Welcome to misalpav.com
लेखक: शनआत्तार | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

शनअत्तार साहेब बरीच ओळख होते आहे तुमच्या लेखणातुन माध्यमिक शिक्षणाबद्दल. जसे तुम्ही मराठीबरोबर इंग्लिश विषय शिकवायला सुरु करुन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवलात तसेच आणखी एका विषयात रुची वाढवणे अतिशय गरजेचे आहे, अन ते म्हणजे शेती! नशिबाने तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहात, जेथे अजुन शेती-वाडी शिल्लक आहे. सर्वचजण यशाच्या शिखरावर मावु शकत नाहीत, अन शेतीव्यवसायाबद्दल शाळेपासुनच जर आत्मियता वाढीस लागली तर बरीच सुधारणा घडु शकते या क्षेत्रात. बघा विचार करा. आठवड्याचा एक दिवस शेतावर घालण्यास उद्द्युक्त करा मुलांना. त्यांच्या कष्टातुन उगवलेले धान्य पहायची संधी द्या. नव्या तंत्रज्ञानाने पडलेला फरक जाणवु द्या.

असेच घवघवीत यश पुन्हा पुन्हा आपल्या जिल्ह्यास मिळो ही सदिच्छा .......... मी शेठ म. ग. हायस्कूल, माजी विद्यार्थी...

अभिनंदन शनआत्तार साहेब, तुमचे दोन्ही लेख वाचले. आपण इतक्या तळमळीने शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम करत आहात, हे वाचून खूप छान वाटले.
>>>> चांगले शिक्षण म्हणजे फक्त परिक्षा पास होणे, चांगले गुण मिळवीणे इतका तोकडा अर्थ नाही>>>
अगदी खरे आहे. आपल्या इकडल्या शिक्षणात एक फार मोठी उणीव आहे, ती म्हणजे कला, साहित्य, संगीत इ. विषयी उत्तम संस्कारांची उणीव. मी माझ्या मुलांचे मित्र (आता मोठे झालेले) बघतो, त्यांना उत्तम चित्रकार, संगीतकार, लेखक, कवी इ.ची नावेही ठाऊक नाहीत, त्यांच्या रचना माहित तर असणे दूरच. याउलट युरोप अमेरिकेतील विद्यार्थ्यांना अगदी लहान पणापासून संग्रहालयात नेऊन अनेक प्रकारची माहिती दिली जाते. चित्रकलेच्या बाबतीत मी मदत करू शकतो, ती म्हणजे उत्तमोत्तम चित्रे निवडून त्याबद्दल थोडी माहिती असलेला एकादा ब्लॉग बनवून तो विद्यार्थांना दाखवता येइल. याच प्रकारे शाळेत भारतीय व पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत थोडावेळ वाजवले, तर तेही त्यांच्या कानी पडेल.

एकूण उपक्रमाबद्दल आणि यशाबद्दल अनेकोत्तम शुभेच्छा!! पण
जिल्ह्यात एकूण २२० माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी ---- शाळांचा निकाल १००% लागला असून गेल्या वर्षा पेक्षा शाळांच्या संख्येत --- वाढ झाली आहे.
इथे माहिती भरली असती तर अजून बरे झाले असते.

एका यशस्वी कार्यक्रमाचा भाग असल्याबद्दल अभिनंदन! आधी लातूर पॅटर्न झाला. आता सिंधुदुर्ग पॅटर्न. या पॅटर्न्सबद्दल अधिक वाचायला आवडेल. साधारण स्कॉलरशिप, १० वी १२ वी अशा परीक्षांसाठी घोकंपट्टी करून रेसचे घोडे तयार केले जातात असा माझा समज आहे. तो चुकीचा ठरला तर आनंदच वाटेल. पण पुस्तकी माहिती मुलांच्या डोक्यात भरण्यापेक्षा अभ्यास कसा करावा आणि तो जास्तीत जास्त आनंददायी कसा होईल हे मुलांना शिकवणे जास्त आवश्यक आहे असे वाटते. अशा परीक्षेसाठी तयार केलेल्या मुलांचे पुढचे करियर फार चांगले होत नाही असे एक निरीक्षण आहे. उलट त्यामुळे मुलांवर तणाव वाढतो. तसे होऊ नये म्हणून तुमच्या पॅटर्नमधे काही उपाय योजना आहेत का?