Welcome to misalpav.com
लेखक: arunjoshi123 | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ज्योतिजी, http://www.aisiakshare.com/node/2053 इथे याच नावाच्या धाग्यावर काही स्पष्टीकरणे आहेत. आपणास ती उपयुक्त वाटू शकतात.

काही पारंपारिक मूल्ये, असू शकते कि, त्या पुरोगत स्थितीशी अगोदरच एकदिक्त झालेली आहेत. >>>> सत्यवचन! शिवाय केवळ विज्ञानाला १००% मानून जो रसभंग होतो तो एक महान मेगाक्लायमॅक्स असतो.>>>> खरे आहे. अर्थात ही यादी आणि प्राधान्य अचूक देण्याची एक सामान्य माणूस म्हणून माझी पात्रता नाही हे वेगळे सांगायची गरज नसावी.>>> हे खरेही असेल कदाचित. मात्र ज्या कुणा पहिल्यास परिस्थितीचे तपशीलवार वर्णन प्रथम करता येते, तोच समस्येच्या समाधानाप्रत नेऊ शकेल, ह्यात मुळीच संशय नाही. त्यामुळे ह्या विचारमंथनाचे मी मनापासून स्वागत करतो.

नरेंद्रजी, त्या 'बेहद्द' शब्दाबद्दल धन्यवाद. आपले विचार इतरांना आवडावेत हा खूप आनंददायक प्रकार असतो.

या एका परिच्छेदाने बासुंदीत लिंबु पिळलं. पुरोगामीत्वाचं आरोहण, अवलंब हे व्यक्तीकेंद्रीत आहे. त्याला संस्थात्मक प्रारूप द्यायचा प्रयत्न झाला कि त्यातनं "पुरो" निघुन केवळ "गामित्व" शिल्लक उरतं. त्यापेक्षा आपल्या सुख-दु:खांना कारणीभूत व्यवहार जाणुन इतरांप्रती वागणं सजग करावं आणि सत्याची व्याप्ती नेहमी एका वर्तमान क्षणापुरती असते हे भान ठेवणं हेच काय ते पुरोगामित्वाचे व्यवच्छेदक लक्षण. अवांतरः तुमच्या भाषेला, वाक्य रचनेला, विषय मांडणीच्या स्टाईलला त्रिवार सलाम.

