Welcome to misalpav.com
लेखक: पिंपातला उंदीर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय राजकारणात जर वचक ठेवायचा असेल तर शेजारी आपल्या पेक्षा प्रबळ कधीच होवुन देता येत नाही.त्यामुळे राष्ट्राचा गाडा हाकताना शेजारील देशात काहीना काही घडवावच लागत्,त्यातुन बर्‍याच्श्या उलथापालथी होत असतात्,प्रत्येक जन दुसर्‍यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणारच्,आपपल्या सिमांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करणारच्,त्यामुळे भारत काय किंवा पाकिस्तान काय या गोष्टी घडतच राहणार फक्त भारत थोडीफार नितीमत्ता पाळतो अथवा लोकशाहीच्या असलेल्या दबावामुळे ती पाळाविच लागते, आणी पाक च्या बाबतीत नितीमत्ता हा शब्दच वापरायचा का नाही हाच मोठा प्रश्न आहे.

लाख मोलाची गोष्ट बोल्लासा बाबा तुमी! सगळ्याच बाजूंनी निरनिराळ्या प्रकारचा रेटा परिस्थितीत जर उलथापालथ घडवणार असेल तर अशा वेळी गांडूळासारखं बसल्याजागी वळवळत राहणं म्हणजे आपल्याच हातानं आपल्या पायावर कुर्‍हाड मारुन घेणं ठरतं. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात कु णी ही धुतल्या तांदळासारखं स्वच्छ असण्याची अपेक्षा करणं म्हणजे शुध्द वेडगळपणा आहे. हे जे प्रकार केले जातात त्याला स्ट्रॅटेजिक अ‍ॅक्तिव्हिटिज म्हणतात आणि त्यांशिवाय आपण स्वतः सुरक्षित राहणं अवघड असतं. कधी निर्णय चुकतात कधी बरोबर येतात...

पण पहिला भाग वेगवान बनवण्याच्या नादात घाई घाईमध्ये उरकल्यासारखा वाटतो. मध्यंतरानंतर मात्र एकदमच भारी आहे. चित्रपटाबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी अमुक एकाची बाजू चांगली किंवा अमुक एक बाजू वाईट असे जजमेंटल काही दाखवले नाहीये. त्यांनी जे काही घडलं त्या पार्श्वभूमीवर फक्त एक कथा सांगितली आहे.

विषेशतः पहिलाभाग (व हाणामारिचे प्रसंग) युध्दानुभव अजिबात न वाटता डोक्युमेंटरी वाटत राहते बहुदा एडिटरचा दोष म्हणुया कारण ब्लॅक हॉक(सर्वोत्कृष्ट एडिटिंगचे ऑस्कर ) अथवा हर्ट लॉकर बघितल्यावर त्यातिल्या तांत्रिक सफाइसोबत तुलना होतेच. सेकंडहाफ मात्र चित्रपट माध्यम म्हणून आवश्यक असलेलि नाट्यमयता व रंगत व्यवस्थित भरतो, इतकं की शेवटचा प्रसंग फॅन फिक्शन मानत बदलला जातो की काय याची शंका यावी. (होय चित्रपट मनोरंजक बनवायला त्यात इतिहास बदलता येतो आणि इंग्लोरिअस बास्टर्डमधिल हिटलर वध हे याचे उत्तम उदाहरण आहे)

