Welcome to misalpav.com
लेखक: गंगाधर मुटे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आयुर्वेद आणि होमिओपाथी तरी तपासली आहे का?
बी. ए. एम. एस. आणि बी. एच. एम. एस या अभ्यासक्रमात शिकवले जाणारे उपचार विज्ञानाने तपासलेले असतात. तसं नसतं तर हे अभ्यासक्रम शिकवणारी सरकारमान्य महाविद्यालये नसती. या विषयातील पदव्या देणारी विदयापीठं नसती. "जडी बुटी" वाले आयुर्वेद अर्थातच या कक्षेत येत नाही.
ती कशी चालते तुम्हाला आणि अनिस वाल्यांना?
वाचून अंमळ मौज वाटली. इथे घाटपांडे काकांनी म्हटल्याप्रमाणे माझ्याही नकळत मी "अंनिस" वाला झालो आहे तर. :)

बी. ए. एम. एस. आणि बी. एच. एम. एस या अभ्यासक्रमात शिकवले जाणारे उपचार विज्ञानाने तपासलेले असतात.
तुमची काहीतरी चुकीची समजूत आहे. अशी तपासणी कुठेही झालेली नाही.

लेख पटलेला नाही ...पण कायदा करण्यात आतातायीपणा होत आहे ह्यावर सहमत आहे . एकुणच असे गडबडीने कायदा करणे हा कायदासुववस्था ह्याबबतीत सरकारच्या अपयशाला झाकण्याचा प्रयत्न वाटतोय . कायदा व्हावा पण उगाचच कोणाच्या हत्येचे भांडवल करुन आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन होवु नये ... सारखं सारखं सुप्रीम कोर्टात तोंडावर पडंण बरं नाही. ---डान्सबारची जादु सुरु होण्याच्या प्रतिक्षेत ;)

लेख पटलेला नाही ...पण कायदा करण्यात आतातायीपणा होत आहे ह्यावर सहमत आहे
+१ ------------------
---डान्सबारची जादु सुरु होण्याच्या प्रतिक्षेत
+१११११११११११११

गंगाधर मुटेंचे शेतकर्‍यासम्दर्भात लेखन आवडते आणि सहमत असतो पण .. आज ते सरळ सरळ चुकीचे लिहित आहेत ..कोणत्याही मंत्राने आजवर सर्पदंश उतरलेला नाहिये.. >> त्याला चार माणसांच्या आधाराने चालवत ठेवतात ..खरे तर ह्याने रक्ताभिसरण वाढते आणि रोगी दगवतो >>काही मंत्र उच्चारून दंश झालेल्या शरीराच्या भागातील नसा-धमन्यांवर हातांच्या बोटांच्या साहाय्याने हलकासा उतरता दबाव दिला जातो. जखमेच्या ठिकाणी काही जंगली वनस्पतीची पाने बांधण्यात येतात. >> सर्प दंश झाला त्याठीकाणी चुना लावला जातो. जर विषारी साप चावला असेल तर चुना हिरवा होतो. सर्प दंश झालेल्यास दर काही मिनिटांनी कडुनिंबाचा पाला खायला दिला जातो. निंबाच्या झाडाच्या सालींचा अर्क काढून त्याला पाजण्यात येतो. मंत्रोच्चार करून सतत त्याचा नाकात, कानात आणि तोंडात फुंका मारल्या जातात. त्याला चार माणसांच्या आधाराने चालवत ठेवतात. त्यासोबतच नागदेवतेची आणि अन्य देवांची प्रार्थना व आराधना केली जाते ह्याबद्दल काय म्हणावे ? जर नाग देवता असेल तर चावेलच का? वाईट याचे वाटते की मुटेंसारखा सुजाण कार्यकर्ता याचे समर्थन करतो आहे ! चुकीचे उपचार करणे हा गुन्हा आहे .. सापाप्रमाणेच भुत उतरवणे , अंगात येणे यावर सुद्धा भगत -देवॠषी जे उपचार करतात ..त्यावर सुद्धा कायद्याने बंदी आणली पाहिजे ..

