Welcome to misalpav.com
लेखक: शरद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

इतिहासाची फारशी माहिती नाही पण "कोणताही मुसलमान दुसर्‍या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो" या बद्दल शंका आहे. भारताच्या बाबतीत बघायचे झाले तर मुघल साम्राज्य हे दिल्लीच्या सुलतानांना हरवूनच प्रस्थापित झाले होते आणी नंतरही नादिरशहा, अब्दाली वगैरे मुसलमान राजांनी मुघलांवर आक्रमण केले होते. मुघलांमध्येही जर सत्ताबदल बघितला तर शहाजहान आणी औरंगजेबनंतर सत्ता काबीज करण्यासाठी भाऊबंदकी झालीच होती. मध्ययुगीन अरबस्तानात दोन मुसलमान राजे एकमेकांशी लढत नव्हते काय?

हाच मुद्दा थोडा पुढे नेताना . शिया सुन्नी वाद तर जग जाहीर आहेत . आपल्या धर्म बांधवाला खरच बंधू मानणं . हा त्या धर्माचा नाही . तर वैयक्तिक विचारसरणीचा भाग असतो . कोणी मानतो कोणी नाही . आपल्यातही (हिंदूमध्ये) असे कित्येक लोक आढळतील जे कोणताही धर्माचा माणूस असो . मदत करतातच .

जगभरात सगळे मुस्लिम बंधू एकमेकांशी भांडत आहेत. त्याना कोणी काफर मारत नाहीये. :) असो, आपले मुस्लिम बंधू एकमेकात कसे भांडत नाहीत याबद्दल आश्चर्य वाटत आहे.

लखनौमध्ये दर वर्षी नियमितपणे शिया आणि सुन्नी या दोन पन्थामध्ये दंगे होतात. काही माणसे मरतात. मिळकतींचे आणि वाहनांचे नुकसान होते. औरंगजेब दक्षिणेत फौज पाठवीत असे ते केवळ शिवाजी विरुद्ध नाही . निजामाच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आणि मिळेल तर त्याचा मुलुख ताब्यात घेण्याचा ही उद्देश होता . बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा सरदार मीर जाफर याने फितुरी करून इस्ट इंडीआ कंपनी ला लढाईत मदत केली होती. स्वार्थ आणि राज्यविस्तार यांना मुस्लीमांनिसुद्धा धर्मापेक्षा जास्त महत्वाचे मानले आहे.

मुस्लिम भारतात येऊन खरेच जिंकले का? पर्शिया पूर्ण इस्लाममय झाला, रोमनांचा सिरिया, इजिप्त इस्लाममय झाला, पाऊण अफ्रिका जवळजवळ इस्लामी झाला. पण भारत त्यांच्यासाठी अजूनही दार उल हरब आहे.

बराचसा सहमत. तपशील, त्याचे दुवे खालील प्रतिसादात दिले आहेत. बादवे, भारताला "दारुल हरब" किंवा "दारुल इस्लाम" दोन्ही न मानता "दारुल अमन" मानावे असेही एक प्रपोजल मुस्लिम विचारवर्तुळात मागील शतकात चर्चिले जात होते.

भारताला "दारुल हरब" किंवा "दारुल इस्लाम" दोन्ही न मानता "दारुल अमन" मानावे असेही एक प्रपोजल मुस्लिम विचारवर्तुळात मागील शतकात चर्चिले जात होते.
ही दारुल प्रकरणं काय आहेत?

दार अल इस्लाम म्हणजे इस्लामची भूमी. जिथे इस्लाम पूर्णपणे त्यांच्या धर्मानुसार वागू शकतो. उदा. सौदी अरबिया, मध्यपूर्वेतील देश, पाकिस्तान इत्यादी. दार अल हरब म्हणजे युद्धभूमी. जिथे इस्लामी अनुयानांची संख्या कमी आहे आणि ती भूमी अनुकूल वेळ येताय इस्लाममय बनवायची आहे. म्हणजेच भारत.

वल्ली साहेब भारत, बांग्लादेश व पाकिस्तान ह्यांची मुस्लिम लोकसंख्येचा ऐकत्रित विचार केला तर अस लक्ष्यात येइल की त्यांची लोकसंख्या ५० कोटीच्या वर जाते. व ह्यातले बहुसंख्य मुसलमान हे आधी हिंदु होते. तेव्हा ते आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम करण्यात यशस्वी झाले. ही गोष्ट लगेच लक्ष्यात नाही येत कारण ऐका देशाचे तीन तुकडे झाले व त्यांची लोकसंख्या तीनही देशात विभागली गेली.