केवळ एक भाग आहे. युद्ध झाले नाही म्हणून रणनीती आखण्याचे कोणी सोडत नाही. औरंगझेब कधी ना कधी सर्व शक्तिसमेत दक्षिणेत येणार ही अटकळ शिवाजी महाराजांनी दहा बारा वर्षे आधीच बांधली होती. त्या वेळी माघार घ्यावी लागली तर सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी जिंजीपर्यंत राज्य विस्तार करून ठेवला होता. अलीकडेच युएन सिक्युरिटी कौन्सिल मध्ये भारत सरकारने श्रीलंकेच्या विरोधात मतदान केले ही देखील रणनीतीच आहे. राजकारण हीच मुळात दलदल आहे. त्यात उतरल्यावर ज्यांच्या कपड्यांवर कमी डाग आहेत ते निष्पाप आणि जास्त डाग आहेत ते पापी अशी मांडणी करणे हे निवडणुका जिंकण्यासाठी सोयिस्कर असले तरी प्रत्यक्षात निरुपयोगी आहे. तत्वांची पाठराखण करणे हे राजकारणात दाखवायचे दात आहेत. राजकारणाचा मुख्य हेतू जे ताब्यात आहे ते राखणे आणि कमीत कमी नुकसान सोसून अधिक मिळवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.केवळ तात्विक मांडणी करता येत नाही म्हणून हातातले सोडण्याचा मूर्खपणा राजकारणात होत नसतो. राजकारण हे तत्वांसाठी किंवा हक्कांसाठी नसून राष्ट्रीय स्वार्थासाठी केले जाते. राष्ट्रीय स्वार्थ हा त्या देशातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या जनतेच्या आकांक्षांचा परिपाक असतो. काश्मिरी हिंदूंवर अन्याय होतो हे सत्य सांगतांना श्रीलंकेत तामिळी हिंदूंवर देखील अन्याय होतो हे तेवढ्याच जोरकसपणे मांडले जात नाही. या देशातील बरेच घटक खऱ्या अर्थाने स्वत:ला आजही राष्ट्रीय प्रवाहात विलीन करायला तयार नाहीत. एखाद दुसरा घटक असे वागत असेल तर त्याला राष्ट्रद्रोही ठरवता येते. पण राष्ट्रीय प्रवाहापासून लांब जाणाऱ्या घटकांची संख्या जर वाढत चालली असेल तर हा राष्ट्रीय प्रवाह संकुचित होत चालला आहे का याचा विचार करणे अत्यावश्यक ठरते. प्रत्येक ठिकाणी सैन्य तैनात करणे हा तोडगा असू शकत नाही. राष्ट्र हे जनतेच्या इच्छेवर टिकते. सैन्याच्या शक्तीवर नव्हे.

+१००% यासंदर्भात एका शेजारी राष्ट्राच्या नागरिकाने खाजगीत केलेली स्पष्टोक्ती आठवली: "आमचे अतिरेकी तुमच्या देशांतर्गत जितके नुकसान करतात त्यापेक्षा जास्त तुमचे "सो कॉल्ड मानवतावादी विचारवंत" राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमचे नुकसान करतात... आणि ते सर्व आम्हाला फुकटात मिळते !"

दुसर्‍याच्या बोलण्यावर लगेच इतका विश्वास ठेऊ नका हो राजेसाहेब! बाकी त्यांचे अतिरेकी तूर्तास आपल्यापेक्षा त्यांचेच जास्त नुकसान करताहेत, हे त्याने सांगितले नसेलच तुम्हाला! ;)

बाकी त्यांचे अतिरेकी तूर्तास आपल्यापेक्षा त्यांचेच जास्त नुकसान करताहेत, हे त्याने सांगितले नसेलच तुम्हाला! बादवे, माझा मुद्दा आपलेच लोक आपल्या देशाचे कसे नुकसान करतात याबाबत होता. त्यांचे लोक त्यांचे काय करतात याबाबत नव्हता. त्यांच्या अतिरेक्यांनी त्यांच्या देशात अतिरेकी कारवाया केल्या तर त्यामुळे आपल्या देशातले लोक आपलेच नुकसान करतात ते योग्य ठरते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? म्हणजे, ते नाही का स्वतःच्या पायावर गोळी मारून घेत, मग आपणही आपणही आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली तर काय बिघडले असे म्हटल्यासारखे वाटत नाही काय? आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जे वाक्य मी उद्धृत केले होते ते "कोणी कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा" जास्त "जगजाहीर सत्य आहे"... मुद्दा हा की "ते तुमच्या तोंडावर सांगूनही मला काही फरक पडणार नाही, ते तसेच चालूच राहील", इतका ठाम विश्वास त्यातून दिसतोय हे जास्त महत्वाचे. अर्थात शहामृगासारखे तोंड जमिनीत खुपसून सगळे आलबेल आहे असे म्हणायचे असले, तर... चालू द्या. दुसर्‍याच्या बोलण्यावर लगेच इतका विश्वास ठेऊ नका हो राजेसाहेब! बादवे... मी कोणत्याही एका राजकीय पक्षाचा समर्थक नाही... माझ्या बुद्धीने दिसलेल्या सगळ्या चुकाना चुका म्हणतो, सगळ्या चांगल्या कामांना चांगले म्हणतो... मग ते कोणत्या व्यक्तीने / पक्षाने केले हा मुद्दा मला गौण असतो... या सगळ्यांपेक्षा देश कितीतरी पटींनी जास्त महत्वाचा असे समजतो. गैरसमज नसावा :)

