Welcome to misalpav.com
लेखक: शरद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

>>> काही मनुष्यांबाबत दारु पाजल्यानंतर "लिफ्ट"ला बाथरुम समजणं हे घडलेलं पाहिलं आहे. इंग्लंडचे क्रिकेटपटू (जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, केव्हिन पीटरसन यांना तर २ दिवसांपूर्वी ओव्हलची खेळपट्टी "बाथरूम" वाटली होती. मधूसूदन पानसरेला सुद्धा १ महिन्यापूर्वी क्लबची गच्ची "बाथरूम" वाटली होती. %)

"त्यांनी संत गाडगेबाबा यांना विचारले असता गाडगेबाबा नि सांगितले कि तू दुसर्या धर्मात जा तिसर्या धर्मात जाऊ नको."
तिसरा धर्म कुठला ? आनि तो तिसरा का ?

अहो, म्हणजे आता ज्या नव्या धर्मात जाणार, त्याचा व्यवस्थीत अभ्यास करुन मग त्यातच रहा असा त्याचा अर्थ. पहिला पटला नाही, तर दुसरा केला. आता दुसराही पटला नाही, म्हणून तिसरा केला, असे करु नको.

मुस्लिमच कां जिंकले याचं कारण फार सोपं आहे. कारण हिंदू त्या वेळी सुद्धा सेक्युलर होते. आणि आता सुद्धा मुसलमानांच्या विरुद्ध खरे बोलल्यावर मिपा वरील पोस्ट जशा उडवल्या जातात तसेच त्या वेळी सुद्धा मुसलमानांच्या बद्दल घातक उदारपणा दाखवणारे शहाणे होतेच!

मुसलमानांच्या विरुद्ध खरे बोलल्यावर मिपा वरील पोस्ट जशा उडवल्या जातात तसेच त्या वेळी सुद्धा मुसलमानांच्या बद्दल घातक उदारपणा दाखवणारे शहाणे होतेच!>>>>>>>>>>>>>>+१०००००००००००००००००००००००

नाही हो ।जो पर्यंत ईद ला ईद मुबारक अशी बांग दिली जात नाही मिपा च्या मुखपृष्टावरून तो पर्यंत मिपा सेकुलर आहे असे मी मुळीच म्हन्टणार नाही!

तो लाल माकडटोपी घालणारा पाकिस्तानी झैद हमीद पाकिस्तानी वाहिन्यांवर संधी मिळेल तेव्हा हमने म्हणजे मुस्लिमांनी हिंदू ओ पे हजारो साल राज किया हे असे घसा फाडून बोंबलत असतो. त्याच्या दाव्यात तथ्य असावे असे हा लेख वाचून माझे मत बनले आहे.

बिशनसिंग बेदी म्हणाला होता कि भारतात fast बोलर्स तयार होत नाहीत कारण समोरच्याला शारीरिक इजा करणे हि भारतीयांची मानसिका नाही.... हत्या रक्त कुर्बानी वगैरे गोष्टी लहानपणापासून शिकविण्याचा सर्वसाधारण हिंदू माणूस विचारही करू शकत नाही...त्यामानानी आपण हळवेपणा दाखवतो....अहिंसेला इतकी व्यापक लोकमान्यता तिथूनच आली आहे... असो...मूळ धागा प्रश्नांकित असल्यामुळे हे माझे मत...

"अल्लावर श्रद्धा नसलेल्या ’काफिर" यांना येनकेन प्रकारेण धर्मात घ्या". येनकेन प्रकारेण साठी एक नवीन उदाहरण अनपेक्षित पणे समजले. गरिबी रेखा (बी पी एल ) आखण्याचे काम सर्व प्रथम कावेबाज औरंगजेब बादशाह ने केले. त्याने जिझीया कराचे दर कर आकारण्यासाठी हिंदूंचे तीन वर्ग केले. श्रीमंत , मध्यम आणि गरीब व त्यांचे वेग वेगळे कर दर ठरवले. सर्वात जास्त दर गरीब वर्गासाठी लावला. याचा सरळ परिणाम म्हणजे गरीब वर्गातून मोठ्या संख्येने मुस्लिम धर्म स्वीकारला गेला, दुसरे सर्व विदित कारण म्हणजे- प्रजनन दर प्रजनन दर जास्त असल्यामुळे भारतातील मुस्लिमांची संख्या १९५१ साली ९.९१ टक्के होती ती २००१ साली १३.४३ टक्के आणि २०१० साली १४ टक्के झाली. ( India’s Muslim Population by Carin Zissis for Council of Foreign Relations)

आत्ताही घरभेदी 'भाऊ' मदत करत आहेत म्हणूनच अतिरेकी जिंकत आहेत. एकी नसलेल्या समाजाचा पराभव अटळ आहे.