अर्धवटरावजी, जगातला कुठलाही माणूस तो प्रतिगामी आहे हे मान्य करणार नाही. आणि याचा फेस व्हॅल्यूवर अर्थ काढायचा झाला तर जग हे अतिशय पुरोगामी आहे असा निघेल. पण वास्तव असे नाही. समाजाला एका सद्स्थितीला पोहोचायला अजून प्रचंड वाव आहे. व्यक्तिगत पुरोगामीत्व बिनमहत्त्वाचे आहे. पुरोगामी बनलेला माणूस आजच्या घडीला स्वतःला समाजापासून फार वेगळा समजतो. समाज देखिल त्याला तितका नॉर्मल समजत नाही आणि आदरणीय वा अनुकरणीय मानत नाही. मानले तरी रडत रडत, नाक मुरडत मुरडत, घाबरत, अर्धवट मानतो. एक माणूस पुरोगामी बनल्याचे किती महत्त्व आहे? अमिताभ बच्चन नावाची, तो स्वतःच एक या अर्थाने, जाहिरात पाहून कितीतरी लोक कलाक्षेत्रात नशीब काढायला येतात. अमिताभने किती मोठा कळस गाठला आहे यापेक्षा मला या सर्व छोट्या मोठ्या लोकांच्या आयुष्यात काय झाले आहे ते महत्त्वाचे वाटते. तसेच पुरोगामीत्वाचे आहे. चार लोक काय करत आहेत यापेक्षा समाज काय करत आहे, कोठे जात आहे ते महत्त्वाचे. पुरोगामीत्वाचे एक तत्त्व, त्याचा एक नियम आणि तद्नुषंनाने येणारे वर्तन हे महाकठीण कर्म आहे. म्हणजे काय ते साधे उदाहरण देऊन सांगतो. संगीत ऐकावे का नाही? एका अर्थाने पाहिले तर संगीतात अनैसर्गिक आवाज असतात. मग आपल्याला संगीत आवडते यात परंपरांचा किती प्रभाव आहे? 'शांती समाधान सर्वां भूतां' असे आळवून आळवून वाद्ये बडवून न ऐकता सरळ 'सर्व प्राण्यांना शांती समाधान असावे' असे थंड गद्यात ऐकले तर काय वेगळा फरक पडावा? परिणाम तोच व्हायला हवा. पण असे होत नाही. संगीताने आपण भारावून जातो. का? संगीत उद्योगाने आपल्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन करोडो रुपये तर वसूलले नाहीत? मग संगीत त्यागावे का? मला थंड गद्याने तितकाच अभिनिवेष अभिप्रेत होत असेल तर मी तसे करून पुरोगामी का बनू नये? थोडक्यात काय एक विचारी माणूस म्हणून आपण मनुष्याचे संपूर्ण वर्तनच चिकित्सेच्या ऐरणीवर आणू शकतो. सोंड असलेल्या माणसाचा देव म्हणून मिपावर फोटो आहे, तेथे लेखन करून मी प्रतिगामीत्वास बढावा देत नाहीय काय असे प्रश्न उभे राहतात. जीवन जीवन न राहता फक्त चिंतन आणि तेही वैचारिक क्लेष इतकेच उरते. क्लिष्ट अशा तात्विक बाबींवर प्रत्येक माणसाचा विचार करायचा मूड नसतो. इच्छा नसते. वेळ नसतो. बुद्धिमत्ता नसते. ज्ञान नसते. त्यातून येणारे निष्कर्ष दरवेळी वेगळे निघू शकतात, निघतात. मग माणसाला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होतो. सर्वात वाइट म्हणजे तथाकथित पुरोगाम्यांत एकमत नसते. देव, धर्म पाळणारे पुरोगामी न पाळणारांना आपल्यापेक्षा जास्त पुरोगामी मानणार नाहीत, इ. सबब लेखात कोणी एक महाशय कसे पुरोगत व्हावेत याबद्दल मार्गदर्शन नाही. सगळाच समाज कसा विकसित व्हावा यावर जोर आहे. प्रत्येकाकडून फर्स्ट प्रिंसिपल्स वापरून पुरोगत बनण्याची अपेक्षा करणे म्हणजे प्रत्येकाला quantum physics शिकवणे आहे. याकरिता एक संस्था असावी किंवा असलेल्या संस्थांचे 'अधिकृत' जाळे असावे. या संस्थेने भयंकर डोकेफोड करून सामान्य माणसाच्या वागण्याची मार्गदर्शक तत्त्वे बनवावीत. अशी तत्वे म्हणजे कायदा नाही, निव्वळ रेफरन्स. ज्याला इच्छा आहे तो तत्त्वाच्या मागचा कार्यकारणभाव वाचू, पाहू, तपासू शकतो आणि पटले नाही तर आपल्या मताप्रमाणे वागू शकतो. आजच्या परिस्थितीत ज्ञानाच्या अनंत शाखा आहेत, अनंत माहिती आहे, अनंत विषय आहेत, अनेकांच्या अनेक विषयांवर अनेक भूमिका आहेत. हे सगळे लोक प्रामाणिकपणे पुरोगामी वागण्याची इच्छा असणार्‍या माणसाला भ्रमित करतात. अशा लोकांत राहिल्याने माणसाला नेहमी आपण भूतकाळात कसे प्रतिगामी होतो याचे शल्य राहते. असा संस्थागत संदर्भ असेल तर माणूस नेहमीच काळाबरोबर, समाजाबरोबर राहतो. अशी संस्था असू शकते का, कशी असावी, तिचे कामकाज कसे असावे आणि फिल्ड अ‍ॅक्टीव्हेटीज काय असाव्यात हा पूर्णत: वेगळा विषय आहे. सर्वानी मिळून बासुंदीचा आनंद कसा घ्यावा यासाठी कोणी वाढप्या प्रयत्न करत आहे, त्याचा तिच्यात लिंबू पिळण्याचा परिणाम झाला नाही पाहिजे.