"ना मनोरंजक गाणी, ना कॉमिक रिलीफ ना अंगप्रदर्शन" हे अगोदर वृत्तपत्रात वाचलं होतं, म्हणून बघावासा वाटत होता पण जॉन अब्राहम मुळे चित्रपटावर डाउट खाऊन होतो. परीक्षण वाचून तीन तास वाया जाणार नाहीतसे वाटते. इतर मिपाकरही चित्रपट कसा वाटला ते सांगतीलच.

जेंव्हा आपले ५ जवान मारले गेले त्या आधी भारतीय सेना ने पाक व्याप्त काश्मीर मध्ये घुसून ४ आतँकवाड्यांची गाठडि वळली चार अतिरेकी पाकचे मारले म्हणून आपल्याला फारच वाईट वाटते आहे, कोणीच १०० % शुद्ध नसते पण नियत नावाची काही गोष्ट असते त्यात पाकिस्तान बसते असे वाटत नाही

गर्व आहे मला मराठी असल्याचा. हे हिंदीयुक्त मराठी झाले ! मराठी "अभिमान" = हिंदी "गर्व" मराठी "गर्व" = हिंदी "घमण्ड"

चित्रपट हे मॅक्रो पातळीवर नसले तरी माइक्रो लेवल ला खूप मोठे बदल घडवून आणू शकतात हे माझे मत. एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्‍यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्‍याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल. यातून काय समजायचे ते समजले. असो.

