रोज रात्री आमच्या खान-पान विधीसाठी मासे,कोंबडी आणि शेळी आपापला देह सत्कारणी लावतच असतात.
बाकी, पूजा, अर्चा, नवस, व्रत वैकल्ये ह्यांची आम्हाला काहीच गरज नाही.
केवळ हिंसा हा मुद्दा असेल तर आमच्या वेळेची हिंसा सरकारकडून होत असतेच.आजकाल त्याचेही काही वाटत नाही.
काही यज्ञ विधींमध्ये कोहोळा एका घावात कापणे असा विधी बघितला आहे... "आमचा खिसा पण" बायकोने काय तो एकदाच कापावा असे वाटते. (प्रेयसीने मात्र रोज कापावा.)
अनेक धार्मिक मंडळींना जीभेसाठी दुसर्या जीवाची हत्या करणे मान्य नसल्याने ते याला विरोध करतात . अमुक दिल्यावर देव तमुक करेल असे मानणे म्हणजे देवाचे / देव या कल्पनेचे अवमुल्यन आहे असे मानून संत याला विरोध करतात . तर या व्यवस्थेचा ज्यांना फायदा होतो ते याचे समर्थन करतात .
नवीन येणाऱ्या कायद्यात नरबळी हा गुन्हा मानला आहे . इतर पशूंच्या बळी बद्दल काहीही म्हटले नाही .
पुराणामध्ये यज्ञात पशु बळी देण्याचे विधान आहे . एका यज्ञात तर इतके बळी दिले कि त्या बळीच्या वाळत घातलेल्या कातडीने नदीचे दोन्ही तट लांबपर्यंत भरून गेले आणि त्या नदीला चर्मण्वती असे नाव पडले . पुढे जैन व बौध्द धर्माच्या धर्माच्या प्रभावाने हिंदू वैदिक शाकाहारी होऊ लागले तेव्हा हा प्रकार बंद झाला किंवा प्रतीकात्मक रित्या होतो .
देवाच्या नावाखाली प्राण्याचा बळी देणे आणि नंतर नैवेद्य म्हणून ते मांस खाणे, हा खरंच दुर्दैवी प्रकार आहे.
मांसाहार करायचाच आहे तर तो देवाच्या नावाआड कशाला?
आमच्याकडे लग्न झाल्यानंतर कुलदैवतांचा गोंधळ घालून बकर्याचा बळी देण्याची प्रथा आहे ... आमच्या लग्नात या प्रथेला छेद देत आम्ही फक्त गोंधळ घालूनच थांबलो ... सर्व काही व्यवस्थित चालू आहे ....
नाही नाही गोंधळ घरी नाही, जेजुरीला देवळात घालतात ... त्या निमित्ताने देव दर्शन पण होते ... आणि वाघ्या मुरली च्या performance मधून लोक संगीताची अदाकारी पण बघता येते ... शिवाय अशा प्रथांमधून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतो ...
त्या निमित्ताने देव दर्शन पण होते ... आणि वाघ्या मुरली च्या performance मधून लोक संगीताची अदाकारी पण बघता येते ... शिवाय अशा प्रथांमधून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतो ...
एखाद्या गोष्टीचं योग्य जस्टीफिकेशन नसलं की इतर अनेक असंबद्ध गोष्टी पुढे केल्या जातात याचं एक उदाहरण.
बाळ साहेब, टीवी, सिनेमातूनही रोजगार निर्माण होतो ना, देव धर्म या सारख्या गोष्टीवर किती तरी सिनेमे, मालिका निघतात ...ग्रामीण पातळीवर त्यांच्या क्षमतेनुसार ते देवांची महती गाणारे लोकसंगीत सादर करून पोटाची खळगी भरतात ... तरी पण तुम्ही म्हणणार का कि रोजगार निर्माण होतो हे ridiculous कारण आहे?