>>जगातला कुठलाही माणूस तो प्रतिगामी आहे हे मान्य करणार नाही. आणि याचा फेस व्हॅल्यूवर अर्थ काढायचा झाला तर जग हे अतिशय पुरोगामी आहे असा निघेल. पण वास्तव असे नाही. समाजाला एका सद्स्थितीला पोहोचायला अजून प्रचंड वाव आहे -- व्यक्तीचं पुरोगामित्व नकारल्यास समाजाचं पुरोगामित्व लंगडं पडतं. समुद्र म्हणुन काहि अस्तित्वात नाहि. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे आपापल्या गुणधर्मासहीत प्रकटीकरण म्हणजे समुद्र. >>व्यक्तिगत पुरोगामीत्व बिनमहत्त्वाचे आहे. पुरोगामी बनलेला माणूस आजच्या घडीला स्वतःला समाजापासून फार वेगळा समजतो. समाज देखिल त्याला तितका नॉर्मल समजत नाही आणि आदरणीय वा अनुकरणीय मानत नाही. मानले तरी रडत रडत, नाक मुरडत मुरडत, घाबरत, अर्धवट मानतो. -- पुरोगामित्वाला हे काहि नवीन नाहि. पुरोगामी व्यक्तीचं वेगळेपण असणारच. अन्यथा पुरोगामित्वाची गरजच काय ? >>एक माणूस पुरोगामी बनल्याचे किती महत्त्व आहे? अमिताभ बच्चन नावाची, तो स्वतःच एक या अर्थाने, जाहिरात पाहून कितीतरी लोक कलाक्षेत्रात नशीब काढायला येतात. अमिताभने किती मोठा कळस गाठला आहे यापेक्षा मला या सर्व छोट्या मोठ्या लोकांच्या आयुष्यात काय झाले आहे ते महत्त्वाचे वाटते. तसेच पुरोगामीत्वाचे आहे. चार लोक काय करत आहेत यापेक्षा समाज काय करत आहे, कोठे जात आहे ते महत्त्वाचे. -- व्यक्तीबदल दृष्टीआड करुन समाज बदलाचे स्वप्न कसं बघता येईल? तसंही समाज आपली स्थितीप्रियता सोडु शकत नाहि. आणि एकुण समाज एकसाथ पुरोगामि होऊ शकत नाहि. >>पुरोगामीत्वाचे एक तत्त्व, त्याचा एक नियम आणि तद्नुषंनाने येणारे वर्तन हे महाकठीण कर्म आहे. -- पुरोगामित्व एक वृत्ती आहे हे आधि उमगायला हवं. नियम, वर्तन वगैरे आपोआप येतात. >>म्हणजे काय ते साधे उदाहरण देऊन सांगतो. संगीत ऐकावे का नाही? एका अर्थाने पाहिले तर संगीतात अनैसर्गिक आवाज असतात. -- चूक. संगीत म्हणजे एका विषिष्ट लयीला मनाने दिलेला प्रतिसाद. त्याय अनैसर्गीक काहिच नाहि. >>मग आपल्याला संगीत आवडते यात परंपरांचा किती प्रभाव आहे? -- शुण्य प्रभाव. >> 'शांती समाधान सर्वां भूतां' असे आळवून आळवून वाद्ये बडवून न ऐकता सरळ 'सर्व प्राण्यांना शांती समाधान असावे' असे थंड गद्यात ऐकले तर काय वेगळा फरक पडावा? परिणाम तोच व्हायला हवा. पण असे होत नाही. -- काव्य आणि संगीत हे भिन्न विषय आहेत. त्यांची रंजकतेची तुलना करणे मुळातच चुक आहे. >>संगीताने आपण भारावून जातो. का? संगीत उद्योगाने आपल्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन करोडो रुपये तर वसूलले नाहीत? -- अंधश्रद्धेचा आणि संगीताचा संबंध कळला नाहि. आणि एकदा समाज म्हणुन मान्यता मिळवली तर व्यापाराला देखील मान्यता मिळते. तिथे बाजार आलाच. >> मग संगीत त्यागावे का? मला थंड गद्याने तितकाच अभिनिवेष अभिप्रेत होत असेल तर मी तसे करून पुरोगामी का बनू नये? -- तितकाच अभिनिवेष प्राप्त होत असेल तर ते गद्य आणि काव्य एकाच क्वालिटीचे आहेत असं म्हणता येईल फार तर. दोन वेगळ्या अभिरुचींना एकाच साच्यात बसवायचा अट्टहास कुठलं पुरोगामित्व मिरवतोय? >>थोडक्यात काय एक विचारी माणूस म्हणून आपण मनुष्याचे संपूर्ण वर्तनच चिकित्सेच्या ऐरणीवर आणू शकतो. -- निश्चितच. पण त्यातल्या कृत्रीमतेचं भान ठेवायलाच हवं. >> सोंड असलेल्या माणसाचा देव म्हणून मिपावर फोटो आहे, तेथे लेखन करून मी प्रतिगामीत्वास बढावा देत नाहीय काय असे प्रश्न उभे राहतात. -- इथे