हो, या अनुभवातून आम्ही पुढच्या वेळी कोणाला तरी राखणीला बसवायला लागलो.
गावापासून ७-८ तासाच्या अंतरावरच्या गुहेत, अशी मण्यार येऊन कोणाला दात लावून गेली, तर परिस्थती ताब्यात ठेवणे अवघड होईल.
काटा काटा आला अंगावर वाचुन. मी पाह्यलाय हा साप पण तो विषारी असतो हे माहीत नाही. वर दाखवलेला मण्यार पाह्यलाय. ह्युक!
लिखाण,अन असल्या विषारी विषयाला वापरलेल्या उपमा, हात अगदी कोपरापासुन जोडायला लावताहेत.
एक लंबर लिवलंय!!
छान खुसखुशीत झालंय. सापांशी संबंध आला तो बहुदा घाबरंघुबरं होऊन घरातुन बाहेर पडणे आणि जरा वेळाने काठीवर लोंबणारा, ठेचलेला साप एवढाच होता. कधीकधी सकाळी घरामागच्या रस्त्यावर धामण दिसली की थांबुन तिला जाऊ देतो. नजर ठरत नाही अशी सळसळत जाते निघून.
हे असले ५-स्टार साप मोकळ्यात दिसले नाहीत अजुन. तुम्ही ओळख करून देताय छानशी त्यामुळे एखादवेळेस दिसले तरी चालेल, म्हणजे लांबुन हो!
जबरदस्त लिहिलंय. रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात लहानपण गेल्यामुळे "राखणदार" नाग, मण्यारी, फुरशी आणि आधेली अधून मधून दृष्टीला पडणे ही नवलाईची बाब नव्हती. कधीतरी कोणी गडी त्यांना मारायचे तर कधीतरी बघून शांतपणे जाऊ द्यायचे. पण आमच्या घरात एक महाभयानक शिकारी होती, ती म्हणजे आमची मांजर.
आमची मांजरी बाहेरून मण्यारी पकडून घरात आणायची. त्यांना अर्धमेल्या करून आमच्या पुढ्यात आणून टाकणे हा तिचा आवडता उद्योग होता. घरात फक्त दूधपोळी मिळत असल्याने बहुतेक ती बाहेर शिकार करून नॉन व्हेज खायची हौस भागवून घेत असावी. अशा तिने १/२ नव्हे तर आमच्या पाहण्यात एकूण ९ मण्यारी घरात आणल्या होत्या. तिचा हा उद्योग साधारण दिवसाच चालायचा. याचे कारण आता समजले की मण्यार दिवसा जरा आळसावून राहते. इतक्या वर्षांत तिला कधी साप चावला नाही हे विशेष म्हणावे की मांजरांना सहसा साप चावत नाहीत? मांजरांना विंचू चढत नाही असे म्हणतात, तसाच काही प्रकार आहे का?
अर्धमेला झालेला साप, किंवा नुकताच मेलेला साप पण तेवढाच हानीकारक असतो. याचे ध्यान ठेवा !
मांजर ही खूप चपळ असते आणि तिच्या अंगावर केस पण असतात, त्यामुळे मण्यारीचे छोटे दात शरीराला घासून जायचे प्रमाण कमी असेल. तीच गोष्ट विंचवाची, मांजरीच्या चपळते पुढे विंचू काही करू शकत नाही. पण जर का मांजर झोपली असेल आणि तिला मण्यार चावली तर ती वाचायची शक्यता कमी असते.
अट्टल शिकारी पण तेव्हडचे मायाळु जनावर्, घरात मांजर असेल तर शक्यतो साप़ किटकांचे भय राहत नाही.त्यामुले एक वेळ घरात एक नाही पाच पाच मांजरी होत्या,सहावी मांजर आमची बायको लय खतरनाक प्राणी.....
काय जबरदस्त लेख!
साध्या मण्यारीच्या अंगावरसुद्धा मला पट्टे दिसताहेत (पट्टेवाल्या मण्यारीपेक्षा पातळ, पण पट्टेच). ते खरे आहेत का फोटो काढताना आलेलं रिफलेक्शन?
"अॅडवेंचर ऑफ द स्पेकल्ड बँड" मधला साप "स्वँप अॅडर" आहे असं त्या गोष्टीत खुद्द शेरलॉक म्हणतो. विकीपानावर तर वेगळीच माहिती आहे!
