पण या सगळ्याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे? १९८३ सालात नर्मदा परिक्रमा करणार्या रघुनाथ रामचंद्र गुण्ये यांनी "नर्मदे हर" मध्ये हेच लिहिलं आहे.
विस्थापितांच्या प्रश्नाबद्दल "एक मोठे शून्य नजरेसमोर उभे आहे." असं ते लिहितात. या योजनांचा लाभ काही लोकांना होईल पण जास्त लोकांना तोटाच आहे. चालताना अनेक लोक धरणाची चौकशी करायचे आणि "नर्मदामैय्या प्रचंड पहाड फोडून येते, ती ही धरणे टिकू देणार नाही" असा विश्वास व्यक्त करायचे! ती सगळी मंडळी आज कुठे आहेत मय्याच जाणे!
या धरणांमुळे परिक्रमेचा मार्ग बदलला आहे, त्याचबरोबर या साध्यासुध्या लोकांच्या श्रद्धेलाही धक्का लागला असेलच. अनेक गावं, पेशवा सरकार राऊंची समाधी, जंगलं सारंकाही एक दिवस नर्मदार्पण होणार आहे,
३० वर्षे झाली. आंदोलन सुरू आहे आणि सरकारचा मुर्दाडपणाही तोच. केंद्र आणि राज्यात अनेक पक्षांची अनेक सरकारे येऊन गेली. नर्मदा आंदोलन आहे तिथेच. विस्थापितांची एक नवी पिढी तरूण झाली. पण काहीच बदल नाही! पर्यावरणाची तर अपरिमित हानी होत आहे. :( वा रे न्याय!
स्नेहल प्रकाशनचं आहे. मी मॆजेस्टिकच्या प्रदर्शनात घेतलं होतं. पुस्तकाबद्दल जास्त http://www.misalpav.com/node/21054 इथे. अर्थात गुण्ये यांचा भर परिक्रमेवरच आहे. मात्र वाटेत जे दिसलं त्याबद्दल, विस्थापितांबद्दल त्यांनी थोडंफार लिहिलं आहे.
हे सर्व केवळ निषेधार्य आणि हृदयद्रावक आहे. आणि सरकारी अनावस्थेचे हे एकमेव उदाहरण आहे असेही नाही.
पण हे असं वाचलं, बघितलं की नेहमी एकच प्रश्न मला पडतो ...
सरकार पुन्हापुन्हा अशा जनहितविरोधी योजना का बनवतं, नीट नियोजन का केलं जात नाही हे काही केल्या कळत नाही. १९०१ चा Irrigation Commission Report या भागात जमिनीवरून सिंचन (surface irrigation) करू नये असं सांगतो तरी हे कालवे का खोदले जात आहेत?“आमचं पुनर्वसन झाल्याचं सांगताना सरकार निव्वळ खोटं बोलत नाही तर आम्हाला कस्पटासमान लेखते” ही खंत एकाने व्यक्त केली.“जमिनीच्या बदल्यात पैसे घ्या आणि आपलं काय ते बघा” अशी मध्य प्रदेश सरकारची भूमिका होती
असं आपण नेहमी म्हणतो. पण सरकार म्हणजे नक्की काय? आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधिंतूनच ते बनते. मग आता तुमच्या लेखनात ते प्रतिनिधी कुठेच दिसले नाहीत. किंवा हे होऊ नये म्हणून त्यांनी काही केले आहे अथवा आताही ते काही करत आहेत असे लेखात तरी दिसले नाही.
मग आता आंदोलन करणार्या इतक्या मोठ्या संख्येच्या मतदारांनी निवडणूकीच्या वेळेस कोणाला आणि का निवडून दिले?
महत्वाचा मुद्दा म्हणजे (जगभरच्या) राजकारणी लोकांना केवळ मतांची भाषा समजते... सारासारबुद्धीची अथवा तर्काची नाही.
लोकांचे प्रश्न लोकशाहीच्या सर्वात समर्थ हत्याराने, मतदानाने, का सुटत नाहित? कारण निवडुन येणं हे स्कील आहे, ते लोकप्रतिनिधीत्व नाहि. जसं उत्तम मार्कांनी वा अगदी काठावर पास होणारा परिक्षार्थी ज्ञानाच्या बाबतीत सुमारच असतो तसच निवडुन येणारा विधायक लोकप्रतिनिधीत्वाच्या बाबतीत यथातथाच असु शकतो.
