चांगलं परिक्षण. पण "एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल." हे वाक्य गरजेचे नव्हते. श्रीलंकेत सैन्य पाठवणे ही भारताची चुक असेलही. पण पाकिस्तानला नष्ट न करणे ही त्याहुन मोठी चुक ठरेल. पण परिक्षण आवडले आहे. चित्रपटाच्या शेवटाचा अंदाज आला आहे. बहुदा वाईट शेवटच असणार.
>>>>एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी....नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन....
हे अनावश्यक तर आहेच पण देशाभिमान बाळगणार्या बहुसंख्यांच्या भावनांना कमी लेखणारं, अपमानास्पद विधान आहे.
लेखकाला जर त्या मनोवृत्तीत कांही चूक दिसत असेल तर फारातफार आपण पाकीस्तान विरुद्ध युद्धाची भाषा करण्यात काय चुक करीत आहोत हे जाणवलं असं म्हंटलं असतं तरी त्याचा स्विकार झाला असता. पण स्वतःला इतर सर्वसामान्यांपासून वेगळे ठसवून, न्यायाधिशाच्या भूमिकेतून, इतरांवर आसूड ओढणे पटत नाही. लेखाचा समतोल बिघडतो आहे.
पाकिस्तानच्या गेल्या कित्येक वर्षापासून चालत आलेल्या भीषण कुरापती पाहिल्या आणि त्यावरील प्रतिक्रिया म्हणून भारत सातत्त्याने चर्चेचे गुर्हाळ चालू ठेवण्याची भाषा करीत असेल तर सामान्य माणसांचा संताप होणं अनैसर्गिक आहे का? जी सामान्य जनता 'एसीत बसून....' (लेखकाचा शब्दप्रयोग आहे, माझा नाही.) मिळकतकर भरते (ज्यावर भारताचे सैन्य आणि इतर आवश्यक गरजा भागविल्या जातात) त्यांना मतप्रदर्शनाचाही हक्क असू नये? 'भारतिय सैन्य पाकिस्तान सारख्या देशासाठी भारी आहे' असे आपण अनेकदा ऐकत आलो आहोत. पण त्या सैन्याचा आपण वापरच करणार नसलो तर सर्व सैन्य दले बरखास्त करुन फक्त चर्चेची गुर्हाळे चालवणारी मंडळे स्थापन करा. निदान देशाचा खर्च तरी कमी होईल.
आपल्या जवळ प्रबळ सैन्य आहे ह्याचा अर्थ आपण वारंवार युद्धाचीच भाषा आणि कृती करावी असे मी म्हणत नाही. पण आपल्या देशात घातपाती कारवायां करणार्या, सीमेवर आपल्या सैनिकांचा शिरच्छेद करून त्यांचे मुंडके पळविणार्या, शस्त्रसंधीला हरताळ फासणार्या देशाला वचक बसेल, कारवायांना चाप बसेल असा जर आपल्या सैन्याचा योग्य वापर केला नाही तर ती दूर्बलाची सहिष्णुता ठरेल. असो.
दुसरा मुद्दा.
सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.
महाराष्ट्र कमजोर नव्हता. औरंगजेबाच्या साम्राज्यासमोर आकाराने आणि वयाने लहान होता. पण काटक होता, शूर होता, धाडसी आणि चतुर राज्यकर्ता लाभलेला सक्षम प्रदेश होता. म्हणजे आक्रमण नाही केलं तर त्याला 'कमजोर' म्हणून हिणवायचं आणि युद्धाची भाषा जरी केली तरी त्याला 'युद्धखोर' म्हणायचं. असं दुटप्पी धोरण योग्य वाटतं का? पेशव्यांच्या काळात दिल्लीचं राजकारण पुण्यातून चालायचं, दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार हे पेशवे ठरवायचे आणि राघोबांनी अटकेपार झेंडे रोवले वगैरे वगैरे वाचण्यात आले आहे. इंग्रजांनाही इतर प्रदेशांच्या मानाने महाराष्ट्र सहजासहजी नाही मिळाला. महाराष्ट्राने चिवट झुंज दिली त्या महाराष्ट्राला कमजोर म्हणणं कुठल्या नितीत बसतं? असो.
चित्रपट नक्कीच पाहिला जाईल.
छान परिक्षण.
पण त्यानिमित्ताने तुम्ही मांडलेला युद्धाबद्दलचा प्वाईंटाचा मुद्दा अर्धसत्य आहे...
दर वेळा युद्ध करणे मुर्खपणाचे आहे हे निश्चीतच... कारण सर्वात यशस्वी युद्ध म्हणजे एकही गोळी न झाडता आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता युद्धाची सर्व उद्दिष्ट्ये साध्य करणे... ह्या दुसर्या (योग्य युद्धसज्जता असणे, ती वेळप्रसंगी वापरली जाईलच याची "शत्रूला" खात्री असणे, आंतरराष्ट्रीय राजकारणातील वजन, इ.) बाजूसंबद्धात भारताची काय अवस्था आहे ते जगजाहीर आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा आपले हितशत्रू सतत घेत आहेत हे रोजच्या वर्तमानपत्रात आपण वाचतोच आहोत. मला वाटते सर्वसाधारण जनता अशा सततच्या भारतीय अपयशाने निराश होऊन अशी आतताई विधाने करते. पण म्हणून त्या सत्याची दुसरी बाजू विसरून फक्त जनतेला (जरी ते मत मला पटत नसले तरी) दोष देणे अस्थाई आहे.
कोणीतरी म्हटलेच आहे की, "अर्धसत्य हे पूर्ण असत्यापेक्षा अधिक घातक असते."
एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल.
या भागाबद्दल जरा शंका आहे. कारण युद्धखोरी ही पाकिस्तानकडून होते आहे आणि आपले सैनिक केवळ हकनाक बळी जात आहेत असे साधारणपणे दिसते.
