Welcome to misalpav.com
लेखक: पुष्कर जोशी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पोतराज म्हणजे देवदासींसारखी देवाला सोडलेली मुले आहेत तर अशा परंपरा नष्ट झालेल्या चांगल्या. प्रतिज्ञेत ज्या परंपरांचा उल्लेख आहे त्या समृद्ध परंपरा आहेत. अशा माणसाला हीन बनवणार्‍या परंपरा सांभाळायची काही गरज नाही.

कोणकोण तयार आहे करिअर इन पोतराज करायला ?
आयसिआयसिआय बँकेत निसत पाउल टाकताच ५० लाखाचे प्रिअ‍ॅप्रुव्ह्ड होमलोन, २-४ गोल्ड प्लाटिनम क्रेडिट कार्ड्स, व्हॅलुएबल कस्टमरशिप ऑफर होत असेल तर माझि तयारी आहे करिअर इन पोतराज करायला .

जोशी, सती सुद्धा परंपराच होती मग त्याचे काय करावेसे वाटतेय तुम्हाला ? तुमच्या परंपरा मानण्याचे ठीकच आहे पण दुसऱ्याच्या जीवाचे काय? मारुतीवरचा लेख वाचूनही जर तुम्ही परंपरा परत सुरु करायचे म्हणतायत तर अवघड आहे ! बाय द वे सांताक्लॉज काल्पनिक असतो आणि पोतराज मात्र खरा खुरा माणूस असतो हे माहित आहे ना तुम्हाला ? -निखिल

सांताबाबा काल्पनिक असतो. आणि समजा कुणी बनलाच सांता, तर तो एका रात्रीपुरताच असतो. पोतराज मात्र जन्मभर असतो. सांताबाबाला लहान मुले प्रेमाने जवळ करतात. पोतराजाला लहान मुले चिडवतात. इतके फरक असुनही याना दोन्ही सारखेच वाटते !

जोशी, सती सुद्धा परंपराच होती मग त्याचे काय करावेसे वाटतेय तुम्हाला ? तुमच्या परंपरा मानण्याचे ठीकच आहे पण दुसऱ्याच्या जीवाचे काय? मारुतीवरचा लेख वाचूनही जर तुम्ही परंपरा परत सुरु करायचे म्हणतायत तर अवघड आहे ! बाय द वे सांताक्लॉज काल्पनिक असतो आणि पोतराज मात्र खरा खुरा माणूस असतो हे माहित आहे ना तुम्हाला ? -निखिल

तुम्ही तुमच्या घरी सांगा की तुम्हाला "पोतराज" या फील्डमध्ये करीयर करणार आहात. आणि घरच्यांच्या प्रतिक्रिया इथे लिहा. अवांतरः तुम्ही कितवीला आहात? :)

माझ्या कडून चूक झाली... मी वासुदेव पहिला आहे पण पोतराज नाही... मला पोतराज आणि वासुदेव एकाच वाटत होते... औरंगाबाद मध्ये... तमिळ भाषिक काही गायक/भिक्षुकी दरवर्षी येतात... आणि इतक्या सुंदर आवाजात मराठीत अभंग, भजन, कीर्तन म्हणतात कि बस कानाला मनाला खूप छान वाटते... जसे गायक हे करिअर होऊ शकते तसे अभाग कीर्तन गाणारे असे का करिअर होऊ शकत नाही... मी हे सगळे प्रातिनिधिक घेतले होते ... जाता जाता आईने व बाबांनी अशातच य.च.मुक्त.वि. चा योग डिप्लोमा केला... त्यातील एक पुस्तक हातात लागले... पहिल्याच पानावर... दुवा मुळ मुद्दा असा आहे कि १. आपणास सर्व भारतीय परंपरा माहित आहेत काय ? २. त्यातील समृद्ध, चांगल्या, टाकाऊ कशा ठरवायच्या ? कोणते परिमाण लावायचे .. का फक्त विज्ञान आणि तर्क ? ३. त्या टिकवण्यासाठी काय करता येईल ? ४. सरकार नावाची अजस्त्र यंत्रणा काही करते का ? ५. त्या आपले जीवने ध्येय असू शकतात का (जसे डॉ., engg) असते तसे.. ? काही सापडले.. http://www.stephen-knapp.com/

१. आपणास सर्व भारतीय परंपरा माहित आहेत काय ? तुम्हाला वासुदेव आणि पोतराज एकच वाटला. अज्ञान बाळगायचा तुम्हाला एकट्यालाच मक्ता दिलेला नाही. २. त्यातील समृद्ध, चांगल्या, टाकाऊ कशा ठरवायच्या ? कोणते परिमाण लावायचे .. का फक्त विज्ञान आणि तर्क ? ते ज्याने त्याने ठरवावे. ४. सरकार नावाची अजस्त्र यंत्रणा काही करते का ? सरकारने काही केले की सरकारने खाजगी आयुष्यावर आक्रमण करावे का, असा धागा तुम्हीच काढला असता. सरकारने काय करावे अशी अपेक्षा आहे? तीर्थ्क्षेत्राना जायला सरकार गाड्य सोडते, रस्ते करते, नदीत हगले मुतले तरी गप्प बसते, रस्त्यावर कडकलक्ष्मी, पोतराज, वासुदेव मुस्तपणे फिरु शकतात. ते कोणत्याही देवाची भक्ती करु शकतात. काम करु शकतात, किंवा काम न करता धर्माच्या नावाने भिक्षाही मागू शकतात. जुनी पोथ्यापुराणे आता पुस्तके, इंटरनेट या रुपात निघत आहेत. तुम्हीच वर लिवले आहे, डिप्लोमा इन योगा ... वगैरे.... म्हणजे तेही उपलब्ध आहे. अजुन काय हवे आहे? सर्व धार्मिक सणाना सुट्ट्ञा असतात. दिवाळीला दिवे लावायला बोनस मिळतो. साखर रुपयाभर स्वस्त होते. मुलाना संस्कृती समजायला सुट्ट्या देतात. शाळेत बालसंस्कारांच्या नावाने हिंदु देव, पूजा, विधी यांचा भडिमार सुरु असतो. अजुन काय कमी पडले आहे तुम्हाला?

या विषयावरचे आपले मनोगत वाचले -आमचा मान पहिला ही अट असो सावकाश मत नोंदवेन