असहमत. जालावरची आकडेवारी तपासून पाहीली तरी पाक + बांग्ला + भारत यातील मुसलमानांची संख्या हिंदूंपेक्षा जास्त भरत नाही.

मुळात हिंदुपेक्षा जास्त भरत नसली तरी त्यांच प्रमाण हे साधारण २ च्या हिंदुमागे १ मुसलमान (३ देशातील मुसलमानांची संख्या धरुन). हिंदुपेक्षा जास्त भरत नसली तरी त्यांच प्रमाण लक्षात घ्या. भारत हा हिंदुंचा देश होता व ह्यात आता मुंसलमानांची संख्या किती आहे हे बघुन व त्यातील बहुसंख्य मुसलमान हे आधीचे हिंदु होते. मग आपल्या लक्षात येईल की हिंदुंवर किती अत्याचार झाले असावेत ते मुसलमान होण्यासाठी .

दलितांना इस्लाममधील एकता आवडली व जातीच्या जाती इस्लामात सामील झाल्या.
.. माझ्या मते हे धर्मांतर मोठ्या प्रमाणात स्वखुषीने झाले नाही, तर ते स्वतःचा जीव वाचवावा ह्या उद्देशाने झाले असावे. माझ्या वाचनात अनेकपुस्तकातूनही असे उल्लेख आले आहेत. बाकी मुस्लिमच कां जिंकले ह्याची अजूनही कारणे आहेत.

थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ होता.
अजिबात नाही. जगभरात मुस्लिम कुठे हरले असतील तर ते केवळ हिंदुस्थानातच! आजवर पन्नासावर देशांत मुस्लिम बहुसंख्य आहेत (जिथे दीड हजार वर्षांपूर्वी त्यांचे,अस्तित्वही नव्हते). भारतीय उपखंडात (पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, श्रीलंका, अफगाण, नेपाल, भूतान इ. ) मात्र हजार-आठशे वर्षांच्या सतत आक्रमणातूनही त्यांची संख्या वीस टक्क्यांवर जाऊ शकली नाही. चूभूदेघे. तथापि, तथापि, "हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत." आणि "अजून शे-दीडशे वर्षांत हिंदू धर्म (किंवा ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते) नष्ट होईल." अशी माझी अभ्यासांती ठाम मते बनलेली आहेत.

आण्णा, मुसलमानानी भारत कधीच जिंकला होता. भारत - पाक -बांग्ला मिळूण अखंड हिंदुस्तानात ४० % मुसलमान होते. ४० % हिंदु आणि उअरलेले इतर. भारतातून दोन देश देश फुटून २० % मुसलमान बाहेर गेले. आणि आता तुम्ही म्हणताय आमच्या देशात हिंदु बहुसंख्य आहेत म्हणून ... :) समजले का? --- मुसलमान न झाल्याबद्दल पश्चात्ताप करणारा उद्दाम खान

शरद यांनी निवडलेला विषय आणि त्याचा घेतलेला मागोवा कौतुकास्पद आहे. विशेषतः शेवटचे २ परिच्छेद तर अप्रतिम आहेत.