>>>> वाईट याचे वाटते की मुटेंसारखा सुजाण कार्यकर्ता याचे समर्थन करतो आहे ! होना राव. आमचे मुटे साहेब, अशा काही गोष्टींचं समर्थन करतील असं वाटलं नव्हतं. असो, चालायचंच.. :( -दिलीप बिरुटे

२) विंचू (इंगळी) - इंगळी चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता काही अंशी असते. उपचार पद्धती वरीलप्रमाणेच. मुटेसाहेब तुम्ही डॉक्टर हिम्मतराव बावस्कर नांव ऐकले आहे का..? इंगळी किती विषारी असते आणि त्याचे काय काय परिणाम होतात, किती मृत्यू होतात हे अनिल अवचटांच्या "कार्यरत" या पुस्तकामध्ये "विषावर उतारा" या लेखामध्ये वाचायला मिळेल. इंगळी मुळे होणार्‍या विषबाधेवरती उपचार करण्यामध्ये डॉ बावस्कर हे जगभरामध्ये "ऑथॉरिटी" मानले जातात. माझ्या मते - साप, विंचू व इंगळी चावल्यानंतरच्या तुम्ही दिलेल्या परंपरागत उपचारांना फारसा अर्थ नाहीये. आधुनीक विज्ञान शास्त्राकडे उत्तर नाही म्हणून परंपरागत उपचार करावेत हा आग्रह अयोग्य वाटतो.

+१ हिंमतराव बाविस्करांचं बॅरिस्टरचं कार्ट पुस्तक वाचा.... तुम्हाला विंचु दंशाच्या भयानकते विषयी आणि तंत्रमंत्राच्या फोलपणा ची ख्ररी कल्पना येईल... टु अ‍ॅड, विंचुदंशामुळे होणार्या मृत्युंचं जगभरातलं प्रमाण आजही ३-२२% आहे....

विषारी साप चावल्यावर वेळेच्या आत योग्य उपचार झाले नाही तर माणूस हमखास दगावतो. परंपरागत उपचार पद्धतीने जसे सर्प दंश झालेल्यास हमखास वाचवता येत नाही तसेच वैद्यकीय शास्त्राकडेसुद्धा यावर रामबाण औषध नाही. सर्पदंश झाल्यापासून एक तासाच्या आत जर त्याच्यावर दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरू झाले तरच सर्प दंश झालेल्याचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय शास्त्राला काही अंशी यश येते. एकदा जर विष शरीरभर पसरून रक्तात मिसळले तर यावर वैद्यकीय शास्त्राकडे आजतरी रामबाण उपचार नाही. वरील विधाने पूर्णपणे असत्य आहेत फारच क्वचित माणूस एक तासाच्या आत दगावतो आणि ते सुद्धा बर्याच वेळेला त्याने सापाशी झटापट केल्यास साप अनेक वेळा चावल्याने विषप्रभाव मोठ्या प्रमाणात झाल्याने असे होते. वैयक्तिक रित्या मी स्वतः १ ३ विषारी सर्पदंश रुग्ण पाहिलेले आणि उपचार केलेले आहेत. बहुसंख्य लोक सहा ते आठ तास सुद्धा प्रवास करून रुग्णालयात पोहोचून सहज जिवंत राहतात प्रसिद्ध सर्प तज्ञ श्री रोमुलस व्हिटेकर हे तीन वेळा नागराज(king cobra) चावूनही अजून जिवंत आहेत. विषारी सर्पदंश झालेल्या रुग्णास कोणत्याही पारंपारिक पद्धतीने उपचार करून पूर्णपणे बरे करता येते हे मुळीच सिद्ध झालेले नाही. जे पारंपारिक उपचार आपण लिहिलेले आहेत ते विषारी साप चावल्यावर पूर्णपणे निरुपयोगी आहेत. साप चावतो तेंव्हा बर्याच वेळेला त्वचेवर जखम दिसत नाही आणि साप विष आपल्या पोकळ दातातून त्वचेच्या आत खोलवर(इंजेक्शन सारखा) सोडतो त्यामुळे चुना हिरवा वगैरे होत नाही. दुर्दैवाने पारंपारिक पद्धतिचा उपयोग होत नाही हे लक्षात आल्यावर मांत्रिक रुग्णाला सरकारी दवाखान्यात "फुटवतो"(जगाला तर मी जगवला मेला तर सरकारी दवाखान्यात) यात मौल्यवान असा वेळ फुकट जातो आणि रुग्ण मृत्यू च्या अधिक जवळ मात्र जातो. वैद्यकीय भाग तेवढा लिहिला आहे बाकी सामाजिक भाग हा चर्चेचा भाग आहे.

