Welcome to misalpav.com
लेखक: जॅक डनियल्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

साधा सरळ वाटणारा प्रसंग जिवावर बेतू शकतो असं हे काम. पण कोणीतरी असले गारुडी व्हायलाच पाहिजे. नाहीतर माणसाच्या जातीने सगळ्या सापांना मारून टाकले असते.

ह्या लेख मालिकेतील सर्वच भाग आवडले. हा भाग तर कहरच आहे. साप पकडणे वा हाताळणे हा जीवावरचा खेळ असल्याने जराशी दिरंगाई,चुक,फाजील धाडस वा फाजील आत्मविश्वास फार महागात पडू शकतो. साप वाचवणे हे जरी महत्वाचे असले तरी आपल्यावर आपल्या बायकापोरांची, पालकांची असलेली जबाबदारी जास्त महत्वाची असते हे भान सोडू नये. हि बातमी वाचून खरच सुन्न झालो होतो. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/--/articleshow/5161564.cms? सर्पमित्र सुनील रानडे ह्यांच्या विषयी हि बातमी आहे. हे देखील वाचा. http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/5182176.cms? जे कोणी ह्या उपक्रमात कार्यरत असतील त्यांनी योग्य ती काळजी घेणे एवढेच सांगावेसे वाटते. थोडक्यात सांगायचे झाले तर, नुसते सापच नाहीत तर सर्पमित्र वाचणे देखील महत्वाचे आहे. अभिज्ञ.

तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. सर्पोद्यान मध्ये या सगळ्याची पूर्णपणे जाणीव करून दिली जाते. तसेच मी काही वेळा सर्पदंशच्या रुग्णाना ससून मधल्या स्नेकबाईटच्या भागात जाऊन भेटलो आहे आणि मदत मदत केली आहे. त्यामुळे "जर चूक" झाली तर ...काय होऊ शकते याची मला पूर्ण जाणीव होती. (ज्याने घोणस चावलेला हात पहिला आहे, तो घोणस या सापाशी कधीच खेळणार नाही.) माझ्या काही मित्रांचे अपघात पण झाले आहेत. मी कशी परिस्थिती सांभाळायचो आणि साप कसे पकडायचो हे मी लेखात कधीच दिले नाही, "साप पोत्यात घातला " या एका वाक्यात मी ते नेहमी संपवले आहे. माझ्या बाबतीत म्हणयचे तर मी विषारी सापासाठी खूप जास्त काळजी घ्यायचो. ज्यांना कोणाला मी भेटतो त्यांना हेच सांगतो की "निसर्गाशी खेळू नका!"

मूळात घटनाच इतक्या नाट्यमय आहेत की लेखनात ओढून - ताणून नाट्य आणावे लागत नाही ! सलाम तुमच्या जिगरिला ! ____/\___ तसेच अभिज्ञ यांचे सांगणेही ध्यानात घ्यावे. { कदाचित जे. डी. तशी पुरेशी काळजी घेत ही असावेत .. त्यांच्या लेखनशैलीमुळे आपल्याला त्यांचा अप्रोच कॅज्युल वाटत असावा }

वूडल्यांड वरून लक्षात आलं… सापाचे दात बुटातून इजा करू शकतात काय? म्हणजे साप बुटावर चावला तर कितपत अवघड परिस्थिती होईल? आणि हाच प्रश्न जीनच्या कापडाबद्दलही…

मला याचे उत्तर माहित नाही, पण जर इंजेक्शन ची सुई बुटामधून आणि जीन्स मधून आत जाऊ शकत असेल तर सापाचे दात पण जाऊ शकतात. ते इंजेक्शन च्या सुईप्रमाणेच काम करतात. दुसरी गोष्ट साप बरोबर बुटावरच चावेल याची शक्यता पण कमी आहे. म्हणून वूडल्यांड चे शूज घातले की विषारी सापापासून धोका नाही हा समाज चुकीचा आहे.(काही सर्पमित्रांचा तो असतो.) धन्यवाद् !

"आपल्याला काही कळत नसताना सापापासून शक्य तितके लांब राहणे" उत्तम हा धडा या लेखमालेतून शिकलो आहे. या इजेच्या मुद्द्यावरून.. डिस्कवरी / नॅट जिओ वरच्या एका सापांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये सापाने कॅमेराच्या लेन्सवर विषाची एक पिचकारी मारली होती व त्या नॅरेटरने सांगीतले की या इतक्या विषानेही कॅमेरामनला विषाचा त्रास झाला होता. (कसा झाला होता ते सांगीतले नव्हते.) जेडी - तुम्ही पोत्यात साप भरून जाताना तो पोत्यातून माणसाला(उदा. पोते धरून उभे असाल तर पायाची पोटरी, किंवा पोत्याजवळ येणारा कोणताही मानवी अवयव जो सापाला पोत्याच्या आतून जाणवू शकतो) चावत नाही का..? येथेच एकदा आदूबाळांनी "बाईक चालवताना सापाचा पाठीला स्पर्श होत होता" असे काहीसे विधान केले आहे. त्या अनुषंगाने..

