Welcome to misalpav.com
लेखक: kalpana joshi | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तिला सर्व दृष्टीने, आर्थिक, मानसिक, कायिक, वाचिक तिची आवड, छंद जोपासा, त्याचे कौतुक करा. तिला आधार वाटेल असे करा. तिचे आशीर्वाद तुम्हांला मोठे करतील यात शंका नाही.
- सहमत.

तिला सर्व दृष्टीने आधार द्या. ती तुमच्यावर प्रेम करते, मदत करते. तुमच्यासाठी त्याग करते, काय नाही करत ती तुमच्यासाठी? तुम्हीही तिला प्रेम, माया द्या. कामाची वाटणी करा. मग बघा, प्रत्येक जीवन कसे निकोप होते ते. तिच्या आरोग्याची काळजी घ्या. मायेने, आस्थेने तिची विचारपूस करा. तिला सर्व दृष्टीने, आर्थिक, मानसिक, कायिक, वाचिक तिची आवड, छंद जोपासा, त्याचे कौतुक करा. तिला आधार वाटेल असे करा. तिचे आशीर्वाद तुम्हांला मोठे करतील यात शंका नाही.
अतिशय सुंदर चित्र उभे केलेत एका सुखि परिवाराचे. उत्तम गृहिणी असणे हे एक मौल्यवान कौशल्य आहे त्याचा यथोचित गौरव हवाच!

धन्यवाद सर्वाना तुमच्या सुभेच्छा व आशिर्वाद पाठीशी आहेत ,वाचून खूप आनंद वाटला . माझे नवीन पुस्तक आहे . त्यातील हा लेख आहे. समुपदेशक लेख ,कविता ,गोष्टी ,संस्कार इत्यादी त्यात आहे. मुले व पालक यांच्यासाठी लिहिण्याचा माझ्या परीने प्रयत्न्न केला आहे.

जरा जास्तच कौतुक होत आहे असे वाटते त्याग काय फक्त गृहिणी करते का? घर हे नवरा आणी बायको दोघांचे असते आजच्या जमान्यात नवरे बायकांना बर्यापैकी मदत करताना दिसतात उलट आज जर नवरा एकटा नोकरी करत असेल तर ती नोकरी टिकवण्यासाठी सकाळी आठ ते रात्रि आठ काम करताना दिसतात आणी त्यांच्या बायका बरीच सुख साधने असल्याने आयुष्य मजेत काढताना दिसतात. काय पुरुषांना नोकरी करताना आपला मानसन्मान खुंटीला टांगावा लागत नाही? कि काम करताना जीव मेटाकुटीला येत नाही. असे शंभर टक्के नोकरी करणाऱ्या माणसाला(आणी स्त्रीला सुद्धा) वाटत नाही का झक मारली ती नोकरी? सोडून द्यावी. आपली अर्थव्यवस्था खाली गेल्यापासून कित्येक घरात नवर्यांची जायची वेळ नक्की आहे पण यायची वेळ कितीही उशिराची आहे. पण त्यांना त्यातून पर्याय नाही. माझी स्वतःची आई माझ्या दहावी पर्यंत घरी होती त्या काळात तिने आपले शिक्षण पूर्ण केले नंतर तिने नोकरी केली आणी मुख्याध्यापिका म्हणून शेवटी निवृत्त झाली. तिने कधीही असे म्हटले नाही कि माझे आयुष्य कष्टात गेले. उलट ती हेच सांगत आली मुले सांभाळून आपले करियर जरूर करा. स्वतःच्या मुलांसाठी आणी काम करण्यात कोणतेही कष्ट होत नाहीत. तिच्या सुदैवाने सासुरवास कधीच झाला नाही कि इतर "खस्ता" खाऊन जीव मेटाकुटीला आला आहे. त्यमुळे तिने माझ्या बायकोला किंवा वहिनीला हाच सल्ला दिला कि उगाच गृहिणी चे उदात्तीकरण करू नका. माझ्या कित्येक मित्रांच्या बायका आरामात चार चार बायका लावून मजेत राहताना दिसत आहेत कारण नवरा मर मर करून भरपूर पैसा कमावत आहे. त्या जर आनंदात राहत असतील तर त्यात काही गैर नाही पण आमचे आयुष्य किती कष्टात जात आहे असा टाहो काहीजणी फोडताना दिसल्या कि मात्र राहवत नाही. वरील परिस्थिती हि कमी घरात असेल पण नगण्य मात्र नक्कीच नाही.