अनेकदा आपला देश हा बळी आहे आणि समोरचा शत्रू हा आक्रमक हा गंड सर्वच देशात आढळतो. पण १९७१ मध्ये आपण पाकिस्तान चे २ तुकडे केले होते हे आपल्या देशाच्या प्रेमापोटी आपण विसरतो. टाळी एका हाताने वाजत नाही हा वैश्विक नियम इथे पण लागू होतोच. पाकिस्तान ला बॅड बॉय म्हणून चालणार नाही. आपण पण अनेकवेळा त्याना सतावल आहे. एका देशाचे दोन तुकडे करणे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. अजुन पण पाकिस्तान त्या धक्क्यातून सावरल नाही. प्रचंड कडवट पणा आला आहे त्यांच्यामध्ये. श्रीलंका प्रकरणात पण भारताने गरज नसताना शांति फौज पाठवून त्यांची मुस्काटदाआबी केली. खर तर तो श्रीलंकेचा अंतर्गत प्रश्न होता. जेंव्हा आपले ५ जवान मारले गेले त्या आधी भारतीय सेना ने पाक व्याप्त काश्मीर मध्ये घुसून ४ आतँकवाड्यांची गाठडि वळली होति. http://www.indianexpress.com/news/a-link--days-ago-army--killed-5-pak-infiltrators/1152242/आपली प्रतिष्ठा वाचवायला त्याना हे करणे भागच होते. हा टॉम अँड जेर्री चा खेळ तिथे नेहमीच चालतो. सांगायचा मुद्दा हा की आपण विक्टिम आहोत हा सर्वसामान्य माणसाचा गंड आहे तो तितकस्सा खरा नाही.
अनेकदा आपला देश हा बळी आहे आणि समोरचा शत्रू हा आक्रमक हा गंड सर्वच देशात आढळतो.
पाकीस्तानने १९४७ साली काश्मिरात सैन्य घुसवून, अफगाणी टोळ्या घुसवून काश्मिरचा लचका तोडला. हल्लीच्या कालखंडात दाऊद सारख्याला आश्रय देऊन भारतात घातपाती कारवाया घडवून आणल्या, १९७१ चे कित्येक सैनिक अ़़जून पाक कैदेत खितपत पडले आहेत, भारता विरुद्ध घातपात करण्यासाठी प्रशिक्षण शिबीरे चालवली, आतंकवाद्यांना प्रशिक्षित केले, इन्डियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून आतंकवाद्यांना सोडविणार्यांना पाकिस्तानात थारा दिला, हाफिज सईद राजरोसपणे पाकिस्तानात फिरतो आहे, कसाब सारख्या १० जणांना भारतात पाठवून हा:हा:कार माजविला, अनेक कोळी बांधवांना पकडून डांबून ठेवले, गेले आठवडाभर सीमेवर गोळीबार वगैरे केला..... हे सर्वही भारतिय जनतेचे गंडच आहेत का??
मान्य की सरकार कडून जनतेची दिशाभूल केली जाते. पण वरील सर्व घटना घडल्या आहेत आणि त्याचे पुरावेही भारताने वारंवार दिले आहेत. की भारतच कुरापतखोर आहे, आतंकवादी कारवाया करणारा आहे आणि सभ्य आणि सोज्वळ पाकिस्तान विरुद्ध कांगावा करत आहे असे समजायचे?
हरीसिंगांचे, 'लष्कर पाठवून काश्मिरला वाचवा हे विनंती पत्र घेऊन' हरीसिंगांचा वकील ३ दिवस दिल्लीत बसून होता. पंडीत नेहरूंनी त्याला भेट दिली नाही. नेहरूंचा आग्रह होता 'आधी विलीनीकरणावर सही करा.' म्हणजेच विलीनीकरणाचा आग्रह नेहरूंचा होता हरीसिंगांचा नाही. हरीसिंगांना स्वतंत्र राहायचे होते. आधी मुस्लिमबहुल काश्मिरला पाकिस्तान सोबत जायचे होते परंतु अफगाण टोळ्यांनी जे अनन्वित अत्याचार आणि बलात्कार केले त्याने जनता बिथरली आणि त्यांनी भारताबरोबर राहणे पसंद केले. काश्मिरात जनमताचा कौल घेण्यात यावा अशी मागणी पाकिस्तानने केली परंतु शेख अब्दुल्ला (त्यावेळचे हरिसिंगांचे विरोधक आणि नेहरूंचे मित्र) कारावासात होते त्यांना आधी मोकळे करा आणि मग जनमताचा कौल घ्या असे नेहरूंनी सांगितले.
तात्पर्यः
१) हरिसिंगांच्या आग्रहाखातीर हा मुद्दा चुकीचा आहे.
२) प्रथम पाकीस्तानाबरोबर जाणारी जनता अफगाणी अत्याचारांनंतर भारतातच राहू इच्छित होती.
३) मुस्लिम नेता शेख अब्दुल्लाला सोडल्यास तो जनमत पाकिस्तानच्या बाजूने वळवेल अशी भिती असूनही विरोधी नेत्याला कारावासात ठेवून निष्पक्षपाती जनमत होणार नाही ही भारताची भूमिका होती.
अफगाणी टोळ्या काश्मिरात पाठवून आपली चुक झाली, काश्मिरी जनता आपल्या विरोधात गेली आहे हे पाकिस्तानच्या लक्षात येऊन जेवढा काश्मिरचा भाग मिळाला होता (नेहरूंमुळे) तो पाकिस्तानने दाबून ठेवून लगेच तिथे आपला 'पंतप्रधान' जाहिर करून टाकला. त्यामुळे पाकिस्तानात गेल्यास आपला पंतप्रधानपदाचा दावा फोल ठरणार हे लक्षात येऊन आणि जनतेचा कौल भारताकडे वळल्याचे लक्षात घेऊन शेख अब्दुल्लाने भारताबरोबर राहण्याचे पसंद केले आणि स्वतंत्र भारताच्या काश्मिरवर 'पंतप्रधान'की चा दावा केला, पद मिळविले. शेख अब्दुल्लांनाही स्वतंत्र काश्मिर हवे होते पण ते शक्य नाही हे लक्षात येताच त्यांनी त्या प्रदेशा करीता वेगळे कायदे कानून बनवून भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळा दर्जा मिळवून घेतला. (नेहरूंमुळेच हे शक्य झाले.) भारतीय सैन्य अफगाणी टोळ्यांस काश्मिर बाहेर हुसकून लावित असतानाच नेहरूंनी शस्त्र संधी घडवून आणली आणि सैन्य कारवाई थांबविली.
