आपला ऑल टाइम फेवरेट मूवी आहे रे....आर्म्स ट्राफिकिंग... हे आर्म्स ट्राफिकर लोक एखाद्या देशाच्या सरकार पेक्षा ही ताकदवान असू शकतात
क्वात्रोची, अदनान खशोगी, डोनाल्ड रम्सफिल्ड मोठी उदाहरणे आहेत
तू नळीवर श्रीलंकन यादवी ची क्लिप आहेत
शेवटच्या युद्धात लिट्टे च्या लोकांना व तमिळ निर्वासितांना
गोळ्या घालून ठार मारले , लहान मुले सुद्धा सोडली नाही.
जग आमच्या लोकांचे आमच्या खंडातील लोकांचे हालहवाल जाणून घेत नाहीत ,तर आम्ही जगात काय चालले आहे त्याबद्दल कशाला फुकाची हलहाल व्यक्त करू आजही श्रीलंकन सरकार सुपात आहे , त्यांच्यावर अमेरिकेने नाही हल्ल्यांची धमकी दिली . एरवी जागतिक पोलिस पाटीलकी बरी जमते त्यांना
अरे हो
श्रीलंके कडे तेल नाही आहे
लक्षातच नाही आले
सर्वात जास्त जैवीक हत्यारांचा उपयोग युरोपियन अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियात गेले तेव्हा झाला... प्रथम नकळत आणि नंतर हेतूपुर्सर. तेथिल मूलनिवासी अन्य लोकांच्या संपर्कात नसल्याने त्यांच्यात अनेक युरोपियन रोगांची रोगप्रतिकारक शक्ती नव्हती. बंदूकीने अथवा तलवारीने जेवढे मूलनिवासी मेले त्यापेक्षा शतपटींनी देवी व प्लेग सारख्या रोगांच्या साथींनी मेले.
फारच भयानक :(. अगदी निराश वाटावे अशी परिस्थिती आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारण फार गुंतागुंतीच असतं. सौदी अरेबिया अमेरिकेचा दोस्त असला तरीही सिरियाविरूद्ध तटस्थ आहे म्हणे कारण काय तर अमेरिकेला मदत केली तर इस्त्राईलला मदत केल्यासारखे होते.
तरीच म्हटले एकतर्फी चित्रे कशी
शेवटी हे वाचून खुलासा झाला:
साभार सीएनएन, एनबीसी,बीबीसी वृत्तसंस्था
त्यामुळे सत्य बदलत नसले तरी संपूर्ण सत्याच्या जवळ पोचणे कठीण होते. इतकेच.
झालेले मृत्यू हे निंदनीय आणि दु:खकारक आहेत याच्याशी सहमत आहेच. पण त्यामागची अमेरिकन कारणे खरी वाटावीत अश्या हेतूने काहि ठराविक चित्रांना ठराविक मिडियातून पद्धतशीर प्रसिद्धी मिळते हेही तितकेच खरे.
चित्रे एकतर्फी कशी काय आहेत कृपया सविस्तर सांगाल का ?
असद बशर च्या सेनेनी केलेली हत्याकांड आणि रेबेल फोर्सेस नी केलेली हत्याकांड दोन्ही दाखवली गेली आहेत.
रशियानी असद ला केलेली मदत आणि अमेरिकेची रेबेल फोर्सेस ला जाहीर केलेली मदत दोन्ही दाखवले आहे
देश सोडून चाललेले लोक आणि राष्ट्रप्रेमापोटी कसेका होईना तग धरून बसलेले लोक दोन्ही दाखवलं आहे
देशाची लागलेली वाट एकीकडे तर अश्या परिस्थितीत परीक्षा देत असलेल्या मुलांचे आशादायी चित्र दोन्ही आहे कि
अॅजेलिना जोलीचा सिरीया दौरासुद्धा अमेरीका सरकारने पुरस्कृत केला असला पाहीजे
सिरीयासारखी प्रकरणे समजून घेण्यापूर्वी अमेरीकेतील थिंक टँक हा प्रकार समजून घेतल पाहिजे. उद्या उद्भवणार्या प्रश्नांवर आजच उत्तरे शोधली जातात, जेणेकरून जगाच्या दोन पावले पुढे राहता येइल. हे करत असताना जमल्यास उद्याच्या जगाला आपल्याला हवे तसे वळण देण्याचा प्रयत्न केला जातो. उदा सिरीया विषय असेल तर त्या देशाचा भूगोल, इतिहास, संस्कृती, त्यांचे कच्चे दुवे, त्या देशाचा व्यापार, त्यांचे अवलंबित्त्व, जनतेचे जिव्हाळ्याचे विषय, वांशिक संघर्ष, दोन धर्मातील दुश्मनी वा धर्माच्या दोन पंथातील तेढ या सगळ्याचा अभ्यास केला जातो. युनिवर्सिटीमधे या विषयात पी एचडी करणारे विद्यार्थी असतील तर असे विद्यार्थी व अभ्यासक यांची मदत घेतली जाते. आपल्या 'लक्ष्याला' चहुबाजूने वेढले जाते. यात मेडीयाचाही रोल महत्त्वाचा असतो.
