Welcome to misalpav.com
लेखक: अनिल तापकीर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मुल्ला नसिरुद्दिनचा एक ज्योक आठवला! एकदा मुल्ला लंगडत चाललेला असतो तर पाठीमागून त्याचा मित्र येतो आणि विचारतो, ‘काय झालंय लंगडायला?’ तर मुल्ला म्हणतो, एक बूट नऊ नंबर आहे आणि दुसरा दहाचा त्यामुळे प्रॉब्लम आहे’ ‘आयला मग दोन्ही दहा नंबरचे का नाही घेतले?’ ‘मुद्दामहून’! मुल्ला म्हणतो. `मी दोन पेअर घेतो आणि मग मिसमॅच करून वापरतो’ ‘आयला, मजाचंय, असं केल्यानं काय होतं?’ ‘घरी जाऊन बूट एकदा काढून फेकले की एकदम झकास वाटतं!’ मुल्ला त्याच्या सुखाचं रहस्य उलगडतो. या प्रदक्षिणा (आणि परिक्रमांच) असं आहे! इतका छ्ळ करून घ्यायचा जीवाचा की किरकोळ गोष्टी सुद्धा मस्त वाटायला लागतातं.

आयडी घेतला म्हणून बाप्याची बायडी होत नाही. तद्वत गाढवानं स्वतःला निराकार म्हटलं तरी ते गाढवंच राहातं... आता हे मी तुम्हाला सांगायला नको.

किरकोळ गोष्टी सुद्धा मस्त वाटायला लागतातं.
किरकोळ गोष्टी मस्त वाटणे एकवेळ परवडले हो, पण सगळेचकाही किरकोळ वाटणे हे जास्त धोकादायक नाहि काय ? आपण शक्य झाल्यास विचार करा खरी अनैसर्गिकता कशामधे आहे... की अतिश्रम झाल्याने लिंबुपाणीही अम्रुत वाटण्यात ? कि अमृतही लिंबुपाणिच वाटण्यात ?

प्रत्येक वेळी इतरांच्या श्रध्देची टर उडवायलाच हवी का? अशा प्रदक्षिणेतून इतरांना काही त्रास दिला जात नसेल तरीही इतरांच्या श्रध्देवर प्रहार करून आपण किती मोठे विज्ञाननिष्ठ हे दाखवायचा क्षीण प्रयत्न वाटला. असो. असल्या प्रदक्षिणा वगैरे करणे या जन्मी तरी जमेल असे वाटत नाही आणि त्याची इच्छाही नाही. तरीही असे निर्धाराने करणार्‍यांविषयी कौतुक वाटतेच.

चला एखादा उपक्रम ठरवला, तसा संकल्प सोडला की तो पूर्ण केल्याशिवाय चैन ना पडणे हे मनःशक्तीचे उदाहरण म्हणता येइल. काय असत; काही माणस संकल्प सोडतात, पहिल्या दिवशीचा पहिला शो बघणारच, काही म्हणतात एव्हढी दारु पिऊन दाखवणारच काही म्हणतात मी ध्यान लाउन बसणार काही ठरवतात,काही ठरवतात दुसर्‍याला शहाणपणा शिकवणारच (स्वतः शहाणं व्हायच राहिलं बाजुला)त्यामानाने तुमच्या मनात बरीच सात्विक भावना आहे. त्रास झाला तरी तुम्हा एकट्यालाच, विनाकारण दुसर्‍यांना त्रासवण्यापेक्षा हे फारच छान.अन मनाला शांती मिळत असेल, समाधान मिळत असेल, तर काय हरकत आहे?.

वा छान. (स्वगतः हायला, इतका मोक्ष मिळाल्यागत आनंद असल्या परिक्रमेतून मिळतो, तर लोक तिथेच कायमचे का रहात नाहीत? )

एक निरागस (की बाळबोध) प्रवासवर्णन म्हणून ठिक पण प्रदक्षिणा-परिक्रमा यावर एक पिंक टाकायची म्हणून, "चालता चालता आळंदीतील दोन साधक विध्यार्थी भेटले आमच्यासारखेच अनवाणी पायाने प्रदक्षिणा करत होते." प्रदक्षिणा अनवाणीच का घालायची बरं? मग कपडे तरी का घालायचे? झेपतील तेव्हडेच आत्मक्लेश करून घेउन अध्यत्मिक तृप्तीची घाणेरडी ढेकर देणं काही पटत नाही.

दादा, कपडे हे लोक लाजेस्तव घालतात, कपडे न घालायला त्यानी काही सर्वसंग परित्याग अथवा सन्यास घेतला नाही आहे. खूपच छान माहिती (फोटू दिसत नाही आहेत.)