जरी काश्मिर पाकीस्तानात जायला पाहिजे होता असे मानले तर त्याच न्यायाने हैद्राबादही पाकिस्तानात जायला पाहिजे होते तसेचे बांगला देश हा पूर्व पाकिस्तानम्हणून होताच. काश्मिर पाकीस्तानात गेला असता तर पाकिस्तान आणि चीनला भारताची राजधानी अगदी हाताशी आली असती. तसेच पाकिस्तान, चीन, हैदराबाद (पाकीस्तान) आणि पूर्व पाकिस्तान अशा शत्रूंनी घेरलेल्या भारतास शांतता, सुरक्षितता आणि प्रगती साधण्याची संधी नसती मिळाली. सामरि़कदृष्ट्या असुरक्षित भारत मागे पडला असता.
तुम्हाला ज्ञात असलेला इतिहास तितकासा खरा नाही.
असो, ह्या विषयावर इथे मिपावरच इतके चर्वित-चर्वण झाले आहे की आता पुन्हा पुनरुक्ती करायची इच्छा नाही. त्यामुळे तूर्तास इतकेच.
माझे वाचन खूप कमी आहे, हे मी आधीच मान्य करतो.
काश्मिर किंवा युद्ध विषयावर (फक्त भारतीय) कुठे वाचावे ? आंतरराष्ट्रीय माध्यम म्हणजे काय ? नुसते गुगल करून लाख लिंका मिळतात पण तुम्ही नक्की कुठे वाचन करतात ?
अमोल उदगिरकरसाहेब,
तुमच्या, 'आंतर राष्ट्रीय माध्यम वाचा विकी पेक्षा' आणि 'तुमचे वाचन (या मुद्द्या वरच) खूप कमी आहे.' ह्या दोन्ही अभिप्रायांमधून तुम्ही व्यक्त केलेला वयाचा आणि कर्तृत्वाचा आदर पाहून गहिवरून आले.
दुसर्याला, 'मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलित तर अजुन आनंद होईल.' असा सल्ला देताना स्वतः मात्र दुसर्यावर ती व्यक्ती 'विकी वाचूनच प्रतिक्रिया देते आहे' आणि त्या व्यक्तीचे 'वाचन खूप कमी आहे असा अप्रत्यक्ष वैयक्तिक आरोप करायचा' तसेच, स्वतः मात्र रेडिफ आणि विकीच्याच लिंका द्यायच्या हा दुटप्पीपणा गमतीशीर आहे.
माझा आंतरजाल आणि विकी वगैरेशी संबंध यायच्या कितीतरी आधी, जम्मू आणि काश्मिरचे गव्हर्नर श्री जगमोहने ह्यांचे 'धुमसते बर्फ' हे पुस्तक माझ्या वाचनात आले होते. माझा काश्मिर ह्या विषयावर तुमच्या इतका अभ्यास नसेलही कदाचित पण श्री. जगमोहन हे काश्मिरचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी इतिहास अभ्यासूनच पुस्तक लिहीले आहे असा माझा विश्वास आहे. तसे नसेल तर तेही माझ्यासारखेच अज्ञानी आणि विचारांनी उथळ असले पाहिजेत.
माझे चुकते आहे, माझे ज्ञान (ह्या विषयातले) तोकडे आहे असे आपणांस वाटत आहे तर मी कुठले पुस्तक वाचू म्हणजे आपल्यासारखा ज्ञानी होईन ते सांगावे. मी जरूर जरूर वाचेन. मला तुमच्या सारखे ज्ञानी व्हावयास आवडेल.
पुन्हा काही अर्धसत्ये...
...पण १९७१ मध्ये आपण पाकिस्तान चे २ तुकडे केले होते....
भारताच्या कारवाईने बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून आस्तित्वात आला. पण त्या अगोदर पाकिस्तानने तेथे काय केले आणि त्याचे भारतावर काय परिणाम झाले याबद्दलची सत्य परिस्थिती जगजाहीर असतानासुद्धा असले अतीटोकाचे आणि एकतर्फी विधान ???
जेंव्हा आपले ५ जवान मारले गेले त्या आधी भारतीय सेना ने पाक व्याप्त काश्मीर मध्ये घुसून ४ आतँकवाड्यांची गाठडि वळली होति.
म्हणजे आतंकवादी आणि एखाद्या सार्वभौम राष्ट्राचे सैनीक एकाच तराजूत मोजायचे काय? शिवाय एका राष्ट्राला आतंकवादी पोसण्याची आणि त्यांना दुसर्या राष्ट्रात घुसवण्याची परवानगी आहे पण दुसर्याने त्याबाबत काही कारवाई केली तर नाराज व्हायची तरतूद पण आहे. या प्रकाराला मराठीत कांगावा आणि इंग्लीश्मध्ये हायपोक्रसी म्हणतात. भारताचे दुर्दैव असे की (१) भारताला अश्या हायपोक्रसीत पीएच् डी केलेले शेजारी आहेत, (२) त्यांचा तात्विक मुकाबला करण्यात भारत सतत कमी पडतो आहे आणि (३) शिवाय वर तथाकथीत भारतिय "विचार्वंत" आपले शेजारी आणि त्यांचे भाडोत्री आतंकवादी यांची तळी उचलून धरण्यासाठी चढाओढ करत असतात ! हे केवळ माझे स्वतःचेच मत नाही तर याबाबत चर्चा करत असताना पुढारलेल्या आणि पुरोगामी मानल्या गेलेल्या देशाच्या सुशिक्षीत नागरिकांनी ह्या वस्तुस्थितीबद्दल अनेकदा आश्चर्य व्यक्त केले आहे आणि काहीवेळेस तेथे हजर असलेल्या शेजारी राष्ट्राच्या नागरिकाने खुशीने डोळ्यांची सूचक हालचाल करत गप्प राहणे पसंत केलेले आहे.