आजवर सिरीयाबद्दल कितीशी माहिती होती. अचानक आपल्या लोकांचे या बाबतीतले नॉलेज वाढू लागले. एवढेच नाही तर या नव्याने माहीत झालेल्या विषयात लोकांची मतेही बनवली गेली. वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, इंटरनेटवर या विषयातील माहिती कोणी ओतायला सुरुवात केली.
अफगाणिस्ताननंतर अमेरीकेने कोरीया, इराण, इराक, इजिप्त, लिबिया असे विषय हाती घेतले. इथे राजकीय उलथापालथी घडवल्या. आता सिरीयाच्या मागे अमेरीका लागली आहे. आपल्या स्वार्थामुळे अमेरीकेने आपल्या शत्रूंची संख्या वाढवली आहे.
रेबेल वेगळे आणि ISIS वेगळे पण ISIS आल्यानंतर रेबेल फोर्सेस मधले बरेच गट ISIS मध्ये सामील झाले. जे गट ISIS मध्ये सामील झाले नाहीत आणि त्यांच्याविरुध्द लढणार आहेत अशांवर रशिया हल्ले करणार नाही.
इराणचा शाह, हुस्ने मुबारक, गद्दाफी यांना हटवून काय भलं झालं त्या त्या देशांच आणि जगाच?
देशाचं भलं होण्यासाठी नैच हटवलं गेलं त्यांना . सत्ता आणि पैशासाठी धर्मांध , इस्लामी मुलतत्वावाद्यांनी देशाला खड्ड्यात घालण्यासाठीच आणि इस्लाम ला वर आणण्यासाठी हटवलं त्यांना . आता देशवासियांना त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चात्ताप होतोय .
रासायनिक व आण्विक शस्त्रे व त्यांचा प्रसार हा अरब राष्ट्रांनी केला नसून त्यांना हि शस्त्रे प्रगत राष्ट्रांनी दिली.
अरबांनी तेलातून मिळणाऱ्या भरमसाठ पैशांच्या जोरावर हि शस्त्रे खरेदी केली आहेत . अमेरिकेने जबरदस्तीने ती त्यांच्या हातात दिली नाहीयेत .
अजूनही बहुसंख्यांना वाटते की सीरियात जे यादवीयुद्ध गेली काही वर्षे चालू आहे त्यामागे दोन धार्मिक गटांमधली तेढ किंवा तत्सम कारणे आहेत. तशी ती आहेतच पण त्यांचा परिणाम शतगुणीत करणारी कारणे कोणत्याही मुख्य प्रवाहातील माध्यमात सांगितली जात नाहीत.
तसं असेल तर 'इसीस ' चा अर्थ काय होतो ?
त्याचवेळी खनिज तेलाचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. सीरियासारख्या तेल निर्यातदार देशांचे तेल निर्यातीतून मिळणारे उत्पन्न घटत चालले आहे आणि त्याचवेळी लोकसंख्या विविध कारणांनी वाढतच आहे व त्यात इराकसारख्या देशांतून येणार्या विस्थापितांची भर पडत आहे.
तेल हे कधीतरी संपणारच आहे . ते काही दरवर्षी पावसासारखं आभाळातून पडत नाही . तेलाची निर्मिती व्हायला हजारो कदाचित लाखो वर्षही लागत असतील . पण तेल विहिरी सापडल्यामुळे माज्लेल्यांनी हा साधा विचार केला नाही .जगण्यासाठी इतर पर्याय शोधणे , प्रगतीसाठी प्रयत्न करणे सोडून केवळ सगळी शक्ती धर्माच्या अमलाखाली आणण्यासाठी खर्च केली . त्यासाठी हिंसक मार्ग अवलंबिले गेले . त्याचेच हे परिणाम आहेत .
अर्थात पाकिस्तानात तेवढा दम नाहिय्ये . मात्र एका सार्वभौम देशात उद्दाम पणे अमेरीका हे करु शकते.
भारतात UAE च्या मुत्सद्यांनी काय केले हे हि आपल्याला ठावूक असेलच . आपल्यात तरी दम आहे का UAE च्या मुत्साद्याला शिक्षा करायला .
अरबांनी तेलातून मिळणाऱ्या भरमसाठ पैशांच्या जोरावर हि शस्त्रे खरेदी केली आहेत . अमेरिकेने जबरदस्तीने ती त्यांच्या हातात दिली नाहीयेत
खरंच... नक्की? बघा बरं?