मी वरती लिहिले आहे, की अंगावर पंढरी वेलबुट्टी काढल्या सारखे पट्टे असतात, तेच ते पांढरे पट्टे आहेत.
शेरलॉक ची गोष्ट मी लहानपणी " पट्टेरी सापाची गोष्ट" म्हणून वाचली होती आणि त्या गोष्टीमधला कर्नल भारतातून इंग्लंड मध्ये माकड, मण्यार इ. घेऊन जातो, असे वर्णन आहे.
"स्वँप अॅडर" हा आफ्रिकेत राहणारा viper जातीचा साप आहे, त्या गोष्टीतल्या वर्णनानुसार तो एका खोलीतून दुसऱ्या खोलीत दोरीवरून चढून जाणे अशक्य आहे. (viper मोठ्या झाडावर चढू शकत नाही.)त्यामुळे ती पट्टेरी मण्यारच होती असे मला वाटते.
पट्टेरी मण्यार च्या डोक्याकडे हे पट्टे विरळ होत जातात, किंवा जर मण्यार तरुण असेल तर पट्टे विरळ असतात आणि ते ठिपक्या सारखे दिसू शकतात.
पिवळे पट्टे आणि ब्राऊन ठिपके असलेला विषारी साप (भारतीय कटिबंधीय) मला माहित नाही.
हि मण्यार अतिशय अनरोमेंटिक प्रकार दिसतोय… सवयीच बघा ना… रात्री खाटां कुचकुचुन लोकं चळवळू लागली म्हणून जरा खाली येउन हळूच झोपलं कि आली हि मुका घ्यायला नतद्रष्ट मेली. हा साप बहुदा संजय गांधीचा पुढचा जन्म असावा किंवा संजय गांधी तेव्हा इच्छाधारी पावर संपली म्हणून या सापात अडकून पडला असावा. बेडकांच्या हाणीमुण ची तर आय माय साय करून टाकली पार हिने.
बाकी इतर लेखांप्रमाणेच हाही खतरनाक!
मस्त !
पण एकदा का फ्लड लाईट लागले की क्रिस गेलच्या बापाला पण ऐकत नाही. या लेखातले चौके छक्के पाहून हा लेखही रात्रीच्या पार्टीनंतर आलेल्या मूडाच्या फ्लड लाईटमध्ये लिहिलेला आहे असा अंदाज आहे ;).... लिखाणाचा अंदाज भयंकर आवडला !
नाग म्हणजे सर्पसृष्टी मधला हृतिक असेल तर मण्यार म्हणजे पिउष मिश्रा
लै बेक्कर उपमा.. =)) सगळे नाग हृतिक ची सिग्नेचर स्टेप करतायत असं चित्र डोळ्यासमोर आलं... बाकी नाग चावल्यावर " एक पल का जीना , फिर तो है जाना" हे शब्दशः खरं करणार लेकाचे...!!!
जबरदस्त लेख!
आमच्या पण नावा पुढे कै. लागणार होते याच्यामुळे नशीब बलवत्तर म्हणून अजून टिकून आहे. मला तर या सरपटणार्या प्रजातीची प्रचंड भिती वाटते, अगदी वाईटात वाईट म्हणजे हे सगळे सरपटते जीव माझ्या पाचवीला पुजले आहेत.... :(
पाच पाच नाग ( तेच दहा आकड्यावाले) एका जागी जंगलात पाहून दातखीळी देखील बसून झाली आहे.
एकदा हायकिंग करत असताना २ -३ फुटांवर कोणतातरी ६ फुटी साप आडवा आला अन मी मोठ्याने " आ ~~" ओरडून एका जागी उभी रहिले. तो साप पण दोन एक सेकंद त्याचं डोकं वर करून थांबला अन काहीच हालचाल नाही पाहून निघून गेला. असो. लेख नेहमीप्रमाणेच वाचनीय आहे.
एकदा हरणटोळ समजून झाडावरच्या ज्याचे अगदी जवळून व वेगवेगळ्या कोनातून मनसोक्त फोटो काढले तो बांबू पिट वायपर होता हे ते फोटो घरी येऊन स्क्रीनवर नीट पाहिल्यावरच कळाले होते. तेव्हापासून सर्पछायाचित्रणाचा नाद आवरता घेतला.