त्या जर आनंदात राहत असतील तर त्यात काही गैर नाही पण आमचे आयुष्य किती कष्टात जात आहे असा टाहो काहीजणी फोडताना दिसल्या कि मात्र राहवत नाही.
वरील परिस्थिती हि कमी घरात असेल पण नगण्य मात्र नक्कीच नाही.
मार्मिक अन नेमके!!!!

पती म्हणजे केवळ स्पॉन्सरर असा भाव लेखात आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. दोघं मिळून कार्यविभागणी करून घर चालवतात.
कामात असे ना ती? अगदी चोवीस तास! हो नशीब तिचे की तिच्यासाठी, तिच्या विश्रांतीसाठी नियतीने केलेली सोय म्हणू या हवे तर, की रात्र होते.
ही हाईट आहे. बहुतेक घरात हल्ली पुरूषाला रात्र आणि दिवस सारखाच अशी परिस्थिती आहे! जोशीबाईंनी १८५७ ची स्टोरी लिहीलीये.

ही हाईट आहे. बहुतेक घरात हल्ली पुरूषाला रात्र आणि दिवस सारखाच अशी परिस्थिती आहे!
बहुतेक घरातिल पुरूष घड्याळ अस्तित्वात नाहि वगैरे वगैरे भ्रम पोसत नसतात हे आवर्जुन लक्षात घ्यावे. ह नम्र विनंती.

अगदी हेच लिहायला आले होते. गृहिणी असणे यात कमीपणा वाटण्यासारखे काही नाही तसेच फार अभिमान वाटण्यासारखे पण काही नाही. पूर्वी पासून आपल्याला सवयच लागली आहे, गृहिणी, आई यांना महान ठरवायचे, उदात्तीकरण करायचे आणि बाबा , नवरा यांना अनुल्लेखाने मारायचे प्रत्येक जण आपापल्या परीने कष्ट, त्याग करत च असतो. कुणाचा Glorify होतो, तर कुणाचा unnoticed जातो.

पूर्वी पासून आपल्याला सवयच लागली आहे, गृहिणी, आई यांना महान ठरवायचे, उदात्तीकरण करायचे आणि बाबा , नवरा यांना अनुल्लेखाने मारायचे
नै, नै. यात खरी गोची अशी आहे की. चूल-मूल सांभाळणं, नवर्‍याची सेवा करणं, सणवार सांभाळणं, नवर्‍यासाठी-भावासाठी उपास-तपास करणं, एकनिष्ठ रहाणं, नवर्‍यानं बाहेर शेण खाल्लं तर त्याला मोठ्या मनानं माफ करणं अश्या करवून घेण्यासाठी हे सगळं आहे हो.

एक शंका...'गृहिणी' नावाची संस्था/संस्कृती आजही टिकून आहे ?

किती खर लिहील आहे. बघ ना काल ना माझ्या यजमानांनी डिश वॉशरच नाही भरला. किती हाल होताहेत माझे..आता मी मिपावर टीपी कशी करणार? आता जाव लागत त्याला नोकरीला...करावे लागतात प्रोजेक्ट पुर्ण...पाळाव्या लागतात डेड लाईन्स..पण म्हनुन काय डीश वॉशर लावायचा नाही? त्याला मुल कधी हातात घेउन बसायला वेळ नाही मिळत, नुसत फोनवर आसुसुन ऐकत रहायचा आज काय केल ते...रोज रात्री जेवणाला वेळेवर पोहोचेलच ही खत्री नसायची...सण वार ...सगळे देवासमोर हात जोडले की होतात त्याचे...एव्हढ्या कष्टाने घेतलेले घर..आठव्ड्याचे पाच दिवस फक्त पाठ टेकायला..अन शनिवार रवीवार बायकोच्या बरोअबरीने स्वच्छ करायलाच घेतलय त्याने. किती किती सांगायच तरी.