एसी ऑफिस मध्ये बसून युद्धाची भाषा ह्या मजकुराची, सहमत . निदान हा सिनेमा पाहून तर असे स्टेटस लिहिणाऱ्या लोकांना ह्यापुढे अश्या लिहिण्याच्या मागील पोकळपणा जाणवेल. ज्या दिवशी पाकिस्तान हा अण्वस्त्र सज्ज झाला त्याच दिवशी भारत व पाकिस्तान चा पारंपारिक युद्धाचा मार्ग निकाली लागला ,कारगिल च्यावेळी काय घडले काही दिवस युद्ध चालले , दोन्ही देशाच्या अर्थ व्यवस्थेवर ताण पडला , जवानांचे बळी गेले. शेवटी अण्वस्त्र हल्ला होऊ नये म्हणून क्लिंटन ने मध्यस्थी केली. ह्यात आपण व पाकिस्तान ने नक्की काय मिळवले व काय गमावले , एका अमेरिकी सैनिकी तज्ज्ञाचं तू नळीवर भाषण ऐकले, त्याच्यामते १०० हून जास्त अण्वस्त्रे असलेल्या पाकिस्तान ने ती देशात सर्वत्र पसरवून ठेवली आहेत व त्यांचा रोख प्रथम ज्यू राष्ट्र व मग भारतावर आहे , ह्यामुळे पाकिस्तानी कोणत्याही अण्वस्त्र केंद्रावर कोणीही हल्ला केला तरी त्या १०० अन्वस्त्राच्या पैकी कोणतीही एक आपले लक्ष्य गाठू शकते , तेव्हा हल्ल्याने पाकिस्तान अण्वस्त्र मुक्त होणे नाही , ह्यामुळे युद्ध खोरी चे धोरण अमेरिकेची शस्त्र व्यापार चालविण्यासाठी उपयुक्त ,पूरक असेल , भारताला हा खेळ परवडण्यासारखा नाही , मग पाकिस्तानी हल्ल्यांचे काय करायचे ह्या प्रश्नावर सोप्पे उत्तर म्हणजे , ते ज्या पद्धतीचे युद्ध करतात त्याच पद्धतीचे छुपे युद्ध त्यांच्यावर लादायचे , ह्या सिनेमातून हेर संस्था त्यांचे कोवर्ट ऑपरेशन ह्यावर उत्तम प्रकाश टाकला आहे , गुजराल पंतप्रधान असतांना गुडविल म्हणून त्यांनी रॉ चा रोष पत्करून पाकिस्तानमधील रॉ च्या सर्व कोवर्ट मोहिमा हट्टाने थांबविल्या. अनेक वर्ष अश्या मोहिमा राबविल्या जातात व त्या उभ्या करतांना अनेक गोष्टी पणाला लावल्या जातात. मात्र त्यावेळी केलेली चूक परत घडली नाही हेच काय ते आपले नशीब रॉ व आयबी ने अश्या मोहिमा पाकिस्तानात अधिकाधिक राबविल्या पाहिजे , बलुचिस्तान मध्ये भारतीय हस्तक्षेप ह्या झरदारी ह्यांच्या आरोपावर भारतीयांनी अजिबात आडकाठी घेतली नाही व सामान्य जनतेने असे होत असेल तर करणे उचित नाही अशी महात्म्यांची भूमिका सुद्धा घेतली नाही , मुळात ह्या सिनेमावर काही तामिळ संघटनांनी आक्षेप घेतला व तो योग्य होता , सिनेमा एकांगी बनवला गेला , ही संघटना रॉ ने उभी केली ह्याचा पुसटचा सुद्धा तेव्हा उल्लेख नाही आहे , व शांती सेनेच्या अपयशाचे प्रमुख कारण म्हणजे लिट्टे शी सहानुभूती दाखवणारे व त्यांना समर्थन करणारे भारतात राजकीय नेते , लष्करी अधिकारी ते अगदी रॉ मध्ये सुद्धा वरिष्ठ अधिकारी होते , त्याचमुळे त्यांनी बिभीषणाची भूमिका पार पडली , ह्या सिनेमातील रॉ चा एक अधिकारी हनी ट्रेप ला बळी पडून देशाची गद्दार होतो असे दाखवले आहे , हेर जगतात हनी ट्रेप हे एखाद्या हेराला गद्दार करण्यासाठी सर्वात प्रभावी अस्त्र आहे ,, हि वस्तू स्थिती मान्य केली तरी तरी ह्या सिनेमात हाच गद्दार त्या संघटनेला सहानुभूती असल्याने गद्दार झाला असे दाखवले असते तर सिनेमा खर्या अर्थाने समतोल झाला , माझ्या परिचयात लंडन व जर्मनीत अनेक तामिळ निर्वासित माझे चांगले स्नेही