केवळ थक्क झालो आहे !
जर तुम्हाला असे वाटत असेल की ती कारवाई दहशतवाद्यानी केली तर तुम्हाला सलाम. ती कारवाई पाकिस्तानी सैनिक दलानी केली. BAT या पाथकानी. १९७१ मध्ये आपण मुक्तिवाहिनी या त्याकाळच्या दहशतवादी पाथकाला सपोर्ट केला होता. आणि इंदिरा जिंच्या काळात तमिळ गणिमाना. जमल तर अभ्यास वाढवा आणि आपला देश निष्पाप आहे हे डोक्यातून काढा.आणि भारतीय प्रसारमाध्यमावर विसंबून न राहता काही आंतर राष्ट्रीय माध्यम पण बघा. १९६५ च युद्ध का आपण जिंकलो नाहीत. कारगिल मधली काही शिखर अजुन का पाकिस्तान च्या ताब्यात आहे ही पण उत्तर मिळतील. आणि . म्हाजे या मुद्द्यावार भावनत्मकतन होता भरपूर वाचन करा. तुमच्या ज्यष्ठेतेचा आदर आहेच. काही विदा हवा असेल तर खर्ड वहित कळवा.
The invading Indian forces outfought their Pakistani counterparts and halted their attack on the outskirts of Lahore, Pakistan's second-largest city. By the time United Nations intervened on September 22, Pakistan had suffered a clear defeat.
डेव्हिन हेगर्टी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ञ आहेत,MIT-केम्ब्रिज इथे प्रोफेसर आहेत, भारतीय उपखंड आणि तेथील राजकारण यावर बरेच वर्ष ते लिहित आहेत.
याउलट तुम्ही दिलेल्या लिंक्स मधील व्यक्ती जसे कि
१. मेहमूद शाम, जंग ग्रुप - पाकिस्तान …यांचे विचार पूर्ण बायस आहेत.
२. मदन सिंग - यांची आंतरराष्ट्रीय सोडाच पण राष्ट्रीय ओळख नीटशी नाही
३. केव्हिन थालेरस्मिथ - हा मिपावरील '१ आठवडा जुना सदस्य' या तोडीचा आहे.
Perceptions. सत्य आपल्याला वाटत तेवढ एकतर्फी नाही हा संदेश मिळाला तरी खूप आहे. १९७१ च युद्ध आपण एकतर्फी जिंकल होत त्याबद्दल कुठेही विवाद नाहीत. १९६५ च युद्ध तस नव्हत .गूगल वर सर्च केलात तर १९६५ च्या युद्ध वर खूप विदा मिळेल
खरच तस नाही. त्यांच्या सारख्या ज्येष्ठ सदस्याला अपमानीत करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. शब्द रचना चुकली असल्यास क्षमस्व. मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलित तर अजुन आनंद होईल.
कारगिल मधली काही शिखर अजुन का पाकिस्तान च्या ताब्यात आहे ही पण उत्तर मिळतील.
या वर तुम्ही पूर्वीही लिहिले आहेच. एक लक्षात घ्या, लष्करी कारवाई पूर्ण जोमाने करणे लष्कराच्या हातात असते; पण दर वेळी १००% मिळेल याची खात्री कुणीच देवू शकत नाही. तुम्ही त्या चर्चेच्या वेळी दिलेल्या दुव्यात लिहिले होते की भारतानेही त्या भौगोलिक प्रदेशात यापूर्वी स्वतःच्या ताब्यात नसलेली शिखरे ताब्यात घेतली आहेत व एका कारवाईत अपयश आल्याने इथे उल्लेखलेली ताब्यात येऊ शकली नाही. पण पूर्वी ताब्यात नसलेली शिखरे आता असल्याने पाकिस्तानी लष्कराला काबूत ठेवणे भारतीय लष्करासाठी पूर्वीपेक्षा सोपे आहे.
अन हाच मुद्दा जर सियाचिनला लावला तर?
बाकी परिक्षण आवडले. हा चित्रपट मी कालच पाहिला.
मात्र या परिक्षणातील ऐतिहासिक दाखले देणार्या काही वाक्यांची मांडणी खटकली.
मान्य. पण कारगिल मध्ये गमावलेला पूर्ण भू भाग आपण अनेक शूर जवान गमावून आपण मिळवू शकलो नाहीत हे सत्य दशंगुले व्यापून उरतेच. कुठलेही लष्कर १०० % देऊन पण नेहमी यश मिळवेळच याची खात्री नाही या तुमच्या विधानाशी सहमत. पाकिस्तान हा खूप कमजोर देश असून आपण त्यांच्या पेक्षा खूप सामर्थ्य शाली आहोत असे मत असणार्या लोकाा हे कळले तर बरे होईल.
सदर लष्करी घडामोडींत कारगिल युद्धापूर्वी एकमेकांच्या ताब्यात असणार्या शिखरांची अदलाबदल झाली. भारतीय लष्कराने एकतर्फी नुकसान सहन केलेले नाहीये.
१९९९ नंतर कारगिलसारख्या मोहिमेची पुनरावॄत्ती करणे पाकिस्तानी लष्कराला अगदी थोड्या प्रमाणातही शक्य झालेले नाहीये. इतकेच नव्हे भौगोलिक क्लिष्टतेचा लाभ उठवून अतिरेक्यांना पाकव्याप्त काश्मिरातून नियंत्रणरेषेच्या भारतीय बाजूला घुसवणेही पूर्वीपेक्षा लक्षणीयरित्या कमी झाले.
