Welcome to misalpav.com
लेखक: सुधीर मुतालीक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

रोचक माहिती. सत्तेवर आल्यानंतर फिरणारे लोक सगळीकडेच आहेत - इराण तरी अपवाद कसा ठरणार ना? एरवी शांतिप्रिय, कष्टाळू आणि आपल्यासारख्याच साध्या सुध्या सामान्य माणसांचे अश्या यादवीत काय हाल होत असतील नाही? इराण काय, पाकिस्तान काय, इजिप्त, सीरिया काय....बहुतेक लोकं प्रामाणिकपणे नोकरी धंदा करून पैसे मिळवू पहाणारीच असणार. काय वाताहत होत असेल सामान्य आयुष्यांची ! अजून वाचायला आवडेल. कारण तुम्ही अश्या गोष्टी लिहू शकाल ज्या मीडियाकडून कधीच कळणार नाहीत. जे.पी.

हा विचार अगदि साधेपणातून्,सरळ मनाने आलेला दिसतो. सामान्य माणसाला थेट युद्ध नको असले तरी बक्कळ साधन संपत्त्ती हवी असते कमीतकमी कष्टात चैनीने जगण्यासाठी. ह्यासाठी सरकारांवर मग साधनसंपत्ती वगैरेंसाठी दबाव येतो. दुसर्‍याच्या मुलखातून ते ती आणू पाहतात. एकमेकांच्या हितसंबंधाना उडवून लावत गळे कापू पाह्तात. जो बलिष्ठ (निदान काही बाबतींत) तो तरतो. जो दुर्बल व कमनशिबी त्याचा घात ठरलेला. शिवाय "एकदा ह्या साल्यांना समोरासमोरच्या युद्धात अद्दल घडवलीच पाहिजे" असे मह्णणारे अरेच सामन्य जन आसपास दिसतात. फेसबुकवर तर फारच दिसतात.असो.

इस्राइल - इराण ह्यांच्यात गुंत बरीच आहे. चमत्कारिक गोष्ट अशी की १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर इस्राइलशी उघड वैर वगैरे खोमेनींनी/इराणने पत्करले तरी इराण-इराक युद्ध१९८०-१९८९ मध्ये सुरु असताना इस्राइलकडूनच भरपूर शस्त्रखरेदी केली! म्हणजे एकीकदे "हा देश बेचिराख केला पाहिजे", "नज्काशावरून पुसून टाकला पाहिजे" वगैरे वगैरे जाहिर भाशणात बोलत असले तरी त्या "पुसून टाकण्याच्या लायकीच्या" देशाकडूनच ते शस्त्रेसुद्ध खरेदी करत होते. अजब आहे. कुणाचा अभ्यास असेल ह्या विषयावर तर त्यांनी अजून लिहावं. --मनोबा

दस्तूर खुद्द इराणी जनता यांच्या मध्ये रोहानी यांनी केलेल्या खळबळजनक हालचालींमुळे आणि विधानांमुळे उमेद संपल्यात जमा आहे. हा असा टोन लेखात वारंवार दिसला."इराणी जनतेला इस्राइलबद्दल काही फार द्वेष नाही" असे ही वाक्ये सुचवतात. इराणी जनतेचा पाठिंबा हवा असेल तर पुरेसे इस्राइलविरोधक रहायला(निदान दिसायला) हवे हे रोहानींना सत्तप्राप्तीनंतर का असेना जाणवले असावे; म्हणून त्यांनी तसे विधान केले असण्याची शक्यता वाटते. ( पाकिस्तान मध्ये कुठलेही सरकार एका विशिष्ट मर्यादेपलिकडे भारतीयांशी किंवा गैर्-तालिबानी अफगाणी सत्त्तांशी सौहार्दपूर्ण वागू शकत नाही. कारण "दोन्ही देशातील जनतेला मैत्री हवी आहे.सरकारे मात्र भांडण करीत आहेत" हे बाळबोध विधान आहे. ) . इराणमध्येही असेच पॉलिटिकल कम्पलशन असावे. ( "दुष्ट झायोनिस्ट" राक्षसाबद्दल तुम्ही टोकाची भूमिका घेतली नाहित तर तुन्ही त्यांचे हस्तक आहत असे मानले जाइल.)

हे सत्य आहे की इराणी जनता उघड उघड म्हणते आम्हाला इस्त्राइलशी असणाऱ्या राजकीय वैराशी काही घेणंदेणं नाही. किंबहुना इस्त्राइलशी आमचे काही भांडण नाही असे बहुतांश जनतेचे म्हणणे आहे. रोहानी यांनी असेच असावे असे त्यांचे मत आहे. अहमदेनिजाद यांच्या पाठीराख्याला अव्हेरून रोहानी यांना निवडून देण्यामध्ये इराणी जनतेची ही भावना स्पष्ट दिसते आहे.

क्षमस्व, परंतू बर्‍यापैकी घाऊक व एकांगी लेखन वाटले. इराणी जनतेची खरी मते आलेली नाहीत (पाश्चात्य मिडीयात जी मते येतात ती तेथील जनतेची मते असतीलच असे नव्हे - किंबहुना नसण्याची शक्यता जास्त). गेल्याच काही दिवसांत भारताने रुपयाचे अवमुल्यन घटवण्यासाठी उलट इराणशी तेल व्यापार पुन्हा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे तोही डॉलरमध्ये न करता रुपयांमध्ये. त्यासंबंधी कालचा लोकसत्तातील अग्रलेख वाचनीय आहे. बाकी लिहिण्यासारखे बरेच आहे पण तुर्तास लेखाचा सूर पटला नाही इतकेच म्हणतो.

हेच मी वरती लिहिलं आहे.पण इतकं नेमकं नव्हतं लिहिलं.

मिडीया मध्ये ऐकून वा बघून माझी मते मी मांडली नाहीत. रोहानिंच्या शपथ विधीच्या दिवशी आणि आधी पंधरा दिवस मी स्वत:तेहरान मध्ये होतो. इराणचा व्यावसाईक कामानिमित्ताने प्रवास होतो - ज्याचा उल्लेख माझ्या गेल्या एकदीड वर्षांच्या लेखात ही येतो आहे. इराण मध्ये बरेच मित्र आहेत, परिचित व्यावसाईक आहेत, विचारवंत आहेत. तेहरान मधल्या पाकिस्तानच्या उच्चाआयुक्तांशी माझा संवाद आहे. माझी मते मी स्वतः बनविलेली वा बनलेली मांडली आहेत. एकांगी या विषयातील माझे मत मी वर मन १यांच्या प्रतिक्रियेत दिले आहे.

मीना प्रभू यांच्या ईराण वरच्या पुस्तकात लिहिले आहे की सर्वसामान्य इराणी जनता अतिशय प्रेमळ आणि भारतीयांविषयी आदर बाळगून आहे.खौमेनी व अहमदेनिजाद यांनी इराणला भलत्या वाटेवर नेले असले तरी त्यांची अतिरेकी मते सामान्य जनतेला पसंत नाहीत. पण तसे ते उघडपणे बोलू शकत नाहीत. आपण भारतीयांनी या बाबतीत स्वतःला सुदैवी समजले पाहिजे. लेख आवडला. इराणवर अजूनही वाचायला आवडेल.

सत्तेवर आल्यानंतर रोहानी यांना इस्लामी मूलतत्त्ववाद्यांची बाजू घेणे काही प्रमाणात आवश्यक ठरले असावे. थोडा जम बसेपर्यंत त्यांना गप्प करण्यासाठीची ही खेळी असू शकेल. पण तरीही नक्की सांगू शकणार नाही. थोडे अवांतरः आजच्या पेपरमधे सुस्मिता बॅनर्जींच्या तालिबान्यांनी केलेल्या हत्येबद्दल वाचले. http://news.sky.com/story/1137919/escape-from-taliban-author-shot-dead जवळपास १८ वर्षांनी अफगाणिस्तानात परत गेलेल्या सुस्मितांना तालिबान्यांनी सोडले नाही. पण या हत्येची दखल टीव्हीवाल्यांनी फारशी गंभीरपणे घेतलेली दिसत नाही. सगळीकडे आसाराम आणि क्रिकेट टीमबद्दल बोलणे चालू आहे. की एका भारतीय लेखिकेची तालिबान्यांनी केलेली हत्या अदखलपात्र आहे?

की एका भारतीय लेखिकेची तालिबान्यांनी केलेली हत्या अदखलपात्र आहे?
हिंदू दहशतवादाशी कनेक्शन असल्याशिवाय अलीकडे अशा गोष्टींना कव्हरेज द्यायचा नाही अशी फ्याशनच आहे.

सुधीर मुतालिक लेख रोचक आहे. कसा हुकला माझ्याकडून असं वाटून राहिलंय. लेखातलं एक विधान दुरुस्त करावंसं वाटतंय :
कारण दहा वर्षात इराण संपेल असे हेन्री किसिंजर ही म्हणाले होते.
उपरोक्त वाक्यात तुम्हाला इस्रायल म्हणायचं होतं का? कारण की माझ्या माहितीप्रमाणे हेनरी किसिंजर यांनी २०१२ साली येत्या १० वर्षांत इस्रायल नसेल असं वक्तव्य केलं होतं. आ.न., -गा.पै.

अमेरिका स्वतःला दादा राष्ट्र समजते आणि जग आपल्या मर्जीने चालावे अशा हेतूने सगळ्या चाली करत असते . इराक सीरिया आणि इतर देशाना अमेरिकेने याच कारणासाठी सम्पवलेले आहे. तेलाचे सगळे व्यवहार डॉलर मध्येच व्हावेत असे म्हणणे हाच मुळात फार मोठा दहशतवाद आहे. अमेरिकेची वेपन्स लॉबी हे सगळे खेळ करत असते . महामूर्ख इस्लामी दहशतवाद्यांच्या तावडीतून सम्पूर्ण मध्यपूर्व मुक्त व्हावा आणि त्या देशाना विविध देशांशी आपल्या मर्जीनुसार ,आपल्या मर्जीच्या चलनात तेलाचे व्यवहार करण्याचे स्वातन्त्र्य मिळेल अशी व्यवस्था तातडीने राबवण्याची गरज आहे.