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीयांमधे असलेल्या मुस्लिमांचे प्रमाणापेक्षा आताचे प्रमाण जास्त असेल तर मुस्लीम जिंकत चालले आहेत असे म्हणू. त्यांचे प्रमाण भारतात २०५० ला पनास टक्क्याहून अधिक झाले तर ...?भारतीय राज्य घटना जिंकली असे म्हणू.

प्रचीन काळी वैभवाच्या शिखरावर असलेल्या,सुसंस्कृत ग्रीक संस्कृतीचा रानटी स्पार्टन्सनी कसा विध्वंस केला ते वाचा. बाकी कुठे नाही सापडला हा इतिहास तर डॉ. मीना प्रभू लिखित 'ग्रीकांजली' ह्या प्रवासवर्णनात शोधा. सावरकरांचा एकच शब्द देण्याचा मोह इथे टाळता येत नाही तो म्हणजे 'सद्गुणविकृती'

ह्यांच्या मतदानाच्या अधिकारावर आणि प्रजननाच्या कारखान्या वर कायमची बंदी घालायला हवी

केवळ भारतच नाही तर इतर जगाच्या इतर बऱ्याच प्रदेशांत झाले. ख्रिश्चन धर्मीयांनीही अशीच आक्रमणे केली. पण त्यापाठी केवळ धर्मांतराचा हेतू नसून त्या प्रदेशांची लूट करणे हा मुख्य हेतू होता. जसवंत सिंह यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटीश किंवा इतर आक्रमकांची ओळख ख्रिश्चन आक्रमक अशी केली जात नाही. पण मुस्लिमांच्या बाबतीत मात्र इस्लामचे आक्रमण असा शब्द प्रयोग केला जातो. याचे कारण म्हणजे आठव्या शतकापासून म्हणजे महंमद बिन कासिमच्या काळापासून ते थेट अब्दालीपर्यंत मुस्लिमांच्या आक्रमणात सातत्य आढळून येते. तसे सातत्य इतर आक्रमकांच्या बाबतीत आढळत नाही. अर्थात ही आक्रमणे प्रत्येक वेळी इस्लामचा प्रचार करण्याच्या हेतूने झाली नव्हती. नाहीतर गझनीच्या महमूदला सतरा वेळा स्वारी करण्याची गरज नव्हती, अब्दालीला तीन वेळा आक्रमण करावे लागले नसते. ह्या सर्व आक्रमणांचा मुख्य रोख देवळांवर होता. याचे कारण म्हणजे त्या वेळी देवळांमध्ये प्रचंड संपत्ती साठवली जात असे. अलीकडेच त्रावणकोरच्या मंदिरात पन्नास हजार कोटींचा खजिना सापडला हे त्याचे उदाहरण. त्याच बरोबरीने स्वत: प्रेषित पैगंबर यांनी काबा मशीद (जे मुळचे मूर्तिपूजक अरबांचे मंदिर होते) येथील ३६० मूर्त्या फोडून टाकल्या आणि निराकार अल्लाची संकल्पना मांडली. धर्माने दिलेली ही प्रेरणा आणि संपत्तीचा हव्यास ह्या दुहेरी कारणांतून ही आक्रमणे झाली. त्यातही संपत्तीचा हव्यास हे प्रमुख कारण मानले पाहिजे. शत्रूकडून मिळालेली लूट आणि स्त्रिया यांमध्ये वाटा मिळण्याची सोय धर्माने करून ठेवणे हे त्याचे कारण आहे. हजारोंच्या संख्येने सैन्य घेऊन कोणी वारंवार निव्वळ धर्मप्रचारासाठी स्वाऱ्या करत नाही. मुस्लिम धर्मांध असले तरी इतकेही धर्मांध नव्हते. हा झाला सैनिकी विजय. पण राजकीय आणि धार्मिक आक्रमण हे इस्लामचे खरे आक्रमण होते. इथल्या बहुसंख्य जनतेला मुस्लिम बनवण्यात इस्लामी राज्यकर्त्यांना यश आले नाही कारण या आक्रमणांचा प्रतिकार करणारी प्रेरणा संपली नाही. एक पृथ्वीराज गेला तरी महाराणा प्रताप येतोच. गुरु गोविंदसिंह येतातच. शिवाजी, संभाजी, छत्रसाल निर्माण होतातच. जेव्हा लढण्याची प्रेरणाच संपते तेव्हा खरा पराभव होतो. ही प्रेरणा समूळ समाप्त करण्यात मुस्लिम आक्रमकांना यश आले नाही हा त्यांचा पराभव आहे. आधुनिक राष्ट्राच्या संकल्पनेत मध्यवर्ती केंद्रीय सत्ता हा प्रमुख आधार असतो. काही प्रमाणात सम्राट अशोक याचा अपवाद सोडला तर अशी सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न मोगल आणि नंतर शिवाजी महाराज यांच्याशिवाय कोणी केलेला दिसत नाही. नाहीतर पानिपतच्या युद्धात मराठा सैन्यावर जाट आणि शिखांच्या मदतीशिवाय लढण्याची वेळ आली नसती. राणा प्रतापच्या विरोधात इतर राजपूतांनी अकबराला मदत केली नसती. खुद्द शिवाजी महाराजांना विश्वासघात सहन करावा लागला नसता. हा झाला राजकीय विजय. प्रश्न असा उद्भवतो की बहुसंख्य जनतेच्या भावनांची कदर न करणारे राज्यकर्ते हजार वर्षे राज्य कसे करू शकले? याच मुस्लिम नवाब आणि बादशहांनी देवळे बांधण्यासाठी देणग्या दिल्याचे इतिहासात नमूद आहे. तरीही हे आपले राज्य नाही ही भावना जनतेच्या मनात होतीच. त्याशिवाय औरंगजेबाचा कैदी म्हणून आग्र्यात गेलेल्या शिवाजीला पाहण्यासाठी तेथील जनता कुतूहल दाखवणार नाही. यातून एवढेच दिसते की धर्म आणि राज्यव्यवस्था यांचा संबंध नाही हे तत्वज्ञान या देशात पूर्वी पासून अस्तित्वात होते. येथील बौद्ध राजांनी हिंदूंना मदत केली आहे तसेच हिंदू राजांनी बौद्ध धर्मालाही मदत केलेली आहे(याच्या उलटही घडलेले आहेच). जोपर्यंत देवळांना किंवा इतर धर्मस्थळांना नियमित देणग्या मिळत होत्या आणि धार्मिक बाबतीत ढवळाढवळ होत नव्हती तोपर्यंत राजकीय दृष्टीने उदासीन राहणे हा इथल्या जनतेचा स्थायीभाव होता. हे इस्लामच्या धर्माधारित राष्ट्राच्या संकल्पनेच्या विरोधात होते. त्यामुळे मुस्लिम राज्यकर्त्यांनाही इथे टिकून राहण्यासाठी तडजोडी कराव्याच लागल्या. इतर प्रदेशांप्रमाणे अनिर्बंध सत्ता त्यांना मिळवता आली नाही. थोडक्यात म्हणजे हिंदूंचा पराभव हा जातीयवाद आणि मुर्तीपुजेच्या नावाखाली बोकाळलेली कर्मकांडे मध्यवर्ती सत्तेचा अभाव बहुसंख्य जनतेला धार्मिक आर्थिक आणि राजकीय सत्तेपासून वंचित ठेवणे या कारणांनी घडवून आणला आहे. A house divided against itself cannot stand - Abraham Lincoln