सर, खरे आहे...
कोणताही मुसलमान दुसर्‍या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो.
फक्त खरा मुसलमान कोण आहे किंवा नाही हे ठरत नाही तोवर भावाभावात भांडणे होतात... तशी त्यांच्या ही होतात. अरब मुस्लिम गैर अरबांना खरा मुस्लिम मानत नाहीत. अश्रफ अन्सारी असे उच्च वर्णीय अन्य हलक्या कुळातील मुस्लिमांशी भावाप्रमाणे वागतात का? हैद्राबादी मुस्लिम लखनवी किंवा देवबंदीना मुस्लिम भाऊ मानतात का? सुन्नी शियांना, अहमदियांना, आगाखानींना, दाऊदी बोहरांना खरे मुस्लिम मानतात का? ते पाकिस्तानच्या विविध मुस्लिम विचारकांच्या मुलाखतीतून पहावे... मुस्लिम्स रूल्ड इंडिया Paki Punjabi and Urdu BBC Urdu service on 14 Aug Saudi Arabia insults Paki Comic person मुस्लिम धर्म निर्मितीच्या आधीपासून ज्या ज्या जमातींच्या, विविध प्रदेशातील टोळ्या वा सैन्याने खैबर खिंडपार करून भारतात प्रवेश का केला त्याची त्या त्या भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी पाहिली तर आक्रमक सैन्याला लढाईत क्रूर व्हावेच लागते. काही हस्तगत करायच्या उद्देशाने घर फोडायला आलेला साधा चोर ही हाती शस्त्र घेऊन प्रतिकार करणाऱ्याला वेळ पडली तर मारण्याच्या तयारीनेच आलेला असतो. आक्रमकपणातून क्रूरता निर्माण होते किंवा क्रूर असल्याशिवाय आक्रमक बनता येत नाही. या मापाने ते क्रूर आक्रमक होते. नंतर मुस्लिम धर्माची तत्वे वा वागणुकीच्या तऱ्हा त्या टोळ्यांना आनंदाने वा बळजबरीने मान्य झाल्या म्हणून ते एकमेकांना पुरक व पथ्यावर पडल्यासारखे झालेले दिसते. अशा क्रूर लोाकांचा धर्म तो होता म्हणून त्या धर्मातील लोकांनी वागणुकीचे ते आदर्श मानायला सुरवात केली. (पाकिस्तानच्या मिसाईलची नावे आठवा) भारतातरील हिरव्यागार सुपीक धनधान्य उगवणाऱ्या जमिनीचे मालक किंवा राजसत्ता खैबरखिंड पार करून तेथील अती थंडी व वैराण भागावर अधिपत्य करायला कसा उत्सुक असेल? तसा असता तर त्याला तो प्रदेश जिंकायला साहसी व क्रूर व्हावेच लागले असते. मग तो हिन्दू असता तरी... पण आपल्या देशाच्या सेना अजूनही आपल्याच बळकावलेल्या प्रदेशात चाल करून जाऊ शकत नाही अशी मानसिकता आहे. तेथे आज ही असे होत नाही म्हणून मुस्लिम जिंकतात...

इथले काही प्रतिसाद पाहीले. सौदी धर्मीय लोकांमधील भांडणे शोधून समाधान मानण्याचा प्रयत्न काही जणांनी चालवला आहे. पण सौदी धर्मीय आपापसात भांडत असले तरी विजय त्यांचाच होत आहे हे आधी मान्य करायला शिकले पाहीजे.

वल्लीशेटशी सहमत. माझ्याकडील माहिती संक्षिप्त रुपात लिहिलेली आहे. त्याचे दुवे देत आहे. भाग १ http://www.misalpav.com/comment/419491#comment-419491 . भाग२ http://www.misalpav.com/comment/419494#comment-419494 . भाग३ http://www.misalpav.com/comment/419497#comment-419497 . भाग४ http://www.misalpav.com/comment/419517#comment-419517 . भाग५ http://www.misalpav.com/comment/419519#comment-419519 . भाग ६(संकिर्ण) http://www.misalpav.com/comment/419744#comment-419744 . हे सर्व दुवे प्[रामुख्याने भारतावर झालेल्या आक्रमणांबद्दल आहेत. मुळात मध्यपूर्वेत इस्लामच्या उदयाच्या आसपासचा काळ संक्षिप्त रुपात तीन भागात लिहून ठेवला होता. तो पुढे आहे:- http://www.misalpav.com/node/21744#comment-399275 http://www.misalpav.com/node/21744#comment-400231 http://www.misalpav.com/node/21744#comment-400256 . बाकी, ही चर्चा वाचतो आहेच, पण सध्या व्यस्त असल्याने एकूणातच प्रत्यक्ष लॉगिन करणे जमेलच असे नाही.

