Welcome to misalpav.com
लेखक: गवि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आमच्या घरचा बैल एकदा आजारी पडला. त्याला अवघड जागी जखमेत किडे पडले. त्यावर कोणताही उपाय चालेना. बाबा स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याने अलोपॅथी, होमिओपॅथी वगैरे करून पाहिले. (बैलाला). शेवटचा उपाय म्हणून जखमेत पेट्रोल ही भरून झाले (हा अत्यन्त दु:खदायक उपाय आहे, पण त्याने हा आजार आटोक्यात येतो बर्‍याचदा). अखेरीस शेवटचा उपाय म्हणून गावतल्या मन्त्रिकाला बोलवणे धाडले. त्याने संगितलेला उपाय असा - एका झाडाची मुळी (झाड कोणते ते ज्ञान परंपरागत त्याच्याकडेच असते. proprietary, you know ). तर झाडाची मुळी बैलाच्या डोक्यावरील छताच्या भागात ठेवायची, आणि त्याने दिलेला अंगारा बैलाच्या गळ्यात बांधायचा. नेमके काय झाले ते माहीत नाही, पन बैल बरा झाला. अन्यथा हे त्याच्यासाठी जिवावरचे दुखणे होते. या घटनेसाठी मी स्वतः एक साक्षीदार होतो.
हायलाईट केलेल्या भागातच आपल्या सर्वांची गोची आहे.

होमिओपथी आणि अन्य उपचार चालले नाहीत म्हणून बैलाच्या जखमेत पेट्रोल घातले.. कारण तो जालीम उपाय होता. का जालीम उपाय होता याचा कारणभाव माहीत नाही. त्यानेही उपाय झाला नाहीच. (तरी पेट्रोल हा उपाय व्यर्थ आहे असा संदेश तयार होणार नाहीच.. अन्य कोणीतरी ते घालतच राहतील जालीम उपाय म्हणून..) मग "मांत्रिक" बोलावला. सद्यस्थितीत माहीत असलेल्या कार्यकारणभावानुसार डोक्याच्या दिशेला छतामधे ठेवलेली मुळी अथवा फांदी आणि गळ्यात बांधलेला अंगारा यांमुळे अवघड जागी (गुदद्वार असावे) असलेल्या जखमेत पडलेल्या किड्यांवर काही उपाय होईल असं मानण्यासारखं कोणतंही कारण नसतानाही ते मानलं गेलं कारण : -माहीत असलेले सर्व उपाय हरले होते असं वाटत होतं. -शेवटी बैल बरा झाला. बैल आपापतः किंवा त्यापूर्वी केलेल्या उपचारांच्या दीर्घकालीन परिणामांनी, किंवा स्वतःच्या प्रतिकारशक्तीवर, किंवा किड्यांची लाईफसायकल पूर्ण झाल्याने अशांपैकी कोणत्याही कारणाने बरा होऊ शकला असेल याची शक्यता शून्यवत धरुन शेवटी आपल्याला बरे होण्याचे कारण काय वाटते तर छतातली मुळी आणि अंगारा.. आपल्या तर्कापलीकडेही बरंच काही आहे.. असेलच. पण आपल्याला त्यातल्यात्यात अधिक वास्तव भासणारी, तुलनेत अधिक तर्कशुद्ध भासणारी कारणं पूर्णपणे विसरुन अल्टिमेटली काहीतरी "नेमके काय झाले ते माहीत नाही" स्वरुपाच्या एक्स्प्लेनेशनलाच हायलाईट करावंसं वाटतं.

