जर पेट्रोल, डिजेल, घरगुती वापरायच्या गॅसवरील सबसिडीमुळे अरबोचा तोटा होत होता, तर त्या काढून घेतल्यानंतर नवीन "फुकटच्या" योजना का राबवल्या गेला?
फुकट लॅपटॉप, फुकट टॅबलेट, फुकट मोबाईल, फुकट खाद्य! हे सगळे फुकट देण्यासाठी लागणरा पैसा कोठून येणार ? आधीच अरबो-खरबोची कर्जमाफी देऊन झाली आहे, ५-१०% लोकांनी भरलेल्या टॅक्स मधून हे सगळे निघणार आहे का? आपण म्हणजे देश... याला कुठेतरी सुरक्षेतेची पण गरज आहे. सैन्य आहे, पोलिस व इतर यंत्रणा याला लागणार पैसा? इत्यादि इत्यादी.
सग्ळ्यात महत्वाचे... २००४ नंतर रस्ते व वाहतूक योजनेवरील सर्व काम हळूहळू करत बंद का केले गेले? २००४ नंतर भारतात किती हायवे व रोड याचे नव्याने निर्माण केले गेले?
आजच स्टार न्युजवर दिल्ली शहरावर कार्यक्रम होता, दिल्ली किती ग्रेट शहर झाले आहे यावर.... त्यात सर्वात मोठाभर हा स्थानिक वाहतुक व त्याची सेवा यावर होता... मग तो इतर भारतात का लागू होत नाही?
सोने खरेदी करु नका हे सांगण्यासाठी सोने ७-८ हजारवरून ३० हजार वर येण्याची का वाट पहावी लागली?
अनेक प्रश्न फक्त प्रश्न..
माझ्यावर अवलंबून असलेली १ बायको अन २ पोरे, घरी धुणिभांडी करणारी १ नोकराणी, एक धोबी, एक दूधवाल, एक पेपरवाला, एक किराणा दुकानदार्,प्लस माझा नोकरी धन्दा सांभाळताना चाड्डी सुट्णार्यांनी प्रश्न विचारताना १३० कोटीचा देश चालवणारे किती बिनडोक, असा अविर्भाव आणून बोलणे कितपत हुशारीचे?
अरबो?? का अब्जावधी?
नोकराणी? का मोलकरीण?
मराठीत कामवाल्या बाईला कामवाली बाई, मोलकरीण असेच म्हणतात. मराठी शब्द असतील तर शक्यतो वापरावे. आपल्या वापरानेच टिकतात.
अवांतर आपला नोकरीधंदा चालवताना चड्डी सुटत असेल तरीही १३० कोटींचा देश चालवणारे मूर्ख बिनडोक असू शकतात. दशाननाशी सहमत आहे. आपल्या देशाच्या इतिहासात १३० कोटीचा नसला तरी ५०-६० कोटीचा देश चालवणार्यानी पराकोटीचे चुकीचे निर्णय घेतले आहेत आणि त्याचे दुष्परीणाम देशा आजही भोगतो. असो. मत व्यक्त करणे हा लोकशाहीतला हक्क का काय म्हणतात तो आहे त्यामुळे माझी नाडी सुटत असली तरी समोरचा बिनडोक असू शकतो आणि तो १३० कोटींचा देश चालवणाराही बिनडोक असू शकतो.
ते लक्षात आले.
कारण मी देखिल प्रश्नच विचारला, अन तो माझादेखिल हक्कच आहे. तो हक्क तुमच्याकडून मागितलेला नाही.
दुसरे,
पुण्यात नोकराणी म्हणत नसतील अशी तुमची गैरसमजूत असू शकते, तरीही, अमुकच शब्द शुद्ध मराठी, हे कशावरून, व मराठीचा ठेका तुम्हाला कुणी दिला? हा एक नवा प्रश्न.
धन्यवाद.
आजच स्टार न्युजवर दिल्ली शहरावर कार्यक्रम होता, दिल्ली किती ग्रेट शहर झाले आहे यावर.... त्यात सर्वात मोठाभर हा स्थानिक वाहतुक व त्याची सेवा यावर होता... मग तो इतर भारतात का लागू होत नाही?
