Welcome to misalpav.com
लेखक: जॅक डनियल्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तुमच्या फण्याची आपलं पायाची प्रिंटौट काढून पाठवा राजे. दररोज पूजा केली तर तुमच्या शतांशाने का होईना डेरिंग येईल. काय ते अनुभव अन काय ती शैली!!! आपण तर बॉ फ्यान झालो तुमचे-अगदी ५ वर फिरणारे चार पात्यांचे. निव्वळ थोर _/\_

प्रत्येक भागात नवीन नवीन अनुभव वाचायला मिळतायत.. सर्पमित्र व्हायची इच्छा होतेय वाचून.. आत्तापर्यंत साप म्हटलं की मारायचा असेच प्रसंग बघितलेत त्याचं दु:खही होतय..

सर्पमित्र नाही झाले तरी चालेल, पण साप पहिला की त्यांना कॉल देत जा, म्हणजे तेवढेच साप वाचतील. जिवावरचा खेळ असल्यामुळे दुरूनच साप बघितलेलेच बरे.

लवकरच पुण्याला येणार आहेच . बाकी काही होवो ना होवो . तुमचा शिष्य जरूर होणार राव . लोक सापाला मारतात तेव्हा खूप वाईट वाटतं . कित्येकदा त्या बिचाऱ्या जीवाला वाचवायला जाऊन शिव्या खाल्ल्यात . जबरा अनुभव __/\__

अत्यंत माहितीपूर्ण आणि अत्यंत रोचक लेखमालिका. सर्व भागांवर प्रतिसाद दिले नसले तरी उत्सुकतेने वाचते आहे.

अत्यंत माहितीपूर्ण आणि अत्यंत रोचक लेखमालिका. सर्व भागांवर प्रतिसाद दिले नसले तरी उत्सुकतेने वाचते आहे.
अगदी असेच म्हणतो. कामाच्या रगाड्यात कधी कधी एखादा भाग वाचायचा राहुन जातो, तर कधी कधी प्रतिसाद द्यायचा. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा राहिलेले भाग आवर्जून वाचुन काढतो.

बहुधा मिपा-वरील सर्वाधिक लक्ष्य-वेधक लेख-मालिका , अगदी जीव मुठीत घेऊन प्रत्येक भाग वाचतोय , स्वता:च्या दिवाण-खाण्यात बसून फक्त डिस्कवरी चॅनेल बघून पर्यावरण प्रेमी म्हणून घेण्यापेक्षा हे जे काही वाचतोय ते भन्नाट , जबरदस्त अनुभव आणि लिहिण्याची भन्नाट शैली एकाच वेळी हे अशक्य आहे , जॅक भौ तुम्हाला साक्षात दन्डवत ____/|\_____

चांगल्या घरच्या बाळा, नेहेमीप्रमाणेच सिद्धहस्त लेखन! {पुण्यातल्या भाई परिवाराच्या घरी तू साप धरायला गेला होतास तो अनुभव लिहिशील असं वाटलं होतं...}

धन्यवाद् ! नाही, जरी ९००० मैलावर असलो तरी थोडा सुरक्षेचा विचार करतो मी. त्यामुळे तो अनुभव आपल्या जेडी च्या बैठकीतच बारा.:)

खूप सूंदर, साहसी आणि वाचनीय लेखमाला. चांगली माहिती मिळते आहे. तुमच्या सर्पमैत्रीचे आणि धाडसाचे खूप कौतूक वाटते. >>तश्याच जिन्याखाली मी तोंडात टोर्च आणि हातात स्टिक घेऊन घेऊन मी सरपटलो. (रांगायला पण जागा नव्हती.)>> http://www.amazon.com/Energizer-Indstrial-Headlamp-Batteries-Included/dp/B00352O79U अशा प्रकारचा एखादा लाइट भारतात मिळतो का ते पहा किंवा मागवून घेता येतो का. याचा साप पकडताना अंधारात उपयोग होईल असं वाटतं.

धन्यवाद् ! आत्ता मी भारतात नाही, २००६ च्या शेवटी मला तसा लाईट ड्यूटी फ्री मध्ये मिळाला होता. नंतर मी काही कॉल ला तो वापरला पण. त्याच्या तकलादू पणामुळे मी टोर्च तोंडात घेऊन साप पकडणे योग्य मानायचो. १००० रु पुढचा लाईट घ्यायची,माझी परिस्थिती नव्हती.