कारण निवडुन येणं हे स्कील आहे, ते लोकप्रतिनिधीत्व नाहि.
तुमच्या उत्तरातच तुम्ही मी सांगितलेले भारतीय लोकशाहीचे सद्याचे अपयश आणि त्यात कोणाचा दोष आहे ते वेगळ्या तर्हेने सांगितले आहे ! धन्यवाद !
१. माझा मूळ प्रश्न "आता लढा देणार्या मतदारांनी कोणाला आणि का निवडून आणले?" हा होता.
जर मतदार "चलाखी" करून त्यांना उल्लू बनविणारा नेता पसंत करत असतील, त्यांचे प्रतिनिधीत्व करणारा नाही… तर मग खरी समस्या मतदारांच्या विचारसरणीतच नाही काय?
एकदा मत दिले की (किंवा मत दिले नाही तरीपण) निवडून आलेला "चलाख" माणूस आपोआप जादू होऊन त्याची चलाखी वापरून स्वत:चाच फायदा करून न घेता जनतेचा फायदा करणारा संत बनेल अशी अपेक्षा करणे याला काय म्हणायचे ते सांगायलाच हवे का? प्रसंगी अगदी निवडून आल्यावरही एखाद्या बाबतीत आपले मत लोकप्रतिनिधीकडे नोंदवायचाही हक्क लोकशाहीत मतदाराला असतो (उदाहरणाखातर... प्रे ओबामांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या मतदारांच्या फोन आणि ईमेलच्या दबावाचे कारण उघडपणे मान्य करून "बुडणार्या वित्तसंस्थांना अब्जावधी डॉलर्सची मदत करण्याच्या विधेयकाच्या" विरुद्ध मतदान केले होते. हे केवळ एक जगजाहीर झालेले उदाहरणआहे आणि ही गोष्ट लोकशाहीत अपवादात्मक मानली जात नाही.)
आपल्या मतदारसंघात विकासाची कामे मंजूर करवून घेऊन ती योग्यपणे होण्यासाठी निगराणी राखणे यासाठी लोकप्रतिनिधिंना निवडून द्यायचे असते. आणि तसे होत नसेल तर आपण निवडून दिलेल्या "लोकप्रतिनिधी (हा शब्द फार महत्वाचा, पण सद्या या लोकांना फारतर नेता म्हणता येईल, लोकप्रतिनिधी नाही)" ला जाब विचारायचा आपल्याला हक्क आहे हे जनतेला जेव्हा माहित असते आणि तो हक्क बजावला जातो तेव्हा खरी लोकशाही येते.
२. शिवाय नंतर मोर्चा घेऊन जाणार चाकरमान्या अधिकारांच्याकडे, ज्यांची सुत्रे (आणि बढतीही) नेत्यांच्या हातात असतात. अधिकार्यांकडून फक्त आश्वासनापेक्षा जास्त काही हाती लागणार नाही, कारण लोकशाहीत मुख्य/मोठे निर्णय घेणे अथवा ते स्थगित करणे हे काम लोकप्रतिनिधी करतात आणि अधिकारी त्या आदेशाची अंमलबजावणी करतात.
हाच मोर्चा नेत्याच्या घरावर नेऊन जेव्हा मतदार नेत्याला जाब विचारायला शिकतील तेव्हाच विकासाची कामे होतील. कारण तेव्हाच योग्य निर्णय घेऊन आणि त्यांची योग्य अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्याला मते मिळणार नाहीत अशी नेत्यांची खात्री होईल.