श्री रोमुलस व्हिटेकर हे तीन वेळा नागराज(king cobra) चावूनही अजून जिवंत आहेत.
कात्रज सर्पोद्यान चे संचालक निलीम्कुमार खैरे यांनाहि ७-८ वेळा सर्पदंश झालेला आहे, अशाच एका सर्पदंशामुळे त्यांना एक हात गमवावा लागला (त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती पण शिकाऊ डॉक्टरच्या चुकीमुळे हात कापावा लागला )

अण्णांना (निलीमकुमार खैरे)किंग कोब्रा कधीच चावला नाही (नशीब चांगले आहे त्यांचे :)) त्यांना चावलेले साप सगळे बिग फोर मध्ये येतात. यामुळे अण्णांची महती आणि कार्य कमी होत नाही, किंवा मला तसे म्हणायचे पण नाही. पण मला असे वाटते की, वरती डॉ.खरे साहेबांनी किंग चे उदहरण दिले आहे कारण किंग च्या विषाचे प्रतिविष अजून भारतात उपलब्ध नाही. जे काही वापरले जात ते थाईलंड च्या किंग साठी बनवलेले प्रतिविष आहे. त्यामुळे थोडे जुगाड करून का होईना त्या प्रतीविषाने व्हिटेकर साहेब वाचले. अण्णांच्या हाताला घोणस चावला होता.

"साप चावतो तेंव्हा बर्याच वेळेला त्वचेवर जखम दिसत नाही "??? उलट मी असं वाचलं होतं की साप चावलेल्या जखमेवरून लक्षात येतं की साप विषारी होता की बिनविषारी. जर दातांच्या खुणा एक सारख्या असतील तर तो बहुधा बिनविषारी असतो आणि जर समोरचे दोन दात ठळक उठून दिसत असतील तर तो बहुधा विषारी असतो.

साप चावल्या वर फक्त दाब पट्टी बांधून त्या व्यक्तीला आडवे झोपवावे. (त्याची हालचाल मर्यादित ठेवावी)नंतर त्याला ताबडतोप सरकारी दवाखान्यात 'हलवावे' (हा शब्द महत्वाचा आहे, टेबल उचलून हलवतो तसे)तसेच सरकारी दवाखाना कारण तिकडे अनुभवी डॉक्टर असतात. सर्पदंशाच्या उपचाराला अनुभवी डॉक्टर लागतो तो फक्त सरकारी दवाखान्यात असू शकतो कारण भारतातले सर्पदंश जास्त खेड्यात किंवा शेतात होतात. म्हणून शेतकरी नेहमी सरकारी दवाखान्यात जातात.(सरकारी दवाखान्यात उपचार स्वत असतो: मण्यार चावल्यावर private दवाखान्याचा फक्त प्रतीविषाचा(antivenom) चा खर्च ५०००० ते ६०००० पर्यंत गेलेला मी पहिला आहे आणि तो माणूस वाचला पण नाही) १) जखम धुण्यात वेळ घालवू नये कारण खूप वेळा जखम हि मोठी नसते, साप फक्त दात लावून जातो (दाढी करताना किवा भाजी कापताना जी जखम होते तेवढी). काही पुस्तकामध्ये विषारी सापाच्या दातांचे व्रण दिलेले असतात, तशी जखम व्हायचे प्रमाण खूप कमी असते. त्वचेवरचे विष बघून ओळखणे खूप कठीण आहे कारण विषाला अगदी थोडा पिवळा रंग असतो. डॉक्टर नेहमी रोग्यावरून ठरवतो की कुठल्या सापावरचे प्रतिविष द्यायचे(हे खूप वेळा खूप अवघड असते, त्या साठी मी लिहिले तसा अनुभवी डॉक्टर लागतो) म्हणून जखम धुण्यापेक्षा चावलेला साप कुठला आहे ते आजूबाजूला बघायचा प्रयत्न करा. २)सर्पदंशाच्या जखमेवर कधी पण ब्लेड मारू नये (लोकं ब्लेड मारताना मी पहिले आहे). चुकून नस कापली जावून जास्त रक्तस्त्राव व्हायची शक्यता असते. समजा तसे झाले तर रक्तस्त्रावामुळे ग्लानी येऊ शकते किंवा मृत्यू पण येऊ शकतो.काही बाबतीत मी असे ऐकले आहे कि खराब ब्लेडमुळे जखम सडून गेली आणि डॉक्टर ला प्रतिविष द्यायला त्रास झाला. विष शरीराबाहेर पडू शकत नाही कारण ते खूप लवकर शरीरात पसरते (१०^-९ सेकंदात). सर्पदंशाचे उपचार सोपे नसतात (animal-planet किंवा discovery सारखे ) आणि माणूस वाचल्यावरसुद्धा जखमेमध्ये बाधा होऊन कधी कधी अवयव कापून टाकावा लागतो. त्यामुळे सर्पदंश झाल्या वर जास्त जखमेशी खेळ न करता सरकारी दवाखान्याचा मार्ग पकडावा. सापाचे विष पाण्यासारखे प्यायले तर ..१)पोटात किंव्हा तोंडात जखम (ulcer) असेल तर माणूस मरेल.२) जखम नसेल तर त्याचे पोट बिघडेल smiley (जास्त प्रोटीन पचवणे अवघड असते )