नित्य नुतन,
आपण अनिल अवचटांचं वाघ्या मुरळी हे पुस्तक वाचलं नसेल तर जरुर वाचा. हे पुस्तक जुनं जरुर आहे. पण त्या परिस्थितीत चांगल्या अर्थाने बदल घडला असेल तर तो इतकाच की या प्रथा कमी झाल्या. एरवी ज्या थोड्या प्रमाणात त्या चालू आहेत त्यामधे त्यांचं शोषण कमी झालं असण्याची कोणतीही तार्किक शक्यता नाही.
या पुस्तकात लेखकाने प्रत्यक्ष त्या त्या समूहांमधे जाऊन वाघ्या मुरळी आणि अन्य कलाकारांच्या त्या "कला" प्रदर्शनामागची तपशीलवार सत्यं आणि "रोजगारा"चं वास्तवही स्पष्ट समोर आणलं आहे.
नवीन पुस्तकाचा नाव सुचवल्याबद्दल धन्यु गवि साहेब .. पण वाघ्या मुरळीच्या प्रथेचं मी समर्थन करते आहे असा कृपया गैरसमज करून घेऊ नका ... देवांचा गोंधळ घालण्यामागे त्यांचे गुणगान गाणे देवादिकांच्या कथा ऐकणे हाच मूळ उद्देश असतो ... आता वाघ्या मुरळीच्या जागी तिथे जी skilled व्यक्ती उपलब्ध असेल ती सुद्धा चालू शकते ..
माझा मूळ मुद्दा बाजूलाच राहिला .. आणि कोणीतरी चुकीच्याच रुळावर ही गाडी नेवून ठेवल्याचा भास मला सतत होत आहे
नाही नाही. तुम्ही समर्थन करताहात म्हणून नाही सुचवलं पुस्तक. वाघ्या मुरळीची हलाखी किंवा अन्य काही वाचून मन कष्टी व्हावं असाही उद्देश नाही.
फक्त ते नेमके मुद्दे जे तुम्ही मांडले आहेत (कला, रोजगार) त्यांची आणि फक्त त्यांची सत्यस्थिती लक्षात येण्यासाठी सुचवलं.
प्रत्येक व्यवसायाचे एक महत्व असते .. मूळ कारण असते.. जसे टीवी, सिनेमा हे मूळ मनोरंजनासाठी आहे.. मनोरंजन हे मूळ कारण आहे.. रोजगार हा त्यातला दुय्यम भाग आहे.. तसे एखाद्या व्यवसायातले मूळ कारणच अर्थहीन, कालबाह्य असेल तर केवळ रोजगार हे justification जर व्यवसाय तगवण्यासाठी दिले तर ते ridiculuous आहे.. लोकसंगीत व त्यातून होणारे मनोरंजन हे जिथे लोकांना भावतयं त्याला काहीच हरकत नाही...
काल्पनिक उदाहरण घ्या.. जसे फाशी द्यायला मांग (??) असतात तसे नरबळी देणारे समजा एक विशिष्ट लोक असतील तर त्यांचा रोजगार जाईल म्हणून नरबळीप्रथा चालू ठेवणे कितपत योग्य??
वाघ्या मुरली सादर करीत असलेल्या लोक संगीताचे मूळ कारण हे देवाचे गुणगान गाणे हे आहे .. ते केल्याबद्दल त्यांना चार पैसे मिळतात ... आता हे कारण अर्थहीन आणि कालबाह्य असूच शकत नाही ... नाही का साहेब ? .. मी काही वाघ्या मुरली प्रथेचे समर्थन करत नाही आहे ... देवाचे गुणगान गाणे हे काम वाघ्या मुरली च्या ऐवजी इतर कोणीही केले तरीही देवाला ते तितकेच प्रिय असेल ... आणि देवांचा गोंधळ घालण्यामागे हाच मूळ मुद्दा आहे आणि असलाच पाहिजे ... हं आता अशा लोकसंगीताच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त हे वाघ्या मुरली काय करतात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, याच्याशी 'गोंधळ' घालणं न घालणं याचा काही संबंध असूच शकत नाही.. ...
