Welcome to misalpav.com
लेखक: विसोबा खेचर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

विशेषतः मिपा संस्थापक तात्या यांना तर स्पेशल... मला मिपाने फार भरभरून दिले आहे.ह्या सुखाची किंमत कशातही करता येणार नाही... मिपा आणि मिपाकर असेच एकमेकांवर प्रेम करत राहो हीच अपेक्षा आहे..

एक्झाटली, हेच म्हननार व्हतो... ह्या सुखाची किंमत कशातही करता येणार नाही अन् मिपासारखी दुसरी जिवाभावाची चावडी कुटंबी गावनार न्हाई... मुळात सुखाची व्याख्या नीट समजावून देणारी माणसे इथेच भेटली. कुणाकुणाचे नाव घ्यावे? आणि हि तर सुरवात आहे, असेच बहरत बहरत या रोपट्याचा वटवृक्ष होवो हिच मनापासून शुभेच्छा.

अभिनंदन !!! मिपाचे संस्थापक, चालक, संपादक, आणि सर्व मिपाकर मित्र मंडळींना अनेकानेक शुभेच्छा ! मिपा सापडले आणि मी मराठीत काहीबाही लिहू लागलो ! आता तर त्यात आणि इतरांशी जाल-चर्चा करण्यात पण मजा वाटायला लागली आहे. रोज एकदा तरी एखादा लेख वाचून अथवा त्यापेक्षा जास्त वेळेस खुसखुशीत प्रतिसाद वाचून खळखळून हसू येते आणि मन प्रसन्न होते. त्याबद्दल मिपाचे आभार !! मिपा असेच वर्षानुवर्षे वृद्धिंगत होवो आणि आपल्या सर्व मिपाकरांची मैत्री अशीच खेळिमेळीत वाढत राहो हीच मनोकामना आज व्यक्त कराविशी वाटते आहे.

मिपा व्यवस्थापन, आतापर्यंतच्या वाटचाली बद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा! गेल्या सांत वर्षात खूप काही दिलेत. येणारी पुढिल अनेक वर्षे भरभरून खूप काही मिळावे हीच अपेक्षा! मिपा परिवाराचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो.

मिपा रिटायर झाल्यावर कुठल्या तरी बुढ्ढा क्लब मधे जाण्यापेक्षा, रोज मिपा वर हजेरी लावल्याने माझे मन वृद्ध झाले नाही. ज्ञान, चेष्टा-मस्करी, तोंडाला पाणी सुटणार्‍या पाकक्रिया आणि सर्वात महत्त्वाच्या 'प्रतिक्रिया', ज्या कधी पोट धरधरुन हंसवतात तर कधी अंतर्मुखही करतात. मिपा हे एकच असे व्यसन आहे की जे, सुटू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करावेत.

सगळी टेक्निकल टीम विथ अखिल संपादक मंडळाला संकेतस्तळाच्या वर्धापनदिनी मन:पूर्वक शुभेच्छा. आणि सर्व लेखक, कवि आणि सदस्यांना लगे रहो!

तात्या आणि नीलकांत व इतर टेक टीमचे यानिमित्ताने आभार मानतो. मिपामुळे जी मजा येते त्याला तोड नाही. खर्‍या अर्थाने ग्लोबल नेटवर्क असलेले मिपा उत्तरोत्तर मोठे होवो आणि मायबोलीइतका पसारा वाढो अशी यानिमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो.

मिपाचे संस्थापक, संपादक, तांत्रिक टीम व सर्व मिपाकर मित्र मंडळींना वर्धापन दिनाच्या आणि गणेशोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा!!

अभिनंदन. पुढील वाटचाल निर्विघ्न आणि आनंददायी व्हावी यासाठी शुभेच्छा. संपादक मंडळ मिपा चालू राहावे म्हणून जी मेहनत घेते त्याबद्दल त्यांचेही यानिमित्ताने आभार.

मिपाच्या सातव्या वर्षात पदार्पनाबद्दल सर्वांना शुभकामना. तसेच मिपावर प्रेम करणार्‍या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार. - नीलकांत

मिपाला खुप खुप शुभेच्छा!!!! तात्यांचे मि.पा काढल्या बद्दल आणि नीलकांतचे मि.पा चालु ठेवल्याबद्दल आभार!! संपादकांचे लष्कराच्या भाकर्‍या बडवल्या सारखे स्वतःचा वेळ घालुन (आणि नस्ते शिव्याशाप खाऊन सुद्धा) इथे मॉनिटरगिरी केल्याबद्दल धन्यवाद!!!

समस्त मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या अनेकानेक शुभेच्छा.. तसेच तात्या, नीलकांत आणि मिपाचे सर्व संचालकमंडळ यांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा..! (अन आम्हीच आम्हाला शुभेच्छा द्यायच्या का?) आपला नम्र, (मिपा वापरकर्ता) पाभे.

मिपाला शुभेच्छा. अनेक जुने मित्र मिपावर येत नाहीत किंवा हाकलले गेले आहेत त्यांची राहून राहून फार आठवण येते. जसे टार्‍या, कोदा, परा, आंद्या, रंगा-रेवती, प्राजु, मितान, प्रसन्न केसकर, केसु, चित्तर, लांबड लावावी तितकी कमीच. तसेच मोडक, यकु अशा काही मित्रांची आठवण देखील अस्वस्थ करून जाते.