माहितीबद्दल धन्यवाद डॉ. खरे!! श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांना एकदा सिंहगडाच्या पायथ्याजवळ एक अत्यंत दुर्मीळ (आपल्याकडे आढळणार्‍या बिग फोर ग्रूप पैकी नव्हे) पण अत्यंत विषारी साप चावला. त्यानंतर गणपती विसर्जनाच्या गर्दीतून स्वतः चारचाकी गाडी चालवत सिंहगड पायथा ते कात्रज सर्पोद्यान व नंतर पुण्यातील एक हॉस्पीटल असा प्रवास त्यांनी केला. उलट्या, जुलाब, लघवीतून रक्त जाणे व रक्ताचा क्लॉटींग टाईम वाढणे वगैरे त्रास होवूनही ते बरे झाले. या सर्व घटनेचे वर्णन त्यांच्या "आसमंत" या पुस्तकात आहे! तस्मात मुटेसाहेबांचे "साप चावल्यापासून १ तासाच्या आत.." ते गृहीतकही चुकीचे वाटते आहे.

डॉ.श्रीकांत इंगळहळ्ळीकर ना स्लेन्डर कोरल साप चावला होता. हा चावण्याच्या केसेस खूप कमी असतात कारण याचे विषाचे दात मागे असतात आणि तो जास्त करून दाट जंगलात सापडतो. याचे विष नुरोटोक्सिक (मज्जा संस्थेवर परिणाम होणारे ) असते. डॉ.श्रीकांत इंगळहळ्ळीकर त्या सापाचा फोटो काढायला गेले, त्यांनी तो साप बिग फोर मध्ये कधीच पहिला नव्हता त्यामुळे विषारी असेल असे वाटले नाही, बाटली मध्ये त्याला घालताना त्याने त्यांच्या बोटाला दात लावले. कसे बसे करत दुपारी ~४ तासने ते दत्तवाडी च्या हॉस्पिटल (बहुतेक) पोहचले आणि नंतर त्यांच्या वरती उपचार केले गेले.

या कायद्याचा सारांश खाली दिलेला आहे. लोकांचा छळ, फसवणूक, लैंगिक शोषण कुठच्यातरी जादूटोण्याच्या आधारे करणारांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. 'इतर कायदे आहेतच की' हा युक्तिवाद पुरेसा जोरकस नसतो. विशेषतः काही लोकांचा स्वार्थ समाजात पसरलेल्या अज्ञानावर आधारित असतो तेव्हा. माणसाला मारणं हा गुन्हा कायमच होता. त्याविरुद्ध कायदेही होते. पण सतीबंदीसाठी स्वतंत्र कायदा करावा लागला. आणि त्या कायद्याचा फायदाही झाला. सारांश १) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये गुन्हा ठरतील. (भूत उतरविण्यासाठी प्रार्थना, मंत्र म्हटले, पूजा केली तर तो गुन्हा ठरत नाही.) २) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा ठरेल. ३) जिवाला धोका निर्माण होतो, अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करणे हा गुन्हा. ४) गुप्तधन, जारणमरण, करणी, भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य करणे किंवा नरबळी देणे. ५) अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे व न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणे, फसविणे, ठकविणे. हा गुन्हा असेल पण केवळ अंगात येणे हा गुन्हा नाही. ६) एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे. ७) चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण करणे, नग्नावस्थेत धिंड काढणे, रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे. ८) भूत पिशाच्चांना आवाहन करून घबराट निर्माण करणे, मृत्यूची भीती घालणे, भुताच्या कोपामुळे शारीरिक इजा झाली, असे सांगणे. ९) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणे. १०) बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणे. गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे. ११) स्वत:ला विशेष शक्ती असल्याचे सांगून अथवा गेल्या जन्मी पत्नी, प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून लैंगिक संबंध ठेवणे. अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचे आश्वासन देत लैंगिक संबंध ठेवणे. १२) एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा, व्यवसायासाठी करणे.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. :) जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२) http://www.misalpav.com/node/25468