बनले , ह्यातले सामान्य नागरिक कोण , व एकेकाळी संघटनेची पट्टी डोक्यावर बांधणारे कोण हे न उलगडणारे कोडे आहे. ज्यांनी आमच्या हाती शस्त्रे दिली त्यांनीच आम्हाला संपविण्यासाठी सैन्य का पाठवले , हा त्यांचा प्रमुख प्रश्न. आणि काय गंमत होती , त्याचवेळी अनेक अफगाण निर्वासित आमच्या हॉटेलात काम करायचे , त्यांनी सुद्धा नेमका हाच प्रश्न विचारला होता . आता रॉ आणि लिट्टे व आय एस आय व तालिबान एवढाच काय तो फरक होता. बांगलादेशच्या संबंधी तू नळीवर के जी बी चा एका माजी हेराची मुलाखत पहिली , त्याने बांगला देश निर्मिती हे के जी बी चे कारस्थान असून ह्यात पैसा व शस्त्रे भारतीय हेर संस्थेला पुरवली गेली असा उल्लेख केला , कलकत्ता येथील रशियन दूतावासात शस्त्रांचे साठे त्याने पहिले असल्याचे सुद्धा सांगितले , पैसा व शस्त्रे त्यांची असली तरी भौगोलिक स्थिती पाहता त्यांना रॉ ची मदत घेणे अनिवार्य होते , नुकत्याच जन्मलेल्या रॉ ला अश्या मोठ्या कोवेर्ट भूमिकेतून खूप काही शिकता आले , व रशियाचे दुर्दैव असे की अफगाण मध्ये त्यांच्या विरुद्ध अमेरिकेनं आय एस आय चा असाच वापर केला. ह्या सिनेमात राजीव गांधी ह्यांच्या हत्येमागील एक कारण परकीय कंपन्या , हेर संस्था , देश होते असे दाखविले ते फारच सूचक होते , राजीव ह्यांच्यावर रशियाचा प्रभाव , भारतासारखी मोठी बाजारपेठ व ती रशियाच्या पतनानंतर मुक्त होणे हे परकीय कंपन्यांच्या साठी हिताचे होते , असा उल्लेख सुद्धा सिनेमात आहे ,तो ह्या सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेतो. राजीव गांधी ह्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मंत्री मंडळातील माजी परार्ष्ट्र मंत्री नरसिंह राव ह्यांनी पंतप्रधान झाल्यावर अभूतपूर्व अशी भारतीय परार्ष्ट्र धोरण बनवणे ज्यात लुक वेस्ट चा नारा व ज्यू राष्ट्रांशी संबंध व अर्थ व्यवस्था मुक्त करणे अश्या अनेक घटना पहिल्या की सिनेमात काही वाक्यांचा संदर्भ लक्षात येतो. एरवी राजीव ह्यांच्या कारकिर्दीत ह्याच नरसिंह राव ह्यांच्या मनात असून सुद्धा त्यांना लुक वेस्ट चा नारा देणे शक्य झाले नाही , आज ह्याच निर्णयाची आपण मधुर फळे चाखत आहोत , रशियाला न सोडता आज अमेरिका आपले मित्रराष्ट्र आहे , ज्यू राष्ट्राने भारताशी अनेक आघाड्यांवर सहकार्य केले आहे. आज रशिया नंतर तेच आपले प्रमुख शस्त्र विक्रेते आहेत, माझ्या साठी महत्त्वाचा मुद्दा ह्या सिनेमा पाहिल्यावर एवढाच उरला की भारत स्वतंत्र झाल्यापासून बंदिस्त अर्थव्यवस्थेत ९० च्या दशकाच्या सुरूवातीपर्यंत आपण केलेली प्रगती व १९९१ ते आजतागायत केलेली प्रगती त्यात एक मध्यम वर्गीय म्हणून १९९१ पासून आजतागायत माझ्या पिढीची झालेली भरभराट महासत्तांच्या प्रमुख माझ्या देशात येउन नोकर्‍या मागणे. व अश्या अनेक गोष्टी पहिल्या की एकच प्रश्न डोक्यात येतो हीच मुक्त अर्थव्यवस्था १९९१ पेक्ष्या १९५१ साली भारतात अंगीकारली असती तर भारत कसा असता आणि असाही प्रश्न डोक्यात येतो समजा १९९१ साली ही मुक्त अर्थव्यवस्था जर आपण न स्वीकारता जुने मॉडेल आजतागायत राबवीत असतो तर आज भारत कसा असता.

