मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे.
.. नवरा , बायको कुणीतरी एक आधी मरणार. दोघाना एकदमच मरायचे तर सदा सुहागन षिणेमात रेखा आणि जितेंद्र एकदमच मरतात, असे काहीतरी व्हायला हवे.
आपली सर्व व्यक्तिगत माहीती जी अजून पर्यंत दुसर्या कोणाबरोबर वाटून घेतलेली नाही. जसे, विविध परवलीचे शब्द (पासवर्डस), ई-मेलचा, मिपाचा, बँकेच्या एटीएमचा, संगणकाचा, नेट बँकींगचा, विमा पॉलीसी तपशील, फिक्स्ड डिपॉझीट तपशील, मित्रां बरोबरचे आर्थिक व्यवहार, तसेच कंपनी बरोबरचे आर्थिक व्यवहार इ.इ.इ. सर्व माहिती एका कागदावर लिहून बायकोजवळ किंवा मोठ्या मुलाजवळ देऊन ठेवा. म्हणजे तुमच्या अकस्मात जाण्याने भावनिक नुकसान होणार आहे ते भरून येणार नाही परंतु आर्थिक गाडा थांबणार नाही. तुमच्या कुटुंबाची कुचंबणा/ओढाताण होणार नाही.
मी स्वतः सर्व महत्वाचे ऐवज, कागदपत्रे हे कायमच माझ्या विश्वसनिय बँकेमधे लॉकर भाड्याने घेउन त्यात ठेवत आलो आहे. त्यामुळे एक किल्लिच काय ती सांभाळावी लागते (वा तिही विश्वासु/जवळच्या नातेवाइकाकडे देउन ठेवता येते).
(या सर्व माहितीमधे मिपाचा परवलीचा शब्दही असावा, हे वाचून सद्गदीद का काय म्हणतात, ते झालो)
राजा गेला . म्हणजे आमच्या वर्गातले गेल्या वर्षात सहाजण गेले . त्या आधीच्या वर्षी चार जण .
आम्ही आता सुप्यातून जात्यात जायचेच बाकी राहिले !
आपल्यापाठी कुणाला त्रास होऊ नये म्हणून काय काय करावयाचे याची चर्चा मित्रामध्ये सतत होऊ लागल्या .
या तीन ओळीत लिहिलेल्या मजकुराचा आणखी विस्तार करून लिहावे, अशी विनंती धागाकर्त्यास करतो. (दहा मित्र गेल्यानंतरही अजून चर्चा करण्यासाठी मित्र आहेत, ही बाब अभिनंदनीय होय).
तो बिचारा बुद्ध कानी कपाळी ओरडून सांगत होता की सगळ्या गोष्टींना शेवट असतोच आणि जगात सुख म्हणून काहीच नाही. तसं म्हटल तर प्रत्येकाचा जन्म ही एका शोकांतिकेची सुरवातच तर असते.
ते कालाच्या प्रवाहात प्रकट झालंय. याचा अर्थ जगात दु:ख आहे असा नाही. जे कालौघात संपणार ते कायम राहावं या इच्छेत दु:ख आहे.
द बेस्ट वे टू डिल विथ डेथ इज टू अॅक्सेप्ट. मग तो मृत्यू दुसर्याचा असो की स्वतःचा. आणि मृत्यूत मजा नाही असं कोण म्हणतं?
आनिसचा एक शेर आहे :
मौजो हवादिसका थपेडा न रहा,
हुई कश्ती गर्क के बेडा न रहा,
सारे झगडे जिंदगानीके थे आनिस,
एक हम न रहे, बखेडा न राहा.
मृत्यू ही जीवनाच्या सर्व प्रश्नातून सुटका आहे. अर्थात, तुम्ही मनसोक्त जगले असाल तर.
नवीन विषयातल्या शतशब्द कथेसाठी( हो, मी शब्द मोजलेत) अभिनंदन.
आणि आता मी फोनवर ऐकतोय मंजिरी ICU बाहेर उभी आहे .
तिचा नवरा पक्षाघाताने ICU त आहे
म्हणजे, एखादीचे नशीब कायमचे तसे असते असे सुचवायचे आहे का ?
''मृत्यू ही जीवनाच्या सर्व प्रश्नातून सुटका आहे. अर्थात, तुम्ही मनसोक्त जगले असाल तर.''
जीवन म्हणजे अनेक प्रश्न असे न समजणारे मृत्यूला काय समजतात ?