मी म्हणीन, शेतकऱ्याचा विचार करून तळमळीने लिहिलेला लेख आहे, पण शास्त्रीय दृष्ट्या चुकीचा आहे. वरती खरे डॉक्टरांनी आणि अनेक लोकांनी खूप शास्त्रीय प्रतिक्रिया दिल्याच आहेत, त्यात थोडीशी भर घालतो. सुरवाती पासून जातो.. सगळे लोक छोट्या लाल विंचवाला -साधा विंचू आणि काळ्या मोठ्या विंचवाला इंगळी म्हणतात. इंगळी आणि विंचू यात पण सापासारखे प्रकार असतात. खर तर इंगळी दिसायला मोठी दिसते पण तिचे विष कमी तीव्र असते. पण लाल छोटे विंचू दिसयला साधे असले तरी त्यांचे विष जास्त जहाल असते. महाड, अलिबाग, पोलादपूर इथे Hottentotta tamulus concanensis (लाल विंचू) नावाची जी जात सापडते त्याच्या विषाने माणसाच्या मज्जा तंतू आणि रक्तावर वर परिणाम होऊन माणूस दगावतो. त्याच्या वर डॉ. हिम्मतराव बावीसकरांनी स्वस्त उपचार शोधला आहे आणि तो आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये (लान्सेत ) छापला पण आहे त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे तो उपचार वापरून त्यांनी हजारो खेड्यातली लोकं बरी केली आहेत. त्यांनी स्वतः ३०००० डॉक्टरांना ते औषध कसे वापरायचे ते शिकवले आहे. त्या उपचाराचे वर्णन तुम्हाला त्यांच्या पेपर मध्ये सापडेल तो पेपर गुगल वर फुकट उपलब्ध आहे. हे उपचार एवढे स्वस्त आहेत की कोणी पण गरिब ते वापरू शकतो आणि कुठला पण साधा फिजिशियन डॉ. ते करू शकतो. डॉ. बावीसकर पेपर साधा विंचू आणि इंगळी या दोन्ही मला स्वतःला खूप वेळा चावल्या आहेत. त्या वरून माझा अनुभव असा आहे की बोटाला विंचू चावला तर, विंचवाचे विष हातामधून काखेपर्यंत वाहते (तुम्हाला ते सरकत असताना जाणवते, कारण वेदना सरकत जाते )काखेमध्ये एक छोटीशी गाठ येते आणि ती त्या विषाला पुढे जायला रोखते.( मेडिकल स्पष्टीकरण मिपाकर डॉ. खरे देऊ शकतील.) हे सगळे ४-५ तास चालते, हात दुखत राहतो. या वेळी मी कुठले पण उपचार केले नाहीत, फक्त विंचू चावल्यानंतर तो विंचू वरती वर्णलेला नाही ना आहे का हे मी तपासून बघायचो. म्हणजे माझ्या मतानुसार विंचवावरचे पारंपारिक उपचार फक्त रोग्याला मानसिक समाधान देतात, किंवा त्याचे मन दुसरीकडे वळवतात. (लहान मुलं कुठे धडपडली की आई-बाप त्यांना चोकलेट देतात.) आत्ता तुम्ही दिलेल्या वर्णनाप्रमाणे जर Hottentotta tamulus concanensis चावलेला माणसाने पारंपारिक उपचार घेतले तर तो वाचणार नाही. आत्ता आख्ख्या महाराष्ट्रमध्ये १०० लोकांना विंचू चावला तर त्यातील फक्त २० लोकांना हा विंचू चावणार आणि याचा पारंपारिक उपचार करणारे फायदा घेणार. (मी भोंदू बाबां बद्दल बोलत आहे.) या भोंदू बाबांना रोखायचे तर हा कायदा आहे.