१९९९ नंतर पाकिस्तानी लष्कराविरुद्ध कुठलीही कारवाई करणे आपल्याला पण शक्य झाले नाही. संसदेवर हलला झाल्यावर आपण खूप मोठे लष्कर सिमे वर नेऊन ठेवले होते. पण आपण काहीही केल नाही. त्यावेळेस कॉंग्रेस वालयानी भाजप सरकार वर टीका केली आता भाजप वाले कॉंग्रेस वर टीका करतात. आणि आपल्याला वाटत की राजकीय इच्छाशक्ती अभावी आपण काही करत नाही. पण मुळात दोन्ही बाजू ला असणारी अण्वस्त्र आणि भारतीय लष्कराने हरवलेला एज हे मुख्य कारण आआहेत हे दोन्ही पक्षाना (कॉंग्रेस आणि भाजप) चांगले माहीत आहे. त्यामुळे भविष्य काळात पण प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता नाही च्या बरोबर आहे.
१९९९ पाक लष्कराने कारगिलसारखी आगळीक केलीच नसल्याने पाक लष्कराविरुद्ध थेट कारवाई करण्यासारखे कारण कुठे होते?
दोन्ही राष्ट्रे अण्वस्त्रसज्ज असल्याने मोठे युद्ध (कारगिलचे युद्धदेखील या श्रेणीत बसू शकत नाही) टळले आहे; या बाबत तुमच्या मताशी सहमत.
बाकी भारतीय लष्कराच्या २००१ मधल्या नियंत्रणरेषेपलिकडील धडक कारवाईचे उदाहरण इथे चर्चिले गेले आहेच.
भारतीय संसदेवर झालेला हलला, मुंबई हल्ला असे अनेक पाक पुरस्कृत हल्ले देशात झाले. पण सिमे वर लष्कराची जमाजमव करण्या पलीकडे आपण काही केली नाही. आणि भारतीय लष्कर सिमे पलीकडे जौन कारवाई कसे करते याचे उदाहरण देऊन तुम्ही चांगले केले. इथे लोकाणा वाटते की पाकिस्तानी लष्कर इथे कधी पण येते आणि आपल्या गरीब लष्करावर हल्ले करते. माझा पॉइण्ट हाच आहे. Nobody is clean here. भारत पण नाही.
नियंत्रणरेषेच्या भारतीय बाजूने पाकव्याप्त काश्मिरमध्ये अतिरेकी घुसवण्याची भारतीय लष्कराचा प्रयत्न पाकिस्तानने हाणून पाडला अशी बातमी एकदा तरी कुठेही वाचली आहे का? पाकिस्तानी लष्कर भारतीय भूभागात होणार्या अतिरेकी कारवायांसाठी प्रत्यक्ष काम करते.
नियंत्रण रेषेच्या पाकिस्तानी बाजूचे अतिरेकी तळ त्या कारवाईमध्ये नेस्तनाबूत केले गेले होते. अचानक केलेली कारवाई १००% यशस्वी पार पाडल्याने व कुठलाही पुरावा मागे न सोडल्याने पाकीस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे अजिबात भांडवल करू शकला नाही.
अन पाकिस्तानवर टिका होते कारण त्यांच्या लष्कराने भारतीय लष्कराबरोबर युद्धबंदीचा तह केलेला आहे. असा कुठलाही तह झालेला नसता तर गोष्ट वेगळी होती.
...जर तुम्हाला असे वाटत असेल की ती कारवाई दहशतवाद्यानी केली तर तुम्हाला सलाम. ती कारवाई पाकिस्तानी सैनिक दलानी केली. BAT या पाथकानी. साहेब, या अमुल्य शिक्षणाबद्दल अनेकानेक धन्यवाद !
अशी विषय भरकटवणारी कॉमेंट (अशा गोष्टिबद्दल की जी वर्तमानपत्रातसुद्धा चावून चोथा झाली आहे) आली की समोरच्याला प्रतिवाद न सापडल्याने आता विवाद न करता वितंडवाद करायचा आहे हे आम्ही फार पूर्वीच शिकलोय... आणि माझा हा अंदाज खरेच चुकीचा असला तर तुम्ही प्रथम तुमचा प्रतिसाद (ज्यावर मी प्रतिसाद लिहिला) वाचावा आणि मग तुमचा स्वतःचा वरचा प्रतिसाद वाचावा अशी विनंती करतो.
तोपर्यंत विनयाने एवढेच सांगतो की मी जे काही लिहिले आहे त्याच्या मागे आंधळी / भडक देशभक्ती नसून काही तपे अनेक संबद्धीत लोकांबरोबरच्या प्रत्यक्ष संबद्धातून अनुभवलेले व ऐकलेले सत्य आहे. किमान दिवाणखान्यात बसून अथवा जालावरचा काही विदा वाचून बनवलेले मत तर आजिबात नाही याची खात्री असू द्यावी.
जमल्यास वर सांगितल्याप्रमाणे करावे, मग बोलू. अन्यथा आमचा रामराम घ्यावा ही विनंती.
अनेकदा आपला देश हा बळी आहे आणि समोरचा शत्रू हा आक्रमक हा गंड सर्वच देशात आढळतो.श्रीलंका प्रकरणात पण भारताने गरज नसताना शांति फौज पाठवून त्यांची मुस्काटदाआबी केली. खर तर तो श्रीलंकेचा अंतर्गत प्रश्न होता.
ही वाक्ये फार विचारपुर्वक वाचली, आणि त्यात तथ्यांस जाणवला . आपण जे काही हलके पणाने वाचतो,जसे की आपण काश्मिर प्रश्न हा युनोत न्यायला नको होता...किंवा आपला देश हा दुसर्या देशामधे काहीही ढवळाढवळ
करत नाही.... हे कदाचीत काहीसे खरे नसावे. पाकिस्तान हा आपला भारत देश सिंध वेगळे करण्यास फुस
देतो हा आरोप कायम करतच असतो. सरबजीत सिंगा वरील आरोपा विषयी भारताने कधीही पक्का पावित्रा घेतला
नाही. आपले गुप्तचर हे परदेशात काही प्रमाणात सक्रिय असतीलच.
