सकारात्मक दृष्टिकोनही आवडला.
सी.के.नायडूंच्या सिक्सर विषयी असे ऐकलेले आहे की बाँबे जिम्खान्यावर खेळताना त्यांनी ती सिक्सर मारली होती. त्या काळी बहुधा क्लब मॅचेस ओवलवर होत नसत. त्यामुळे जे घड्याळ फुटले (हे ऐकले आहे)ते राजाबाई टॉवरचे नसावे. ओवल च्या कडेने युनिवर्सिटी आणि कोर्ट असल्याने तो परिसर शांत राखला गेला होता. मधल्या रस्त्यावरही वाहतूक नसे. ती सुरू झाली श्री.पसरिचा वहातुक आयुक्त असताना म. गांधी मार्ग एकदिक मार्ग केला गेला तेव्हा.
राही,
माहितीबद्दल धन्यवाद. खरंतर त्या गोष्टीची कधी शहानिशा करावीशी वाटलीच नाही. मला अगदी लहानपणी असं कोणी सांगितल्याचं आढवतंय. सी के नायडूंनी बॉम्बे जिमखान्याच्या गच्चीवर बॉल मारल्याचंदेखील मी ऐकलंय. ते अंतर १०० एक मीटर असेल पिच पासून. म्हणजे विश्वास ठेवायला जागा आहे. पण ते घड्याळ फोडायला केवळ मिसाइल लाँचरमधून बॉल सोडावा लागेल हे आम्हाला तेव्हा लक्षातही आलं नाही. आम्हाला तर कित्येक वेळा "अरे त्या अमुक तमुकनी जी सिक्स मारली.... नेहरू स्टेडियमवरून बॉल थेट सारसबागेत" वगैरेही सांगितलं गेलं होतं :).
शेवटी दंतकथा म्हणजे वेगळं काय? बाजीप्रभूंची तलवार एक मणाची (४० किलो!!) होती वगैरेही सांगणारे असतातच की. पण ती लोकं मुळात इतकी महान होती म्हणूनच तर त्यांच्या दंतकथा बनतात ना? सुनील जोशी किंवा नरेंद्र हिरवाणीची नाही दंतकथा सांगत ते कोणी? ;-). आणि शेवटी why let facts come in the way of a good story? :-)
हे बाकी एकदम खरं!!! तुकोबा सदेह वैकुंठात जाणे किंवा ज्ञानोबांनी रेड्यामुखी वेद वदवणे इ. गोष्टी लैच जबर्या. त्यांचे महात्म्य तेवढ्यापुरते राहू देण्यात काही हार्म इल्ले असे मला वाटते.
ही नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर मारलेली होती. मैदानच्याच बाहेर एक चर्च आहे व त्यावर (अजूनही) ते घड्याळही आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर हे अंतर जवळ जवळ १५० मीटर असावे.
या सर्व लढवय्या मैदानपटुंचं कौतुक करताना एका रसीक, अगदी मोजक्या शब्दात खेळाचा थरार आणि जिगर नेमकं पकडणार्या आणि ते आमच्यापर्यंत सही सही पोचवणार्या क्रीडाप्रेमी समीक्षकाचं नाव न दिल्यामुळे जे.पी. चा निषेध :)
ओळखा बघु कोण हा मिपाकर :) ??
छान लिहिलयस (तुझ्या जुन्या लिखाणाची आठवण झाली - शारलेट एअरपोर्टवरचया अन इंडँटेड कॅज्युएलिटी वालं).
खेळ खेळायचेच कशाला, पाहून/ चर्चून वेळ फुकट कशाला घालवायचा? काय मिळतं त्यातून असे प्रश्न मला विचारले गेले (विशेषतः नवतरूणांकडून) की माझं असं लंबचौड भाषण तयार असतं ;)
स्पोर्टसमन्शिप आणि त्याची नशा अशी काही और आहे की बस्स्स! बॉल टू बॉल मॅच, मग री-प्लेज, मग सगळ्या पेपरांमधील वार्तांकन वाचण्याचे दिवस आठवले. दुर्दैवाने क्रिकेट इतका ठसा इतर खेळांनी उठवेपर्यंत लहानपण संपलच होतं जवळ जवळ. पण ब्रीज, कॅरम, चेस सारखा बैठा असो की कुठलाही मैदानी, खेळ खेळण्याची आणि पहाण्याची मजा लहानपणापासूनच ठसली मनावर.
आणि हो, विश्वनाथ आनंदचा उल्लेख आवडला असता लेखात :) तद्वत पेस सुद्धा!
सुरेख लेख. फारच आवडला. (वरती उपास यांनी म्हणल्याप्रमाणे आमच्या 'विशीचा' उल्लेख असता तर सोने पे सुहागा असं झालं असतं पण तरीही लेख आवडलाच.)
खेळाने जो चिवटपणा आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची वृत्ती तयार होते त्याला खरंच पर्याय नाही.
आमचे मल्लखांबाचे गोपाळे सर आठवले त्यांनी रागं भरुन पहाटे व्यायामाच्या सवयीची लावलेली शिस्त आठवली आणि भरुन आलं!
वा, मस्त लिहलय..
डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी लढत व्हावी की हार - जीत गौण ठरावी. अशी अटीतटीची लढत की विजेत्यानी पराभूताला सलाम ठोकावा. खेळाच्या मैदानात अशी द्वंद्वं बघायला मिळतात ज्यांच्या कथा कुठल्याही युद्धकथेपेक्षा कमी रोमांचक नसतात!