महाड, अलिबाग, पोलादपूर इथे Hottentotta tamulus concanensis (लाल विंचू) नावाची जी जात सापडते त्याच्या विषाने माणसाच्या मज्जा तंतू आणि रक्तावर वर परिणाम होऊन माणूस दगावतो.
महाड तालुक्याच्या आधीचा तालुका माणगांव. या माणगांव तालुक्यातील एका खेडेगावात मी लहानाचा मोठा झालो. सहावी ते अकरावी या सात वर्षात गुरे राखली. सुट्टीच्या दिवशी आणि विकडेजला सकाळी मी गुरे चरायला नेत असे. त्यावेळी रानातले दगड हातातील गुरे हाकलायच्या काठीने पलटी करुन मी त्या दगडांखाली असलेले विंचू मी ठेचत असे. सहावी सातवीला असताना गुरे राखायला गेल्यावर माझा हा आवडता उद्योग असे. पुढे डॉ. बावीसकरांबद्दल वाचले. त्यांचे संशोधनपर लेखन वाचले. आणि लक्षात आले डॉ. बावीसकरांनी वर्णन केलेली विंचवाची जात आणि मी लहानपणी खेळ म्हणून ठेचत असलेल्या विंचवाची जात एकच होती. मी खेळ म्हणून जे विंचू मारत असे, त्यातला एखादयाने जरी नांगी मारली असती तर माझाच खेळ खलास झाला असता.

डॉक्टरांचे नाव हिम्मतराव बाविस्कर नसून बावसकर आहे. लाल विंचवाचे विषाचा मोठ्या माणसानवर तेवढा जास्त प्रभाव होत नाही आणी सर्वात जास्त प्रभाव लहान मुलांवर होतो( वजनाच्या प्रमाणात विषाची मात्रा जास्त होते त्यामुळे) लाल विंचू चावल्यावर माणसाच्या रक्ताचा दाब प्रमाणाच्या पेक्षा वाढतो आणी त्यामुळे हृदयाचे काम अस्थिर होऊन रुग्णाला आकडी येते आणी रुग्ण दगावण्याची शक्यता असते यात प्राझोसीन नावाचे औषध शिरेतून दिले जाते आणी रुग्णाचा रक्तदाब नियंत्रित केला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राझोसिन हे औषध विंचवाच्या प्रतीविषापेक्षा जास्त परिणामकारक आहे असे आढळले आहे. प्राझोसीन हे औषध अतिशय स्वस्त आणी कोणत्याही रुग्णालयात नेहेमी वापरले जाणारे औषध आहे. डॉक्टर बावसकरांच्या या संशोधनाने हजारो बाल रुग्णांचे कोकणात जीव वाचले आहेत. रच्याकने- हि सर्व माहिती मला स्वतः डॉक्टर( बावसकर) साहेबांच्या तोंडून ऐकायचे भाग्य लाभले. आम्ही ठाणे जिल्ह्यात एका डॉक्टर म्हसकरांच्या रीसोर्टला गेलो असताना ते स्वतः तेथे आले होते.डॉक्टरसाहेबाना मी( तेंव्हा मी लष्करात डॉक्टर होतो त्यामुळे थोडेसे वजन होते) विनंती केल्यावर त्यांनी तेथे या विषयावर एक छोटेसे भाषण दिले आणी आपले स्वतःचे अनुभव अतिशय सुंदर शब्दात सर्वाना सांगितले. अत्यंत हुशार पण साधा आणी सरळ माणूस आहे हे लगेच कळून येते.त्यांच्या सेवावृत्तीला प्रणाम.

धन्यवाद् ! थोडी चूक झाली. डॉ. बावसकरनी हे प्रयोसीन औषध कसे देतात आणि ते त्यांनी कसे शोधले हे मी त्यांच्या पुस्तकात वाचले होते पण आत्ता इकडे ते पुस्तक माझ्या कडे नसल्याने संदर्भ देता आले नाहीत.

मुटे यांचा लेख वाचला. तर्कसंगत वाटला. एक मुद्दा हत्या का झाली ? कुणी तरी असेच एक बाबा आहेत, त्यांचा भांडाफोड करण्याची घोषणा डॉ. दाभोळकरांनी केली होती. त्यांचे नाव घेतले जात आहे. आणि असे बाबा राज्यकर्त्या पक्षाशी संबंधित असतील तर पुढे काय होणार आपण कल्पना करु शकता.