तसेच आपल्या आजच्या आतराष्ट्रीय सीमा ह्या ब्रिटीशा च्या साम्राज्यवादाचीच देण आहे. म्हणुन पुरवोत्तर राज्ये आज आपल्या भारतात आहेत.व त्यामुळेच चीनशी सीमावाद आहे.आनी जगात असा कोणताही देश नाही की त्याचा शेजारील देशाशी सीमावाद नाहि.
खर्या गोष्टी जेव्हा अचुक सदंर्भ ग्रथं वाचायला मिळतील तेव्हाच त्या समजतात. नाहीतर एकीव माहीतीच्या आधारे
फक्त रक्त उसळते. ( पण म्हणुन पाकिस्तान/चीन चे चुकत नाही असे नाही. त्यान त्याबद्दल किंमत चुकवाविच लागेल हा विश्वाचा नियमच आहे. आठवा १९५०-६० मधील अमेरीकेची आतर राष्ट्रीय ढवळाढवळ...व आजची त्या देशाची स्थिती.)
परीक्षण अतिशय उत्तम आहे आणि उत्कंठा वाढवणारे आहे. त्यामुळे आता चित्रपट नक्की पहावा लागेल.
मला तरी त्यांचे युद्धखोरिबद्दलचे विधान बरोबर वाटते. उगीच कशाचाही अनुभव नसताना आणि किती हानी होईल याची कल्पना नसताना जे लोक सदानकदा हल्ला करा हल्ला करा असे म्हणतात यांना तो सल्ला होता की जर सारासार विचार करा आणि पहा की या युद्धामुळे किती नुकसान होते. फक्त घरदार नव्हे तर मनुष्य आणि शेती, झाडे पशुपक्षी सगळ्यांचाच प्राण जातो. आणि त्यामुळे देश जो कर्जबाजारी होईल ती गोष्ट निराळीच.
अमेरिकेचा हल्ला आणि आपला हल्ला यात मुलभूत फरक आहे - कधीही त्यांच्या सीमेवर प्रत्यक्ष युद्ध झालेले नाही. पोलंड युक्रेन लेबेनॉन यांसारख्या देशातील नागरिक सांगतील उगीच कारण नसताना युद्ध करून काही फायदा होणार नाही.
दहशदवादी हल्ले होतात त्यात सगळीकडून येत असतात - नुसता पाकिस्तान नाही तर आता नेपाळ बांगलादेश चीन असे बरेच देश आहेत. आणि एका युद्धामुळे देश कमजोर झाला की दुसरीकडून आक्रमण करायला हेच टपून बसले आहेत.
हे हल्ले खरे तर अंतर्गत सुरक्षा आणि गुप्तहेर खाते मजबूत करून थांबवायला पाहिजेत. आणि त्या उग्रवाद्यांना जास्ती उचल मिळू नये म्हणून उलट पाकिस्तानात लोकशाही स्थिर सरकार असायला पाहिजे.
एक पॉलीटीकल थ्रिलर म्हणून चित्रपट चांगला आहे आवडला,चित्रपटाचा पेस काही ठिकाणी खूप कमी झालाय.
मद्रास कॅफे वर स्पाय गेम आणि ब्ल्याक हॉक डाऊन ची छाप दिसली
बाकी युद्ध हि न परवडणारी गोष्ट आहे ती न झालेलीच चांगली
शान्ति सेना पाठवण्यामागची सांगायची कारणे आणी खरी कारणे वेगळी आहेत असे माझे मत आहे. श्रीलंकेतील स्वतंत्र तमिळ इलमची चळवळ आणि भारतातील दाक्शिणात्यांचा स्वतंत्र देशाची (द्रवीड्नाडु) चळवळ ह्यात नेहमीच सख्य होते. जर का तमिळ इलम अस्तित्वात आले असते तर तमिळनाडुमध्ये तमिळ इलमला सामील होण्यासाठीच्या मागणीने नक्किच उग्र रूप धारण केले असते. शांतीसेनेने लिट्टेला दुबळे केले व भारतातला अजून एक संभाव्य फुटिरतावाद टाळला.
शांति सेना ने तामिळ आतँकवाड्याना कमजोर केले? खूपच विनोदी विधान. उलट भारतीय सेने ला खूप हानी होऊन माघार घ्यावी लागली. आणि नतर ते कधी नव्हते एवढे ताकदवान झाले. आपल्या एका हिंदू हृदय सम्राताणी तमिळ हिंदू आहेत म्हणून त्याना नैतिक पाठिंबा दिल्याचे स्मरते
शांतिसेनेने लिट्टेला निश्चितच खिळखिळे केले होते. जर वी. पी. सिंगनी लश्कराला मागे बोलवले नसते तर कदाचित निर्णायक विजय मिळालाही असता. वी. पीं. च्या ह्या निर्णयामागे देखिल द्रवीडनाडु समर्थक करुणनिधिंचा दबाव होता. मात्र भारतिय लश्कराचे ह्यात नुकसान झाले हे खरय, पण राजीव गांधींसमोर दुसरा पर्यायही नव्हता. अर्थात रॉने सुरवतीच्या काळात लिट्टेला प्रशि़क्षण व शस्त्रे दिली होते हे ही खरेच.
अजुन एक गोष्ट म्हणजे पाकिस्तान च्या मुद्द्यावर तावा तावाने मुद्दे साणगणारी मंडळी भारताने श्रीलंका मध्ये आपली फौज पाठवणे किती संयुक्तिक होते या मुद्द्यावर मूग गिळून गप्प आहेत. का आपला तो बाप्या नियम इथे लागू पडतो ते देव जाणे
श्रीलंकेतून भारतात येणारे तमिळ निर्वासित हा मोठा प्रश्न उभा राहिला होता, (सुमारे १ लाख ३५ हजार तमिळ निर्वासित भारतात समुद्रमार्गे आल्याची नोंद झाली होती. नोंद न झालेले आणखी असू शकतील.) आणि पाकिस्तान श्रीलंकन तमिळींच्या प्रश्नात बरीच ढवळाढवळ करू लागले होते, जे थांबवणे आवश्यक होते. या दोन कारणांमुळे आणि श्रीलंकेबरोबर केलेल्या तहानुसार भारतीय शांतिसेना पाठवण्यात आली होती.