पण मुस्लिम जिंकले असे म्हणण्यापेक्षा मुस्लिम राज्यकर्ते जिंकले असे म्हटले पाहिजे. कारण अगदी शिवाजी महाराजांसारख्याला सुद्धा प्रत्यक्ष मुस्लिम सरदारांपेक्षा बादशहाच्या हिंदू सरदारांशी जास्त लढावे लागले. तत्कालीन समाज हा मुस्लिम्/ब्रिटिश्/पोर्तुगीज कोणीही असो, ते इतर हिंदू राजांप्रमाणेच हे वेगवेगळे राजे असेच समजत असे. एक देश, धर्माधारित राज्य वगैरे कल्पना तेव्हा रुजल्या नव्हत्या. मुस्लिम बादशहांनी राजपूत मुलींबरोबर लग्ने लावून त्याना आपले नातेवाईक करून घेतले. पण अशा लग्नातील मुले ही हिंदू नव्हे तर मुस्लिमच असत. मुसलमान बादशहाला दिल्लीश्वर म्हणण्याइतकी लाचारी तेव्हा बहुसंख्य समाजात होती. भले ते जिझिया कर लावू देत किंवा शेंडी कर बहुसंख्य हिंदू हे जमेल तसे आपला धर्म टिकवून नांदत होते असे दिसते. धर्मांतरे ही आपखुशीने क्वचित होत असतीलही. पण मोठ्या प्रमाणात झालेली धर्मांतरे ही छळ, बळ, कपट अशा मार्गांनीच झालेली आहेत. अपवाद एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर दलितांनी केलेल्या धर्मांतराचा. पण त्याला धर्मांतर म्हणावे का हा प्रश्न पडतो. कारण हिंदू धर्माने बौद्ध हा पंथ म्हणून सामावून घेतला होता. मुस्लिमांनी तलवारीच्या जोरावर पूर्ण हिंदुस्तानचे धर्मांतर घडवून आणणे केवळ अशक्य होते कारण प्रचंड लोकसंख्या. पोर्तुगीजांनी तसे प्रयत्न केले तरी गोव्यात ख्रिश्चन लोकसंख्या हिंदूपेक्षा जास्त होऊ शकली नाही. शिवाय ही आक्रमणे महाराष्ट्राने थोपवून धरली. त्यामुळे दक्षिण भारत एवढा चिरडला गेला नाही. एकूणातच भारतात येऊन आक्रमक असल्याच्या जोरावर राज्य ताब्यात घेण्यात मुस्लिम यशस्वी झाले तरी संपूर्ण हिंदुस्तानचे धर्मांतर घडवून आणणे त्यांना शक्य कधीच नव्हते. इतर सर्व आक्रमकांप्रमाणे कालांतराने बरेचसे सुजाण मुस्लिमही भारतात मिसळून गेले आणि जेव्हा मुस्लिम बहुसंख्येने असलेले पाकिस्तान तयार झाले तरी स्वखुशीने भारतात राहिले. भारतात त्यांना जेवढ्या संधी होत्या तेवढ्या पाकिस्तानात नव्हत्या हे स्पष्टच आहे. त्यामुळे "हँस के लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान" या वल्गनाच राहिल्या. आणि राहतील.

"हँस के लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान" या वल्गनाच राहिल्या. आणि राहतील.
नक्की? वाक्यातला पूर्वार्ध वल्गना राहिला नसून साठ वर्षांपुर्वीच वस्तुस्थिती बनलीय (आणि म्हणून) उत्तरार्धही केवळ वल्गना राहील या समाजाला आधार काय?

http://www.globalfirepower.com/countries-comparison-detail.asp?form=form&country1=India&country2=Pakistan&Submit=Compare+Countries या लिंकवर दोन्ही देशांची तुलना बघा. पाकिस्तान उपद्रव करत राहील पण पाकिस्तानपेक्षा क्षेत्रफळाने चौपट, लोकसंख्या ६ पट असलेला भारत देश सैन्याचा हल्ला करून जिंकून घेणे पाकिस्तानला कदापि शक्य नाही. अगदी अण्वस्त्रे वापरली तरीही.

विषयांतर होतेय याची जाणिव आहे पण तुम्हीच दिलेल्या लिंकवर भारत आणि चीनची तुलना केल्यावर उरात धडकी भरली आणी पोटात गोळा आला.