छान प्रतिसाद
हीच मुक्त अर्थव्यवस्था १९९१ पेक्ष्या १९५१ साली भारतात अंगीकारली असती तर भारत कसा असता आणि असाही प्रश्न डोक्यात येतो समजा १९९१ साली ही मुक्त अर्थव्यवस्था जर आपण न स्वीकारता जुने मॉडेल आजतागायत राबवीत असतो तर आज भारत कसा असता
ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा काढाव अशी विनंती आहे ..त्यावर अधिक साधक बाधक चर्चा होइल ..

Yuri Bezmenov, a Russian born, KGB trained subverter tells about the influence of the Soviet Union on Western media and describes the stages of communist takeovers. This interview was conducted by G. Edward Griffin in 1984. ह्या इसमाची पूर्ण मुलाखत येथे उपलब्ध आहेत. भारताविषयी ममत्व असलेल्या व भारतात के जी बी साठी काम केले असल्याने के जी बी च्या भारतात कारवाया , व अमेरिकेविरुद्ध कारवाया ह्यांच्या विषयी विस्तृत माहिती देतो , भारतीय विचारवंत , कॉम्रेड जे रशियात दौऱ्यावर यायचे त्यांना के जी बी पोलिटिकल prostitute का म्हणायचे. ह्यावर प्रकाश पाडतो.

निनाद, कुठून शोधता तुम्ही असे कंटेंट्स ? पाताळयंत्रीपणा म्हणजे काय याचा रशियाहून दुसरा नमुना शोधूनही सापडणार नाही असाच विचार ही मुलाखत पाहून आला. आपणच नाही तर अगदी अमेरीकन्सही रशियाच्या हातातले बाहूले आहेत की काय असा विचार आल्याशिवाय राहत नाही. मात्र रशियाच्या विघटनानंतर परिस्थीती बदलली असेल अशी भाबडी आशा आहे.

धर्मराजमुटके रशिया ने त्यांच्या कह्यातील देशांना जेवढे आपल्या जाळ्यात ओढले किंवा अमेरिकेला ओढण्याचा प्रयत्न केला तेवढाच प्रयत्न अमेरिकेने सुद्धा केला , कोल्ड वॉर ह्यालाच तर म्हणतात. मात्र अमेरिकेची जगभर पसरलेली प्रसारमाध्यम व हॉलीवूड ला रशियाकडे तोड नव्हते. के जी बी संपली मात्र सी आय ए ला मोकळे रान मिळाले. आज भारतात सी आय ए चे कितीतरी हस्तक प्रसार माध्यमे ते राजकीय नेत्यांच्या स्वरुपात असतील , ही क्लिप १९८४ मध्ये ह्या हेराने अमेरिकेत दिलेल्या मुलाखतीची आहे , ह्या क्लिप मधील त्यांचे सर्वात महत्त्वाचे विधान म्हणजे जगातील कोणतीही ग्रास रूट चळवळ ही उस्फूर्त नसते , तर एक नियोजनबद्ध कारवाई असते. सध्या अरब लीग मध्ये झालेली चळवळ असो किंवा आमच्या जर्मनीत झालेली सोलर एनर्जी ची असो त्यामागे अनेकांचे हात होते म्हणूनच जर्मनी मधील ह्या आंदोलनावर लेख लिहितांना शेवटी मी अशी एक चळवळ लवकरच भारतात होईल असे लिहिले होते व एका वर्षाच्या नंतर लोकपाल ची चळवळ उभी राहिली . पण आपले राजकारणी त्याला पुरून उरले.

निनाद अप्रतिम प्रतिसाद ! आजच मद्रास कॅफे बघीतला . असे सिनेमे भारतामध्ये फार कमी बनले आहेत. तुमच्या सविस्तर प्रतिसादात इन्सायडर स्टोरी म्हणजे काय असते ..
.जगातील कोणतीही ग्रास रूट चळवळ ही उस्फूर्त नसते , तर एक नियोजनबद्ध कारवाई असते.
ते कळले. आज या युगात हे सर्व सामान्य नागरीकाला हे समजावयाला हवेच. आज खुद्द अमेरीकेत नागरीक सिरीयन युद्धाला विरोध करतात ते हे त्यानां आता कळते म्हणुनच .

अशोक पाटील आता कुठे भारतात अश्या पद्धतीचे सिनेमे बनविण्यात सुरवात झाली आहे , आता भारताच्या छोट्या पडद्यावर इतिहास घडवणारी भव्य मालिका २४ ही मालिका येत आहे . अमेरिकेत एका दिवसात घडणाऱ्या दहशतवादी घटना त्यामागील दहशतवादी संघटना ,ह्या संघटनेच्या नावाखाली आपला स्वार्थ साधणारे अमेरिकन राजकारणी अश्या गोष्टींचा उहापोह करणारी काल्पनिक मालिका अमेरिकेतच नाही तर जगभरात लोकप्रिय झाली तिचे हक्क अनिल कपूर ज्याने ह्या अमेरिकन मालिकेत काम केले होते त्याने व कलर्स ने विकत घेतले आहे. व आता ह्या किंवा पुढच्या महिन्यात भारतात हि मालिका सुरु होईल. हिचे आठवड्यात एका तासाचे भाग म्हणजे प्रेक्षकांना पर्वणी असतील ,