मागच्या आठवड्यात झू पाहयला गेलेलो. तिथल्या रेप्टाईल सेक्शनमधे बरेच साप पाहिले. या लेखमालेची प्रर्कषाने आठवण झाली. जाड काचेच्या आत असली तरी ती शेरलॉक खतरनाक वाटली. काचेपलिकडे असूनही माझी चांगलीच तंतरलेली. तुम्ही प्रत्यक्षात हे असले खतरनाक साप हाताळ्ले आहेत. खरंच सलाम !
“आता माझी सटकली” म्हणत ती दंश करायला लागली की संपले सगळेच, शेतकऱ्याचे पूर्ण कुटुंब जमिनीवर झोपलेले आहे, आणि मण्यार घरात आली आणि काही कारण नसताना सगळ्या कुटुंबाला दंश करून गेली, कोणाचे हा-की-चू-नाही...आणि काम तमाम
वरील बाबतीत माझे मत थोडेसे वेगळे आहे. हि मते लष्करी प्रशिक्षण, वाचन आणि सर्पविष उपचार यातील अनुभव यावर आधारित आहेत. यात काही चूक असेल तर मला त्याबद्दल माहिती अद्ययावत करायला आवडेल.
मण्यार हि जरी रात्री जास्त उत्साहात येत असली तरी ती उगाच कुणाला चावत नाही. अक्खे कुटुंब तिला बळी पडले हि फारच दुर्मिळ घटना असावी. साधारणपणे मण्यार हि पावसाळ्यात बिळात पाणी शिरले तर कोरड्या जागेच्या शोधात घरी घुसते वा उंदीर आणि दुसरा साप (होय दुसरे साप हे पण तिचे अन्न आहेत)यांच्या मागे ती घरात येते. एखादे वेळी फार थंडी असेल तर जमिनीवर झोपलेल्या माणसाच्या पांघरुणात उबेसाठी शिरते. त्यावेळी जर माणसाचा हात व पाय तिच्या अंगावर पडला तर ती प्रतिकारासाठी चावते. दुर्दैवाने मण्यारीच्या विषात फक्त मज्जासंस्था बधिर करणारी द्रव्ये असल्याने (रक्त किंवा उती विघटन करणारी(hemolytic ) द्रव्ये नसतात. त्यामुळे चावल्या जागी आग किंवा दुखणे होत नाही आणि डास किंवा किडा चावला आहे असे समजून माणूस गप्प झोपतो. त्यानंतर सकाळी एकतर तो सरळ स्वर्गात उठतो किंवा उठल्यावर सरळ बोलणे अशक्य झाल्याने लोकांना त्याचे बोलणे समजत नाही आणि ते समजेपर्यंत फार उशीर झालेला असतो. कोकणातील मुसलमान लोक खाटेवर झोपतात त्यामुळे त्यांच्यात मण्यार किंवा कांडार ) चावून मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे असे डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचे (महाड आणि बिरवाडी येथील) अनुभव आहेत.
मण्यार चावल्यावर इलाज न केल्यास मृत्युचे प्रमाण पन्नास ते सत्तर टक्के असते.हेच प्रमाण नागाच्या बाबतीत फक्त ६ ते १५ % आहे (सर्प दंश आणि सर्प विषबाधा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक दन्शात विषबाधा होईलच असे नाही आणि प्रत्येक विषबाधा हि जीवघेणी असेलच असे नाही). कारण मण्यारीचे विष वजनाच्या मानाने नागाच्या पेक्षा बरेच जास्त शक्तीचे असते आणि मण्यार जेंव्हा चावते तेंव्हा बर्याच वेळेस चावा पूर्ण करून बरेच विष आत उतरवते. शिवाय नंतर जखमेची फारशी आग न झाल्याने त्यावर उपचार केला जात नाही.