मृत्यू सुटका करतो याचा अर्थ जीवन न जगण्यासारखे आहे असा होतो ना ?
पण जगू नये असे वाटणारे , म्हणणारेही जगताना दिसतात तेव्हा जगण्यात गंमत असणार हो !!
_____________________
मृत्यू ही जीवनाच्या सर्व प्रश्नातून सुटका आहे. अर्थात, तुम्ही मनसोक्त जगले असाल तर.
या वाक्याचा अर्थ आहे.
अत्यंत सोपं करतो. दिवस धावपळीचा आहे आणि रात्र निवांतपणाची. तुम्ही दिवस मनसोक्त जगलात, कोणतंही काम अपूर्ण ठेवलं नाही आणि उद्याची काळजी नसेल तर मस्त झोप येईल. दिवस कसा जगलात यावर निद्रेचं सुख अवलंबून आहे.
आयुष्य देखील तसंच आहे. मृत्यू ही कायमची झोप आहे आणि जीवन हा प्रदीर्घ दिवस आहे.
तुम्ही उत्कटतेनं, मनमुराद जगला असाल तर मृत्यू सार्थक आहे. ती निसर्गाची बहुमोल योजना आहे हे तुम्हाला लक्षात येईल. मृत्यूकडे तुम्ही पॉजिटीवली बघू शकाल.
तुम्ही मनसोक्त जगा किंवा कसेही जगा. `सुटका' याचा अर्थ मनसोक्त जगणार्याला मृत्यूची अनिवार्यता मान्य असते. ही टेक्स इट इन अ पॉजिटीव वे. ही वोंट होल्ड ऑन टू द बॉडी. किती वर्ष जगेल देह? आणि वयपरत्वे त्याची क्षमता कमी होणारच. सो इट इज ओके.
मी माझ्यासाठी एक फुलफ्रुप व्यवस्था करुन ठेवली आहे, जी माझ्या अचानक जाण्याने होणारी परिस्थिती हताळेल, किमान घरच्यांना माझ्या आर्थिक व्यवहारांची (देणे-घेणे) व पुढील प्लॅनिंगची माहिती आपोआप मिळेल व सगळे सुरळीत चालू राहील.
आजकाल च्या ज्या अस्थिर जगात आपण राहत आहोत ते पाहता आपल्याला असे काही करणे गरजेचे आहे, मी वापरलेल्या कल्पना काही इंग्रजी चित्रपट पाहून सुचल्या आहेत हे जाता जाता नमुद करतो :)
''जगण्यात गंमत आहेच पण मृत्यूतही मजा आहे''
मृत्यू ही भविष्यकालीन घटना आहे त्यामुळे मृत्यूत मजा आहे म्हणणे पटणे कठीण आहे
What makes you think I am wiser today than tomarrow ?[ मला आवडलेले ,पटलेले बहुदा Notes to myself मधील वाक्य ]
पण दोन गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेत :
१) मृत्यूच्या विचारानी व्यथित झाल्यानं त्यावर वर्तमानात चर्चा चालू आहे. आणि ही व्यथा वर्तमानात निस्तरायची आहे.
२) मृत्यू भविष्यात असला तरी तो निश्चित आहे याची वर्तमानात खात्री आहे!
नाऊ सी, ज्याला विदेहत्त्व कळलं त्याच्या दृष्टीनं मृत्यू हा अंतिम उत्सर्ग आहे. आणि लॉजिक असं आहे: प्रत्येक उत्सर्ग सुखात्म आहे, प्रणयातल्या उत्सर्गात कमालीचं सुख आहे. मृत्यूत हजार प्रणयांचं सुख आहे कारण तिथे वन फायनली इजॅक्युलेट्स द होल बॉडी!
या (रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार) ) लेखात मी विदेहत्त्व जाणण्याची प्रक्रिया विशद केलीये. कारण ज्ञानदेव म्हणतात :
देहबळी देऊनी साधिली म्यां साधनी
तेणे समाधान मज जोडले ॐ मयी ।
पण पब्लिक ऐकेल तर शप्पत! त्याला आता मी काय करणार?
....मृत्यूत हजार प्रणयांचं सुख आहे कारण तिथे वन फायनली इजॅक्युलेट्स द होल बॉडी!
हे स्वतःचे अनुभवाचे बोल नाहीत हे उघडच आहे, ऐकीव माहिती कितपत खरी, हे नेहमी संशयास्पदच राहणार, एवढे नमूद करू चाहतो.