>> "चांगल्या घरचा दिसतो, असले गारुडी धंदे कशाला करतो रे बाबा ?" अत्यंत वाचनीय लेखमाला आहे! ह्या सगळ्या अनुभवांचे / लेखांचे एक खूप चांगले पुस्तक छाप रे बाबा!

तुम्ही फार छान लिहित आहात. तुमचे अनुभव वाचून मला पण साप पकडणे शिकावेसे वाटत आहे. एखाद्या स्त्री ला हे शक्य आहे का?

हो, माझ्या खूप मैत्रिणी हे काम करतात. पण मी आधीच्या भागात लिहिल्या प्रमाणे पब्लिक मध्ये जाऊन साप पकडणे खूप जिकरीचे काम आहे, कारण सगळी कडे खूप लोकांना सांभाळावे लागते. म्हणून माझ्या ज्या मैत्रिणी हे काम करतात त्या जास्त करून कोणाला तरी बरोबर घेऊन जातात. तुम्हाला सापांवर संशोधन करायचे असेल, किंवा जंगलात त्यांना बघायचे असेल तर तुम्ही ते करू शकता.

अगदी जीवावर बेतले असते असे अनुभव, कुठेही 'मी पहा कसा तोप' हा अभीनिवेश न आणता, अत्यंत खुमासदार शैलीत लिहण्याची हातोटी जबरी आहे दोस्ता.. तुझ्या साहसाला आणि धैर्याला सलाम.. आणखी येऊ देत..:-)

मला तसंही सर्पसृष्टीबद्दल एक प्रकारची भिती वाटते. तुमचे हे असले जीवावर बेतणारे अनुभव वाचुन तर मी आणखी चार पाऊले लांब राहणार. मला आश्चर्य वाटतं कि खरेच असे लोक असतात कि जे सापाचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात?? ते ही कुठल्याच मोबदल्याची अपेक्षा नसताना किंवा स्वतःची काहि गरज नसताना?? आणि वर इतक्या सहजतेने आपले अनुभव शेअर करतात... आपल्या शौर्याची टिमकी न वाजवता... कमाल आहे राव.

खरे सांगायचे म्हणजे मला भीती कधी वाटली नाही, म्हणजे डोक्यात पहिल्या पासून साफ होते की, विषारी साप चावला तर ससून ला जायचे,आणि औषध घ्यायचे. म्हणून तो पकडताना मी जास्तीत जास्त काळजी घायचो. हे कसे काय जमले, याचे श्रेय मी पूर्ण पणे सर्पोद्यान ला देईन.(भाग २-३) सर्पोद्यान मधल्या अतिशय कुशल माणसांबरोबर काम काम केल्यामुळे आपसूकच शिकत गेलो. पण मी कधी कधी द्चकायचो, कारण कॉल ला साप पकडताना खूप माणसे आजूबाजूला असतात, प्रत्येक जागा नवीन असते , त्यामुळे जर अनपेक्षित जागेतून तो साप बाहेर आला तर थोडे दचकायला व्हायचे पण काही सेकंदातच परिस्थिती काबूत यायची. भाग पाच मध्ये लिहिले आहे की नाग हल्ला का करतो, "एखाद्याला कोपच्यात घेतल्या वर तो जसा आधी बॉडी फुगवत आये-माई काढतो तसा नाग फणा काढून फुत्कार टाकतो, त्यामधून त्याला फक्त समोरच्याला सांगायचे असते- "आपण लई डेंजर ए, पुढे आला तर बघ"...जर समोरच्याने वाट दिली तर तो लगेच कल्टी मारतो(दुनियादारी मधल्या साईनाथ सारखी ;)). शेवटचा पर्याय म्हणून चावतो, नागाला पण त्याच्या विषाची पूर्ण किंमत माहिती असते त्यामुळे जेंव्हा चावतो तेंव्हा तो मोजून-मापून चावतो.(दुसऱ्याचे डोके विनाकारण चावणाऱ्यानी हे लक्षात ठेवले पाहिजे !)."

हो,म्हणजे मैदानात समजा समोर साप आला, तर जास्त करून पळूनच जाईल. पण एखाद्या मोरीत असला तर त्याला बाहेर जायची वाट सापडे पर्यंत तो फिरत राहील. आणि कोणी समोर गेले तर फणा काढेल.

सादर प्रणाम हा भाग सगळ्यात थरारक होता. काहीवेळा जीवावर बेतू शकत होते. पण नशिबी नागांचे प्राण वाचवणे होते म्हणूनच अघटीत काही घडले नाही. हि लेखमाला मिपावर वाचलेल्या काही उत्कृष्ट लेखमालेपैकी एक आहे.