तुमचा मुद्दा बरोबर आहे मात्र सांगण्याची पद्धत साफ चुकीची आहे.
>>> वरील वाक्य आवडलं नाही.
मला तुमचा अॅटिट्युड आवडला नाही. किडकी मेंटॅलिटी वगैरे. गणपती सजावटीच्या धाग्यावर देखील हा अॅटीट्युड दिसतो आहे.
उत्सव साजरे करणं मान्य नाही ते मूर्खपणाचं मात्र पार्ट्या अगदी रिलिजियसली आठवड्याला, आऊटींग श्राद्धाप्रमाणे दरसाल करणार, 'तीर्थप्रसाद' महिन्यातून. असं 'रुटीन' असतं. नि त्यात पुरोगामीत्व दिसतं असं आहे का? कुणाला कशात आनंद मिळेल ह्याबद्दल कोणी सांगू नये. आपण का निष्कर्ष काढताय?
>>>एखाद्या पोलिसानी चोरी केली किंवा डॉक्टरने रुग्णाचं मूत्रपिंड काढून घेतल्यावर कुणितरी निषेध करायला जावा तर शेवटी पोलिस/डॉक्टर म्हणजे एक माणसेच आहेत. आणि उलट समाजात काही चोरी न करणारी आणि मूत्रपिंड न काढून घेणारी लोकं तर बलात्कार आणि खून करतात, असलं काहितरी जस्टीफिकेशन देण्यासारखं वाटलं.
अॅनालॉजी सपशेल हुकलेली आहे. माझं उदाहरण चुकलेलं असेल मान्य मात्र तुमचं चुकलेलं आहेच. कारण माझ्या उदाहरणात कुणालाही अर्थाअर्थी नुकसान होत नाही. ठीक आहे आर्थिक तोशीस समजून उमजून सोसली जाते. चोरी, खून, बलात्कारानं माणसांचं नुकसान होतं. तुम्ही वैचारिक नुकसान वगैरे म्हणत असाल तर चर्चांमधून उद्बोधन हा पूर्वीपासूनच सगळेच करत आलेत. रुढी मोडून उपयोग होत नाही, नवीन रुढी स्वीकारली जात नाही. मुळासकट बदल झाला तर नि तरच रुजते.
बाकी मुद्दे नंतर खरडवहीत बोलेन. वेळ मिळाल्यावर!
सरांनी इथे चर्चा प्रस्ताव नुसता टाकलाच नाही तर त्याबद्दल जास्तीचे वाचुन मिळालेली माहीतीही इथे शेअर केली.
प्रत्येक गोष्टीला परंपरा म्हणुन आग लावायची काही गरज आहे का? राखल्या आपल्या गोष्टी तर काही बिघडणार आहे का? किती वेगवेगळ्या प्रथा कानावर पडल्या, किती वेगवेगळे मुद्दे मांडले गेले, याचा विचार नाही. काय तर फक्त तुम्ही प्राध्यापक आहात. आहेतच ते प्र-अध्यापक, दिसुन येतच ते.
प्रतिक्रिया
तुमचा मुद्दा बरोबर आहे मात्र
प्यारेकाकांच्या फ्यानक्लबात
सरांनी इथे चर्चा प्रस्ताव
Pagination