दशानन काका. दिल्ली ला मिळणारा निधी हा बहुतेक इतर राज्यांनी गोळा करून दिलेला असतो.
दिल्ली जेंव्हा केम्द्रशासीत होते त्यावेळे दिल्लीतील उद्योगाना उत्पादन कर नव्हता. आजही तो अत्यल्प आहे.
सेल्स्टॅक्स नव्हता. देशाची राजधानी म्हणून दिल्लीतील इन्फ्रास्ट्रक्चर वर खर्च व्हायचा हा तेथील नागरीकानी दिलेल्या पैशातुन नाही तर मुम्बई कलकत्ता , मद्रास , बंगलोर , लुधियाणा या शहरातील / राज्यातील नागरीकानी कष्टकरून सरकारला दिलेल्या टॅक्स मधून मिळवलेल्या पैशातुन होतो. यात गैर काही नाही मात्र दिल्लीच्या विकासाचा ठेंबा मिरवु नये.
केवळ मतांवर डोळा ठेवून पैश्यांची उधळपट्टी करणारे निर्णय घ्यायची ही वेळ नाही. अर्थव्यवस्थेसाठी मुलभूत आणि दीर्घकालीन योग्य असे निर्णय घ्यायची ही वेळ आहे.
चूक.
लाँग टर्म डिसिजन्स सीम स्टुपीड, इन शॉर्ट साईट.
अत्ता इलेक्शन जिंकायचा टाइम आहे. मूलभूत निर्णय बहुमत आल्यानंतर घेतात.
राजकारण अन अर्थ कारण अल्लग आहेत.
नक्कीच. अन्नधान्य सुरक्षा विधेयकः राजकारणदॄष्ट्या बरोबर निर्णय. अर्थकारणदॄष्ट्या चूकीचा निर्णय. राजकारण जोपर्यंत अर्थव्यवस्थेला घातक ठरत नाही तोपर्यंत ठीक आहे. पण एरवी कधी न बोलणारे पंतप्रधान बोलू लागलेत, अर्थमंत्र्यांना सर्वसामान्य नागरिकांना सोने खरेदी टाळा असे सांगावे लागते आहे, ऐन निवडणुकींच्या तोंडावर अवघड धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत असे पंतप्रधान म्हणू लागलेत म्हणजे वेळाच्यावेळी अर्थकारण न केल्याने काय वेळ आलीये ते बघा. (ईथे हे स्पष्ट करतो की तुम्ही दशानन यांना म्हणल्याप्रमाणे १३० कोटींचा देश चालवणा-यांना नावे ठेवत नाहीये. सरकारने काही चांगली कामेही केली आहेत, नक्कीच केली आहेत. पण काही निर्णय जेव्हा घ्यायला पाहिजे होते तेव्हा या राजकरणापयीच घेतले गेले नाहीत)
अत्ता इलेक्शन जिंकायचा टाइम आहे. मूलभूत निर्णय बहुमत आल्यानंतर घेतात.
ठीक आहे. पण नवीन सरकार बहुमतातले असो वा आघाडीचे, आत्ता नाही केले तरी नंतर करावेच लागणार आहे हे.
>>पण काही निर्णय जेव्हा घ्यायला पाहिजे होते तेव्हा या राजकरणापयीच घेतले गेले नाहीत
हे सत्य आहे.
विरोधक, किंवा आघडीतले इतर घटक पक्ष यांची समजूत काढता काढताच भरपूर वेळ जात असतो. तरी ही अनेक निर्णय घेतले गेलेत. त्या निर्णयांच्या शहाणपणावर अनेक शंकाही उपस्थित केल्या गेल्यात.
मी म्हटलो, शॉर्ट साईट मधे असे निर्णय चुकीचे दिसतात. उदा. आधार कार्ड.
याचा उपयोग काय? अशा अनेक चर्चा झडून गेल्यात.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी हे कार्ड आधीच वापरात आलेय, तर कालच DBTL scheme (लिंक : http://www.petroleum.nic.in/dbtl/ ) लागू होण्याबद्दल बातमी आली.
नागपूर, गोंदिया, धुळे व जळगांव जिल्ह्यांत हा पायलट प्रोजेक्ट १.१०.२०१३ पासून सुरू होतोय.
