आवडले,
आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!"
+१०००००००
लेख प्रचंड आवडला आहे. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आता क्रिकेट हा गावस्करच्या काळात होता तसा खेळ राहिलेला नाही. तेव्हा महिना महिना प्रवास करून बोटीने इंग्लंडला जाणारे खेळाडू होते. रणजी मॅचेस खेळायला लोकल ट्रेनमधून जाणारे खेळाडू होते. आता सगळ्याच गोष्टी ७० एम एम करायची पद्धत आहे. क्रिकेट हा खेळ राहिलेला नाही. निव्वळ पैसे छापायची टांकसाळ आहे. प्रत्येकजण जेवढे खाता येईल तेवढे खात असतो. तरी कोणाचं पोट भरत नाही.
तसे सचिनच्या काळात खेळलेले लारा आणि पॉण्टिंग तेवढेच, कदाचित काकणभर सरसच होते हे कबूल करायला आम्हा भारतीयांना का जमत नाही? लारा म्हणतो की "सचिन सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे." तसे लाराबद्दल सचिन का म्हणू शकत नाही?
पैसाताई,
सचिननी कोणाची तोंड फाटेपर्यंत स्तुती करावी अशी देखील अपेक्षा नाही. पण मुळात सचिनच काय, पण कुठल्याही क्रिकेटपटू / सिनेकलाकार / राजकारण्याला आपण इतकं larger than life का बनवतो हेच समजत नाही. एक गोष्ट कबूल की आफ्रिकन / ऑस्ट्रेलियन खेळाडू सारखे आपले खेळाडू सार्वजनिक वाहनांतून प्रवास करू शकणार नाहीत. पण त्यांच्यावर कोणी टीका केली तर लगेच आपल्याला इतकं का झोंबतं? लगेच निषेध व्यक्त करून माफी मागायची मागणी कशासाठी? सचिन एक ऑल टाईम ग्रेट फलंदाज आहे - पीरियड.
तोच प्रकार संजय दत्तला " भावनिक पाठिंबा देण्यासाठी" गर्दी करणार्यांचा. भयंकर चीड येते ह्या लांगूलचालनाची.
जे.पी.
आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!"
आणि तेवढ्यात कोणी तरी म्हणेल . नाही .
सैतान नाही हा . नाही तर आम्हाला लहान मुलांसारखा लोळवून मारल्यानंतर पण असा वागला नसता हा .
देवच आहे .
लई भारी लेख साहेब .
अमोल,
भारी लेख आहे रे. सचिन किंवा फेडरर च्या मनात काय चाललंय ते त्यांनाच ठाऊक. त्याआधी बालगंधर्वांपासून कपिल देव पर्यंत अगणित कलाकार आणि खेळाडूंना काय वाटलं असेल ते सुद्धा त्यांनाच ठाऊक. कदाचित एड स्मिथ म्हणतो त्याप्रमाणे खरंच त्या खेळाचं / कलेचं प्रेम, त्यानी येणारी धुंदी आणि नशाच असेल जी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांच्यासाठी क्रिकेट / टेनिसच आयुष्य आहे. लहानपणापासून दुसरं काही केलेलंच नाही. मग त्यांना हा "ब्रेक-अप" त्रासदायकच ठरणार.
जे.पी.
तळमळ जाणवलीच.. कुठल्याही गोष्टीचा इव्हेंट आण व्यक्तिचा देव करण्याची उफराटी सवय लागलेय आपल्या समाजाला... त्यात फेक्स वर चेहरे रंगवून घेणारे पण आले आणि फेसबुक वर 'लाईक'ची भिक मागणारे पण आले. कालच बातमी वाचली पेपरात की नवी मुंबईत बाळासाहेबांच्या वेषात गणपती बनवलाय.. डोक्याला हात लावला..चीड, संताप ह्यापेक्षा कीव येते अशा प्रकारांची..!!
असो, पण सच्च्याची एकदिवसीय सामन्यातली निवृत्ती मात्र अजून चांगली हवी होती असं मनात येतच!
बडे बडे देशोमे अलग अलग खेलोमे ऐसे बहोत बडे बडे प्लेयर होके गये
पण कोणी खेळा पेक्षा मोठा नाही समजला गेला. आमचं भारतीयांचं मात्र वेगळच !
काय तर म्हणे खेळाडू म्हणतो मी कधी जायचं मी ठरवणार !!
आम्ही एकदा दैवत्व बहाल केलं कोणाला म्हणजे मग नाय नो नेव्हर... काही म्हणजे काही बोलायचं नाही देवाच्या विरुद्ध
प्रतिक्रिया
१ नंबर.....
हे जर खरं असेल तर असे वाटते
मस्तच...
आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!"+१०००००००मस्त!
+१
+१११११
आमचा सच्या जेव्हा कसोटींत
सचिन आणि फेडेरर यांच्या फॅन
भारी लेख आहे
व्यक्ती पूजा आणि अनावश्यक स्तोम हे समाजाला घातकच....
मस्त रे..
आमचा सच्या जेव्हा कसोटींत
बडे बडे देशोमे
दोनशे वी कसोटी
दोनशे वी कसोटी ही घरच्या मैदानावर व्हावी अशी इच्छा नक्की कोणाची