अमोल साहेब,
भारताने अगोदर तमिळ अतिरेक्यांना शस्त्रास्त्रे व मदत केली होती ही वस्तू स्थिती आहे परंतु नंतर तमिळ अतिरेक्यांना आवरणे श्रीलंकन लष्कराच्या हाताबाहेर गेल्याने त्यांनी भारताकडे मदत मागितली. हे प्रकरण केवळ वेगळा तमिळ प्रदेशाच्या पुढे जाऊन श्रीलंका पादाक्रांत करण्याच्या पातळी पर्यंत आले होते यामुळे श्रीलंकेने आपले सार्वभौमत्व गमावण्याच्या भीतीने भारताला पाचारण केले आणि जर भारताने ती मदत दिली नसती तर त्यांची अमेरिकेकडे (प्रत्यक्षात चीन कडे) मदत मागण्याची तयारी चालू होती या बदल्यात त्यांनी अमेरिकेला (किंवा चीनला) सशस्त्र तळ उभारण्याची परवानगी देण्याचे ठरत होते. अमेरिका किंवा चीन सारखा देश आपल्या परसदारात येउन बसणे परवडणारे नव्हते. यासाठी भारताने तमिळ अतिरेक्यांना वेसण घालण्याचे प्रयत्न चालू केले त्यात तमिळ अतिरेक्यांनी भारताने पुरवलेली शस्त्रास्त्रे शांतिसेनेला पूर्णपणे परत केली. पण आपल्या गुप्त हेर खात्याचे अपयश असे कि त्यांनी तमिळ वाघांनी आंतर राष्ट्रीय बाजारपेठेत(चीनी शस्त्रे) किती मिळवली आहेत याचा बरोबर लेखा जोखा मिळवण्यात चूक केली. यामुळे आपली शांती सेना तेथे गेली ती तमिळ अतिरेक्यांना थोडासा धाक दाखवून वाटाघाटीच्या टेबलावर आणू या मिषाने. पण प्रत्यक्षात उलटेच घडले पहिल्या काही दिवसात लश्कराची फार मोठी हानी झाली कारण तमिळ अतिरेक्यांकडे AK ४७, मोर्टार, रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड सारखी अद्ययावत शस्त्रास्त्रे होती.आणि आपल्या सैनिकांकडे फक्त 7. 62 रायफल होत्या शिवाय भारतीय लष्कराला सक्त ताकीद होती कि गरज पडेल तरच गोळी मारा कारण तेथिल तमिळ लोक हे भारतीय वंशाचेच आहेत. या लढाईतून भारतीय लष्कराला कोणताही फायदा झाला नाही. उलट त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम मात्र झाला होत. कारण अधिकारी वर्गाला सैनिकांना भारतीय वंशाच्या लोकांना मारून आपण दुसर्याच्या देशासाठी का लढत आहोत हे समजावणे आणि प्रोत्साहन देणे(motivate) फार कठीण गेले. नंतर मात्र आपल्या सैनिकांनी प्रतिहल्ला चढविला आणि तामिळ वाघांची वाताहत झाली. यानंतर सुद्धा जेंव्हा लष्कर निर्णायक विजयाच्या जवळ होते तेंव्हा त्यांना परत येण्यास सांगितले कारण द्रमुक आणि इतर राजकीय पक्षांचे असलेले हितसंबंध.
प्रत्येक गोष्ट राजकीय कारणासाठी बाहेर येतेच असे नाही. लष्कराच्या सेनापतींनी लष्कर श्रीलंकेत पाठीण्यास कसून विरोध केला होता पण तो राजकीय निर्णय होता.
बर्याच वेळेस लष्कराचे नुसते हात नव्हे तर तोंड सुद्धा बांधलेले असते.
प्रतिक्रिया
चित्रपट नक्कीच बघितला जाईल.
चांगले परिक्षण
सहमत.
छान परिक्षण.
परीक्षण आवडले
अनेकदा आपला देश हा बळी आहे
अछ्छा म्हणजे (CC0Q9QEwAA&dur
लिंक गंडली
POK आणि COK चा नकाशा पहावा
गंड?
पाकिस्तानने लचका तोडला? की
मला ज्ञात इतिहास....
-१
बर्र बुवा!
+११११. लांब जायची गरज नाही.
नक्की कुठे ?
तुमच्या वयाचा आणि कर्तुत्वाचा
काश्मिर..
पुन्हा काही अर्धसत्ये...
...पण १९७१ मध्ये आपण पाकिस्तान चे २ तुकडे केले होते....भारताच्या कारवाईने बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून आस्तित्वात आला. पण त्या अगोदर पाकिस्तानने तेथे काय केले आणि त्याचे भारतावर काय परिणाम झाले याबद्दलची सत्य परिस्थिती जगजाहीर असतानासुद्धा असले अतीटोकाचे आणि एकतर्फी विधान ???जेंव्हा आपले ५ जवान मारले गेले त्या आधी भारतीय सेना ने पाक व्याप्त काश्मीर मध्ये घुसून ४ आतँकवाड्यांची गाठडि वळली होति.म्हणजे आतंकवादी आणि एखाद्या सार्वभौम राष्ट्राचे सैनीक एकाच तराजूत मोजायचे काय? शिवाय एका राष्ट्राला आतंकवादी पोसण्याची आणि त्यांना दुसर्या राष्ट्रात घुसवण्याची परवानगी आहे पण दुसर्याने त्याबाबत काही कारवाई केली तर नाराज व्हायची तरतूद पण आहे. या प्रकाराला मराठीत कांगावा आणि इंग्लीश्मध्ये हायपोक्रसी म्हणतात. भारताचे दुर्दैव असे की (१) भारताला अश्या हायपोक्रसीत पीएच् डी केलेले शेजारी आहेत, (२) त्यांचा तात्विक मुकाबला करण्यात भारत सतत कमी पडतो आहे आणि (३) शिवाय वर तथाकथीत भारतिय "विचार्वंत" आपले शेजारी आणि त्यांचे भाडोत्री आतंकवादी यांची तळी उचलून धरण्यासाठी चढाओढ करत असतात ! हे केवळ माझे स्वतःचेच मत नाही तर याबाबत चर्चा करत असताना पुढारलेल्या आणि पुरोगामी मानल्या गेलेल्या देशाच्या सुशिक्षीत नागरिकांनी ह्या वस्तुस्थितीबद्दल अनेकदा आश्चर्य व्यक्त केले आहे आणि काहीवेळेस तेथे हजर असलेल्या शेजारी राष्ट्राच्या नागरिकाने खुशीने डोळ्यांची सूचक हालचाल करत गप्प राहणे पसंत केलेले आहे. केवळ थक्क झालो आहे !जर तुम्हाला असे वाटत असेल की
???