मांजर किंवा मार्जार कुळातील इतर प्राणी यांची चपलता सापांपेक्षा जास्त असल्याने आणि त्यांची प्रीतीक्शिप्त क्रिया(reflexes) जास्त तीक्ष्ण असल्याने साप सहजासहजी मांजराना चावू शकत नाही.शिवाय मांजराना रात्री जास्त स्वच्छ दिसते आणि ऐकू येते. कोंकणात याचमुळे घरात मांजर पाळण्याची पद्धत आहे
खालील दुवा पहा
https://www.youtube.com/watch?vI379HHdy7ak=
थंडी किंवा पावसात ट्रेकला जाताना शेकोटी पेटवण्यापेक्षा झोपेची पिशवी घेऊन जाणे जास्त सुरक्षित आहे कारण एकतर आपले सामान/ कपडे पेटण्याची शक्यता नाही आणि दुसरे त्या उबेसाठी साप किंवा उंदीर आणि त्यामागे साप हि शक्यता नाही. आपल्या झोपेच्या पिशवीमुळे आपले केवळ थंडीच नव्हे तर आग, किडे, विंचू आणि साप या सर्वांपासून संरक्षण होते
धन्यवाद् !
मस्त माहिती दिली आहे, आणि तूनळी ची लिंक पण सही आहे.
मण्यार हा खूप बेभरवशाची असते, हे मी अनुभवातून आणि ऐकलेल्या अनुभवातून बोलतो आहे. नेपाळ मध्ये जेंव्हा पूर येतो तेंव्हा या सापांनी धुमाकूळ घातलेला मी वाचले आहे.(कुटुंब चे कुटुंब जाते.) सगळे या सापाच्या मनावर असते, म्हणजे तो कधी पाय पडला तरी चावणार नाही तर कधी चावू पण शकेल.
कुठल्या पण सर्पोद्यान मध्ये जिकडे सगळे विषारी साप एकत्र ठेवता, घोणस, नाग इ. त्यामध्ये तुम्हाला मण्यार कधीच आढळणार नाही. तसेच जी लोक सापांचे विषारी खेळ करतात (थाई, किंवा अमेरिकन इ.)ती लोकं मण्यार कधीच वापरत नाही. अगदी घोणस पण हातावर गुंडाळी करून उचलतील पण मण्यार नाही.
प्रतिक्रिया
मस्त!
आधी सापाला घाबरत नव्हतो पण ही
हो ना...
हा ही लेख नेहमीप्रमाणे वाचनीय
धन्यवाद् ! नाही पूर्णविराम
बापरे
हो, या अनुभवातून आम्ही
हो खरच कधीही गुहेत झोपनार
काटा काटा आला अंगावर वाचुन.
+++१११
अशी जहाल विषारी गोष्ट इतकी नर्म विनोदी केलि ?
एक लंबर लिवलंय!!
मस्त लेख.....
हाही भाग जबरदस्त.
खुसखुशीत आणि थरारक
टिपिकल कोकणातील अनुभव! फक्त
हायला
अर्धमेला झालेला साप, किंवा
माझी माउ पण असलेच उद्योग करायची...
आवडला.
धन्यवाद् !
काय जबरदस्त लेख!
मी वरती लिहिले आहे, की अंगावर
'अ पेक्युलिअर येलो बँड विथ
पट्टेरी मण्यार च्या डोक्याकडे
ओक्के.. मग काय प्रश्नच संपला.
ह्या लेखमालेतला लेख दिसला रे दिसला
वाचतोय........
आणखी एक जबरदस्त लेख.
मोठ्ठा बेडूक कि 'डब्बल बेडूक'? !
ओह्ह्ह, फोटो टाकताना
अय्यो !!
जबरा..
होना !
मस्त !
पण एकदा का फ्लड लाईट लागले की क्रिस गेलच्या बापाला पण ऐकत नाही.या लेखातले चौके छक्के पाहून हा लेखही रात्रीच्या पार्टीनंतर आलेल्या मूडाच्या फ्लड लाईटमध्ये लिहिलेला आहे असा अंदाज आहे ;).... लिखाणाचा अंदाज भयंकर आवडला !हाही लेख मस्तच!!
हो, मागे एकदा तुम्ही
खुप छान आहे लेख.. मला सुद्धा
नाग म्हणजे सर्पसृष्टी मधला
जबरदस्त लेख!
एकदा हायकिंग करत असताना २ -३
लै भारी..
आयला जे.डी...
नेहमीप्रमाणेच थरारक भाग.
खूप वर्षांपूर्वी
__/\__
अनुभव मस्त आहे.
खतरनाक लिहिलंय!
“आता माझी सटकली” म्हणत ती दंश
उपयोगी माहिती.
Pagination