Welcome to misalpav.com
लेखक: मदनबाण | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अश्या वेळी भारतात नसल्यचे दु:ख होते.

गिरगावातली दहीहंडी आणि ते मंतरलेले दिवस.. दहीहंडीची दोन महिने प्रॅक्टीस आणि मग गणपतिचे वेध. दहीहंड्या फोडल्या दिवसभर की त्याच रात्री गणपतीचे बॅनर लागायचे.. मांडवास सुरुवात लग्गेच! एक्दम नॉस्टेल्जिक वाटत होतो पण बाणा फोटो बद्दल थँक्स रे! अवांतर - गोविंदाचा इव्हेंट झाला ते मात्र इतकं झेपत नाही. साला पुरुषाच्या कच्चीवर आणि कोंबडी बाजावर नाचत वाढलेली पिढी.. कच्ची नाय तर गोविंदा नाय ;)

छायाचित्रे एकदम अप्रतिम आहेत अगदी व्यावसायीक छायाचित्रकारा प्रमाणे.

नंतर गणपतीही बघायला मिळू दे नक्कीच ! मागच्या वर्षी केशवजी नाईकांच्या चाळीतील गणपतीने सुरुवात केली होती, या वेळी वेगळ्या ठिकाणी जायचा विचार आहे,बघु कसे जमते ते... पण इच्छा मात्र आहे.