पण तुमच्या बोलण्यात तर असा सूर दिसतो कि सिनेमे हे पांढरपेशे लोकांनी बनवलेले असल्याने त्यांना महत्व आहे पण समाजातील मागास स्तराने त्यांच्या लेवल वर केलेले देवादिकांचे कार्यक्रम मात्र ridiculuous आहेत .. जर रोजगार हे दुय्यम कारण आहे तर मग significant लेवल वर पैशांची उलाढाल ही याच सिनेक्षेत्रात होताना दिसते .. कास्टिंग काउच हा प्रकार इथुनच आम्हाला कळला...
नरबळीच्या प्रथेला कोणताही विवेकी माणूस कडाडून विरोधच करेल ..आणि मी सुद्धा यास अपवाद नाही ... पण, वाघ्या मुरलीच्या प्रथेविरुद्ध बोलताना हे उदाहरण म्हणजे (माफ करा पण) थोडी अतिशयोक्तीच वाटते ... मी पुन्हा एकदा अधोरखित करते कि मी वाघ्या मुरली प्रथेचे समर्थन करत नाही .. पण तरीही त्रयस्थपणे पाहिल्यास कोणीही सांगू शकेल कि नरबळी च्या प्रथेने समाजाची जर २००% हानी झाली असेल तर वाघ्या मुरलीच्या प्रथेने ती त्याच्या अर्धीही नसावी ...
मी लोकसंगीताला अर्थहीन म्हटलेले नाही.. उलट ते उदाहरण म्हणून वापरलय.. लोकसंगीताने मनोरंजन होत असल्याने रोजगार हा मुद्दा वापरायची गरज नाही.
पण तुमच्या बोलण्यात तर असा सूर दिसतो कि सिनेमे हे पांढरपेशे लोकांनी बनवलेले असल्याने त्यांना महत्व आहे पण समाजातील मागास स्तराने त्यांच्या लेवल वर केलेले देवादिकांचे कार्यक्रम मात्र ridiculuous आहेत
अत्यंत चुकीचा अर्थ घेतलात तुम्ही..
माझ म्हणण एवढच आहे की व्यवसायाचा मूळ हेतु अर्थहीन, कालबाह्य असेल तर रोजगार हा मुद्दा आणला जातो जो त्या परिस्थितीत ridiculuous वाटतो..
नरबळीच्या प्रथेला कोणताही विवेकी माणूस कडाडून विरोधच करेल
याच कारणासाठी हे उदाहरण वापरलं. मूळ व्यवसाय अर्थहीन असल्याने त्याच्या रोजगाराचा विचार करुन हा व्यवसाय justify करणे हे ridiculuous.
माझ म्हणण एवढच आहे की व्यवसायाचा मूळ हेतु अर्थहीन, कालबाह्य असेल तर रोजगार हा मुद्दा आणला जातो जो त्या परिस्थितीत ridiculuous वाटतो..
हे वाक्य विधान म्हणून एकदम बरोबर आहे बाळ साहेब...तथापि निव्वळ हा व्यवसाय चालावा म्हणून देवांचे गोंधळ घातले पाहिजेत असे मी कोठेही म्हटलेले नाही ...
देवांचे गोंधळ घालताना अनेकांचे योग्य अयोग्य असे अनेक उद्देश असतील.. केवळ प्रथा म्हणून करणारे जसे लोक आहेत तसेच भक्ती भावाने गुणसंकिर्तन करणारेही लोक आहेत ... . पण अशा कार्यक्रमातून एखाद्या गरिबाला त्याच्या (under the sun केलेल्या) कामाचा मोबदला मिळत असेल तर त्यात आक्षेपार्ह काय आहे...