अवतारजी, प्रतिसाद आवडला..
आधुनिक राष्ट्राच्या संकल्पनेत मध्यवर्ती केंद्रीय सत्ता हा प्रमुख आधार असतो. काही प्रमाणात सम्राट अशोक याचा अपवाद सोडला तर अशी सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न मोगल आणि नंतर शिवाजी महाराज यांच्याशिवाय कोणी केलेला दिसत नाही.
+१११

यात नवीन काय आहे? केरळातला राजा तिकडे गेला. त्याने पैगंबरांच्या मुलीशी विवाह केला. येताना तो वाटेत मेला. पण त्याची बायको भारतात आली आणि तिने त्या नवर्‍याच्या राज्यात म्हंजे केरळात मशीद उभारली ती मशीद जगातील दुसरी मशीद मानली जाते. आता, ही दुसरी मशीद, मग पहिली कोणती? तर जगातील पहिली मशीद म्हणजे खुद्द पैगंबरांचे घर! म्हणजे एका अर्थाने, भारतातील ती केरळातील जामा मशीद ही जगातील पहिलीच मशीद मानता येते.

माहिती,मग त्यातुन एक सिद्ध झाले की ईस्लाम मध्ये सुद्धा स्त्रियाना सुद्धा पुरुषा ईतकेच स्थान आहे किवा होते,मग प्रार्थनाग्रुहात (मशजीद) प्रार्थना करण्याचा हक्क मात्र फक्त पुरुषाना हे नन्तर झाले असावेका?

"पैगंबरांचे" असे अनेकवचन/आदरार्थी मुद्दाम केले आहे की चुकून झाले? देवांच्या नावाचे अनेकवचन बघण्यात येत नाही. उदा. रामाचे धनुष्य. रामांचे धनुष्य कोणी म्हणत नाही. इत्यादी

जो केरली राजा अरबस्तानात मोहम्म्द पैगंबरान्ला भेटायला गेला तो परत्ताना अचानक वाटेतच मेला, कसा कोन जाने. त्यचे थदगे येमेनमदे आहे. त्याला तिते घेउन जाणार्या मुस्लमान धर्मच्या व्यापार्यानि परत येउन राजाच्या रिलेर्टिवाना साम्गितले की राजाने मुस्ल्मान धर्म घेत्ला होता. अशे ते राजघराने मुसलमान जाले.

नावे वेगळी असली तरी शेवटी सर्व मार्ग एकाच ईश्वराकडे जातात. इस्लाम काय ख्रिश्चन काय ? सर्वच धर्म दया क्षमा शांतीचा संदेश देतात. सगळ्याच धर्मांची शिकवण मानवता हीच आहे. ईस्लामचा अर्थ शांतता असा आहे. असे असताना कोण जिंकले कोण हरले हा प्रश्न का पडावा ?

कै च्या कै लेखन! भारतातील मुसलमानांचे हिंदुकरण ही इतर परकीयांपेक्षा अधिककाळ चालु आहे इतकेच फारतर म्हणता यावे. (मला हिंदु हा धर्म नाही जीवनपद्धती आहे हे श्री.वाजपेयी यांचे मत चिंत्य (आणि बर्‍यापैकी मान्य) आहे)

भारतातील मुसलमानांचे हिंदुकरण ही इतर परकीयांपेक्षा अधिककाळ चालु आहे इतकेच फारतर म्हणता यावे. (मला हिंदु हा धर्म नाही जीवनपद्धती आहे हे श्री.वाजपेयी यांचे मत चिंत्य (आणि बर्‍यापैकी मान्य) आहे) >>> ऋ , तु काय करतोयस इथे ? इतिहासाच्या धाग्यात ? इतिहास पेटवितो माहीत आहे ना !! ;) असो ...या निमीत्ताने शरद पुन्हा बोर्डावर दिसले यातच समाधान !! विषय नेहमीच डोक्यात जातो ...हा नव्हे हो ..इतिहास हा ...त्यामुळे नो कमेंटंस कोण जिंकले किंवा कोण हारले या वादात न पडणारा.

पण हे वाक्य अनेकदा ऐकत असतो कि हिंदु हा धर्म नाही जीवनपद्धती आहे. म्हणजे नक्कि काय आहे ? हिंदुत्व जर जिवनपध्दति आहे तर ती "धर्म" म्हणून जे काहि असते (स्व अथवा पर) त्याचे अस्तित्व नाकारते काय ?

उध्रुत करुन सान्गाल का? तेव्हडेच आमच्या सारख्या अल्पमती माणसाला कळले तर बरे होइल.

ते दुसर्‍याच परिच्छेदातील पहिले वाक्य इ स २००० ते इस ६०० बदलून इसपूर्व २००० ते इसपूर्व ६०० करा बघू.

