Welcome to misalpav.com
लेखक: अनंतसुत | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हा होता धन्या यांचा प्रतिसाद अगदी अगदी. हापिसात जाऊन काहीतरी कॉपी पेस्ट करत असतात किंवा कुठल्या तरी सर्वरचा ब्याकप घेत असतात. पण बाहे मात्र असा आव आणतात की नासाचे अवकाशयान हेच उडवतात. हे करत असलेल्या फडतूस कामाचे त्यांच्या हापिसात कुणाला कौतुक नसते. मग बाहेर आम्ही यव करतो आणि त्यव करतो सांगत सुटतात.

ह्म्म्म.. श्रीयुत धनेश्वरजी यांचे एकांगी प्रतिसाद नेहमीच डोक्यात जातात. व्यक्तीगत निराशेपायी ते लोकांचा वेळ घेतात आणि अकारण दिशाभूल करण्याचा प्रयत्नही करतात. जोगसाहेब.. थोडे दिवस थांबा, येथेही ते सपशेल शरणागती पत्करतीलच. बादवे - तुम्ही धन्याचा प्रतिसाद येथे देण्याचे प्रयोजन कळाले नाही.

आशु जोग, तुम्हाला माझ्या प्रतिसादातला उपहास कळला नाही. असो. तुम्ही त्या निष्कर्षाप्रत कसे आलात हे तुम्ही अजून सांगितलं नाही.

मोदकराव धन्या यांचा प्रतिसाद माझ्या प्रतिसादाला पूरक होता म्हणून त्यांचेच म्हणणे त्यांना सादर केले. बा द वे निष्कर्षाप्रत कसे आलो ? मनाचा अभ्यास.

निष्कर्षाप्रत कसे आलो ? मनाचा अभ्यास. एक शंका - तुम्हालाही "स्व" गवसला आहे का..?? या बाबतीत काहीच अभ्यास नाही म्हणून अशा बेसीक शंका उद्भवतात - लैच बेसीक शंका असेल तर कृपया वाईट वाटून घेवू नये.

लेख आणि प्रतिक्रिया जाम मजेशीर आहेत! खरे तर हे सगळे सोनु आणि तरन्नुम मिपावर दिवसभर हलचल चालू ठेवतात!

आय टी चे पगार भरमसाट वाढतात - गेले ते दिन गेले प्रदेश प्रवास म्हणजे चैन - सुरुवातीला हो..मजा येते..पण नाविन्य संपले कि तर..कशाचीच मजा येत नही... पण मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे...प्रत्येक गिऱ्हाईक फर्माईश वेगळी ..मुजरा वेगळा आणि सगळं लगेच आलाच पाहिजे...नाहीतर तरन्नुमची सोनू व्हायला एक चुटकी पुरते ..

मोदकराव तुमच्या माहितीसाठी - मी सॉफ्टवेअर इंजीनीयर नाही मग तुम्हाला डोके चालवायला परवानगी आहे.

पण एक सांगा "सोनु आणि तरन्नुम" ची किंमत १० - १५ वर्षाने कमी होणारच की वाढत जाणार ? म्हणजे ते बघा "अब तुम्हारी जवानी ढला गयी है तरन्नुमबाई " असे गि-हाईकाने सांगितल्यावर "फटका" नविन सोनू शोधतोच की. आय टी मधी भी अशी गत व्हैइल का हो ? :) (डोके चालवायचा परवाना असलेला) ब़जरबट्टू

तरन्नुम, सोनूचे माहीत नाही पण मालक 'फटका' बदलतो. कारण 'फटका'चा सोनू म्हणून वा तरन्नुम म्हणून कुठलाच उपयोग नसतो.

आम्हा आय-टी इंजिनिअर लोकांना ती भानगड निमुटपणे शिकुन घ्यावीच (’च’ पुन्हा महत्वाचा बरका) लागते
कुठल्या नोकरी, व्यवसायात काळानुसार काहीच बदलावं लागत नाही?? आणि तरीही टिकून रहाता येतं, प्रगती करता येते?

पुर्ण वाक्य अस्स आहे, आय-टी इंजीनिअरचही तसचं आहे, दर दोन-तीन महिन्यात एखादी नवीन भानगड 'श्री गुरुदेव दत्त' म्हणुन समोर उभी राहते, (भानगड म्हणजे, नवीन टेक्नोलॉजी, किंवा नवीन प्रोसेस, किंवा नवीन स्टॅंन्डर्ड्स आणखी बरंच काही काही) आणि आम्हा आय-टी इंजिनिअर लोकांना ती भानगड निमुटपणे शिकुन घ्यावीच (’च’ पुन्हा महत्वाचा बरका) लागते, तुम्ही संदर्भ सोडुन अर्ध वाक्य काढत प्रश्न केलात? असो, त्या निमित्ताने का होईना 'सखाराम गटनेची ' आठवण आली, पण तुम्ही म्हणताय ते पण खरं आहे, मी उदा. म्हणुन आय टी इंजीनिअर घेतले, बाकी काही नाही, घरोघरी मातीच्याच चुली . . . :)

कुठेही संदर्भ सुटलेला दिसत नाही.. जशा नव नवीन भानगडी आयटीत येत राहातात तसचं इतरही व्यवसायात नवनवीन अडचणी येतच असतात.. शेवटी म्हणणं पटलय ना मग ठीक आहे.. :-)