मालोजि राव आपण ते युद्ध
डेव्हिन हेगर्टी
http://www.rediff.com/news
डेव्हिन हेगर्टी आंतरराष्ट्रीय
Perceptions. सत्य आपल्याला
वर म्हणालात विकिपेक्षा
मिपावरील नवीन साथ
खरच तस नाही. त्यांच्या
कारगिल मधली काही शिखरे
मान्य. पण कारगिल मध्ये
गमावलेला पूर्ण भू भाग?
१९९९ नंतर पाकिस्तानी
१९९९ नंतर पाक लष्कराविरुद्ध कारवाई?
भारतीय संसदेवर झालेला हलला,
खूप मोठा फरक आहे
...जर तुम्हाला असे वाटत असेल
...जर तुम्हाला असे वाटत असेल की ती कारवाई दहशतवाद्यानी केली तर तुम्हाला सलाम. ती कारवाई पाकिस्तानी सैनिक दलानी केली. BAT या पाथकानी.साहेब, या अमुल्य शिक्षणाबद्दल अनेकानेक धन्यवाद ! अशी विषय भरकटवणारी कॉमेंट (अशा गोष्टिबद्दल की जी वर्तमानपत्रातसुद्धा चावून चोथा झाली आहे) आली की समोरच्याला प्रतिवाद न सापडल्याने आता विवाद न करता वितंडवाद करायचा आहे हे आम्ही फार पूर्वीच शिकलोय... आणि माझा हा अंदाज खरेच चुकीचा असला तर तुम्ही प्रथम तुमचा प्रतिसाद (ज्यावर मी प्रतिसाद लिहिला) वाचावा आणि मग तुमचा स्वतःचा वरचा प्रतिसाद वाचावा अशी विनंती करतो. तोपर्यंत विनयाने एवढेच सांगतो की मी जे काही लिहिले आहे त्याच्या मागे आंधळी / भडक देशभक्ती नसून काही तपे अनेक संबद्धीत लोकांबरोबरच्या प्रत्यक्ष संबद्धातून अनुभवलेले व ऐकलेले सत्य आहे. किमान दिवाणखान्यात बसून अथवा जालावरचा काही विदा वाचून बनवलेले मत तर आजिबात नाही याची खात्री असू द्यावी. जमल्यास वर सांगितल्याप्रमाणे करावे, मग बोलू. अन्यथा आमचा रामराम घ्यावा ही विनंती.सहमत..
अनेकदा आपला देश हा बळी आहे आणि समोरचा शत्रू हा आक्रमक हा गंड सर्वच देशात आढळतो.श्रीलंका प्रकरणात पण भारताने गरज नसताना शांति फौज पाठवून त्यांची मुस्काटदाआबी केली. खर तर तो श्रीलंकेचा अंतर्गत प्रश्न होता.ही वाक्ये फार विचारपुर्वक वाचली, आणि त्यात तथ्यांस जाणवला . आपण जे काही हलके पणाने वाचतो,जसे की आपण काश्मिर प्रश्न हा युनोत न्यायला नको होता...किंवा आपला देश हा दुसर्या देशामधे काहीही ढवळाढवळ करत नाही.... हे कदाचीत काहीसे खरे नसावे. पाकिस्तान हा आपला भारत देश सिंध वेगळे करण्यास फुस देतो हा आरोप कायम करतच असतो. सरबजीत सिंगा वरील आरोपा विषयी भारताने कधीही पक्का पावित्रा घेतला नाही. आपले गुप्तचर हे परदेशात काही प्रमाणात सक्रिय असतीलच. तसेच आपल्या आजच्या आतराष्ट्रीय सीमा ह्या ब्रिटीशा च्या साम्राज्यवादाचीच देण आहे. म्हणुन पुरवोत्तर राज्ये आज आपल्या भारतात आहेत.व त्यामुळेच चीनशी सीमावाद आहे.आनी जगात असा कोणताही देश नाही की त्याचा शेजारील देशाशी सीमावाद नाहि. खर्या गोष्टी जेव्हा अचुक सदंर्भ ग्रथं वाचायला मिळतील तेव्हाच त्या समजतात. नाहीतर एकीव माहीतीच्या आधारे फक्त रक्त उसळते. ( पण म्हणुन पाकिस्तान/चीन चे चुकत नाही असे नाही. त्यान त्याबद्दल किंमत चुकवाविच लागेल हा विश्वाचा नियमच आहे. आठवा १९५०-६० मधील अमेरीकेची आतर राष्ट्रीय ढवळाढवळ...व आजची त्या देशाची स्थिती.)उत्कंठा वाढवणारे परीक्षण
छान
कालच बघितला हा चित्रपट डोकं
चित्रपट सुंदर आहे
एक पॉलीटीकल थ्रिलर म्हणून
शान्ति सेना पाठवण्यामागची
शांति सेना ने तामिळ
शांतिसेनेने लिट्टेला निश्चितच
छान परिक्षण
अजुन एक गोष्ट म्हणजे
निर्वासित
अमोल साहेब,
Pagination