लोकसंगीताने मनोरंजन होत असल्याने रोजगार हा मुद्दा वापरायची गरज नाही.
भारतासारख्या सामाजिक विषमता असलेल्या देशात एखाद्याचे निव्वळ मनोरंजन हे काही लोकांचे उपजीविकेचे साधन असते .. म्हणूनच रोजगाराचा मुद्दा आला ..ते तसे नसावे अशी माझीसुद्धा अगदी मनापासून इच्छा आहे हो ...
मी या आधी सुद्धा दोन तीन वेळा म्हटले आहे आणि आता ही सांगते की वाघ्या मुरलीच्या प्रथेचे समर्थन करण्याचा माझा हेतु नाही ...
हा प्रतिसाद वजा प्रष्ण हा आपल्याला नसुन श्री बाळ सप्रे यान्च्यासाठी होता हे आपण नीट वाक्य हे कोणाच्या प्रतिसादातिल आहे हे तपास्ल्यावर कळले असते,असो सप्रे साहेब याना माझ्या प्रष्णाचे स्पष्टीकरण द्यावे ही विनन्ती.
रोजगाराचे एक साधन आहे.. पण मूळ हेतु मनोरंजन हे आहे.. भविष्यात जर यातून होणारे मनोरंजन लोकांना रुचेनासे झाले तर केवळ वाहिन्यांतील कर्मचार्यांचा रोजगार जाउ नये म्हणून या वाहीन्या चालू ठेवाव्यात असा मुद्दा आल्यास तो योग्य नाही .. म्हणून मनोरंजन प्राथमिक आणि रोजगार दुय्यम..
आता ज्या काही बातम्याना वाहिलेल्या वाहिन्या आहेत त्या कसले मनोरन्जन करतात पुर्वी जेव्हा दुर्दर्शन होते तेव्हा बहुसन्ख्य लोक बातम्या सुरु झाल्या की बाजुला जात असत व बातम्या सम्पल्यावर परत येत असत्,आता तर २४ तास फक्त बातम्याच्या वाहिन्या आहेत मग त्यासुद्धा मनोरन्जनासाठी आहेत असे म्हणने आहे का?
सर्व वाहिन्यांचा मूळ हेतू "पैसा कमावणे"... आणि त्यासाठी जास्तितजास्त प्रेक्षकवर्ग (TRP) खेचणे. कारण जेवढा जास्त TRP तेवढ्या जास्त बातम्या मिळतात आणि त्यांचा दरही वाढवता येतो.
हाच मूळ हेतू (पैसा कमावणे) सफल करण्यासाठी एखाद्या वाहिनीने फक्त एखाद्याच खास विषयाची निवड केली (ह्याला इंग्लिशमध्ये टॅक्टीक म्हणतात) की ती झाली स्पेशालिस्ट वाहिनी, उदा बातम्यांची वाहिनी, चलत्चित्र वाहिनी, इ. पण पैसे कमावणे हाच मूळ हेतू. त्यामुळेच बर्याचश्या बातम्यांच्या वाहिन्या त्यांच्या बातम्यांचीही एखाद्या सिरियलसारखी जाहिरात करतात आणि बातम्यांचे सादरीकरण अत्यंत नाटकीय पद्धतीने करतात.
दादा साहेब , लोक कीर्तनाचे , अभंगांचे कार्यक्रम ठेवतात .. भक्तीची ती एक अभिव्यक्ती आहे ... मग अशा गोंधळ, लोक संगीताच्या माध्यमातून देवाचे गुणगान गाणारे कार्यक्रम केले तर ते असंबद्ध ? कळले नाही बुवा ...
भक्तीची ती एक अभिव्यक्ती आहे ... मग अशा गोंधळ, लोक संगीताच्या माध्यमातून देवाचे गुणगान गाणारे कार्यक्रम केले तर ते असंबद्ध?