पुरोगामी-प्रतिगामी अशा वादात जाणं हेच मुळी प्रतिगामित्वाचं लक्षण आहे. आपल्याला एखादी गोष्ट कळत नाहि, पटत नाहि तर सर्वांनाच तसं वाटावं हे कुठलं पुरोगामित्व? >> जीवन जीवन न राहता फक्त चिंतन आणि तेही वैचारिक क्लेष इतकेच उरते. -- पुढे जाणं आणि योग्य दिशेने जाणं यांचा ताळमेळ व्यक्तीलाच शक्य आहे. तसा नसला तर वांझोट्या पुरोगामित्वाचं वैचारीक क्लेष हेच फळ आहे. >>क्लिष्ट अशा तात्विक बाबींवर प्रत्येक माणसाचा विचार करायचा मूड नसतो. इच्छा नसते. वेळ नसतो. बुद्धिमत्ता नसते. ज्ञान नसते. -- नसतच ना. आणि तसं असायचा अट्टहास देखील वेडेपणा आहे. >> त्यातून येणारे निष्कर्ष दरवेळी वेगळे निघू शकतात, निघतात. --निघायलाच हवेत. >> मग माणसाला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होतो. -- बीग डील. आगीत हात टाकला तर जळणाच. सोन्याला जर आपली अशुद्धी जाळुन भस्म करायची असेल तर असा चान्स घेण्याला पर्याय नाहि. >>सर्वात वाइट म्हणजे तथाकथित पुरोगाम्यांत एकमत नसते. देव, धर्म पाळणारे पुरोगामी न पाळणारांना आपल्यापेक्षा जास्त पुरोगामी मानणार नाहीत, इ. -- बीग डील अगेन. तसंही, देव-धर्म (व इतर तत्सम आचार विचार) पाळणार्‍यांना प्रतिगामी समजणार्‍या पुरोगाम्यांनी आपण खुंटीला बांधलेले आहोत हे समजुन घेणं अत्यंत महत्वाचं आहे. समाज प्रबोधन वगैरे फार लांब राहिलं. >>सबब लेखात कोणी एक महाशय कसे पुरोगत व्हावेत याबद्दल मार्गदर्शन नाही. -- मला तर कुठलच मार्गदर्शन दिसलं नाहि. >>सगळाच समाज कसा विकसित व्हावा यावर जोर आहे. प्रत्येकाकडून फर्स्ट प्रिंसिपल्स वापरून पुरोगत बनण्याची अपेक्षा करणे म्हणजे प्रत्येकाला quantum physics शिकवणे आहे. -- कुठल्यतरी पायरीवर हे केल्याशिवाय गत्यंतर नाहि. >> याकरिता एक संस्था असावी किंवा असलेल्या संस्थांचे 'अधिकृत' जाळे असावे. या संस्थेने भयंकर डोकेफोड करून सामान्य माणसाच्या वागण्याची मार्गदर्शक तत्त्वे बनवावीत. अशी तत्वे म्हणजे कायदा नाही, निव्वळ रेफरन्स. ज्याला इच्छा आहे तो तत्त्वाच्या मागचा कार्यकारणभाव वाचू, पाहू, तपासू शकतो आणि पटले नाही तर आपल्या मताप्रमाणे वागू शकतो. -- आजवर असे शेकड्याने प्रयोग झाले आहेत, आजही होताहेत आणि पुढेही होतील. >>आजच्या परिस्थितीत ज्ञानाच्या अनंत शाखा आहेत, अनंत माहिती आहे, अनंत विषय आहेत, अनेकांच्या अनेक विषयांवर अनेक भूमिका आहेत. हे सगळे लोक प्रामाणिकपणे पुरोगामी वागण्याची इच्छा असणार्‍या माणसाला भ्रमित करतात. -- हि त्या पुरोगामी वागण्यार्‍या व्यक्तीची मर्यादा झाली. आणि भ्रमीत होण्यात काहिही वाईट नाहि. >> अशा लोकांत राहिल्याने माणसाला नेहमी आपण भूतकाळात कसे प्रतिगामी होतो याचे शल्य राहते. -- तसं शल्य राहाण्याचं काहि कारण नाहि. आणि असलच तर ते सकारात्मक रित्या घेतल्या जाऊ शकतं. >> असा संस्थागत संदर्भ असेल तर माणूस नेहमीच काळाबरोबर, समाजाबरोबर राहतो. -- आशावाद म्हणुन असं मानणं ठीक आहे. पण ते सत्य नाहि. >> अशी संस्था असू शकते का, कशी असावी, तिचे कामकाज कसे असावे आणि फिल्ड अ‍ॅक्टीव्हेटीज काय असाव्यात हा पूर्णत: वेगळा विषय आहे. -- यावर देखील बराच काथ्याकुट झाला आहे मानव इतीहासात. >>सर्वानी मिळून बासुंदीचा आनंद कसा घ्यावा यासाठी कोणी वाढप्या प्रयत्न करत आहे, त्याचा तिच्यात लिंबू पिळण्याचा परिणाम झाला नाही पाहिजे. -- स्वयंपाक्याच्या/वाढप्याच्या रेसीपीतच लिंबु पिळणं अंतर्भूत असेल व्हायचा तो परिणाम होणारच.