नै म्हणजे ते गडचिरोलीतल्या आदिवासी मागास भागात अत्याधुनिक शस्त्रे सापडतात ती विकत घ्यायला भरमसाठ पैसे कुठून मिळवत असतील ते नक्षलवादी तेचा विचार करयला पाहिजे.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थे वर शस्त्र उत्पादक आणि विक्रेते यांची पकड आहे. तेच अमेरिका चालवितात, दुसर्या शब्दात जगात कुठेतरी युद्ध हे सुरु राहिलेच पाहिजे. द्वितीय युद्ध संपल्यानंतर कोरिया युद्ध, विएतनाम युद्ध, इराण इराक युद्ध, कुवैत, इराक, अफगाणिस्तान, आणि आता ... शिवाय अमेरिकी सरकारची खरीदारी हि मोठी आहे. मला आठवते, कुवैत मुक्ती साठी इराकवर जो हल्ला केला होता त्यात पहिल्या महिन्यात फक्त अब्जावधी डॉलरचे शस्त्र फक्त इराकचे इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करण्यासाठी वापरले. युद्ध नंतर त्यांचे कंत्राट पुन्हा युरोपियन देशांनाच मिळणार होते न. एवढेच नव्हे तर देशातही हजारो निर्दोष लोक मारल्या गेले तरी शस्त्र वापरण्यावर कठोर नियम बनविले नाही. गॅन विकत घ्या आणि थोडा शाळेकारी मुलांना. अमेरिकी सरकारला काही हि फरक पडत नाही. शस्त्र घ्या लढा आणि मरा.
प्रतिक्रिया
आपला ऑल टाइम फेवरेट मूवी आहे
काही मुद्द्यांशी काही अंशी
तू नळीवर श्रीलंकन यादवी ची
जैविक हत्याराचे प्राचीन उदाहरण
सर्वात जास्त जैवीक हत्यारांचा
इंका राजवट स्पॅनिश लोकांनी
फारच भयानक :(. अगदी निराश
नको होता उघडायला हा धागा.
तरीच म्हटले एकतर्फी चित्रे
?????????????
युद्ध / यादवी झाली की
अॅजेलिना जोलीचा सिरीया
अॅजेलिना जोलीचा सिरीया दौरासुद्धा अमेरीका सरकारने पुरस्कृत केला असला पाहीजे
सिरीयासारखी प्रकरणे समजून घेण्यापूर्वी अमेरीकेतील थिंक टँक हा प्रकार समजून घेतल पाहिजे. उद्या उद्भवणार्या प्रश्नांवर आजच उत्तरे शोधली जातात, जेणेकरून जगाच्या दोन पावले पुढे राहता येइल. हे करत असताना जमल्यास उद्याच्या जगाला आपल्याला हवे तसे वळण देण्याचा प्रयत्न केला जातो. उदा सिरीया विषय असेल तर त्या देशाचा भूगोल, इतिहास, संस्कृती, त्यांचे कच्चे दुवे, त्या देशाचा व्यापार, त्यांचे अवलंबित्त्व, जनतेचे जिव्हाळ्याचे विषय, वांशिक संघर्ष, दोन धर्मातील दुश्मनी वा धर्माच्या दोन पंथातील तेढ या सगळ्याचा अभ्यास केला जातो. युनिवर्सिटीमधे या विषयात पी एचडी करणारे विद्यार्थी असतील तर असे विद्यार्थी व अभ्यासक यांची मदत घेतली जाते. आपल्या 'लक्ष्याला' चहुबाजूने वेढले जाते. यात मेडीयाचाही रोल महत्त्वाचा असतो. आजवर सिरीयाबद्दल कितीशी माहिती होती. अचानक आपल्या लोकांचे या बाबतीतले नॉलेज वाढू लागले. एवढेच नाही तर या नव्याने माहीत झालेल्या विषयात लोकांची मतेही बनवली गेली. वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, इंटरनेटवर या विषयातील माहिती कोणी ओतायला सुरुवात केली. अफगाणिस्ताननंतर अमेरीकेने कोरीया, इराण, इराक, इजिप्त, लिबिया असे विषय हाती घेतले. इथे राजकीय उलथापालथी घडवल्या. आता सिरीयाच्या मागे अमेरीका लागली आहे. आपल्या स्वार्थामुळे अमेरीकेने आपल्या शत्रूंची संख्या वाढवली आहे.डाय अनादर डे
डेंजरस...........!
भयानक ...........!
रेबेल वेगळे आणि ISIS वेगळे
काय असं मिळवणारेत हे लोक
अरबांनी तेलातून मिळणाऱ्या
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थे वर
त्रिवार सहमत.
सध्याची स्थिती अशी आहे
तो पूर्वेकडे पूर्ण काळ्या
Pagination