दोन संघ वा खेळाडू अश्या ताकदीनी आणि त्वेषानी एकमेकांना भिडतात की बघणार्याला आपल्याच नशीबाचा हेवा वाटावा. डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी लढत व्हावी की हार - जीत गौण ठरावी. अशी अटीतटीची लढत की विजेत्यानी पराभूताला सलाम ठोकावा. खेळाच्या मैदानात अशी द्वंद्वं बघायला मिळतात ज्यांच्या कथा कुठल्याही युद्धकथेपेक्षा कमी रोमांचक नसतात! Contests not for the faint hearted !
क्या बात..
आणि जोपर्यंत आंतरशालेय स्पर्धेत सहावीतला तो बारक्या फुटबॉलपटू खरचटलेल्या कोपरांवरची माती झटकून पुन्हा "किक ऑफ" साठी जातोय, जोपर्यंत ती ढोपराएवढी पोरगी धरमतर ते गेटवे पोहण्यासाठी ६-६, ८-८ तास तलावात सराव करतीये, जोपर्यंत आपल्या वेळेतला एक दशांश सेकंद कमी करण्यासाठी तो अॅथलीट पहाटे ४ चा गजर लावून उठतोय तोपर्यंत त्या पणतीला काही धोका नाही. खेळच ह्या पोरांना परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद देईल. संकटांच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत देईल, अपयशाच्या छाताडावर पाय देऊन यशाचा जल्लोष करण्याची ऊर्मी देईल.
जबरदस्त.. अत्यंत समर्पक, रोमांचक लेेख, माॅर्गनसाहेब.. अत्यंत आवडला..
वर उल्लेखलिल्या किंवा तत्सम अटीतटीच्या सामन्यांचि क्षणचित्रे यु ट्युब वर असतिल ना? त्यांच्या सगळ्या लिंक्स एकत्र करुन ठेवता येतील का? म्हणजे वेगवेगळे खेळ आणि त्यातले हे क्षण पुन्हा पुन्हा उपभोगता येतील, ते ही सहजच. जे. पी. what say?
सर्वांना त्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.
@उपास.... अशी एक यादी करायला हवी. आणि लोकांनी त्यांच्या आवडत्या सामन्यांचे दुवे द्यावेत ! आयडिया भारी आहे.
जे.पी.
डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी लढत व्हावी की हार - जीत गौण ठरावी. अशी अटीतटीची लढत की विजेत्यानी पराभूताला सलाम ठोकावा. खेळाच्या मैदानात अशी द्वंद्वं बघायला मिळतात ज्यांच्या कथा कुठल्याही युद्धकथेपेक्षा कमी रोमांचक नसतात!
माझी टीम जिंकत असेल तरच मी टाळ्या वाजवणार या प्रवृत्तीच्या पलिकडे जाऊन सुंदर खेळ झाला तर मी दाद देणार हे म्हणणं आवडलं.
सहज सुंदर आणि मस्त लेख आहे.
सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. क्रिकेट सोडून इतर खेळांचा उल्लेख आल्यामुळे खूप बरे वाटले.
भाग मिल्खा भाग ! हे गाणं खूप प्रेरणा देऊन जाते. आत्ता असाच ध्यानचंद वर पण सिनेमा यायला पाहिजे, मन खुश होऊन जाईल.
जोपर्यंत आंतरशालेय स्पर्धेत सहावीतला तो बारक्या फुटबॉलपटू खरचटलेल्या कोपरांवरची माती झटकून पुन्हा "किक ऑफ" साठी जातोय, जोपर्यंत ती ढोपराएवढी पोरगी धरमतर ते गेटवे पोहण्यासाठी ६-६, ८-८ तास तलावात सराव करतीये, जोपर्यंत आपल्या वेळेतला एक दशांश सेकंद कमी करण्यासाठी तो अॅथलीट पहाटे ४ चा गजर लावून उठतोय तोपर्यंत त्या पणतीला काही धोका नाही.
प्रतिक्रिया
लेख आवडला.
सी. के. नायडू
why let facts come in the way
सी. के. नायडूंची सिक्सर
होय
निषेध !!!
क्रीडा दिनाची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
मस्तच रे जे.पी.
पण.
तद्वत पेस सुद्धा!त्याने सध्या एव्हडा धिगांना केला ना, उतरलाय मनातून... :(दिवसाची स्फूर्तिदायक सुरूवात
सुंदर लेख
मस्त
अप्रतिम लेख !!!
वा!
गोपाळे सर
प्रत्येक खेळातल्या या जवळपास
झक्कास !
डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी लढत व्हावी की हार - जीत गौण ठरावी. अशी अटीतटीची लढत की विजेत्यानी पराभूताला सलाम ठोकावा. खेळाच्या मैदानात अशी द्वंद्वं बघायला मिळतात ज्यांच्या कथा कुठल्याही युद्धकथेपेक्षा कमी रोमांचक नसतात!जबरदस्त..
खुपच सुंदर. जेपीदा नेहमीच
मस्त...
यु ट्युब..
यू ट्यूब
जबरदस्त!
मस्त लेख.
सहज सुंदर आणि मस्त लेख आहे.
मस्त लेख...
_/\_