होमिओपथी आणि अन्य उपचार चालले नाहीत म्हणून बैलाच्या जखमेत पेट्रोल घातले.. कारण तो जालीम उपाय होता. का जालीम उपाय होता याचा कारणभाव माहीत नाही.
गुरांच्या जखमेत किडे होणे हा देखील जनावरांसाठी असाध्य आजार आहे. माझ्या माहितीत "आपोआप" बरी झालेली कोणतीही केस नाही. (येथे आपोआप म्हणजे कोणताही उपाय न करता.. यात मांत्रिक पण आले. आता मांत्रिकाने बर्‍या केलेल्या केसेस आपोआप बर्‍या झालेल्या आहेत असे आपले म्हणणे असेल तर भाग वेगळा ). पेट्रोल हा जालीम उपाय आहे कारण जखमेवर पेट्रोल टाकल्यावर मरणप्राय वेदना होतात. पण पेट्रोल टाकल्यावर किडे निघून जायचे असतील तर लगेच जातात. असा आत्तापर्यंतचा अनुभव. इतर उपायांमध्ये सामान्य प्रतिजैविके वगैरे उपाय करून आम्ही थकल्यावर सहजच पेट्रोलचा उपाय क्लिक झाला आणि तो चालला पण, म्हणून आमचा त्यावर पूर्ण विश्वास आहे. जनावरांना अ‍ॅड्मिट करणे वगैरे नसल्यामुळे त्यांसाठी असेच तत्काळ उपाय करावे लागतात. असो. त्या आजाराचे गांभीर्य प्रत्यक्ष तिथे अनुभवल्याशिवाय कळणार नाही. अजून एक किस्सा - माझ्या बाबांचा अनुभव, मि स्वतः साक्षीदार नसल्यामुळे लिहिला नव्हता, आणि तो सरळ सरळ मांत्रिकाचा अनुभव आहे म्हणूनच या चर्चेत टाळायचा होता. आमची एक म्हैस याच आजाराने आजरी होती. इथपर्यंत की तिच्या दूधातही किडे येउ लागले होते. ती म्हैस ही अक्षरशः मरणासन्न स्थितीत (आमच्या कडे त्याला 'उठवणीला येणे' असे म्हणतात. ) असताना बाबा त्यांच्या बाहेरगावी असलेल्या दवाखान्यात गेले होते, तिथे हा विषय काढला. तिथे त्यांना असे कळले की इथे एक मंत्री (मांत्रिक) आहे. अखेरीस ते त्याला भेटले. त्याने फक्त म्हशीचे नाव विचारले, आणि मंत्र टाकला. गम्मत म्हणजे ही केस पण वाचली.. ही अंधश्रद्धा आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. अशा काही गोष्टींमुळे मी हल्ली संभ्रमीत असतो.. कार्यकारणभाव न दाखवता येणारे हे अनुभव एका बाजूला, आणि विज्ञान्णिष्ठा एका बाजूला.. म्हणूनच मी अज्ञेयवादाची भूमिका घेतो. आणि अंधश्रद्धा निर्मूलन करायचे असेलच तर या सर्व घटनांचा अभ्यास करून त्यातील तथ्य समाजसमोर आणले पाहिजे. कायदा करून आणि या मांत्रिकांना आत टाकून आपण रोगावर इलाज करू कदाचित, पण या मांत्रिकांकडे असलेल्या परंपरागत ज्ञानाला मुकु असे मला वाटते. जोपर्यंत सम्पूर्ण सत्य बाहेर येत नाही तोपर्यन्त एकच बाजू सत्य असा निर्णय देणे मला पटत नाही. सरकारची यातील भूमिका कमीत कमी हस्तक्षेपाची असली पाहिजे असे माझे मत आहे ते त्यामुळेच.

