पंडित साहेब
आपण म्हणता तसे षडरस हे आयुर्वेदात किंवा पारंपारिक साहित्यात म्हटले असले तरी ते चार(आता उमामी धरून पाच) चवीमध्ये धरता येत नाहीत कारण या पाच चवी मेंदूकडे पोहोचविण्याचे काम करणारे विशिष्ट संवेदक जिभेत आहेत तसे तिखट आणि तुरट(कषाय) या चवीसाठी विशिष्ट संवेदक नहित.तिखट हि संवेदना मेन्दुपर्यंत दुखः आणि तापमान (गरम) या संवेदना पोहोचविणार्या नसातून पाठविले जाते. म्हणून तिखट वस्तू खाल्ली तर (मिसळीच्या तर्री चा भुरका मारला तर थंडीतहि आपल्याला घाम येतो.(मेंदूला तापमान वाढले आहे / गर्मी झाली आहे हि संवेदना झाल्याने). तिखट हि संवेदना आपल्याला जीभेलाच येते असे नव्हे तर नाकाच्या( जोरात ठसका लागल्यास हा अनुभव येतो) अन्न नलीकेच्या जठराच्या आतल्या त्वचे कडूनही निया दुसर्या दिवशी पार्श्वभागाच्या आतील त्वाचे कडून सुद्धा मिळते.
तूरट हि चव नसून जिभेला तोठरा बसल्याची संवेदना आहे हि त्यातील astringent.अशा पदार्थाने. यात तुरटी चहा कच्ची फळे इत्यादी आणि क्षारयुक्त पदार्थामुळे त्वचेतील प्रथिने अवक्षेपित(PRECIPITATE) झाल्याने आपल्याला हि संवेदना होते.
घ्राणेंद्रियांच्या कार्याची उत्तम माहीती. तरी विस्तारभयास्तव जरा आवरती घेतल्यासारखी वाटते. अजून थोडे जास्त आणि उदाहरणांसहित तपशील आले असते तर आवडले असते. असो.
माझ्या एका मित्राला जन्मतःच घ्राणेंद्रिय नाही. त्याला कसला वासच येत नाही. त्यामुळे भूकही लागत नाही. वयाच्या ५० व्या वर्षीही एकूण वजन ५० किलोच्या आसपास आहे. घड्याळ पाहून तो जेवायला बसायचा. जेवायची इच्छाच कमी. तो गमतीने म्हणायचा, 'डोळ्यांवर पट्टी बांधली तर मी संडासात बसूनही जेवू शकेन.'
पर्फ्यूम खरेदी साठी तो आम्हा मित्रांना बरोबर घेऊन जायचा आणि आम्ही सुचवू तेच पर्फ्यूम घ्यायचा. त्याला म्हंटलं, 'तुला जर वास येत नाही तर पर्फ्यूमवर खर्च कशाला करतोस?' तर म्हणायचा, 'मला वास येत नाही पण माझ्या आजूबाजूला वावरणार्या माणसांना तर वास येत असतो नं!'
एखाद्याला कुठलाच वास न येणं म्हणजे आयुष्यभर तो त्या अनुभवापासून किती आणि कसा वंचित राहतो ह्याचा विचार केला तर फार वाईट वाटतं.
"त्यामुळे जर आपण ती वापरण्यास सुरुवात केली तर अतिशय आश्चर्य कारक रित्या आपल्याला तिचा वापर करता येतो. आपण सध्या सोप्या गोष्टी वापरत असतो तरीही त्या लक्षात घेत नाही"
नीट वास घेतला तर पदार्थातले मीठ/तिखट इत्यादीचे प्रमाणसुद्धा सांगता येते.
हो!
मी बर्याचदा तिखट मिठ जास्त किंवा कमी हे वासावरुनच अॅडजस्ट करते.
बेसनाचा लाडू करताना बेसन भाजताना एका विशीष्ट क्षणी एक वेगळाच खमंग वास सुटतो त्या तासभर भाजत असलेल्या बेसनाचा. मी त्यावर अवलंबुनच गॅस बंद करते.
आतापर्यंत अनेकदा सर्दी झाली पण अजून कागद खाऊन बघितलेला नाही !... आमचे एक स्नेही म्हणतात त्याप्रमाणे, "प्रयोग करून बघण्यासारखा आहे"... मात्र मुळात कुठला कागद कसा लागतो हेच माहित नाही... म्हणजे अगोदर सर्दी झाली नसताना बरेच प्रयोग करायला लागतील ! मग आमचा पास ;)
जरा गंमत बाजूला ठेवली तर तुम्ही म्हणता ते खरेच आहे.
आमचे एक प्रोफेसर धुम्रपान सोडण्याचे फायदे सांगताना "धुम्रपान सोडल्यावर काही दिवसांनी सफरचंद आणि केळे याची चव वेगळी असल्याचे समजते." हा फायदा न चुकता मिश्कीलपणे हसत सांगायचे.
प्रतिक्रिया
काही बाळबोध शंका...
चुकलं वाटतं...
पंडित साहेब
चांगली माहीती.
विस्तारभयास्तव जरा आवरती घेतल्यासारखी वाटते.
चांगली माहिती मिळाली.
उपयूक्त माहिती...
"कुत्रा /कुत्रे गाडी मागे
खरं आहे
हो!
पु. ले. शु.
माहितीपूर्ण
आतापर्यंत अनेकदा सर्दी झाली
नक्की आठवा!
जरा गंमत बाजूला ठेवली तर
माहितीपूर्ण लेख.
मस्त.. स्वाद चव फरक छान समजला