सांगायला लोक नाना प्रकारच्या गोष्टी सांगत असतात. अनुभवाला येइल, तेंव्हाच त्यातली वस्तुस्थिति कळणार (आणि मृत्युच्या बाबतीत तर ती कळणार तरी कशी, कुणाला, वगैरेही प्रश्न आहेतच)).
अमूक गुरु, बाबा, स्वामीने सांगितले, वा अमूक ग्रंथात लिहिलेले आहे, त्या अर्थी खरेच असणार, असे मानणे कितपत योग्य?
मृत्यूचा स्वानुभव आहे का?
हे काय विचारणं झालं? सर्वज्ञानी (आहोत असे स्वतःला समजणारे आणि इतरांना भासवायचा प्रयत्न करणारे) मॄत्यूचा सुद्धा अनुभव घेऊन तो सांगायला परत येऊ शकतात.
कितपत योग्य?
मृत्यू नंतर उठून लिहायला मी काही सच्चिदानंद बाबांची गोष्ट सांगत नाही.
तुम्ही रोजच्या जगण्यात अनुभवू शकता.` प्रत्येक उत्सर्ग सुखात्म आहे, प्रणयातल्या उत्सर्गात कमालीचं सुख आहे '. या स्टेटमंटमधे वाद करण्याचं काही कारण नाही
आता दुसरी गोष्ट आपलं विदेहत्त्व. त्याबद्दल मी देह या लेखात चर्चा केली आहे. आणि ते जाणण्याची प्रक्रिया (अधिक देखणे) या लेखात वर्णन केली आहे.
मृत्यू नंतर उठून लिहायला मी काही सच्चिदानंद बाबांची गोष्ट सांगत नाही.
वाह! क्या बात है. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मान्य आहे कि तुम्हाला म्रूत्युचा अनुभव नाहीच पण... या लेखातिल चर्चा या लेखात अनुशंगित असताना पहिल्यातिल तिसरा व दुसर्यातिल पहिला पॅरा कॉट्राडिक्टरि आहे हे आपण स्वतःच लिहलं आहे ते कसे काय ?
निअर डेथ एक्सपिरिअन्स घेतलेले लोक त्या अनुभवालाहजार प्रणयांचं सुख आहे असे तर कधिच म्हणाले नाहित म्हणजेच तुमचे अज्ञान त्या लोकांनी उघडे पाडले आहे. आता बोला ज्याने मृत्यु जवळुन बघितलाय तो थापा मारतोय कि तुम्ही ?
फार वर्षापूर्वी १ ते १ ० ० अंक मोजल्याशिवाय गिळण्यास मिळत नव्हते
आता केव्हाही गिळतोय !!
पण १ ते १०० अंक मोजण्यासाठी शतशब्द कथेचे निमित्य केले आणि काय काय गिळतोय!!
प्रतिक्रिया
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
आपली सर्व व्यक्तिगत माहीती जी
मिपापण
+१
वर्षापुर्वी नवरा गेलेल्या मंजिरीने लग्न केले'' !
सूक्ष्मतम...
आणखी विस्तार
त्यांना कशाला इचारताय?
बापरे!
शतशब्द कथा
नाही हो,
मंजिरीला म्हणावेसे वाटतेय आता पुन्हा लग्न नको,
तो बिचारा बुद्ध कानी कपाळी
नाही. बुद्ध म्हणतो जग स्वप्नवत आहे.
नवीन
''मृत्यू ही जीवनाच्या सर्व
जगण्यात गंमत आहेच पण मृत्यूतही मजा आहे
प्रतिसाद आवडला.
मलापण
मला पण.
पण मनसोक्त जगले असाल तर
मृत्यू निश्चित आहे
मी माझ्यासाठी एक फुलफ्रुप
फुलफ्रुप व्यवस्था कोणती ?
''जगण्यात गंमत आहेच पण
मृत्यू ही भविष्यकालीन घटना आहे..... अर्थात!
मृत्यूचा स्वानुभव आहे का?
मृत्यूचा स्वानुभव आहे का?
अमूक ग्रंथात लिहिलेले आहे, त्या अर्थी खरेच असणार, असे मानणे
वाह! क्या बात है.
आणि होय, सर्वात महत्वाचे म्हणजे
उगाच
फार वर्षापूर्वी १ ते १ ० ०
असंय होय