Welcome to misalpav.com
लेखक: शनआत्तार | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पण इतक्या वेगाने जाणारी नौका पाकिस्तानविरुद्ध कशी वापरणार? बटण सुरु करुन लगेच बंद केले तरी इतक्या वेगाने जाणारी नौका एव्हाना सुएझ कालव्यात घुसलेली असणार नै का?

ऐकावे ते नवलच्,पण एक सान्गा हे भारतिय NRI आहेत का?म्हणजेच भारतिय वन्शाचे अमेरिकन्/ब्रिटिश नागरिक.

गणिताचा या वेगळ्या अंगानं घेतलेला वेध जाणून घ्यायला आवडेल.
तर अधुनिक ओम चा वापर करून स्टेलेरीयम सारखे संगणकीय स्वाप्टवेअर तयार करण्य़ात आले आणि संगणकाच्या साह्याने खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू झाला.
एकतर ॐ ही गणितीय संकल्पना आहे का? आणि त्याचे विविध प्रकार आहेत का? आणि तुम्ही म्हणताय ते सॉफ्टवेअर कसं विकसित करण्यात आलं आहे याविषयी अधिक माहिती द्याल का?

तरी बरं शेवटचा संदेश तरी चांगला आहे - गणिताशी दोस्ती करा!! त्यामुळे लेखातल्या मनोरञ्जनमूल्याकडे तूर्त दुर्लक्ष करावयाचे ठरवले आहे.

पाय ची किंमत अंदाजे अनंत अपरीमेय बाजातीत आहे. हे चूकीचे असून ती ३.१४१५९२६५३… एव्हडी आहे हे सिध्द केले असं कुठं काय त्याने सिद्ध केले बुवा? त्याच्या त्या पायच्या किंमतीतही ........ आहेत ना शेवटी? म्हणजे त्याने शोधलेली किंमत अनंत अपरिमेयच आहे. पायची किंमत म्हणजे २२ ला साताने भागणे. ते कुणीही आणि कशावरही म्हणजे कागदावर किंवा क्याल्कुलेटरवर केले तरी उत्तर तितकेच येणार. एकाचे उत्तर अपरिमेय आहे आणि एकाचे अपरिमेय नाही, असे कसे होईल? --- पाय मोडका उद्दाम

पायची किंमत म्हणजे २२ ला साताने भागणे. ते कुणीही आणि कशावरही म्हणजे कागदावर किंवा क्याल्कुलेटरवर केले तरी उत्तर तितकेच येणार.
२२/७ हे फक्त अ‍ॅप्रॉक्जिमेशन आहे. मुळात, तंगडी अविवेकी अंक आहे. (मराठीतः पाय इज एन इरॅशनल नंबर). सो इट कॅनॉट बी अ रेशिओ ऑफ टू ईटीजर्स. बाकी लेख वाचूच शकलो नाही त्यामुळे त्यावर काही बोलत नाही.

त्या इरॅशनल शब्दालाच म्हराटी भाषेत अपरिमेय म्हणतात. त्याची किंमत अंदाजेच सांगावी लागणार . कारण शेवटी ............ असते किंवा डोक्यावर ---- असते. --- गणित सोडून बायॉलॉजी का घेतली यावर कधीकधी पश्चात्ताप करणारा उद्दामराव अनंते

इरॅशनल शब्दालाच म्हराटी भाषेत अपरिमेय
आयशी... - (गणित आणि शास्त्र इंग्रजीतून शिकलेला) दादा

या मध्ये दोन प्रोटॉन विरूध्द दिशेला ठेवून ते एकेमेकावर ९९.९९९९९९९९% इतक्या वेगाने आदळले जातात. त्या मध्ये E = MC2 या पेक्षही अधिक उर्जा निर्माण होते. वेग हा % या एककात व्यक्त करतात, ही माहिती ऐकून छान मणोरंजन झाले. ई = एम सी २ पेक्षाही जास्त ऊर्जा निर्माण होते. हा तर अगदी कळसच आहे! :) ---- १०० % पेस्तनजी उद्दाम

फुकट ते शिक्षण, तिच्यामारी.. आमच्या गुरुजींनी एवढ्या मनोरंजकपणे गणित शिकवले असते तर..

"आता तर दिल्ली लंडन हा ५० हजार किलोमिटर" ?????? की "गुगल गुरु" हेच अंतर ८२६०कि.मी. सांगत आहेत... आता कुणाला गुरु मानावे असा प्रश्न पडला आहे. आपलाच

तुमच्यासारख्या गुगलपंडीतांचा णिशेध ! काही झाले की चालले गुगलायला ! आमच्या धर्मग्रंथात अमूक दिले आहे नी तमूक दिले आहे असे सांगणार्‍या आणी समजणार्‍या धर्मांधळ्या लोकांत आणी गुगलने अमूक तमूक सांगीतले आहे असे सांगणार्‍या विज्ञानांधळ्या तुम्हा लोकांत फरक तो काय ? गुगल मे नॉट बी अपडेटेड येट ! कोणे एकेकाळी धरती गोल नव्हती असेच दुनिया मानत होती ना ! काय झाले त्याचे ? तसेच अजून काही शे वर्षांनी तुम्ही दिल्ली ते लंडन हे अंतर ५० हजार कि.मी. आहे असे मान्य कराल यात मला शंका वाटत नाही ! कीप वॉचींग ! नवोदितांचे खच्चीकरण करु नका हो ! त्यांना बी एक चानस द्या !

दिल्ली ते लंडन अंतर ५०००० किमी आहे. हेही बरोबरच आहे. पृथ्वी गोल आहे. तुम्ही हिकडून जाण्याऐवजी वळसा घालून तिकडून गेलात तर दिल्ली - लंडन ५०००० किमी नक्कीच होईल.