मुद्दा सरकार व्ययक्तीक जीवनात हस्तक्षेप करत आहे हा आहे प्राध्यापक बिरुटे सर, आनंदिता आणि बाकी बरेच सुशिक्षीत मिपावासी ह्यांना हा कायदा झाला असल्या मुळे बरे वाटले आहे. त्यात चुक पण काही नाही. पण हे लक्षात घ्या की अश्या कायद्याच्या निमित्ताने सरकार तुमच्या व्ययक्तीक विचारधारा ठरवायचा प्रयत्न करत आहे्. आणि हे खुप धोकादायक आहे. मी नास्तिक आहे त्यामुळे समाजात एकदम मायनोरिटी मधे आहे, त्यामुळे मला सरकार अशी सक्ती करु लागले की भीती वाटते. आज तुम्हाला पाहिजे तसा कायदा केला गेलाय. नंतर दुसरे धार्मिक सरकार आले, आणि त्यांनी म्हणले की जे नास्तिक आहेत त्यांना ७ वर्ष तुरुंगात टाका. तर? जर मला आज मांत्रिका कडे जायला सरकार बंदी घालू शकते, तर उद्या दुसरे सरकार मी नास्तिक आहे म्हणुन मला शिक्षा करु शकते. म्हणुनच मी पहिल्यापासुन म्हणतो आहे की हा कायदा जरी आपल्या सर्वांना योग्य वाटत असला तरी सरकारला अशी सक्ती करण्याची संधी देऊ नये.

मी नास्तिक आहे
आणि तरीसुध्धा मांत्रिकावर विश्वास??...कारण मांत्रिकावर विश्वास ठेवणे म्हणजे मंत्रविद्या, त्यांच्या देवता (आणि त्याचबरोबर सगळ्या ३३ कोटी देवांवर विश्वास ठेवणे) तुमच्या घरातल्या व्यक्ती आजारी असतिल असतील तर तुम्ही त्याना डौक्टरकडे कधीच घेउन जायला नको मग...बरोबर??

आणि तरीसुध्धा मांत्रिकावर विश्वास??...
असे मी कधी म्हणले? तुम्ही नीट वाचा मी काय लिहीले आहे ते. लोकांना त्यांच्या मर्जी प्रमाणे मूर्खपणा करायचे ( दुसर्‍यांना त्रास न होता ) व्यक्ती स्वातंत्र आहे की नाही?

मुलांना शाळेत घालणे हे पालकांचे पालकांचे कर्तव्य आहे तसेच योग्य उपचार करणे हे पिडीत व्यक्ती सोबतच्या लोकांचे कर्तव्य आहे . असे उपचार मिळणे हा लोकांचा हक्क हक्क आहे . हा कायदा योग्य उपचार देण्यासाठी आणि अयोग्य उपचारांपासून वाचण्यास मदत करेल . यात कोणत्याही वैयक्तिक हक्कावर गदा येत नाही . हा कायदा आस्तिक असण्याला , देवाची उपासना करण्यास विरोध करत नहि.

जादूटोणा-विरोधी कायदा या नावाने येऊ घातलेल्या कायद्यामध्ये एक कलम असेही आहे की ते कलम आजवरच्या अनेक कायद्याप्रमाणे शेतकर्‍यांच्याच गच्चीवर बसेल असे दिसत आहे. कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे.
मुळातले कलम काय आहे सांगु शकाल काय? (पेपरात आलेले सारांश नव्हे. आजकाल पेपरात जे येते त्यात सारे काही सत्य मिळाले तर पेढे वाटले जातात म्हणणे ;) ) ते वाचल्याशिवाय लेखातील भावनेशी सहमती/असहमती शक्य नाही

अहो कायदा अथवा वटहुकूम लांब राहीला... हे सरकारी संस्थळावरून पाहीले.... मंत्रिमंडळ त्रिर्णय 21 ऑगस्ट, 2112 (मंत्रिमंडळ बैठक क्र. 129) हे वाचले तर समजेल की अधिकृत नोंदींमधे वटहुकूम काढला जावा ही जी काही बातमी माध्यमांमधे आली आहे त्याची साधी नोंदही नाही आहे. :(