२४ नेहमीच अतिरंजीत वाटली, अमेरिकेच्या आंटि टेररिस्ट स्कॉडचे लोक (एकमेकांसोबतही) इतके विक्षिप्त वागतात हे पाहुन तुफान विनोदी या द्रुष्टीकोनातुनच ही मालिका बघितल्या आहे. ज्यॅक बाउर म्हणजे जणू बिगर दॅन वन म्यान आर्मी. अगागा! :D अवांतर :- तसही भारतिय निर्मीतिमुल्ये बघता हिला कितपत न्याय मिळेल ही उत्सुकता आहेच.

छोट्या पडद्यावर इतिहास ह्या अर्थी लिहिले की सासू सुनांच्या मालिकेत हि मल्टी स्टारर मालिका जिचे हक्क तब्बल दीडशे कोटी देऊन घेतले आहेत. व सध्याचा स्टार दिग्दर्शक अभिनय देव हा हि मालिका दिग्दर्शित करणार आहे , आपल्याकडे अजून सिनेमाचे बजेट अपवाद वगळता १०० करोडच्या वरती जात नाही , आता भारतीय मालिका म्हटले म्हणजे ते ओरीजनल २४ ला कितीसा न्याय देऊ शकतो हा प्रश्न आहे पण सध्याच्या छोट्या पडद्यावर ज्या मालिका आहेत त्यांच्या तुलनेत ही बरीच उजवी असेल आणि राहिला प्रश्न अमेरिकन २४ चा तर त्यात ती मालिका असल्याने अतिरंजित असणे स्वाभाविक आहे , पण ह्या मालिकेचे कौतुक म्हणजे आपल्याच प्रशासनात आणि समाजात पैसा व सत्ता , ह्यांचा वापर अमेरिकन नेते , अध्यक्ष , व्यापारी करून अमेरिकन जनतेला दहशतवादाच्या बागुलबुवा दाखवून आपले उखळ कसे पांढरे करतात. एका सिझन मध्ये त्यांनी असे दाखवले आहे की अमेरिकेतील लॉबी ला मुस्लिम राष्ट्रावर हल्ला करायचा असतो. म्हणून ते अमेरिकेत त्या राष्ट्रांच्या एका निरपराध मुस्लिम माणसाच्या घरात तो दहशतवादी असल्याचे पुरावे जमवून त्याच्या भावाला ओलिस धरून त्या माणसाला बाँब ने भरलेली पिशवी देऊन भूयारी रेल्वेत बसवतात. निदान त्या मालिकेच्या धाडसाचे कौतुक करायला हवे , अमेरिकन जनतेला असे दाखवून हि मालिका यशस्वी करून दाखवली.

एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्‍यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्‍याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल.
AC office मध्ये बसणार्यांना पाकिस्तानी दहशतवाद नष्ट व्हावासा वाटणं हा गुन्हा आहे का? अण्णा चे लोक श्रीलंकेसाठी तामिळी दहशतवादी होते. परंतु त्यांच्या ह्या वागण्याला श्रीलंका जबाबदार नाही का? श्रीलंकेत तामिलींवर जे अमानुष अत्याचार होत होते त्याच काय? भारताच्या शांती सेनेचं काम काय होत? तामिलींवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी भारताने प्रयत्न का केले नाहीत? श्रीलंकेतल्या दहशतवादाची अखेर करण्यामध्ये भारताने एवढी शक्ती वाया घालवण्यापेक्षा आपल्याच देशातला पाकिस्तानी दहशतवाद संपवण्यावर लक्ष द्यावं हि AC office मध्ये बसणाऱ्या लोकांची अपेक्षा रास्त नाहीये का?