या मोजकाचा संकल्प करणारे तात्या; स्वयंपाकघर नेहमी तय्य्यार ठेवणारे निलकांत, टेक्ल्नीकल टीम; नैवेद्याचे पावित्र्य जपणारे संपादक मंडळ; आणि आपापल्या टाळ-मृदुंगासह आरतीला हजर असणारे सभासद, वाचक... सर्वांची जय हो :) गणपतीबाप्पा मोरया.

सर्वांना मि.पा. वर्धापनाच्या अनेकानेक शुभेच्छा! http://www.sherv.net/cm/emo/happy/thumbs-up.gif ================================= मि.पा.ही आमची लहानपणीची खेळण्याबागडण्याची क्रिकेट-गल्ली आहे! त्याही शिवाय मोठं होताना जे काही पचवलं..अंगी लागलं/लागलं नाही अश्या अनेक गोष्टींची उजळणी/नविन शिकवणी देणारी साळा पण आहे. :) ================================= समांतर-स्मायल्या आणी मी यांची अफ्फाट जोडी जमली,ती मि.पा.मुळेच... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif अब स्मायली हमारा श्वास है। http://www.sherv.net/cm/emoticons/yes/happy-yes-smiley-emoticon.gif और हम स्मायली के पास है॥ http://www.sherv.net/cm/emo/happy/too-happy-smiley-emoticon.gif

सर्वप्रथम मिपा ही अद्भुत वस्तु जन्मास घालणार्‍या तात्यांना अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा. व्यवस्थापन, संपादन करणार्‍या सर्वांना, आणि सर्व सल्लागार, लेखक, वाचक, प्रतिसादक मिपाकरांना शुभकामना. उत्तरोत्तर मिपा असेच समृद्ध होत जाओ, आणि अधून-मधून येणार्‍या इडापिडा टळोत.

*good* *THUMBS%%_%%UP* :GOOD: :good: *GOOD* *THUMBS UP* अभिनन्दन...!!!!.. अभिनन्दन...!!!!.... अभिनन्दन...!!!!......
.......समस्त मिपाकराना, मिपाच्या ७ व्या वर्धापन दिनाच्या हार्दीक शुभेच्छा....!!!!!!!!!
मिपा अशीच उत्तरोत्तर वाढो व लोकप्रिय होवो अशी कामना करतो. *pleasantry* *db* :db: विनोद१८

मिपा चे अभिनंदन ह्या निमित्ताने विनोद आठवला मिपा जेव्हा तांत्रिक कारणाने बंद होते तेव्हा चेपू वर मी मिसिंग मिसळपाव असे लिहिले होते. तेव्हा मला माझ्या पुणेकर मित्राने ये की पुण्यात तुला कडक मिसळ खायला घालतो असे सुनावले होते. मिसिंग मिसळपाव अशी लिहिण्याची वेळ परत न येवो हीच गणराया कडे प्रार्थना

मिपावर योगायोगानेच आलो. ( हिंदी चित्रपटात हिरो हिरॉईनचा योगायोगाने एकमेकांचा धक्का लागणे, पुस्तके खाली पडणे, किंवा सायकलींची टक्कर होणे या चालीवर ) . मग "तुझसे खूबसूरत कोई नही" या स्टाईल वर दुसर्‍या संस्थळांकडे तिरका कटाक्षही टाकला नाही. सुरवातीला काहीनी तरास दिला पण या पीच वरचा बॉन्स लगेच कळून आला. या फोरमच्या आयडीयेची कल्पना राबविणारे तात्या ( सचिन ) पुढे चालविणारे नीलकांत ( महेश कोठारे) व तांत्रिक मांत्रिक डोके चालविणारे प्रशांत ( अशोक सराफ) यांचा ऋणी आहे. गणपती बाप्पा मोरया ! मिपावर तुम्हीही एकदा या !

शून्य मनस्क शेजार्‍यांपेक्षा इथले चिमटे काढणारे अआ, वल्ली, स्नेहांकिता, मोदक, पकपकपक , धन्या, अभ्या, धमू , श्रीरंग जोशी यांचा स्नेह मोलाचा आहे. सोत्री, क्लिंटन, इस्पिक एक्क्का , चित्रगुप्त काका, विकास. श्री गुरूजी ,.बॅटमॅन यांचा पंखा आहे.

आम्ही तर ह्या मंडळी शिवाय इतरही अनेक मंडळींचे हावरे वाचक आहोत. त्यांत तुम्ही आणि पिडा काका पण आहातच..

संस्थापक आणि सदस्यांचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा, तसेच मिपाने दिलेल्या अमूल्य ठेव्यासाठी मनापासून आभार.

मिपा संस्थापक श्री तात्या अभ्यंकर, विद्यमान चालक-मालक श्री. नीलकांत, सर्व आजी-माजी-भावी संपादक-सल्लागार, तांत्रिक समिती, सदस्य आणि असंख्य वाचक यांना श्रीगणेशचतुर्थी आणि मिपाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद!