Welcome to misalpav.com
लेखक: विनोद निंबाळकर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हे इनस्टॉल केले तर मला तुमच्यासारखे मराठी शब्द येतील का हो लिहिता? कसले कसले भारी शब्द आहेत.:) अवस्त कंपनीत मिळतात का ? . . बादवे म्या क्विक हिल टोटल वापरतो. ते स्वस्त आहे:)

१ नंबर शब्द रचना / वापर ... सावरकरांनंतर यांचाच क्रमांक काय म्हणता ? ह.घ्या. पण मनापासून आवडले आहो आम्ही बऱ्याच दिवसांपासून ३-४ वर्षा पासून Microsoft Security Essential Win XP आणि Win 7 वर आणि नवीन laptop मधील खिडकी ८ मध्ये मायक्रोसॉफ्ट खिडकी डीफेन्दर वापरतो काही एक अडचण आली नाही

जुन्या ३३१० श्रेणीतल्या नोकिया भ्रमणध्वनीसंचावर उपलब्ध असलेल्या हिंदी सोयी सूचनांची आठवण आली ... (आयला.. नुसता लेख वाचून माझ्या भाषेवर इतका परिणाम झाला तर हे 'अवस्त' समायोजित केलं तर माझं काय होईल!)

लैच उशीर केलासा . फेब्रुवारीत झालाय अवास्त ८ लॉंच . आता अवास्त २०१४ (९.००) बीटा पण आलाय . असो . आपण बीट डिफेंडर वापरतो . आवस्त ने धोका दिल्यामुळे :D

मी norton इंटरनेट security वापरतो. अर्थाथ विकत घेऊन. काही प्रतिकिया देऊ शकता. आमच्या बा च काय जाते अस कृपया मन्हु नका. मिपा वरच्या प्रतिकिया वाचून/बोध घेऊन अगोदरची ओळ लिहली आहे.

अवस्त ८ मध्ये संगणक आज्ञावली उन्नतीकरण (Software Updater) मोफत आवृत्तीमध्ये देखिल उपलब्ध आहे का?

kidegiri.com ही वेबसाईट तुमची आहे का? किंवा हा वरील लेख तुम्ही लिहीलेला आहे का? कारण हा लेख या आधी किडेगिरी नावाच्या साईटवर प्रकाशित झाला आहे. त्याची कॅशड आवृत्ती येथे दिसेल. http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:ZwiwvJBz7xkJ:kidegiri.com/internet/protect-ur-pc-with-avast-8/40/+&cd=1&hl=en&ct=clnk&gl=in&client=firefox-a मिसळपाव वर अन्य लोकांचे लेख आपल्या नावावर प्रकाशित करण्यास मनाई आहे. - नीलकांत

या निमित्ताने अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे तपशीलवार तुलनात्मक विश्लेषण करता येईल का? काही वर्षांपुर्वी मी क्विक हील वापरले नंतर मॅक-अ‍ॅफी वापरले. पण मला क्विक हील अधिक उजवे वाटले. आपलाही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर विषयीचा अनुभव लिहील्यास नवीन अँटीव्हायरस सॉफ्टवेअर विकत घेणार्‍यांना मदत होईल. तसेही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर फक्त विंडोज काही बाबतीत आवश्यक असल्यामुळेच लागते. नाहीतर linux आहेच.

ह्या लेखाला प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे प्रथमतः मनापासून आभार मानतो, मिसळपाववर हा माझा पहिला लेख आहे. @राव साहेब, होय, मला खूपच उशीर झाला, हा लेख मिसळपाववर प्रसिद्ध करण्यास ! हा लेख मी खूप दिवसांपूर्वी लिहिलेला होता. @टोपीवाला, अवस्तच्या आधी मी नॉर्थनचा अँटीव्हायरस वापरत होतो, २ महिने तो ठीक चालला,नंतर तो अचानक अकार्यक्षम झाला.(हा माझा अनुभव आहे) कृपया तुम्ही आपला अँटीव्हायरस कार्यक्षम आहे कि नाही याची खात्री करा. नमस्कार नीलकांत, आज आपला मेल मिळाला, माझ खात मिसळपाववर सक्रीय केल्याबद्धल धन्यवाद. होय Virtual किडेगिरी.कॉम माझ संकेतस्थळ आहे.

Net Protector NP AV हा Anti virus मी गेल्या ५ वर्षापासुन वापरतोय . काही प्रोब्लेम नाही. आणि स्वस्त पण आहे. ह्याचे अपडेटस पेन ड्राइव मधुनपन नेवु शकता. क्विक हील हा स्केन करतांना बराच वेळ लावतो. अवास्ट चे मोबाइल चे वर्शन कसे आहे ?

avira उत्तम आहे. अवस्त (:))) उगाच कुचाळक्या करतंय. मध्येच सेटप्स च्या .exe उडव, मध्येच facebook, gmail सारखी पेजेस ब्लॉक कर असलं कायतरी. त्यापेक्षा aviraa फार बरं वाटलं.