आपल्या वैचारिक मतांतराचा मला आदर आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मी 'भारतीय शिक्षण विषयक धोरण' बद्दल बोलत आहे. आपण मिस्टर क्ष च्या शिक्षणाबद्दल बोलत आहात. भारतीय शिक्षण विषयक धोरण काही का असेना, मिस्तर क्ष यांचा काय विचार आहे, वर्तन आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे हा आपला विचार मान्य आहे.

तुमच्या भाषेला, वाक्य रचनेला, विषय मांडणीच्या स्टाईलला त्रिवार सलाम.
http://www.aisiakshare.com/node/1944 इथे मी भाषांच्या उणिवांबद्दल एक धागा काढला होता. तेथिल काही प्रतिसाद वाचण्यासारखे आहेत. मी, माझे व्यक्तित्व, भाषा, मांडणी, बुद्धी, इ इ वर तेथे व्यक्त झालेले विचार पाहिले तर आपला प्रतिसाद सद्गतीत करून सोडणारा आहे.

५. विज्ञानाने पुराव्याने दिलेल्या कोणत्याही सत्यास खोटे मानू नये.
>>> का? उलट विज्ञानाने पुरावा दिलेल्या गोष्टी नक्की सत्य आहेत का , की आपण आपल्या मनाची खोटीच समजुत करुन घेवुन बसलोय ?? हा प्रश्न सतत विचारत रहायला पाहिजे आपण आपणाला !

गिरीजाजी, अर्थातच आपण म्हणत आहात ते योग्य आहे. इथे थोडा संदर्भ वेगळा आहे. म्हणजे आपल्याकडे 'विज्ञानाच्या नियमांना' चॅलेंज करण्याचे सामर्थ्य असेल तर तसे अवश्य करावे. पण सहसा ते शास्त्रज्ञ करतील. या लेखात सामान्य माणसाचे बर्डन शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न आहे. मग 'सरकारचे कायदे पाळावेत' असे लिहिले आहे. अर्थात असलेले काय्दे गरजेचे आहेत का, योग्य आहेत का, त्यांचा अर्थ नीट काढला जातोय का हे पाहणेही आलेच. पण ते सामान्य माणसाचे काम नाही. त्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी ते काम करावे. आपण ज्या अर्थाने प्रतिसाद लिहिला आहे तो त्या अर्थाने योग्य आहे.

पण ते सामान्य माणसाचे काम नाही. त्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी ते काम करावे.
आणि ह्यावाक्यावर मला ठेच लागली ...कारण ह्या वाक्याचा अर्थ असा होतो कि त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसेच खर्‍या अर्थाने पुरोगामी आहेत बाकीचे थोड्याश्या हायर लेव्हलचे अंधश्रधाळुच !! मग अशा अंधश्रधाळुंना जरा खालच्या लेव्हलच्या अंधश्रध्दाळुंना प्रतिगामी (की अजुन काही) म्हणण्याचा काय अधिकार ?