शीर्षकातच अभ्यास असल्यामुळे एक अभ्यासू उत्तर देण्याचा हा प्रयत्न. हिंदू अथवा मुस्लिम ही शेवटी दोन एकसारखीच माणसे, बदलते ती परिस्थिती असं मानून हे लिहितो आहे. (अवांतर: या विषयावर एक सुंदर पुस्तक आहे. मिळाले तर जरूर वाचा. Guns, Germs, and Steel by Jared Diamond.) भारताच्या आक्रमकांविषयी बोलायचं झालं तर लढाईतल्या विजयाचे मुख्य कारण म्हणजे नवे डावपेच आणि नवीन हत्यारांचा वापर. नकाशाकडे नजर टाकली तर दिसतं की अगदी तुर्कस्तान पासून भारतापर्यंत पसरला आहे तो प्रदेश बहुतेक रुक्ष. या प्रदेशात पाणी एकंदरीने कमी त्यामुळे शेतीचे प्रमाण कमी. भटक्या टोळ्या जास्ती, अन्न पिकवण्यापेक्षा हिसकावून घेणे जास्त फायदेशीर. म्हणून आपापसात भांडणे फार. लढाई आणि नवीन हत्यारांचा वापर या परिस्थितीत जास्त. बाबरनामा या बाबराच्या आत्मचरित्रात याची भरपूर उदाहरणे सापडतात. याउलट परिस्थिती होती भारतात. गंगेयमुनेच्या दुआबात सुपीक जमीन भरपूर आणि नगरे समृद्ध. दोन उदाहरणे पाहूया. अल्लाउद्दिन खिलजी. त्याने देवगिरी विरुद्ध काय डावपेच वापरले? पाहिलं म्हणजे गती आणि गुप्तता. त्याला अत्यंत वेगाने दिल्लीपासून देवगिरीपर्यंत येणे शक्य झाले कारण त्याच्याकडे असलेले अरबी घोडे. हत्ती अथवा पायी हे अंतर इतक्या कमी वेळात जाणे शक्य नव्हते. (बाजीरावाने काही शतकांनंतर उलट दिल्लीवर अशीच चपळ धडक मारून दाखवली ती पुन्हा घोडदळाच्या भरवशावरच) यामुळे त्याला अचानक रामदेवराव यादवाची बचावाची सिद्धता नसताना देवगिरी गाठता आली. आणि त्याच्या सामर्थ्याविषयी अफवांनी त्याला मदतच झाली. दुसरं म्हणजे त्याने उगाच देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवून आपले घोडेस्वार वाया घालवले नाहीत. त्यापेक्षा त्याने धान्य पाणी रोखून धरले. त्याला चपळ घोड्यांची या कमी मदतच झाली. रामदेवराय यादव अथवा त्याचे सरदार वैयक्तिक शौर्यात कमी पडले नाहीत, त्यांची चूक झाली ती गाफील राहण्यात, शत्रूवर नजर न ठेवण्यात. आणि भांडणे फक्त हिंदूमधेच नव्हती, मुघल पक्षात तुर्की, इराणी, अफगाण, दख्खनी असे अनेक पक्ष होते आणि वेळप्रसंगी ते दुसर्याचा जीवही घेण्यास कमी करीत नसत अशी कित्येक उदाहरणे इतिहासात आहेत. दुसरं उदाहरण बाबराचं. त्याने इब्राहिमखान लोदीवर जो विजय मिळवला तो तोफखाना आणि बंदुकांच्या जोरावर. इब्राहिमखानाकडे कित्येक पट सैन्य होते, अनेक हत्ती होते, पण तोफांपुढे त्यांचे काहीही चालले नाही. बाबराने तोफा मिळवल्या त्या मध्यपूर्वेत. मंगोल साम्राज्यात तोफांची दारू चीनमधून युरोपपर्यंत पोहोचली. तिथे तिच्यावर अनेक प्रयोग होऊन युरोपियन लोकांनी त्यात प्रभुत्व मिळवले पण ते नंतर. पंधराव्या शतकात बाबाराकडे त्या काळातल्या आधुनिक तोफा आणि दारू होती. अगदी शिवकालातही तोफांचे गोलंदाज मुस्लिम असत आणि दारुगोळा युरोपियन लोकांकडून विकत घेतला जात असे. घोडदळाबाबत मात्र वेगळेच चित्र दिसते. मराठ्यांनी घोडे विकत घेऊन आणि स्वतः त्यांची पैदास करून कित्येक हजारांचे सैन्य बनवले. बऱ्हाणपूरपासून गुजरातेपर्यंत आणि विजापूरच्या वेशीपासून माळव्यापर्यंत औरंगझेब बादशाह जिवंत असताना मराठी घोड्यांनी दौड मारली होती. तेंव्हा कोणताही फायदा अथवा डावपेच हा एका पक्षाकडे कायम राहू शकत नाही, परिस्थितीनुसार दोन्ही पक्ष त्याचा वापर करून यशस्वी होऊ शकतात.

अगदी सुंदर उत्तर. म्हणूनच भारताच्या इतिहासातील खरी सोनेरी पाने दोनच .. मोघलकाळ आणि इंग्रजकाळ .. उरलेला नुस्ताच पोकळ यज्ञ-जाळ .. असे मला वाटू लागलेले आहे. --- सोनेरी उद्दाम