३. भारतातही सर्वच पक्ष उघडपणे मान्य करतात की "निवडून येण्याची क्षमता" हीच मुख्य पात्रता निवडणूकीचे उमेदवार निवडताना वापरली जाते. (हे पक्षाच्या दृष्टीने योग्यच आहे कारण निवडून न येणारे उमेदवार सत्ता हस्तगत करायला कुचकामाचे आहेत, आणि सत्ता नाही तर पक्षाच्या देश/राज्य/शहर यांचे भले करण्याच्या गोष्टी केवळ फुकाचे मनोरथच राहतील.) त्याबरोबरच जनतेने जर हे दाखवून दिले की आमचे मत योग्य कामे करणार्या उमेदवारालाच मिळेल तर पक्षानाही त्याच उमेदवारांना तिकिटे द्यावी लागतील. अर्थात हे सगळे एका निवडणूकीत होणार नाही... ही एक प्रक्रिया आहे आणि लोकमताचा कल कुठे आहे हे कळले की पक्षमत आणि नेत्यांची वागणुकही बदलू शकेल.... आजच्या भक्कम लोकाभिमुख लोकशाह्या काही एका निवडणूकीने तयार झाल्या नाहीत... पण म्हणतात ना की १००० किलोमीटचा प्रवास पहिले पाऊल टाकल्याशिवाय सुरू होत नाही... लोकशाहीचा प्रवास नागरिकाच्या पहिल्या पावलाने सुरू होतो आणि त्याची दिशा त्याच्याच पावलाच्या दिशेने ठरते!
आपण लिहिलेल्या समस्येबद्दल आणि आपल्या प्रयत्नांबद्दल अत्यंत आपुलकी आणि आदर आहे याबाबत शंका नसावी. किंबहुना या सर्व प्रकाराबद्दल खूप खंत वाटते.
मात्र एक वचन मी नेहमी ध्यानात ठेवतो ते असे: "प्रयत्न नक्कीच महत्वाचे... परंतू प्रयत्न कोणत्या दिशेने केले यावरच फळ मिळणार की नाही हे ठरते." (Effort is important... but, where to put the effort is the key to success."
आपल्या कार्यामध्ये यश यावे म्हणून अनेक शुभेच्छा !
एका मुद्यावर स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे लक्षात आले आहे.
आपल्या प्रयत्नांबद्दल अत्यंत आपुलकी आणि आदर आहे याबाबत शंका नसावी.
दुर्दैवाने मी(ही) या कामात प्रत्यक्ष सहभागी नाही; दुरूनच पहात आणि ऐकत होते अद्याप. (त्याच भागातल्या दुस-या कामांत प्रत्यक्ष सहभागी होते इतकंच!) यावेळी माहिती घ्यायला गेले होते - जी माहिती मिळाली ती आणि एकंदर तो अनुभव इथल्या वाचकांशी शेअर करते आहे. त्याच हेतूने हा लेख 'आंदोलन' मासिकात प्रकाशित झाला आहे.
त्यामुळे तिथल्या समाजाच्या राजकीय (आणि इतरही) निर्णयप्रक्रियेविषयी मी सध्या मत व्यक्त करु शकत नाही कारण ते जाणण्याची प्रक्रिया माझ्यासाठी आत्ताआत्ताच सुरु झाली आहे. पण तुम्ही मांडलेल्या विषयावर इतर अनुभवांच्या आधारे बरंच काही म्हणता येईल मला - पण ते इथं तितकंस संदर्भाला धरुन असणार नाही म्हणून नंतर कधीतरी लिहिण्याचा उल्लेख केला आहे आधीच्या प्रतिसादात.
माझा गैरसमज नाही. आपलाही नसावा म्हणून हे स्पष्टीकरण .
"समग्र माते नर्मदे" या नावाचे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोलकर यांनी लिहिलेले एक पुस्तक पूर्वी वाचनात आले होते.
नर्मदा प्रकल्प हवा कि नको ,त्याचे लाभार्थी आणि विस्थापित, आंदोलक, सरकारी अधिकारी. अशा सर्वांची भेट घेऊन त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. आंदोलकांच्या नेते मंडळीनी त्यांना सहकार्य केले नाही असे त्यांनी पुस्तकात नमूद केल्याचे आठवते. जिज्ञासूनी पुस्तक अवश्य वाचावे.
खूप वर्षां पूर्वी हे पुस्तक वाचले होते. आता नव्याने वाचल्यास अनेक नवे मुद्दे कळतील - म्हणजे जुन्याच गोष्टींचा नवा अर्थ लागेल. या पुस्तकाची आठवण करुन दिल्याबद्दल आभार.
प्रतिक्रिया
आई गं! कठीण आहे अतिवास.
खरच कठीण
गर्व से कहो...
भयानक!
हे पुस्तक सध्या बाजारात मिळते
पुस्तक उपलब्ध आहे
वाचतेय..
सुन्न करणारे वास्तव.
हे सर्व केवळ निषेधार्य आणि
सरकार पुन्हापुन्हा अशा जनहितविरोधी योजना का बनवतं, नीट नियोजन का केलं जात नाही हे काही केल्या कळत नाही. १९०१ चा Irrigation Commission Report या भागात जमिनीवरून सिंचन (surface irrigation) करू नये असं सांगतो तरी हे कालवे का खोदले जात आहेत?“आमचं पुनर्वसन झाल्याचं सांगताना सरकार निव्वळ खोटं बोलत नाही तर आम्हाला कस्पटासमान लेखते” ही खंत एकाने व्यक्त केली.“जमिनीच्या बदल्यात पैसे घ्या आणि आपलं काय ते बघा” अशी मध्य प्रदेश सरकारची भूमिका होतीअसं आपण नेहमी म्हणतो. पण सरकार म्हणजे नक्की काय? आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधिंतूनच ते बनते. मग आता तुमच्या लेखनात ते प्रतिनिधी कुठेच दिसले नाहीत. किंवा हे होऊ नये म्हणून त्यांनी काही केले आहे अथवा आताही ते काही करत आहेत असे लेखात तरी दिसले नाही. मग आता आंदोलन करणार्या इतक्या मोठ्या संख्येच्या मतदारांनी निवडणूकीच्या वेळेस कोणाला आणि का निवडून दिले? महत्वाचा मुद्दा म्हणजे (जगभरच्या) राजकारणी लोकांना केवळ मतांची भाषा समजते... सारासारबुद्धीची अथवा तर्काची नाही.मला वाटतं...
कारण निवडुन येणं हे स्कील आहे
कारण निवडुन येणं हे स्कील आहे, ते लोकप्रतिनिधीत्व नाहि.तुमच्या उत्तरातच तुम्ही मी सांगितलेले भारतीय लोकशाहीचे सद्याचे अपयश आणि त्यात कोणाचा दोष आहे ते वेगळ्या तर्हेने सांगितले आहे ! धन्यवाद ! १. माझा मूळ प्रश्न "आता लढा देणार्या मतदारांनी कोणाला आणि का निवडून आणले?" हा होता. जर मतदार "चलाखी" करून त्यांना उल्लू बनविणारा नेता पसंत करत असतील, त्यांचे प्रतिनिधीत्व करणारा नाही… तर मग खरी समस्या मतदारांच्या विचारसरणीतच नाही काय? एकदा मत दिले की (किंवा मत दिले नाही तरीपण) निवडून आलेला "चलाख" माणूस आपोआप जादू होऊन त्याची चलाखी वापरून स्वत:चाच फायदा करून न घेता जनतेचा फायदा करणारा संत बनेल अशी अपेक्षा करणे याला काय म्हणायचे ते सांगायलाच हवे का? प्रसंगी अगदी निवडून आल्यावरही एखाद्या बाबतीत आपले मत लोकप्रतिनिधीकडे नोंदवायचाही हक्क लोकशाहीत मतदाराला असतो (उदाहरणाखातर... प्रे ओबामांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या मतदारांच्या फोन आणि ईमेलच्या दबावाचे कारण उघडपणे मान्य करून "बुडणार्या वित्तसंस्थांना अब्जावधी डॉलर्सची मदत करण्याच्या विधेयकाच्या" विरुद्ध मतदान केले होते. हे केवळ एक जगजाहीर झालेले उदाहरणआहे आणि ही गोष्ट लोकशाहीत अपवादात्मक मानली जात नाही.) आपल्या मतदारसंघात विकासाची कामे मंजूर करवून घेऊन ती योग्यपणे होण्यासाठी निगराणी राखणे यासाठी लोकप्रतिनिधिंना निवडून द्यायचे असते. आणि तसे होत नसेल तर आपण निवडून दिलेल्या "लोकप्रतिनिधी (हा शब्द फार महत्वाचा, पण सद्या या लोकांना फारतर नेता म्हणता येईल, लोकप्रतिनिधी नाही)" ला जाब विचारायचा आपल्याला हक्क आहे हे जनतेला जेव्हा