आधार कार्डाच्या बेसिसवर तुमचे बॅंक अकाउंट व गॅसचे खाते एकमेकांशी जोडले जाऊन अपेक्षित सबसिडीची रक्कम ग्राहकाच्या खात्यावर जमा होईल, बाजारात गॅस फ़क्त अनसबसिडाईज्ड भावात मिळेल अशी ही स्कीम आहे.
यामुळे चोरून मारून हॉटेलवाले वा ग्यासोट्या गाड्यांसाठी सबसिडीचा ग्यास वापरणे आपोआप बंद होईल, कारण बाजारात स्वस्त/सबसिडाईज्ड गॅस मिळणारच नाही.
बायोमेट्रिकली लिंक्ड अकाउंट्स असल्याने खोटी खाती बनवणे देखिल कठीण जाईल..
आता या डिसिजन्स गुड पॉलिटिक्स आहेत, की बॅड अर्थकारण, की टायमिंग चुकलेय?
फक्त कागदावर असते मला स्वताला आलेला अनुभव फार बोलका आहे,जर मला सब्सिडीच्या नऊ बाटल्या मिळावयास हव्या होत्या तेव्हा मला सातच मिळाल्या उर्लेल्या दोन बाटल्या बद्दल विचारले असता त्या मला दिल्यागेल्या अशी माझ्या नावावर नोन्द होती प्रत्यक्षात मी त्याच्यासाठी मागणी सुद्धा केली नव्हती.नाईलाजाने अनसबसिडाईझ बाटल्या (गेस च्या) घ्याव्या लागल्या.
लोकल ग्यास एजंटाने तुमच्या नावाची सब्सिडाईज्ड सिलिंडरे कुणाला तरी ब्लॅकमधे विकलीत असा संशय इथे येण्यास वाव आहे. यात सरकारचा दोष कुठे?
दुसरे म्हणजे या नव्या योजनेतून तो एजंट कुणालाच सब्सिडाईज्ड भावात विकू शकणार नाही. सब्सिडीचे पैसे डायरेक्ट तुमच्या बँकेत जमा होणार आहेत. थोडक्यात सरकार भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे चांगले की वाईट?
सब्सिडाईज्ड भावात विकू शकणार नाही. मी तेच सान्गतोय तो घेताना सब्सिडाईज्ड भावात घेतो पण विकताना मात्र काळ्याबाजारात विकतो,असो हे एक उदाहरण आहे,तसेच सि एन जी नामक गेस जोडणी मात्र मुद्दाम टाळली जात आहे अथवा लाम्बणीवर टाकली जात आहे त्याचे काय?
म्हणजे रिझर्व बँकेचं डोकं फिरलंय असं तुमचं मत आहे का? फुकटच्या वाढलेल्या जागांच्या किंमतींचा व स्वस्तात मिळणार्या बँकेंचे कर्जाचा फायदा घेवून तीन चार घरे घेणार्या, विकणार्या आणि सर्व सामान्यांचे घराचे स्वप्न उधळणार्या, फालतू वेळ घालवणार्या निकृष्ट दर्जाच्या देशाच्या नालायक नागरीकांच्या गळ्याला फास लावण्यासाठी हे गरजेचं आहे. गरज नसताना मोठ्या मोठ्या गाड्या भर रस्त्याकडेला पार्क करणार्या व त्यामुळे ट्रॅफिक जाम करणार्या, नदीत गणेश विसर्जन करून प्रदूषण करणार्या, काम नसल्यामुळे ढोल वाजवून ध्वनी प्रदूषण करणार्या भारतीय नागरीकांची लायकी भीक मागण्याचीच आहे. आणि लवकरच त्यांच्या खर्या जागी म्हणजे १९९१ पूर्व स्थितीला भ्रष्टाचारी काँग्रेस पक्ष घेवून जाईलच. कामचुकार, निर्बुद्ध, जातीयवादी मद्दड भारतीयांना त्यांची खरी किंमत कळणे ही काळाची गरज आहेच.
एक पहिल्यांदाच कबूल करतो मी बी कॉम आहे तो ही बाहेरून परीक्षेला बसलेला. त्यामुळे अमर्त्य सेन यांच्या सारखी माझ्या मागे नोबेलची उपाधी नाही की नरेंद्र जाधव यांच्या सारखी वा मनमोहन यांच्या सारखी डॉ. ही पदवी नाही, पण हे तिघे असूनही " उपेग " काय ? शून्य !