लोककला वगैरे ठिक आहे हो, पण मुळात एक देव आहे. त्याचं गुणगान केल्यावर तो खूष होतो. हा शूद्ध भंपकपणा आहे. रीत पाळली नाही तर कोप होइल. किंवा स्वतःची समजूत म्हणून इतक्या पिढ्या करत आलोय म्हणून करू असली कारणं काही कामाची नाहीत.
दादा साहेब, संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज देवांचे अभंग रचून त्यांची महती आळवत असत.. असे वाटते कि तुमच्या दृष्टीने तो सुद्धा भंपकपणा असावा .. तुम्ही सांगितलेल्यापैकी एकही पोकळ कारण माझ्या बोलण्यात अजूनपर्यंत तरी आलेले नाही ..तुम्ही नका पाळू रिती रिवाज ... ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो ..
अनिंस वाल्यांनी खुळचट चमत्कारांचा बुरखा पाडल्यावर पुरोगामी महाराष्ट्रातल्या (हो, त्याच राज्यातल्या ज्यात मुख्यमंत्री जोडीने शासकीय इतमामात विठ्ठलाच्या देवळात जाउन पूजा करतो.) लोकांनी मग विविध संतांना पांडूरंगाचा साक्षातकार झाला तो खोटा का? असं विचारलं. त्यावर दाभोळकरांनी संतांकडे खूप प्रतिभा होती असं मार्मिक उत्तर दिलं होतं.
आज जो आजुबाजूला किडका समाज बघताय ना. तो दहा-वीस वर्षात तयार झाला नाहिये. कित्येक पिढ्यांपासून चालत आलय हे. एंट्रॉपी थोडी कमी-जास्त होत असेल. अंधश्रद्धा, जातीयवाद, अस्वच्छता, स्त्रियांचा छळ वगैरे वगैरे. याचा फुकाचा अभिमान बाळगायचा की हे सगळं विसरून नविन, स्वच्छ समाजासाठी नविन मुल्यं तयार करायची ते तुम्ही ठरवा.
शिवाय अशा प्रथांमधून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतो ...
हे म्हणजे आम्ही बाहेरच जाऊन बसतो, कारण यामुळे डुक्करांना जेवण मिळते, असे म्हणण्यासारखे आहे... :)
मी शाळेत शिकत असताना आमच्या सन्स्क्रुत च्या शिक्षकानी सान्गितले होते की यज्ञात जो बळी (बोकड) देतात तेव्हा तो त्याच्या शरिरावर ठरावीक ठिकाणी खुण करुन कापतात व त्याच्या ह्रुदयावरचे आवरण काढुन ते यज्ञात आहुती म्हणुन वापरतात व उरलेला बोकड नन्तर पुरला जातो त्याचा खाण्यासाठी उपयोग केला जात नाही,अर्थात ही माझी ऐकीव माहीती आहे,बाकी मी स्वता कुठलाही यज्ञ पाहिलेला नाही आणि मला स्वतालासुद्धा बळि देणे हे मान्य नाही.
@बाय द वे, काही यज्ञ विधींमध्ये कोहोळा एका घावात कापणे असा विधी बघितला आहे...तो काही बळी सदृश प्रकार (प्राणी नाही तर फळ) असावा कि काय असे हि वाटते?>>> तसेच आहे... नवचंडी होमात मुख्य यज्ञ पार पडल्यानंतर क्षेत्रपाल/बलिपूजा विधि असतो.. त्यानंतर कूष्मांड(कोहोळा)बली चा विधि असतो... कोहोळा हा शिजायला/पचायला मांसाइतकाच जड असतो..(म्हणे!) म्हणून पशूबळीवर टीका झाल्यानंतर हे असे पर्याय धर्मव्यवस्थेत स्विकारण्यात आले!
नारळ फोडण्याबद्दल पण असेच काहीसे ऐकुन आहे.
नरबळीला पर्याय म्हणुन नारळ फोडतात. नारळाला शेंडी, डोळे असतात. नारळपाणी म्हणजे रक्त आणि खोबरे म्हणजे मांस.