धन्यवाद् ! तुम्ही जे शिकला तेच मी सांगायचे प्रयत्न करत आहे. तो नॅट जिओ वरचा किंग cobra चा विडीयो मी पहिला आहे, त्यामध्ये त्या थाई- किंग कोब्राचे विष लेन्स वर लागते. बहुतेक त्या क्यामेरामन च्या हाताला थोडा कट असेल, त्यातून त्याला जळजळ झाली असेल.पण माझ्या मते विषाचे प्रमाण कमी असल्याने आणि ते आधीच घट्ट असल्याने थोडेच (न्यानो मिली )विष जखमेत गेले असेल.
तुम्ही पोत्यात साप भरून जाताना तो पोत्यातून माणसाला(उदा. पोते धरून उभे असाल तर पायाची पोटरी, किंवा पोत्याजवळ येणारा कोणताही मानवी अवयव जो सापाला पोत्याच्या आतून जाणवू शकतो) चावत नाही का..?
नक्कीच चावतो, असे अपघात पण खूप झाले आहेत, म्हणून विषारी साप साठी मी २-३ पिशव्या वापरायचो.म्हणजे एका कापडी पिशवीत त्याला टाकून, वरती एक अजून सुट्टी कापडी पिशवी वापरायचो. घोणस जातीच्या सापाचा दात (दीड-२ इंच ) आरामात बाहेर येऊ शकतो. अश्या दोन पिशव्या वापरून मी त्याला मानवी शरीरापासून दूर ठेवायचो. (म्हणजे डिक्कीत, किंवा बाईक च्या हान्डेल ला)
आदूबाळांनी "बाईक चालवताना सापाचा पाठीला स्पर्श होत होता"
त्यावेळी तो साप "धामण" हा बिनविषारी साप होता, म्हणून एकाच पोत्यात होता, म्हणून त्याला वळवळ जाणवत होती. या अश्या छोट्या-छोट्या खूप महत्वाच्या गोष्टी मी सर्पोद्यानात शिकलो.

सद्या मी बेकर्सफील्ड कैलीफोर्नीया येथे एका तेल विहीरी वर काम करत आहे. इकडे सापान्चा सुळ्सुळाट आहे. आम्ही फिल्ड्वर स्टील कैप असलेले बूट वापरतो. पायासाठी स्नेक कैप वापरतो ज्यामूळे गुड्घ्यापर्यन्त सरक्षण मीळते. भारतात उपलब्ध आहे का पहावे लागेल.

धन्यवाद् ! हे लेग गार्ड आहे, याची किंमत साधारण पणे $५०-६० मध्ये असते. माझे जे मित्र जंगलात राहून संशोधन करतात, ते हे वापरतात. तसेच वरती उल्लेख आल्या प्रमाणे स्टील टो चा बूट पण वापरू शकतात. पण हे सगळा घालून कॉल ला जाणे अशक्य आहे.तसेच त्याच्या किमती पण खूप असतात, त्यामुळे जास्त करून कोणी भारतात वापरात नाही. पण एकडे मियामी स्नेक रेस्कू वाले (त्यांचे कामच स्नेक रेस्कू करणे आहे.)आणि डिस्कवरी वरचे लोकं हे वापरतात.

तुमचे एकदम बरोबर आहे, तुमच्या भागात खूप जास्त प्रमाणात rattle स्नेक सापडतो. त्यामुळे हे घालून काम करणेच योग्य, तो गुढघ्याच्या उंची पर्यंत आरामात उडी मारून चावू शकतो. हे बघा, हे सगळे साप सापडत असतील,कॅलिफोर्नियातले साप ! त्यामुळे काळजी घेत राहा.

हो बरोबर, असेच साप दीसतात कधी कधी. साप दीसताच आम्हाला ताबड्तोब काम थाम्बवून तो साप निघुन जाण्याची वाट पाहाण्याची आज्ञा आहे. साप मारण्यास सक्त मनाई आहे. तसेच कैट फोक्स (छोटा कोल्हा) दीसल्यास तो भाग त्वरीत सोड्ण्याच्या आज्ञा आहेत. एकदा तर एक मादी कैट फोक्स दीसली होती पीलान्बरोबर तर त्याना प्राईव्हसी मिळावी म्हणून त्या भागातील काम दोन आठवडे बन्द ठेवण्यात आले होते.. वन्य प्राण्याबद्द्ल एवढी जागरुकता आपल्याकडे केव्हा येणार..

एकदा तर एक मादी कैट फोक्स दीसली होती पीलान्बरोबर तर त्याना प्राईव्हसी मिळावी म्हणून त्या भागातील काम दोन आठवडे बन्द ठेवण्यात आले होते..
आयला इतका रिस्पेक्ट?? कळायचं बंद.

१. आपण ज्या विनोदबुद्धीने लिहिता, २. ज्या तत्परतेने समाधानकारक उपप्रतिसाद देता हे मला फार हेवा करावा असे वाटले.

तुमच्या या लेखमालेतल्या गोष्टी ह्या थरारक आणि साहसी आहेत. माझ्यासाठीतरी तुमचे अनुभव खरच मौत का कुवा आहेत. पण तुमच्या विनोदी शैलीमुळे त्यातला थरार आणि साहस सहज दिसून येत नाही.