केवळ संख्येवर उपद्रवमुल्य तर अवलंबून नसतेच पण बर्‍याचदा विजयही अवलंबून नसतो... जुन्या काळची मराठी गनिमी कावा विरुद्ध दिल्लीतील सत्ता यांची जुगलबंदी आठवा. तसेच आधुनिक जगातली व्हिएतनाम-चीन, व्हिएतनाम-अमेरिका, अफगाणिस्तान-यु एस एस आर या युद्धांची उदाहरणेही आहेतच! हल्लीच्या काळात युद्धात पूर्ण विजय शक्य नाही... अगदी खर्‍या सामरीक महासत्तेलाही. मग दुसरा परिणामकारक आणि कमखर्चीक उपाय म्हणजे शत्रूला चर्चेच्या गुर्‍हाळात गुंतवून त्याचा छुपेपणाने (आर्थिक, सामाजीक, धार्मीक, राजकीय उपाय वापरून) शक्तीपात करत राहणे आणि योग्य वेळ येताच मोठा घाव घालणे. अण्वस्त्रे ही "केवळ आणि केवळ डिटरंट" आहेत... त्यांचा प्रथम वापर करणार्‍या राष्ट्राविरूद्धा इतर सगळे जग एकत्र होईल. हे नीट समजून त्यांचा गर्भित धमकीसारखा उपयोग करणारे राष्ट्र तात्वीकदृष्ट्या वरचढ असते. ह्या बाबतीत आतापर्यंत पाकिस्तान जास्त हुशारीने वागून भारतापेक्षा जास्त गुण मिळविले आहेत असेच खेदाने म्हणावे लागते. अघोषीत शत्रूबद्दल तर सांभाळून असायला हवेच... पण इथेतर स्वंयघोषीत (उघड उघड) छुपे युद्ध चालू आहे !

त्याशिवाय उद्या पाकिस्तानने सर्वंकष युद्ध सुरू केलेच तरी एवढे सगळे प्रदेश जिंकत कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपर्यंत जाणे त्यांना शक्य नाही. दुसरे म्हणजे अमेरिका भारत किंवा पाकिस्तान दोघांनाही निर्णायक विजय मिळवू देणार नाही. दोघांना झुंजत ठेवण्यात त्यांचा फायदा आहे ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे.
अघोषीत शत्रूबद्दल तर सांभाळून असायला हवेच... पण इथेतर स्वंयघोषीत (उघड उघड) छुपे युद्ध चालू आहे !
अगदी अगदी सहमत! पण म्हणूनच आमच्यासारख्या सामान्यांना कळत नाही की आपण तरी चर्चेचे गुर्‍हाळ कशाला घालत बसायला हवे. बरे गुर्‍हाळ घालायचे तर घाला, संरक्षण खर्च कमी करताना आधीच कठीण अवस्थेत काम करणार्‍या सैनिकांच्या सोयी सुविधा कमी का करता? त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट कमी पडला असे का ऐकावे लागते? आपल्या सैनिकांना पाकिस्तानी सैनिक भारतीय सीमेत येऊन धरून नेतात, त्यांचे हाल हाल करून मारतात, डोकी कापतात, तरी शांततेच्या गप्पा कशाला? सगळे संबंध तोडून टाका ना! "मोस्ट फेव्हर्ड नेशन" चा दर्जा कशाला?

अपवाद एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर दलितांनी केलेल्या धर्मांतराचा. पण त्याला धर्मांतर म्हणावे का हा प्रश्न पडतो. कारण हिंदू धर्माने बौद्ध हा पंथ म्हणून सामावून घेतला होता. इथे याचा संबंध काय ?

धर्मांतरे ही आपखुशीने क्वचित होत असतीलही. पण मोठ्या प्रमाणात झालेली धर्मांतरे ही छळ, बळ, कपट अशा मार्गांनीच झालेली आहेत. अपवाद एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर दलितांनी केलेल्या धर्मांतराचा.
हे आधीचं वाचलं नाय का?