>>> पण इस्लाममधील काही महत्वाच्या गोष्टी प्रथम नोंदवू. (१) कोणताही मुसलमान दुसर्‍या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो ज्या देशात मुस्लिम अल्पसंख्य असतात व इतर धर्माचे नागरिक जास्त असतात, त्या देशात मुस्लिम एकमेकांचे भाऊ असतात व मुस्लिमांमधील सर्व पंथ एकत्र येऊन आपल्यावर अन्याय होत आहे असा कांगावा करून वेगळा देश मागण्याच्या मागे लागतात व त्यासाठी थेट युद्ध सुरू करतात. (उदा. भारतातले काश्मिर, रशियातील चेचन्या, पूर्वीच्या युगोस्लावियातील बोस्निया, फिलिपाईन्स, चीन मधील उग्यार प्रांत इ. अमेरिकेत सुद्धा टेक्सस हे मुस्लिम राज्य म्हणून जाहीर करावे यासाठी काही वर्षांपूर्वी लुईस फराक्खान नावाच्या बाटग्याने लाँग मार्च काढला होता). या सर्व देशात इतर धर्मियांचे प्राबल्य असल्याने तिथे फुटिरतेची चळवळ सुरू आहे. ज्या देशात मुस्लिम बहुसंख्य असतात तिथे ते आपापसात लढतात. सुन्नी विरूद्ध शिया (पाकिस्तान, इराक, इराण इ.), सुन्नी विरुद्ध अहमदी (पाकिस्तान), सुन्नी विरूद्ध बहाई (सौदी अरेबिया, पाकिस्तान), सुन्नी विरूद्ध हाजिरा (अफगाणिस्तान) इ. याची उदाहरणे आहेत. या सर्व देशात मुस्लिम बहुसंख्य आहेत. मुस्लिमात सुन्नी बहुसंख्य असल्याने इतर पंथांविरूद्ध ते लढत असतात. एकंदरीत मुस्लिमांना सशस्त्र झगडा आवडतो. मग तो स्वधर्मियांविरूद्ध असेल किंवा इतरधर्मियांविरूद्ध.

या लोकांचे वर्तन लोकसंख्येच्या प्रमाणात कसे बदलते ते कुणाकडे असेल तर इथे सादर करा ना !

>>> या लोकांचे वर्तन लोकसंख्येच्या प्रमाणात कसे बदलते ते कुणाकडे असेल तर इथे सादर करा ना ! साधे उदाहरण म्हणजे पाकिस्तान. १९४७ साली पाकिस्तानात २२ टक्के हिंदू होते. ख्रिश्चन व शीखही ही बर्‍यापैकी होते. मुस्लिम ७० टक्क्यांच्या आसपास होते. त्यामुळे त्यांचे पहिले लक्ष गैरमुस्लिम होते. २०१३ पर्यंत हिंदूंचे प्रमाण २ टक्क्यांहून कमी झाले आहे. एकूण मुस्लिमांचे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे गैरमुस्लिमांविरूद्धचा लढा यशस्वीरित्या संपत आलेला आहे. १९८० च्या दशकात प्रथम अहमदींना मुस्लिम धर्मातून बहिष्कृत करून अमुस्लिम ठरविले गेले आणि आता गेल्या काही वर्षांपासून सुन्नी मुस्लिम शियांना संपविण्याच्या मागे लागले आहेत. शियांच्या मशिदीबाहेर आत्मघातकी बॉम्बहल्ले करणे, शियांच्या मिरवणुकीवर हल्ले चढविणे इ. सुरू आहे. म्हणजे प्रथम हिंदूंना संपविले, नंतर अहमदींना आणि आता शियांच्या ते मागे आहेत. म्हणजे प्रथम गैरमुस्लिम, नंतर मुस्लिमातला अल्पसंख्य गट आणि आता मुस्लिमातला प्रतिस्पर्धी पंथ असा क्रम आहे. उद्या शिया पाकिस्तानमध्ये शिल्लक राहिले नाहीत तर उरलेले सुन्नी मुस्लिम आपापसात लढतील.

+१ टू श्रीगुरुजी...! या परस्पर झगड्याची सोय एका हदिसमधे (हदिस-प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या उक्ती) आलेली आहे! हदिस'ना कुराणाच्या खालोखाल मान्यता असते. जेंव्हा प्रेषित निर्वतले..पैगंबरवासी झाले,त्यानंतर लगेच उत्तराधिकारी नेमण्याविषयी वाद सुरु झाले. सकिफा नावाच्या स्थळी हा वादविवाद सुरु झाला. मदिनेच्या लोकांना पुढचा उत्तराधिकारी आपल्या कुळगटापैकी हवा होता. हे कानी पडताच . अबू बेकर व उमर तेथे गेले.आणी उताराधिकारीत्व/खिलाफत/खलिफापद हे कुरैशांच्या (प्रेषितांच्या वंशापैकी व्यक्तिचेच) असेल असे मदिनेच्या लोकांना युक्तिवादाने पटवू लागले. यावेळी त्यांनी प्रेषितांच्या दोन हदिसचा आधार घेतला.. त्या अश्या- १)प्रेषित म्हणाले-"सर्व लोक हे कुरैशांचे अज्ञाधारक आहेत." (हदिस क्रमांक-२५-१००९.१०) २)प्रेषित म्हणाले-"खिलाफत(राज्यसत्ता) ही नेहमीच कुरैशांच्या ताब्यात राहिल,जरी त्यांची दोन माणसेही(पॄथ्वीवर) जिवंत राहिली तरी.(ती त्यांच्याकडेच राहिल)" (हदिस क्रमांक-७१३९,४०) नंतर मदिनेच्या मुस्लिमांमधे इस्लाममधे येण्यापूर्वी ज्या तिन टोळ्या होत्या,त्यातल्या वैरभावनेचा मुत्सद्दीपणानी वापर केला,आणी अबू बेकर यांच्याशी सर्वांना एकनिष्ठतेची(खलिफापद मान्य करण्याची) शपथ घेण्यास भाग पाडले. इकडे प्रेषितांचे जावई अली हे (बिचारे) त्यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यात गुंतून(थांबून) राहिले. त्यांना आपण स्वतः खलिफा होऊ,व लोक त्याला मान्यता देतील असे अधीपासूनच वाटत होते.पण वरिल प्रकार समजल्यावर ते अत्यंत नाराज झाले.अलींना मान्यता देणारा/मानणारा पंथ (हाच पुढिल शिया पंथ गणला गेला),जो आजही खिलाफत साठी अलिच योग्य होते,हे दाखवण्यासाठी असेच आधार/पुरावे काढून दाखवत असतो. हा कुरेशांअतर्गत असलेल्या दोन प्रमुख टोळ्या हाशिमी व उम्मय्यी कुळगटातला वाद होता. शेवटी त्यावेळी हा वाद कसाबसा मिट्वून अलिंनी अबू बेकर प्रती शपथ घेतली,आणी स्वतःची खलिफा होण्याची इच्छा..मुस्ल्लिमांमधे फूट पडू नये,म्हणून पहिल्या तिनही खलिफा निवडीवेळे पर्यंत दाबून ठेवली,तिसरे खलिफा उस्मान यांची हत्या झाल्यावर, अलींना आता आपण खलिफा होणार याची जवळपास खात्रीच वाटत होती...
पण...
तोपर्यंत मुस्लिम साम्राज्याचा जवळजवळ चौपट विस्तार झालेला होता,बळजबरीने म्हणा किंवा युद्धलूट मिळण्याच्या आकर्षणाने म्हणा लाख्खो लोक इस्लाम'मधे आलेले होते. पण त्याच्यात कथित ऐक्याचा पाइक असलेला इस्लाम आलेलाच नव्हता,त्यामुळे अत्ता पाकिस्तानात जी अवस्था आहे,तीच तिथे निर्माण झालेली होती. प्रचंड वाढलेलं राज्य .. तिथे प्रशासनाच्या व नवमुस्लिमांच्या लावण्याच्या सोइ/कर-अकारणी अश्या प्रशासनाच्या अनंत भानगडी निर्माण झाल्या होत्या.त्यामुळे गैरमुस्लिमांविरुद्धचा जिहाद थंडावला होता. म्हणून मग "बाहेर"च्या मारामारीत तात्पुरता हरवलेला अंतर्गत कलह/वैमनस्य प्रचंड उफाळून आला,त्यात वर म्हटल्याप्रमाणे कुफा,बसरा अश्या नव्या प्रांतातल्या मुस्लिम झालेल्या प्रजेला खलिफा आपल्या'तला असावा,असे वाटू लागले...आणी (अव्यहार्य)धर्मवचनांचा जोर ओसरून ज्याची लाठी बळकट त्या'चा राजसत्तेवर अधिकार पहिला.. हा त्यांच्या जुन्या टोळीयुगाचा नियम वर्चस्व गाजवू लागला... शेवटी अली(हाशिमी-कुळगट) आणी मुविया(उम्मय्यी-कुळगट) यांच्यात आमने/सामने युद्ध सुरु झालं. दोघेहीजण आपण इस्लाम'नुसार बरोबर आहोत.