कोणत्याही देशाला आपली अर्थव्यवस्था जागतिक प्रवाहाला संलग्न काही प्रमाणात तरी करावीच लागते. पण ती किती करायची याचे भान नेत्याला असावे लागते. त्यासाठी देशांतर्गत संशीधन व नैसर्गिक साधन सामग्री यांना बरोबर घेऊन उद्योगजकांशी संपर्क साधावा लागतो. उत्पादन ,सेवा व शेती यांच्या अर्थ्व्यवस्थेतील प्रमाणाला काबूत ठेवावे लागते.आपल्या देशात ज्या केमिकल , फिजिकल, लॅब आहेत त्यात किती प्रमाणात मौलिक संशीधन चालते.? आपण जी टूथपिक वापरतो ती देखील आपल्या शास्त्रज्ञानी विकसित केलेली नाही. मग निर्यातीचे सोडाच. पेटंटचे बाजूलाच राहू द्या ! परदेशातून आलेलेच तंत्रज्ञान वापरून इथे उत्पादन होते.त्यात बर्याचशा कंपन्या तिकडीलच आहेत. वेनूगोपाल धूत यांच्या सारक्या काहींचा अपवाद आहे. बाकी स्कूटरी मोटारी यात डिझाईनची किती पेटंटस आज भारतीय उद्योजकांकडे आहेत बरे ? हे सारे मूलभूत प्रशन आहेत. सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर अमिताभ बच्चन ई लोकांचे उखळ त्यांच्या कलेने पांढरे झालेले आहे. त्यांचा सामान्य लोकांच्या स्वास्थ्यासाठी काय उपयोग ? कुशल व वेल्पेड कामगार, कल्पक उद्योजक व बुद्धीमान संशीधक हे राष्ट्राला निर्मांण करतात . बाकी संगीत साहित्य ई मधे लाखानी पी एच डी करणारे भारतात काय कमी आहेत ?
चौरा, संशोधनाचा मुद्दा बरोबर आहे पण ते अर्थव्यवस्था बिघडायचं मुख्य कारण होऊ शकत नाही.
आणि कलाकारांचा मुद्दा जरा अवांतर आणि अतिशयोक्तीचा वाटला हो. मुळात योग्य मार्गाने पैसा मिळवणा-या , समाजात काही उपद्रव न देणा-या माणसाला 'तुझा सामाजिक स्वास्थ्यासाठी उपयोग काय?' हे का विचारायचं? हा आता टॅक्स चुकवेगिरी वगैरे म्हणत असाल तर ते चुक आहेच. पण आपलं घोडं पेंड खातय ते धोरणात्मक निर्णय घेण्यात दिरंगाई आणि अंमलबजावणीत कुचराई होते तिथे. आता त्याला कारण आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता म्हणा, नेतृत्वाचा अभाव म्हणा किंवा कमकुवत विरोधी पक्ष म्हणा.
मुळात योग्य मार्गाने पैसा मिळवणा-या , समाजात काही उपद्रव न देणा-या माणसाला 'तुझा सामाजिक स्वास्थ्यासाठी उपयोग काय?'
मुळात, माणसांच्या गरजांमध्ये कलेचा नंबर खूप वरती आहे. समाज भौतिकरित्या सूदृढ आहे त्या समाजात कलेला स्थान आहे. तिथेच कलाकाराची कला अप्रिशिएट केली जाते. पण ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे अशी लोकं 'शारूक' च्या पिक्चरसाठी किंवा क्रिकेटसाठी तासन् तास घालवत असतील तर त्यांचे काही शहाण्या माणसांनी कान उपटलेच पाहिजेत. वर "दिवसभर झोपडपरट्ट्यात गटारी शेजारी रहाणार्या, कचरा वेचणार्या लोकांना करमणूक म्हणून वर्चुअल जगात तरी हिरो-हिरोइन म्हणून स्विझर्लंड मध्ये जाणं ही त्यांची मानसिक गरज आहे" असं म्हणणं म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे.