हे खरे आहे आहे का?
हे मी वाचलेले दिले आहे. शेंडीचा उल्लेख त्यात होता म्हणुन आला.
सगळा काथ्या तसाच ठेऊन नारळ फोडायला अवघड जातो म्हणुन माणसाच्या केसाचे प्रतिक म्हणुन म्हणुन थोडा काथ्या तसाच ठेवत असावेत. त्याला आता शेंडीच म्हणणार की.
तुम्ही बट म्हणा हवं तर ;)
कोहोळा हा शिजायला/पचायला मांसाइतकाच जड असतो..(म्हणे!) फक्त शेवटी म्हणे लिव्हलय म्हणून सोडतोय बघा... आव, नुसते गरम पाण्यात बुडवले तरी शिजेल की व्हो ते.. एक ट्पलावर मारायची स्मायली टाका..
अहो, नैवेद्य दाखवल्यानंतर ते काहीतरी खायचेच असते ना? मग ते चावायला, पचायला सोपे असायला नको का? म्हणून दुर्बळ आणि नाजुकसाजुक असा प्राणीच पाहिजे. म्हणून तर हत्ती-घोडे नकोत, वाघ तर नकोच नको, पण अजापुत्रं मात्र बलीं दद्यात् !
प्रतिक्रिया
आमचा तर कधीच आणि कशालाही आक्षेप नसतो...
आक्षेप कोण घेत आहे ?
देवाच्या नावाखाली प्राण्याचा
.
नाही नाही गोंधळ घरी नाही,
म्हणजे कुठेतरी गोधळ घातलातच ना?
कैच्या कै
अगदी अगदी.. रोजगार निर्माण
बाळ साहेब, टीवी, सिनेमातूनही
नित्य नुतन,
नवीन पुस्तकाचा नाव
नाही नाही. तुम्ही समर्थन
प्रत्येक व्यवसायाचे एक महत्व
वाघ्या मुरली सादर करीत
आता हे कारण अर्थहीन आणि
माझ म्हणण एवढच आहे की
रोजगार हा त्यातला दुय्यम भाग आहे
तुम्हाला असे का वाटत नाही
साहेब
वरील २ प्रतिसाद वाचा..
धन्यवाद
रोजगाराचे एक साधन आहे.. पण
समजले नाही
बातम्यांच्या वाहिन्यांचा मूळ
असे वाटत नाही
ठीक आहे..
सर्व वाहिन्यांचा मूळ हेतू
धन्यवाद
वरच्या प्रतिसादात कृपया "..
दादा साहेब , लोक कीर्तनाचे ,
आग लागो भक्ती आणि श्रद्धेला...
दादा साहेब, संत तुकाराम,
अलबत
संतांच्या पातळीवरील भक्ती
हो
एखाद्या गोष्टीचं योग्य
+१११
शिवाय अशा प्रथांमधून ग्रामीण
शिवाय अशा प्रथांमधून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतो ...हे म्हणजे आम्ही बाहेरच जाऊन बसतो, कारण यामुळे डुक्करांना जेवण मिळते, असे म्हणण्यासारखे आहे... :)(No subject)
मांसाहार करायचाच आहे तर तो
सहमत
त्याचा खाण्यासाठी उपयोग केला
पण
@बाय द वे, काही यज्ञ
नारळ फोडण्याबद्दल पण असेच
हम्म
हे मी वाचलेले दिले आहे.
नवलच....
कोहोळा हा शिजायला/पचायला मांसाइतकाच जड असतो..(म्हणे!)फक्त शेवटी म्हणे लिव्हलय म्हणून सोडतोय बघा... आव, नुसते गरम पाण्यात बुडवले तरी शिजेल की व्हो ते.. एक ट्पलावर मारायची स्मायली टाका..आणि असलाच समजा जड, तर
जड कशाला?
Pagination