लष्करी इतिहास शिकवताना आम्हाला असे शिकवले होते कि मध्ययुगात मुस्लीम राजे जिंकले याचे प्रमुख कारण त्यांचे वेगवान घोडदळ होते त्याची सुरुवात चंगीझ खानाने केली जो मुळात एक मंगोल होता (अरब नव्हे). चंगीझ खानाने उत्तम घोड दळ वापरून आपल्या शत्रूंच्या बलाढ्य पायदळाचे पानिपत केले त्यःचे उदाहरण घेऊन मुघलांनी उत्तम अरबी घोड्यांची पैदास करून आपले वेगवान घोडदल बनवले जे भारतीय राजांच्या हत्ती आणी पायदला पेक्षा चपळ आणी वेगवान होते. हीच स्थिती जर्मनीने दोन्ही महायुद्धात रणगाडे आणून करून दाखवली आणी महायुद्ध जवळ जवळ जिंकले होते. त्यांचे ब्लिट्झ क्रीग हे तत्वज्ञान अत्यंत कीर्तीचे आहे. आजही बहुतांश युद्धात वायुदलाचे काम अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. डॉक्टर बाबासाहेबआंबेडकर यांचे विचार काळाच्या फार पुढे होते त्यांनी इस्लाम का स्वीकारला नाही याचे कारण त्यांच्याच शब्दात ISLAM AS A RELIGION DEMANDS MORE LOYALTY TO RELIGION THAN THE NATIONI CAN NOT ACCEPT MY PEOPLE TO BE MORE LOYAL TO RELIGION THAN NATION. त्यांनी संत गाडगेबाबा यांना विचारले असता गाडगेबाबा नि सांगितले कि तू दुसर्या धर्मात जा तिसर्या धर्मात जाऊ नको. डॉक्टर बाबासाहेबांना इस्लाम मध्ये असणारी स्त्रियांवरील बंधने पूर्णपणे अमान्य होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्त्रिया आणी शुद्र या पीडितांचा उद्धार झाल्याशिवाय राष्ट्राचा उद्धार होणे शक्य नाही. त्यांचा राखीव जगणं सुद्धा पूर्ण विरोध होता. त्यांच्याच शब्दात IF YOU GIVE RESERVATION TO BACKWARD PEOPLE THEY WILL NEVER STRIVE TO BECOME FORWARD. शेवटी इतर सर्वांच्या विरोधामुळे त्यांनी अनिच्छे ने राखीव जागांना मान्यता दिली पण फक्त दहा वर्ष साठी. त्यांनी असे लिहिले आहे कि राखीव जागांमुळे एक नव पुढारलेला मागासवर्ग जन्माला येईल जो आपल्या बांधवांपासून फारकत घेईल. दुर्दैवाने त्यांचे विचार सार्वत्रिक प्रसार करणे हे कोणत्याही सरकारला परवडणारे नाहीत. फार कशाला मागासवर्गाच्या आजच्या पुढार्यांना पण झेपणारे नाहीत.

राजा शिवछत्रपती ह्या बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या कादंबरीत मोघलांच्या पराभावाचे एक मुख्य कारण त्यांचे हत्तीदळ होते असे म्हंटले आहे. उत्तरभारतात सपाट प्रदेश जास्त असल्याने हत्तीवरून, उंच सुरक्षीत जागी बसून, सैन्याच्या हालचाली करणे त्यांचा सुलभ वाटत असे परंतू महाराष्ट्रात, अत्यंत कठीण अशा डोंगराळ प्रदेशात हत्ती आणि तोफांचा वापर अडचणीचा ठरत होता. घोडा चटकन कसाही वळविता येतो पण हत्तीला पूर्ण १८० डिग्रीत वळविण्यास प्रयास पडतात आणि ते अत्यंत वेळखाऊ काम असते. हत्ती वळे पर्यंत घोडेस्वार त्याच्या पायावर वार करून त्याला जायबंदी करायचे आणि शत्रूशी दोन हात करायचे. महाराष्ट्रात डोंगराळ भागात गनिमी काव्यासाठी जंगलातून अत्यंत अरूंद जागेतून घोड्यावरून येऊन मोंगली सैन्यावर महाराजांनी अगदी तुटपुंज्या सैन्यानिशी हल्ला करून मोंघलांच्या फौजांना बेजार केले होते. जंगलातून अंधार्‍यारात्री अचानक ५-२५ घोडेस्वार यायचे आणि सपासप कापाकापी करून झटकन जंगलात पळून जायचे. महाराजांनी हत्तीदलापेक्षा घोडदळावरच जास्त भर दिला होता. कोसकोसाच्या जलद हालचाली (जसे सुरतेची लूट, लाडाचे कारंजे इ.इ.) घोड्यावरूनच शक्य व्हायच्या. हत्ती आपल्या सोंडेने घोड्यांना फटकारतो आणि खाली पाडतो. (हतींना, युद्ध प्रसंगी भरपूर दारू पाजली जायची). राजस्थानात मोंघलांच्या हत्तीला संभ्रमात पाडण्यासाठी घोड्यांच्या तोंडाला चामड्याच्या सोंडा बांधल्या जायच्या. त्यामुळे ते छोट्या हत्ती सारखे दिसायचे. दांडगट हत्ती समोर दिसणार्‍या लहानग्या हत्तीवर(?) हल्ला करायला काकू करायचे. ह्याचा फायदा घोड्यावरच्या सैन्याला मिळायचा. आजही जयपूरच्या म्युझीअम मध्ये असे हत्तीची सोंड लावलेले घोड्यांचे पुतळे पाहायला मिळतात.