माहित असते आणि तो हक्क बजावला जातो तेव्हा खरी लोकशाही येते. २. शिवाय नंतर मोर्चा घेऊन जाणार चाकरमान्या अधिकारांच्याकडे, ज्यांची सुत्रे (आणि बढतीही) नेत्यांच्या हातात असतात. अधिकार्यांकडून फक्त आश्वासनापेक्षा जास्त काही हाती लागणार नाही, कारण लोकशाहीत मुख्य/मोठे निर्णय घेणे अथवा ते स्थगित करणे हे काम लोकप्रतिनिधी करतात आणि अधिकारी त्या आदेशाची अंमलबजावणी करतात. हाच मोर्चा नेत्याच्या घरावर नेऊन जेव्हा मतदार नेत्याला जाब विचारायला शिकतील तेव्हाच विकासाची कामे होतील. कारण तेव्हाच योग्य निर्णय घेऊन आणि त्यांची योग्य अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्याला मते मिळणार नाहीत अशी नेत्यांची खात्री होईल. ३. भारतातही सर्वच पक्ष उघडपणे मान्य करतात की "निवडून येण्याची क्षमता" हीच मुख्य पात्रता निवडणूकीचे उमेदवार निवडताना वापरली जाते. (हे पक्षाच्या दृष्टीने योग्यच आहे कारण निवडून न येणारे उमेदवार सत्ता हस्तगत करायला कुचकामाचे आहेत, आणि सत्ता नाही तर पक्षाच्या देश/राज्य/शहर यांचे भले करण्याच्या गोष्टी केवळ फुकाचे मनोरथच राहतील.) त्याबरोबरच जनतेने जर हे दाखवून दिले की आमचे मत योग्य कामे करणार्या उमेदवारालाच मिळेल तर पक्षानाही त्याच उमेदवारांना तिकिटे द्यावी लागतील. अर्थात हे सगळे एका निवडणूकीत होणार नाही... ही एक प्रक्रिया आहे आणि लोकमताचा कल कुठे आहे हे कळले की पक्षमत आणि नेत्यांची वागणुकही बदलू शकेल.... आजच्या भक्कम लोकाभिमुख लोकशाह्या काही एका निवडणूकीने तयार झाल्या नाहीत... पण म्हणतात ना की १००० किलोमीटचा प्रवास पहिले पाऊल टाकल्याशिवाय सुरू होत नाही... लोकशाहीचा प्रवास नागरिकाच्या पहिल्या पावलाने सुरू होतो आणि त्याची दिशा त्याच्याच पावलाच्या दिशेने ठरते!अतिशय महत्त्वाचा,
आपण लिहिलेल्या समस्येबद्दल
स्पष्टीकरण
आपल्या प्रयत्नांबद्दल अत्यंत आपुलकी आणि आदर आहे याबाबत शंका नसावी.दुर्दैवाने मी(ही) या कामात प्रत्यक्ष सहभागी नाही; दुरूनच पहात आणि ऐकत होते अद्याप. (त्याच भागातल्या दुस-या कामांत प्रत्यक्ष सहभागी होते इतकंच!) यावेळी माहिती घ्यायला गेले होते - जी माहिती मिळाली ती आणि एकंदर तो अनुभव इथल्या वाचकांशी शेअर करते आहे. त्याच हेतूने हा लेख 'आंदोलन' मासिकात प्रकाशित झाला आहे. त्यामुळे तिथल्या समाजाच्या राजकीय (आणि इतरही) निर्णयप्रक्रियेविषयी मी सध्या मत व्यक्त करु शकत नाही कारण ते जाणण्याची प्रक्रिया माझ्यासाठी आत्ताआत्ताच सुरु झाली आहे. पण तुम्ही मांडलेल्या विषयावर इतर अनुभवांच्या आधारे बरंच काही म्हणता येईल मला - पण ते इथं तितकंस संदर्भाला धरुन असणार नाही म्हणून नंतर कधीतरी लिहिण्याचा उल्लेख केला आहे आधीच्या प्रतिसादात. माझा गैरसमज नाही. आपलाही नसावा म्हणून हे स्पष्टीकरण .हल्ली टीव्हीवर 'भूमी अधिग्रहण
सरकार'नी आपल्याच जनतेवर
बहुधा आणखी काही वर्षांनी आपण
नर्मदा खो-यातून
आभार