त्यामुळे वर चौरा म्हणतात त्याप्रमाणे, या शहाण्या नेत्रुत्वाने आत्ता, या घडीला सामाजिक हीत बघत कुण्या सोम्यागोम्याला पद्मश्री किंवा भारतरत्न वाटण्यापेक्षा बदल करून एक उदाहरण म्हणून कचरा विस्थापनाचं काम करणार्या, लोकसंख्या नियंत्रणाचं काम करणार्या, उपेक्षीत (वेश्यांची मुलं, आदिवासी वगैरे) घटकांसाठी काम करणार्या लोकांना वेचून त्यांना भरघोस मदत केली पाहिजे. अश्या पुरस्कारांना मिडिया मध्ये जागा दिली गेली पाहिजे.
मूलभूत समस्या म्हणून घसरणार्याअर्थव्यवस्थेशी संशीधनाचा संबंध लांबूनच आहे पण पेटंटस चा संबंध
अर्थव्यवस्थेशी अगदी खोलवर आहे. कलावंत , खेळाडू, चित्रकार, ई चे महत्व समाजात आहेच पण ते रस्ते, आरोग्य, शिक्षण,
अन्न वस्त्र निवारा, पर्यावरण यांच्या इतके नक्कीच नाही. अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या शेवटच्या टप्प्यात , गाणे बजावणे, क्रीडा
सामने,व्यसने, नाईट क्लब, मोटारींच्या शर्यती सोन्या चांदीचा खच,फटाक्यांची आतशबाजी ई यावयास आमची काहीच हरकत नाही राव !
कमकुवत नव्हे तर सताधार्यानाच सामील झालेला विरोधी पक्ष ! आता भाजप म्हणेल की निवडणुका आल्या म्हणून काही सवंग लोकप्रिय विधेयकांची लाईन लागली आहे. पण राजकीय चाल म्हणून गेल्या ९ वर्षात हीच विधेयके आणंण्याची कल्पकता भाजपाने का दाखविली नाही. त्याना अनेकांची पंचाईत करता आली असती की नाही ? आता सरकारचे शिक्के
वापरून त्याचे श्रेय लाटण्याचा उद्योग मनमोहन सिंग व सोनिया गांधी करीत आहेतच ना ?
लेख आवडला.खूपच चांगला आहे. विशेषत: QE विषयी इतकी मुद्देसूद माहिती मराठीतून तरी मी इतर कुठे वाचली नव्हती.
बाकी मनमोहन सिंह सरकारने दुसऱ्या टर्ममध्ये अर्थव्यवस्थेत ना भूतो ना भविष्यति असा गोंधळ घातला आहे हे अगदी समोरच दिसत आहे. याविषयी चौकटराजांच्या चर्चेतील या प्रतिसादात लिहिले आहेच.तेव्हा तेच परत लिहित नाही.
गुंतवणुकदारांचा विश्वास वाढवायची गरज आहे यात काही शंकाच नाही.पण जोपर्यंत व्होडाफोन retroactive taxation केस, निर्णय घेताना होणारी दिरंगाई इत्यादी महत्वाच्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत तसे होणे जरा कठिणच आहे.विशेषत: कोळसा मंत्रालय आणि पर्यावरण मंत्रालय यांच्यातील रस्सीखेच, NHAI ने रस्ते प्रकल्पांच्या अंमलबजावणी करताना घातलेला घोळ इत्यादी गोष्टी खरोखरच अडचणीच्या आहेत.
मे महिन्यापासून आत्तापर्यंत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्या $200 Bn पैकी फक्त $3 Mn ईतकी गुंतवणूक काढून घेतली आहे.
जून महिन्यात FII नी ७ बिलिअन डॉलर काढून घेतले होते. (संदर्भ: http://www.livemint.com/Money/vEVnxqYazq84GVuOc8sJAJ/FIIs-withdraw-72-bn-from-bonds-equities.html)
अजून चर्चा रंगल्यास भाग घेईनच.