गिरीजाजी, आपण अगदी योग्य अर्थ घेतला आहे मला काय म्हणायचं आहे त्याचा. तज्ञ ते पुरोगामी आणि आपण ते डोळस अनुयायी. असे म्हणण्याचे मुख्य कारण हे आहे कि ज्ञानाच्या अनेक मुख्य शाखा आहेत. अनेक उपशाखा आहेत. प्रत्येक शाखेत ज्या ज्या गोष्टीचे ज्ञान करून घ्यायचे त्यादेखिल हजारो आहेत. शिवाय प्रत्येक गोष्टीची माहिती इतक्या खोलात उपलब्ध आहे कि सगळी माहिती घेणे एक क्लिष्ट काम आहे. साधे मला 'उपवास करावा का?' या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जीवशास्त्र, शरीरशास्त्र, पचनसंस्थाशास्त्र, अन्नशास्त्र, पाकशास्त्र, धर्म, अध्यात्म, इतिहास, पर्यावरण, आरोग्यशास्त्र, उर्जाशास्त्र, कुटुंबशास्त्र, इ इ ची कितीतरी माहिती लागेल. समजा देवासाठी 'उपवास करणे' अंधश्रद्धा आहे, पण अन्यथा उपवास करणे चांगले आहे असा निष्कर्ष निघाला तर अजून बरेच प्रश्न उभे राहतात. जसे, उपवासात काहीच खाउ नये का? तो किती काळाचा असावा? महिन्यातून कितीदा करावा? आपण जर एक 'उपवासनिती' अवलंबायला जाल तर हजारो प्रश्न उभे राहतील ज्यांचे समाधानकारक उत्तर हवे असेल. ही उत्तरे मिळवण्यासाठी पुन्हा प्रचंड अभ्यास करावा लागेल. कोणी म्हणेल कि काही हरकत नाही, आपल्यासमोर आयुष्य पडले आहे उत्तरे शोधायला. पण अशी निती प्रस्थापित करण्यासाठी एक सुसूत्र पद्धत उपलब्ध नाही. म्हणून आपण समाधानकारक उत्तराकडे पोहोचणार नाही. आपली निती चांगली आहे असे समाधान मिळणार नाही कारण इतर लोक वेगळ्याच निष्कर्षाप्रत पोहोचलेले आढळतील. उपवासासारख्या आपण हजारो गोष्टी करतो. जो कोणी त्याच गोष्टी आपल्यापेक्षा वेगळ्या प्रकारे करतो तो आपल्याला एक प्रकारे खालच्या, वरच्या, वेगळ्या लेवलचा/पुरोगामीत्वाचा समजतो. जीवन प्रत्येक शास्त्राच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करते. अशा प्रत्येक ठिकाणी स्वतःचा निर्णय घेऊ अशी प्रत्येकाची क्षमता नसते. जीवनात एका विशिष्ट थ्रेशोल्डपर्यंत भिन्न व्यक्तिंमधे भिन्न विचार, वर्तन असणे आवश्यक, योग्य, नैसर्गिक, स्वागतार्ह आहे. पण त्यांनंतर मात्र ते कसे असावे यासाठी मार्गदर्शन हवे. ते तज्ञांनी करणे बरे. 'लठ्ठ असाल तर आठवड्यात एक दिवस केवळ फलाहार करा', 'विठ्ठल पावण्यासाठी एकादशीला उपास करा', 'उपासाने पचनशक्ती वाढते, रोग ठीक होतात, म्हणून करा', 'इंद्रीये ताब्यात राहतात, मन प्रसन्न राहते...', 'करू नका, कधीच करू नका', इ इ पैकी काहीतरी एक असावे. समजा उपवास हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि प्रत्येकाचे वेगळे मत आहे, तर हा समाज भरकटलेला वाटेल. 'अधिकृत असे तज्ञ लोक ' यासाठी कि प्रत्येकास आपण तज्ञच आहोत असे वाटते. तज्ञ लोकच खरे पुरोगामी असतात, आपण त्यांच्या तज्ञतेचे साक्षी असतो आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रश्न आपल्या इगोचा नाही, प्रश्न खरोखरीच योग्य वागण्याचा आहे. आणि जे लोक हुशार असतात ते कशा ना कशाचे तज्ञ, इच्छा असेल तर, बनू शकतात.