Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

जुलै १९९१ ते मार्च १९९३.. अकरावी बारावीची दोन वर्षं जेवलो तिथे... भरपूर आठवणी आहेत.. जेवण फार थोर आणि चवदार होतंच वगैरे म्हणणार नाही पण एस्पी हॉस्टेलवरून रोज तिथे जाऊन जेवायला मजा यायची... वामनराव नंबर लावेपर्यंत पेपर वाचायचो... सामना आणि मार्मिक तिथे खूप वाचला... रामजन्मभूमी चे वातावरण तापत असताना आणि ९२ - ९३ च्या त्या काळात दंगली आणि बारावीच्या परीक्षेच्या काळातच झालेले मुम्बई बॉम्बस्फोट आणि रोजचा वाचला जाणारा सामना आणि मार्मिक प्लस बादशाही मधलं जेवण असं काय काय लक्षात राहिलंय...

@९२ - ९३ च्या त्या काळात दंगली आणि बारावीच्या परीक्षेच्या काळातच झालेले मुम्बई बॉम्बस्फोट आणि रोजचा वाचला जाणारा सामना आणि मार्मिक प्लस बादशाही मधलं जेवण असं काय काय लक्षात राहिलंय... >>> येस..येस...बादशाही वाल्यांनी जाहिर केलं की असे अनुभव लिहा.तर एक भलामोठ्ठा ग्रंथ होइल! :)

तिखट पण शानसे पायजे.. मजा नाही आली मिसळीला.. आणि वरति बसलो होतो. दहा वेळा डोकं आपटलं.. :प

बादशाही कटट्यासाठी नाव नोंदणी करावी .. मला व्य नि पाठवावा आणि सी सी टू अत्रूप्त आत्मा .. तारखेकडे ल़क्ष द्या .. थोडाच वेळ शिल्लक आहे.

कट्ट्यासाठी नावनोंदणी

>>> +१ हितेच ठरवू आणी धमाल उडवू ... ;) नाव टाका ना रे............................! :-/ अगोबा... धन्या... मोदुक... लवकर या ना...! :) बाकिच्यांनी पण ;)

कालच बादशाहीत गेलो होतो. घेवडा अन वांगी रस्सा. भरपेट जेवण झालं. आमटीची चव नेहमीप्रमाणेच जबरदस्त. पुणेरीपणाचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले पण रिसीव्हिंग एंडला मी नसल्याने णो पिराब्ळेम. बाकी ही थाळी दिवसेंदिवस महाग होत चाललीये. ८०/- किंमत आहे आता. एक्स्ट्रा चपाती घेतली तर ६/- पर चपाती. त्यामुळे क्वचितच जाणे होते आता. त्यापेक्षा आमची मगरपट्ट्यातली रेड्डी'ज् आंध्रा मेस ७०/- मध्ये एकदम जबरी जेवण देते. क्वालिटी उत्तम, क्वांटिटी रावण स्टाईल आणि प्लस नो पुणेरीपणा.

मोदकश्री, अर्थातच-स्वीकारचे जेवण मस्तच होते. :) रेड्डीज मेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दररोज जाणे होत असल्याने तिकडचा उल्लेख आला इतकेच. स्वीकारच्या जेवणाचाही तसा "बेशर्त स्वीकार" केल्या गेला आहे. ;)

९४-९५ साली स.प. च्या समोरच्या गल्लीत राहत असताना मी व माझे काही मित्र सकाळ व रात्रीचे जेवण बादशाही येथे घेत असू. पहिल्यांदा गेलो आणी मेंबरशिप विषयी चौकशी केली तेव्हां खुर्चीतील (अबोल) आजोबांनी एका पाटीकडे बोट केले ज्यावर लिहीले होते "कृपया मेंबरशिपविषयी चौकशी करू नये" त्यामुळे मग सकाळ/संध्याकाळ टोकन घेवून जेवू लागलो. त्यावेळी गाडी नसल्यामूळे इतर पर्याय नव्ह्ते. साधारण १५-२० असे झाल्यानंतर एक दिवस वामनराव म्ह्णाले "असे टोकनवर किती दिवस जेवणार, दुपारी येवून मेंबरशिप घ्या". त्यादिवसापासून मेंबर झालो. त्यानंतर पुढील १-१.५ वर्ष (सदाशिवपेठ सोडेपर्यंत जेवणाकरिता बादशाही was home away from home). त्या १-१.५ वर्षात व नंतरही (ब-याच वेळी जायचो तेव्हा) खुप छान अनुभव आला. एकदा एक मित्र आजारी होता (२-३ आठवडे असेल) व तो जेवायला जात नसे व आम्ही नवखे असल्याने खाडावगैरे माहित नव्हते, साधारण ४-५ दिवसांनी वामनराव विचारते झाले "तुमचा मित्र कुठे आहे?", मी सांगितले की तो आजारी आहे व त्यामुळे येवु शकत नाही, त्यावर ते म्ह्णाले "मग जेवणाचे काय करता?" मी म्हणालो की करतो आहे manage दुध-bread वर. ते म्हणाले तसं नको, डबा घेवून जा तो बरा होई पर्यंत आणी त्यानंतर अनेक दिवस सकाळ-संध्याकाळ त्याचा डबा आम्ही आणत असू. कधी-कधी कॉलेजमधून यायला उशीर झाला तरी कधीही "mess ची वेळ संपली जेवण मिळणार नाही" असे म्हणाले नाहीत. Feast च्या दिवशी किंवा काही खास पदार्थ असल्यात आग्रहकरून वाढत (फक्त मेंबर्सना) :) अश्या अनेक आठवणी आहेत, आज ह्या धाग्यामुळे त्या ताज्या केल्याबद्दल धन्यवाद!