नुसते ३ मिलियन काढले असते तर काहीच फरक नाही पण प्रत्यक्षात बरेच पैसे बाहेर पडले, मला वाटतं तो आकडा ७ पेक्षा नक्कीच जास्त आहे. येऊ घातलेली निवडणूक, राजकीय अस्थैर्य, सरकारी इच्छाशक्तिचा अभाव, अन्नसुरक्षा विधेयकाचा सरकारी तिजोरीवर बोजा अशा त्याचवेळी सावरणारी अमेरिकी अर्थव्यवस्था, टेपरींग करत मूळ पदावर यायची फेडची सावध धडपड आणि त्यातून गुंतवणूकदारांना दिलेला विश्वास ह्यामूळे भारताकडून गुंतवणूकीचा ओघ अमेरिकेच्या दिशेने जातोय की काय असं वाटायला लागलय. मला वाटतं ह्याची जाणीव भारताला होतेच आहे त्यामुळेच ओबामाबरोबर अर्थविषयक बोलणी करायला मिटींग आहे मनमोहनसिंगाची येत्या पंधरवड्यात व्हाईट हाऊसवर! भारताने इंटर्नल कंझम्शनवर लक्ष द्यायलाच हवे आता, निर्यातीवर फार विसंबता येणार नाही यापुढे, सगळ्या जगातले लेबर रेटस खालती येतायत विशेषतः विकसित देशांमधले.
गणपतीच्या आठ दिवसांच्या सुट्टीनंतर आवडत्या विषयावर मिपावर चांगला लेख वाचायला मिळाला.
रुपयाच्या घसरणीच्या सुरुवाती नंतर सरकारने आणि आरबीआयने क्विक फिक्स म्हणून काही उपाय केले (बातम्या वाचल्या/ऐकल्या होत्या, स्रोत देणं कठीण आहे). त्यात CAD कमी होण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्क वाढवले. २ बिलियन डॉलरची बाँड/ट्रेजरी बिल्स विक्रिस काढायचं ठरवलं (पण त्यासाठी लावलेली बोली फारशी उस्ताहवर्धक नव्हती). चलनाच्य वायदेबाजारात काही कडक अटी आणल्या. FDI साठी सरकारने मध्यंतरी काही नियम शिथिल केले होते. पण नियम शिथील केल्याने FDI ही काही दिवसात वा महिन्यात येणारी गुंतवणूक नव्हे. एकंदर क्विक फिक्सने फारशी मदत झाली नाही.
जीडीपीचे आणि आयआयपीचे आकडे खरचं निराशाजनक आहेत त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला बांधलेली जीडीपीची अटकळ दोघांनीही, सरकार आणि रेटींग एजन्सीजने कमी केली आहे. याला काही जण आरबीआयच्या लिक्विडीटी टायटनींग पॉलिसिला (व्याजाचे दर वाढवण्याला) जबाबदार धरतात. पण आरबीआयने ही स्टेप्स वाढत्या इन्फ्लेशन मुळे घेतली होती. (ज्याचं विवेचन या लेखात चांगलं केलं आहे). पण वाढलेल्या दराने काही प्रमाणात ग्रोथचा बळी शेवटी घेतलाच.
दीर्घकालीन प्रगतीसाठी निर्यातीला चालना देणारे उद्योगधंदे वाढविले गेले पाहिजेत (एक्स्पोर्ट ओरिएंटेड ग्रोथ) असा एक सूर बर्याच तज्ञांकडून ऐकायला मिळतो.
येत्या सोमवारी QE tapering वर फेडचा निर्णय कळेलच. शिवाय भविष्यात होवू घातलेल्या निवडणूका आणि पुन्हा त्रिशंकू वा दोलायमान/कमकुवत सरकार स्थापन झालं तर? गुंतवणू़कदार म्हणून सध्याचा आणि येणारा कालावधी बिकट वाटतो. डॉ. रघुराम राजन यांनी कारभार पाहायला सुरुवात केल्यावर आपल्या पहिल्या वाहिल्या भाषणातून काही आशेचा किरण दाखवला खरा पण तो कितपत खरा ठरतो हे काळाच्या उदरात दडलं आहे. काही तज्ञांच्या मते आपण तळ गाठला आहे तर काहींच्या मते तळ अजून गाठला नाही. एकंदरीत मला वाटतं, दिर्घकालीन इक्विटी मार्केट मधल्या सिस्टिमॅटीक गुंतवणूकीच्या संधीची ही चांगली सुरुवात आहे.