राज्यपदासाठी योग्य आहोत,असे दावे धर्माच्या आधारे काढून दाखवू लागले. आम-मुस्लिम जनता भांबावली,आणी मग ती'ही ज्याचं सैन्य आपल्या प्रदेशात घाबरवायला/शपथ घेववायला येइल..त्याच्याशी शपथ घेऊ लागली..आज अली तर उद्या मुविया असा अक्षरशः कपडे बदलल्या सारखा खेळ सुरु झाला. (इस्लामी इतिहास/वर्तमानातल्या..या परिस्थितिवर नरहर कुरुंदकरांनी मुस्लिमांना असे आवाहन केले होते, की- "कुणीतरी एक चुकला होता(इस्लामनुसार..अयोग्य होता..) असे तुंम्ही मान्य करायला हवे!" ) शेवटी दोघांमध्ये लढाया डावपेच इतके विकोपाला गेले/कंताळवाणे झाले की त्यांना हजारो मुस्लिमांचा बळी देऊन खिलाफत दोन विभागात वाटण्याची इस्लाम बाह्य तड-जोड स्विकारावी लागली! इस्लामी राज्य दोन ठिकाणी विभागले गेले. पुढे विशुद्ध इस्लामचा पुरस्कार करणार्‍या एका कड्व्या धर्मनिष्ठ गटाच्या (खारिजिंच्या) या दोघांन्नाही अधीपासून असलेल्या विरोधाच्या पडसादामुळे मुविया जखमी होऊन वाचला..आणी अली मारले गेले! नंतर धूर्त..मुत्सद्दी अश्या मुवियानी सगळी खिलाफत बळकावली.. या सर्व घटनांकडे पाहिल्यावर मला एकच वाटते.. एखादी व्यवस्था धर्मातून/धर्माबाहेरून कशिही कुठूनही आलेली असो,त्या व्यवस्थेतच जर बेइमानी असेल,तर त्यातल्या बेइमानांचेच नेहमी फावणार! इस्लाममधे तेच झाले आहे... आणी कदाचित यापुढेही होत राहिल... जाता जाता-- बाकी ह्या खारिजिंविषयी थोडे सांगायला हवे... खारिजी हा इस्लाममधील विशुद्ध इस्लामचा प्राणपणानी पुरस्कार करणारा/आचरणारा, असा सर्वसामान्य मुस्लिमांमधला एक गट होता.. ते "सर्व मुस्लिम हे परस्परांचे बंधू आहेत" या कुराणातल्या वचनाचा आधार घेऊन असे प्रतिपादत असत ,की खलिफा हा त्यापदाला योग्य गुणधर्म असलेला असा अख्या मुस्लिम समुदायातला कुणीही होऊ शकतो! हा इस्लाममधला खास तत्वनिष्ठांचा(आणी त्यामुळेच व्यवहारात कायम अपयशी राहिलेला) गट..! त्यांना बिचार्‍यांना हे समजणेच शक्य नव्हते की धर्मात वाइटाबरोबर जे काही थोडंफार चांगलं आलेलं असतं त्याला कधिही पाळायचं नसतं..तर वाइटाच्या रक्षणासाठी त्या कथित चांगल्याचे फलक हाती घेऊन त्याचा वापर जाहिरात करण्यासाठी करायचा असतो! यांच्याबाबत एक कथा सांगितली जाते... धर्मवचनांचा काटेकोरपणे.. टोकाला जाऊन अर्थ काढून त्याची तितकीच काटेकोर अंमलबजावणी (अर्थातच पहिली स्वतःवर..) करणार्‍यांपैकी हे लोक होते.. "एका खारिजीला कळले,की त्यानी जो झाडाखाली पडलेला खजूर खाल्ला,तो दुसर्‍याच्या बागेतला होता.झाले... लगेच त्याने "चोरी करणार्‍याचे हात तोडावे" या इस्लामी न्यायशास्त्राच्या आधारे स्वतःचा खजूर उचललेला हात कापला...! खरेखोटे कसेही असो..! पण हे खारिजी होते मात्र अव्वल! त्यांना स्वतःच्या (इहलौकिक) जीवनाबद्दल काहिही आस्था नसायची,आपले सर्व जीवन हे कुराणानी सांगितल्या प्रमाणे इहलोकावर अल्लाचे राज्य आणण्यासाठी ते खर्चून टाकीत असत! लढायांमधे सुद्धा
स्वर्ग...स्वर्ग
...अल-जन्नत..अल जन्नत.. अश्या घोषणा देत प्राणपणानी लढणारी ही लोकं! यांचे देह हे खरच धर्माचं साधन होते! त्यामुळे असं वाटतं... की...
ज्या धर्मांसाठी लढायचं,ते धर्म "कसे" आहेत? हे पाहायची विवेकबुद्धी यांच्याजवळ असती तर...?
यावर मला पुन्हा एकदा कुरुंदकरांच्या लेखनातील काही वाक्य अठवतात... "चांगली माणसं आणी वाइट व्यवस्था" "वाईट माणसं आणी चांगली व्यवस्था" यापैकी आपण कश्याची निवड करणार ??????

+१११. एकंदरीत मुस्लिमांचा सर्व इतिहास व वर्तमान हा युद्ध, लढाया इ. शीच जोडलेला आहे.