आता तर दिल्ली लंडन हा ५० हजार किलोमिटर चा टप्पा पार करणारे काय ही फेका फेकी .. हा प्रवास व्हाया कोणत्या मार्गाने ? बाकी गणित ही केवळ मानवी व्यवहारांसाठी असलेली योजना आहे. निसर्ग काही मोजून इव्हेंट घडवून आणत असेल असे नव्हे. ( हे आमच्याही मर्यादित विचारमंथनाचे विधान आहे ते अंतिम सत्य आहेच असा दावा नाही )

निसर्ग हा सुध्दा गणितीय कालगणने नुसार चल आहे. निसर्गातील प्रत्येक सजिवाचा श्वास हा सुध्दा गणिताचा वापर करून घेतला जातो.
आज पर्यंत मी ऑक्सिजन का काय . ते घेत होतो गुर्जी . धन्यवाद . आजपासून फक्त गणिताने श्वास घेईन :-/
आता तर दिल्ली लंडन हा ५० हजार किलोमिटर चा टप्पा पार करणारे विमान भारतीय २०१४ मध्ये तयार करताहेत..
आयला . आपली पृथ्वी एवढी लांबूळ्की कधी झाली :o
तसेच १० हजार किलोमिटर ताशी वेगाने धावणारी युध्द नौकेचे भारतात विकसीत होणारे तंत्रज्ञानही गणितावर आधारीत आहे
एक मला पण बुक करता येते का बघा राव . . मी तुम्हाला ८८८८८.८८८८ *० % इतके पैसे देईन .
जागतीक संशोधक हिग्ज बॉसन मध्ये वापरले गेलेले तंत्रज्ञान व कालगणना हे गणिताचे योगदान आहे.या मध्ये दोन प्रोटॉन विरूध्द दिशेला ठेवून ते एकेमेकावर ९९.९९९९९९९९% इतक्या वेगाने आदळले जातात
बाब्बौ . हिग्ज सायेब म्हंजी मानुस हाय कि बोगदा . कुटून बी कोन बी आदळत्यात त्यांच्यात घुसून . पन एक परस्न हाये . ह्ये प्रोटोन धक्का मारले एकमेकाले कि त्यातून काय निघते हो . ते एम्शी च्या डोक्यावर दोन ठेवलेलं काय समजलं नाय ब्वॉ

आधीच्या शिक्षणविषयक दोन लेखात लुटलेली वाहवाही असे काहीतरी लिहून घालवू नका हो गुरुजी. मिपाकर लै च्याप्टर हैत.

आधीच्या शिक्षणविषयक दोन लेखात लुटलेली वाहवाही असे काहीतरी लिहून घालवू नका हो गुरुजी. +१०० मिपाकर लै च्याप्टर हैत. अहो गुरुजी, तुम्ही जे काय लिहीले आहे त्याची किंमत करायला फार चॅप्टर असायची गरज नाही. खरंच, असं काही लिहून तुमच्या बाकीच्या इतक्या चांगल्या कार्याबद्दल संशय निर्माण करू नका हो.

"पुढारी" तील विचित्रविश्व आणि इतर पेपरातील तत्सम सदरे किंवा संध्यानंद सारखे कागद वाचत असल्याचा भास झाला. त्यामुळे णॉस्टाल्जिक कि काय म्हणतात तसे वाटले... पु भा प्र

श्री साप्ताहिकाचे मथळे आठवले.. 'खरा ब्रूस ली मेलाच नही' 'उडणार्या बायका' 'कोहिनूर हिरा नाहीच' '२ हृदयाचे बालक' आणखीन काही बाही... काय झाले पुढे त्या साप्ताहिकाचे देव जाणे...

शन आत्तार का 'शाना' आत्तार? बाकी दिल्ली लंडन अंतर ५०००० किमी व्हायला पृथ्वीच्या किती प्रदक्षिणा घालाव्या लागतील ? अशा प्रश्नातून गणिताबद्दलचं प्रेम वाढीस लागेल असं आत्तार सायबांना वाटत असावं. (स्वगतः काय काय करावं लागतं ट्यार्पीसाठी लोकांना!)

विद्यार्थ्यांसाठी तुम्ही अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवतायं. या लेखात मांडलेल्या तुमच्या सर्व कल्पना बाद आहेत पण ते लेख इथे टाकल्यामुळे कळण्याची संधी मिळाली असं समजा. तुमच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा दृष्टीकोन जास्त वस्तुनिष्ठ झाला, असा अर्थ घ्या. दिलगिरी व्यक्त करून सं.मं. ला लेख काढून टाकायला सांगा. तुम्ही जास्त जोमानं कामाला लागाल.

आत्तार सर, हा लेख नक्की कधी लिहिला होता? सन २०१२ हे वर्ष राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून साजरे करण्य़ात येत आहे आणि डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी जोतिषशास्त्र व पौरोहित्य हे दोन विषय अभ्यासक्रमात मांडण्य़ासाठी पुढाकार घेतला आहे ह्या दोन वाक्यांनी काहीही कालबोध होत नाही. जोशी १९९९-२००४ ह्या कालावधीत मनुष्यबळ आणि विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री होते. लेखाची चीरफाड इतरांनी केलेली आहेच. मी अधिक भर घालू इच्छीत नाही. वर चित्रगुप्त यांनी म्हटल्याप्रमाणे आधीच्या शिक्षणविषयक दोन लेखात लुटलेली वाहवाही असे काहीतरी लिहून घालवू नका हो गुरुजी, असेच म्हणतो. टीका सकारात्मक घ्यावी, ही विनंती.