एक कल्पनाप्रयोग सांगतो. एका माणसाने १०२४ लोकांना पत्रं पाठवली. निम्म्या लोकांना सांगितलं की क्ष स्टॉक आज वर जाईल. निम्म्यांना तो खाली जाईल असं सांगितलं. दररोज तो अशी पत्रं पाठवत राहिला. फक्त दरवेळी त्याने सगळ्यांना रॅंडमली निवडून वर वा खालीची उत्तरं पाठवली. निम्म्यांना वर, निम्मी खाली. एवढंच. शून्य बुद्धीमत्ता वापरून. असं आठ वेळा केल्यावर ४ लोकांना लागोपाठ ८ अचूक उत्तरं ३२ लोकांना ८ पैकी ७ बरोबर भाकित ११२ लोकांना ८ पैकी ६ बरोबर भाकितं म्हणजे सुमारे पंधरा टक्के लोकांना त्याच्याकडे अतिशय अचूक भाकितं करण्याची शक्ती आहे असा विश्वास सहज बसला. आता या १४८ पैकी किमान पन्नास लोकांनी जर खरोखरच त्याच्या सल्ल्याप्रमाणे पैसे लावले, तर त्यातले सुमारे १२ लोक लागोपाठ दोनवेळा पैसे कमावतील. हे त्याचे पहिले अनुयायी/भक्त. मग त्यातले काही पैसे त्याच्या चरणी अर्पण करतील. इतकंच नव्हे तर ते आपल्या अनेक श्रीमंत मित्रांकडे त्याचे गोडवे गातील. पुरावा म्हणून तुमची १० पैकी ८ ते १० वेळा बरोबर आल्याचे 'चमत्कार' सांगतील. त्यानंतर मग त्याचं भाकीत चुकलं तर ते स्वतःलाच दोष देतील. कारण एव्हाना 'त्याचं बरोबर' हे त्यांनी जीवनातलं त्यांना गवसलेलं सत्य म्हणून स्वीकारलेलं असतं. पूर्ण लेख इथे वाचावा

माझ्या गावात संधीवातावर औषध घ्यायला खूपजणं येतात. औषध अर्थात झाडपाल्याचे, अन दोन दिवस फक्त ताक पिणे. अजुनही खूप लोक येतात कारण अ‍ॅलोपथीच्या औषधाला साईडैफेक्टस आहेत तसे यात नाही आहेत. साप चावण्यावरही एका झाडाची मुळी जी देवळात उत्तर दक्षीण टांगुन ठेवलेली आहे ती दिली जाते. एक केस पाह्यली आहे. अर्थात साप कोणता चावला होता हे चावलेला माणुसच जाणे. गुरांवर तर सरकारी दवाखान्यपेक्षा जालिम उपाय शेजारगावचा वैद्यच करतो. वरती आनंदा यांनी सांगीतलेले उपाय मी ही पाह्यलेत. एक अतिशय ठसलेले उदाहरण म्हणजे, म्हैशीला पिल्लु झाल्यावर तिचे अंग बाहेर आले होते. तो माणुस सायकल वरुन आला, सरळ गोठ्यात गेला. जवळची एक मुळी काढुन जाळुन तिचा धुर गोठ्यात कोंडला. म्हैशीला मिठाबरोबर काही खायला दिले. अन चहा सुद्धा नको म्हणुन निघुन गेला. अर्थात त्याच्या डोळ्यासमोर म्हैस बरी झाली होती.

येथे बर्‍याच जणांनी पारंपारिक मांत्रिक वगैरे पद्धतिचे उपाय सांगितले आहेत. त्याच्यावर विश्वास बसलेल्यांनी या लोकांना थोडे मार्गदर्शन करून शास्त्रिय पद्धतिने ते उपाय सिद्ध करायला सांगितले तर नक्की खरे काय आणि अंधविश्वास काय याची शहानिशा होईल. एका उदाहरणाने किंवा अनेक माणसांच्या समजाने पसरलेली कल्पना खरी आहे असे सिद्ध होत नाही. परंतू शास्त्रीय पद्धतीने सिद्ध केलेल्या उपायाचे पेटंट घेऊन तो माणूस कायदेशीरपणे आणि अनेक पटीने यशस्वी व्यवसाय करू शकेल. शिवाय एखाद्या खरेच उपयोगी असलेल्या पारंपारिक पद्धतीला जगात मान्यताही मिळेल. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत ती गोष्ट अंधश्रद्धेत गणली गेली तर दोष कोणाचा हे काय सांगायला पाहिजे काय?