Avast चांगले आहे , पण हार रोसोर्स हंग्री आहे ! या पेक्षा avira उत्तम आहे,डिटेक्शन रेट जबरा असुन गेले अनेक वर्ष मी हेच वापरत आहे. क्विकहिल इतका खास नाही. अधिक माहिती इथे मिळेल

मला मदत हवी आहे. माझ्याकडे ४ GB चा एक पेन ड्राईव्ह आहे. त्यात अनेक महत्त्वाच्या फाईल्सचा बॅकअप घेऊन ठेवलेला आहे. त्यातील अंदाजे २.५३ GB जागा भरलेली आहे व उर्वरीत रिकामी आहे. २-३ दिवसांपूर्वी तोच ड्राईव्ह एका वेब कॅफेत वापरला होता. तिथून एक व्हायरस घुसला. घरच्या लॅपटॉपवर असलेल्या QuickHeal AntiVirus ने तो नष्ट केला. परंतु आता फाईल ब्राऊझर उघडला की तो पेन ड्राईव्ह empty आहे असे ब्राऊझर दाखवितो. आधीच्या फाईल्सपैकी एकही फाईल दिसत नाही. पण त्या पेन ड्राईव्हची २.५३ GB जागा भरलेली आहे हे सुद्धा फाईल ब्राऊझर दाखवितो. म्हणजे पेन ड्राईव्ह मधील फाईल्स तिथेच असून बहुतेक FAT नष्ट झाले असावे व त्यामुळेच एकही फाईल दिसत नाही. या समस्येवर कोणी मदत करू शकेल का?

वल्ली, तुमच्या सूचनेनुसार तुम्ही दिलेली कमांड रन केल्यावर पेन ड्राईव्हमधील सर्व फाईल्स परत मिळाल्या. मदतीबद्दल तुमचे मनापासून आभार!

तुम्ही जर त्या अँटीव्हायरस स्कॅन नंतर त्या डीवाईस वर काहीही राईट केल नसेल तर तुम्ही डेटा रीकव्हरी टूल द्वारे तुमचा डेटा परत मिळवू शकता

वल्ली साहेबांनी सांगितलंच आहे. ते नाही जमलं . तर "रीकुवा" वापरा . मिळतील फ़ाइल्स . पण . नको तिथे पेन ड्रैव कशाला घुसडायची म्हणतो मी :D :P

अवस्त हा मी वापरत असलेला अँटिव्हायरस आहे व अवस्तबाबत माझा दृष्टीक्षेप येथे प्रकट केलेला आहे. प्रत्येक अँटिव्हायरस आपल्या परीने कार्य करत असतो परंतु संगणकीय तांत्रिक कारणामुळे तो अकार्यक्षम होवू शकतो. आपला अँटिव्हायरस कार्यक्षम आहे कि नाही? याची खात्री करा. अधिक माहिती साठी येथे टिचकी द्या.

सध्या मार्केट मध्ये उपलब्ध असलेले सर्वात सरस अन्टिवायरस प्रोग्राम्स कोणते?

सर्वात सरसची व्याख्या व्यक्तिनुरूप बदलते. विनोदना अव्हास्ट उत्तम वाटतो, पैसाताईंना कॅस्परस्काय तर मला अविरा. अव्हास्ट निष्कारण ताप देतो डोक्याला.

सर्वात चांगली टूथपेस्ट कोणती ? ह्या प्रश्नावर प्रत्येकाच उत्तर वेगवेगळ असू शकत. त्याचप्रमाणे 'सध्या मार्केट मध्ये उपलब्ध असलेले सर्वात सरस अन्टिवायरस प्रोग्राम्स कोणते?' ह्या प्रश्नावर प्रत्येकाच उत्तर आपआपल्या अनुभवावर अवलंबून असेल. या अनुभवामध्ये 'अँटीव्हायरसची किंमत, सहज वापरकर्ता इंटरफेस (Simple User Interface), कार्य करण्याची पद्धत, यामधील नवीन वैशिष्ट, काही अडचण निर्माण झाल्यास अँटीव्हायरसच्या संकेतस्थळा वरून मिळणारी तात्काळ मदत' या गोष्टी प्रामुख्याने समाविष्ट असतात.

सहज वापरकर्ता इंटरफेस (Simple User Interface)
मराठी प्रतिशब्द म्हणजे शब्द समुच्चयातील प्रत्येक शब्दाचं भाषांतर नव्हे. किंबहूना प्रत्येक वेळी त्याची गरजही नसते. इथे तुमचा "सहज" हा शब्द चुकला आहे असे वाटते. त्याऐवजी "साधां" किंवा "साधं" हे शब्द जास्त योग्य वाटतात. आणि शेवटचा इंटरफेस हा शब्द तर तसाच ठेवला आहे. त्यामुळे तुमचा हा भाषांतराचा अटटाहास अनाठायी वाटतो.

आहो मायक्रोसॉफ्ट खिकीतच उत्तम सुरक्षा देत आहे आजकाल... आम्ही ३-४ वर्षा पासून Microsoft Security Essential Win XP आणि Win 7 वर आणि नवीन laptop मधील खिडकी ८ मध्ये मायक्रोसॉफ्ट खिडकी डीफेन्दर वापरतो काही एक अडचण आली नाही... 1 2 3 4