Welcome to misalpav.com
लेखक: rakhee | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

विंदा करंदीकरांची एक छान कविता आहे शीर्षक आठवत नाही बहुदा "परंपरा" असावे. बघा मिळते का. मी घरी गणपती आणणे सुरु करू दिले नाही. सार्वजनिक गणपतींना भेट दिल्याचे आठवत नाही. आरत्या त्यातील गेयते मुळे आवडतात ,जशी कविता आवडते तश्याच, भजने,नाथांच्या गवळणी सुद्धा आवडतात पण कविता ,चाल ,संगीत आवडते तसेच. गावच्या उत्सवात सहभागी होतो पण त्यात भक्ती कमी मित्र मंडळीना भेटणे हाच उद्देश असतो " आयुष्य मजेत जाईल" या सदराचा मी सुद्धा चाहता आहे.

हस्तांतर....... विसर्जनसाठी गणपती नेताना..., मला गणेशची मूर्ती अवजड झाली तेव्हा.., उसळत्या तारुण्याचा..., नवीन पिढीचा..., माझा मुलगा मला म्हणाला : द्या इकडे मी गणेशची मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चोरांगासाहित..., मुलानेही मूर्ती हातात ठेवली नीट सावरून तर..., मी एका देंवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याचा मी पुन्हा तरुण ययातीसारखा..., माझा मुलगा जाक्ख म्हातारा परंपरेच्या ओझ्यांनी वाकलेला........ - द. मा. धामणस्कर

याबाबत एक अशीच गोष्ट आठवली. एका धनागाराकडे एक ओढाळ गुरु होते. ते पळू नये म्हणून तो त्याच्या पायाला दोरी बांधे. एकदा त्याने खुंटाला दोरी घातली पण गाठ बांधायला विसरला. आश्चर्य म्हणजे म्हसराने पळायचा बिलकुल प्रयत्न केला नाही. बेट्याला वाटले, आहेच खुंटाला दोरी बांधलेली ! मग काय, धनगर रोज दोरीचा वळसा मारून ठेवी अन म्हसरू गप्पगार उभे राही ! परंपरेच्या खुंटाचा हा एक फायदा निश्चित आहे, की ओढाळ मनाला लगाम घातला जातो...

आजकाल जो येतो तो "आयुष्य कसे जगायचे" यावरच उपदेशाचे डोस पाजायचा प्रयत्न करतो. असो... चालू द्या. अवांतरः "लोढणी टाका आयुष्य मजेत जाईल " हे वाचून लिन्क उघडण्याचा धीर झाला नाही

आणि मांजराचं उदाहरणही समर्पक आहे.... पण त्याचं काय आहे राखीताई, मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची हा मुख्य प्रश्न आहे. कारण तसं करायला गेलं की सगळी भाविक मांजरं आपली भाविकता विसरून एकदम फिसकारून अंगावर येतात आणि बोचकारतात!!! आमच्या हातांवरचे ओरखडे याला साक्ष आहेत... तरी काही हरकत नाही. आमचं सोडा, तुम्ही नव्या दमाने प्रयत्न करून पहा... :)

गणपतीचं ओझे?? बरं बरं... मला वाटायचं हल्लीच्या तथाकथित स्पर्धेच्या युगामुळे माणसांवर पैसे मिळवायचं ओझे वगरै येत असेल.......

नवीन घरात गणपती आणावा / एकदा घरी गणपती आणला कि तो कायम आणायला लागतो/ त्याचे सर्व सोपस्कार करावे लागतात या परंपरेचे आहे. वडिलांनी हौसेने गणपती आणायला सुरुवात केली ,त्यांच्या हयातीत त्यांनी आणला पण मुलगा निव्वळ आवड नसून परंपरा म्हणून आणत असेल तर ? जसे वडिलांना गणपती आणण्याचे स्वातंत्र्य आहे तसे मुलाला न आणण्याचे सुद्धा असावे असे वाटते .

कोणतीच लिंक उघडू नका फक्त लोढणे ओळखा ते ओळखल्यावर लोढणे मिरवायचे की टाकून द्यायचे हि तुमचीच मर्जी !!! सगळा घोळ होतो तो इतकाच कि एकाच्या लोढ्ण्याला दुसरा लोढणे समजत नाही आणि ते लोढणे मिरवण्यात झालेला आनंदही समजू शकत नाही वैतागाचे कारण आनंद होणे हि परिस्थिती न मानवणारी च असते

'गणपतीउत्सवामधला खर्च होणारा पैसा म्हणजे अपव्यय आहे, यात समजोपयोगी काही नाही' याच्याशी असहमत. यात होणार्‍या खर्चामुळे अनेकांना काम/पैसा मिळतो. देखावे केल्याने मांडववाले, लायटिंगवाले, देखावे करणारे कारागिर, सुतार यासारख्या कितीतरी लोकांना काम मिळते. देखावे बघायला अनेक लोक बाहेर पडतात. बाहेरगावहून लोक येतात. ते पैसे खर्च करतात त्यातून खाणं विकणारे, फुगे, धनुष्य-बाण आणि तत्सम खेळणी विकणारे लोक बर्‍यापैकी पैसा कमावत असतील. एकंदर खूप पैश्याची उलाढाल होते जे चांगलच आहे. कारण हा पैसा समजात फिरतो. स्पीकर्सच्या भिंतींचा त्रास होतो पण वर्षातून २-३ दिवसच असतो तो...

//स्पीकर्सच्या भिंतींचा त्रास होतो पण वर्षातून २-३ दिवसच असतो तो...// अहो कोणी धरून बडवले तरी १५-२० मिनिटांपेक्षा जास्त त्रास होत नाही.

स्पीकर्सच्या भिंतींचा त्रास होतो हल्ली जोरात स्पीकर बडवल्या शिवाय आनंद साजरा करता येत नाही असे काहीसे वाटु लागले आहे.कुठलाही सण असो कानठल्या बसणार्‍या आवाजात डोक फिरलयां आणि तत्सम गाणी जोरात वाजत असतात ! नक्की कोणाचं डोक फिरलय ? आणि कोणाचे डोके फिरायचे बाकी आहे हेच काही कळत नाही ! दहीहंडी आणि गणेश उत्सव हे आता उत्सव राहिले नसुन फक्त इव्हेंट बनले आहेत. :( अनंत चतुर्दशी आमच्या कॉलनीतला एका सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे विसर्जन सुरु होते... पहिला ट्रक जनरेटरना, दुसरा मोठ्या स्पीकर्सचा आणि तिसरा बाप्पाचा ! इतका भयानक आवाज होता की साधारण १ किलोमिटर तरी त्याचा आवाज जात असावा ! घरातल्या सर्व खिडक्या बंद करुन सुद्धा डोक कलकलायला लागल होत ! सतत डिजे लुंगी डान्स लुंगी डान्स वाजवत बसला होता ! तरी नशिब की माझ्या अंगात नाना पाटेकरचा संचार झाला नाही ते ! ;)