राजस्थानात मोंघलांच्या हत्तीला संभ्रमात पाडण्यासाठी घोड्यांच्या तोंडाला चामड्याच्या सोंडा बांधल्या जायच्या. हे माहिती नव्हतं.

घोड्यांच्या तोंडाला चामड्याच्या सोंडा बांधल्यावर हत्ती त्याला हत्ती समजत असेल तर हत्ती हे मूर्ख जनावर आहे, असेच म्हणावे का?

घोड्यांच्या तोंडाला चामड्याच्या सोंडा बांधल्यावर हत्ती त्याला हत्ती समजत असेल तर हत्ती हे मूर्ख जनावर आहे, असेच म्हणावे का? हत्तीला दारू पाजली असेल तर...??? संदर्भ : (हतींना, युद्ध प्रसंगी भरपूर दारू पाजली जायची).

हत्तीला दारु पाजण्याच्या उल्लेखाने काही संकीर्ण विचार आले: १. घोड्याला चामड्याची सोंड लावल्यावर त्याला हत्ती समजण्यासाठी मूळ हत्तीला किती दारु पाजावी लागत असेल. २. युद्धप्रसंगी वापरल्या जाणार्‍या दारुगोळा या शब्दातल्या "दारु"चा उगम इथे असेल का? ३. दारु पिऊन हत्ती युद्धात धुमाकूळ करु शकत असेलही, पण नंतर हत्तीचा हँगओव्हर हा किती जबरदस्त असेल. अशावेळी त्याला डोके गच्च दाबून गप आडवे पडावे असे वाटत असतानाही (आणि मुळात स्वहस्ते डोके दाबणेही शक्य नसताना) पुन्हा युद्धाला जुंपत असतील तर त्यावेळच्या "पेटा"ने याची दखल घ्यायला हवी होती. (की अशा वेळी किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी हत्तीला डोक्याने धडका द्यायला लावत असत?) ४. पुरेश्या प्रमाणात दारु पिऊन हत्ती घोड्याला हत्ती समजत असू शकेल हे मान्य होण्यासारखं आहे. काही मनुष्यांबाबत दारु पाजल्यानंतर "लिफ्ट"ला बाथरुम समजणं हे घडलेलं पाहिलं आहे.

'दारू पाजल्यामुळे हत्ती, घोड्याला हत्ती समजतो' असे म्हणायचे नसून समोर दिसणारा 'प्राणि' हत्तीसदृष आहे ह्या विचाराने हत्ती संभ्रमात पडतो आणि हल्ला करत नाही. हि एक रणनिती आहे.

हत्तीलाच नव्हे तर घोड्यालाही पाजत असावेत. त्यामुळे घोड्याला आपण हत्तीइतकं मोठं झाल्यासारखं वाटण्याची शक्यता आहे. :)

हत्ती दारू स्वतःहून पीत असेल का? सापाला तोंडात नळी खुस्पू खुस्पू दूध पाजतात तस काहीतरी करत असतील का?

सर्कशीतल्या हत्तीला सर्दी झाली की ब्रँडी पाजतात. पुढे त्याला ब्रँडीची एवढी सवय (व्यसन) लागते की ब्रँडी मिळावी म्हणून कधी कधी हत्ती सर्दी झाल्याचे नाटक करतो. हे, एका सर्कशीतील जनावरांना सांभाळणार्‍या व्यक्तीने आपल्या सर्कस जीवनावर लिहीलेल्या पुस्तकात नमूद केले आहे.

कुठल्याश्या खेड्यात एका बकर्‍याला काही रिकामटेकड्या लोकांनी बिडीची सवय लावली होती. तुनळीवर बघितलं होतं.

त्यामुळे घोड्याला आपण हत्तीइतकं मोठं झाल्यासारखं वाटण्याची शक्यता आहे.
सामान्य सैनिकालाही भरपूर दारू पाजण्यात येत असावी त्यामुळे तो स्वतःला अफझलखान समजत असण्याची शक्यता आहे ;)

(की अशा वेळी किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी हत्तीला डोक्याने धडका द्यायला लावत असत?) हत्तीने किल्ल्याच्या दरवाजावरच्या खिळ्याला न घाबरता जोरदार धडक द्यावी म्हणून उंटाला मध्ये ठेवत असत. मात्र यात हत्ती सुरक्षित रहात असला तरी उंट चिरडला जात असल्याने "पेटा" ने त्या उंटांच्या वंशजांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून लढा उभारायला वाव आहे ;)