आपण अतिशय उत्तम विवेचन केले आहे.
सोने ३०००० पर्यंत आले कुणामुळे?....सरकार कि नागरिक...
थोडक्यात सरकार किती मूर्ख आणि मी किती बेजबाबदार हा विचारहि करायला हवा इतर देशात नागरिकही जबाबदारीने वागतात हे विसरून चालणार नाही. ३०००० रुपयाला सुद्धा घेणारे आहेत आणि ३२००० झाले तरी घेणारे आहेत...१९२५-३० पर्यंत १००००० होतंय सोने तेव्हाही घेणारे असतीलच कारण १९७९ साली १५० रुपयात मिळत होते तेव्हाही घेणारे होतेच.
उपाय नुसते चिदंबरम किंवा मनमोहन सिंग ह्यांनी नाही आपणही करू शकतो का?
वडील कमावतात उधळतात आणि मी घरात नुसता बसून खातो आणि बाप दारू पितो उधळतो मग घरात पैसा येणार कसा म्हणून आईला (म्हणजेच अर्थव्यवस्थेला) बोल लावण्यात पुरुषार्थ मानतो हे हि लक्षात घ्यायला हवे.
पेट्रोल महाग कोणाला ज्याची गाडी आहे त्याला, सोने महाग कुणाला जो घेण्याची इच्छा आहे पण ऐपत नाही त्याला. माझी गरज गाडी आहे का? सोने का हवे आहे मला गुंतवणूक म्हणून कि मिरवणार म्हणून वगैरे प्रश्न प्रश्न प्रश्न येतात डोक्यात....पण लक्षात कोण घेतो..????
परवा फेड ने QE Program अजून चालू राहिल असे सांगितले. त्यामुळे सध्याचं गडांतर तरी टळलं असं म्हणायला हरकत नाही. कदाचित तिस-या तिमाहिचे निकाल उत्साहवर्धक मिळाले की फेड tapering चा विचार करेल. बेरोजगारीचा दर Ben Bernake ने म्हणल्याप्रमाणे 6.5% व्हायला निदान 8-10 महिने तरी नक्कीच लागतील...ते ही अमेरिकेचा सध्याचा GDP विकासदर चालू राहिला तर. बाकी चिदंबरमने सुटकेचा निःश्वास टाकला असेल काल.
कालच फेड ने घोषणा केलीये की जानेवारी २०१४ पासून टेपरींग सुरु होईल म्हणून. चिंदंबरम म्हणतायत की आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि विशेष काही परीणाम होणार नाही म्हणून. फेड ने २०१४ डिसंबर पर्यंत त्यांचा क्यू.ई. कार्यक्रम पूर्णपणे थांबवणार असे सांगितले आहे . वर्षभराचा कालावधी आहे, त्यामुळे एकदम धक्का बसणार नाही असे वाटते. आज सेन्सेक्स पडलाय पण ते अपेक्षित असावं.
प्रतिक्रिया
जर पेट्रोल, डिजेल, घरगुती
अनेक प्रश्न फक्त प्रश्न..
अरबो?? का अब्जावधी?
अवांतर आपला नोकरीधंदा
तुम्ही किती हुशार
ता.क.
गोपाळ साहेब, पु पे नि
आजच स्टार न्युजवर दिल्ली
अजिबात नाही.
राजकारण अन अर्थ कारण अल्लग
निर्णय जेव्हा घ्यायला पाहिजे होते तेव्हा ..
अहो हे प्रत्य़क्ष
तुमचा अनुभव खरा असला, तरीही,
तो कुणालाच
रिझर्व बँक उगाचच व्याजदर
अहो मालक पूर्ण वाचा की
चायला ,ह्या अर्थशास्त्रात आणि
ह्म्म
आयला
काय प्रोळम आहे ?
चौरा...
नाही
+१
+१
मूलभूत समस्या म्हणून ...
कमकुवत विरोधी पक्ष ?
लेखन आवडले.
लेख आवडला.खूपच चांगला आहे.
अस्सेच म्हणतो..
चांगला लेख
उत्तम विवेचन
दुरुस्ती.....१९२५-३० नाही २०२५-३० वाचावे
परवा फेड ने...
टेपरींग सुरू