सगळ्यात गोष्टींत काहीना काही कमी असतेच. या जगात १००% सफेद अथवा काळे असे काहीच नाही... सगळ्या करड्या रंगाच्या छटा असतात. ज्या गोष्टीने आपल्याला अथवा समाजाला त्रास होत नाही अश्या गोष्टीने दुसर्‍याला होणार्‍या आनंदावर विरजण घालणे म्हणजे त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्रमण नाही काय? कमीत कमी जे स्वतःला नि:पक्षपाती, भौतीक न्यायवादी किंवा सडेतोड (अथवा अजून काही...) म्हणवतात त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. कोणत्याही बाजूने टोकाची भूमिका घेणे ह्यालाच अतिरेक म्हणतात याचा नेहमीच "माझे म्हणणे किती चांगले/खरे आहे" असा पक्का ग्रह झालेल्या मंडळींना विसर पडतो :) ;)

ज्यांची मतं पक्की आहेत त्यांच्यासाठी मी लिहीत नाही. जे विचार करु शकतात त्यांच्यासाठी लिहीतो. जर आनंद झाला असेल तर विरजण कसं लागेल? ते पुढच्या प्रदक्षिणेची तयारी करतील. पण ज्यांना "ब्रम्हगिरिचि प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. कारण ब्रम्हगिरीचा पर्वत म्हणजे साक्षात शंकर आहे.".... यावर विचार करता येतो त्यांना माझं म्हणणं पटू शकतं. आणि मतं व्यक्त करण्यासाठी तर संकेतस्थळ आहे. ज्यांच्या मनात द्वंद्व आहे त्यांना तो व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला वाटू शकतो.

कोणी एखादा पर्वतारोही एव्हरेस्ट किंवा दुसरे एखादे शिखर चढून जातो... किंवा अगदी जे कोणी ट्रेकिंगला जातात आणि ते कष्ट करण्यात त्यांना आनद वाटतो, यात काही वाईट आहे काय ?

लेखकाला प्रदक्षिणेतनं पुण्य मिळवायचं आहे
"दृष्टी पडता ब्रम्हगिरी । त्यासी नाही यमपुरी ॥ "नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याच्या पुण्या नाही गणना ।।
...आणि माझं म्हणणं इतकंच आहे की प्रदक्षिणेनं कोणत्याही प्रकारची मुक्ती (त्यासी नाही यमपुरी) किंवा पुण्य मिळत नाही. टाईमपास कुणी काय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे (त्याला आक्षेप असू शकत नाही). माझं मत साधना आणि फलप्राप्तीविषयी आहे. आय थिंक यू हॅव गॉट द पॉइंट.

ह्या वेगळ्या भासणार्‍या गोष्टी कश्या वेगळ्या नाहीत यावर एक धागा लिहीण्याचा मानस आहे... तेव्हा तेथे विस्ताराने लिहीन. शिवाय, हा धागा जास्त भरकटवायला नको असे वाटते आहे.

इस्पीकचा एक्का, मुक्ती ही सर्वस्वी भिन्न डिरेक्शन आहे. टाईमपास आणि साधना यात फरक आहे. तरीही तुमच्या लेखाची प्रतिक्षा आहे. पोस्ट भरकटण्याची शक्यता नाही कारण खुद्द लेखकानंच म्हटलंय :
संजयजी, मला तुमच्या प्रतिसादाचे कहीही वाटले नाही कारण माझे जे विचार बनले आहेत ते अगदी लहान पणापासुन वाचलेले जे ग्रंथ आहेत त्याचेच सार आहेत कोणी काहिही म्हटले तरी मला जे योग्य वाटते ते मि करतोच,

खर्‍या नांवानं त्यांनी मनोगतवर लिहीलं होतं आणि मला व्यक्तिगत उल्लेख जास्त जवळचा वाटतो. तरी इथून पुढे आयडीचा उल्लेख केला जाईल.

वर्णन आवडले. बाकी वर ब्रह्मगिरीला जाउन आलात का नाही? सर्व बाजूंनी खडे कातळकडे असलेला ब्रह्मगिरी अतिशय सुंदर दिसतो. त्याचे ते कातळातून कोरून काढलेले दरवाजे, तसेच एका बाजूला माचीवर असणारा भंडारदुर्ग अफाट आहे. पलीकडे होणारे हरीहरचे दर्शन तर लाजवाब. हा घ्या तुमच्यासाठी ब्रह्मगिरीचा एका वेगळ्याच बाजूने फ़ोटू. a

तरी अर्थ बदलत नाही. आणि माझ्या (इतरांना दिलेल्या) प्रतिसादावर (दरवेळी) उपप्रतिसाद देण्याचे कष्ट कशाला घ्यायचे? मग पुन्हा विषय वाढला की....

माझ्या (इतरांना दिलेल्या) प्रतिसादावर (दरवेळी) उपप्रतिसाद देण्याचे कष्ट कशाला घ्यायचे?
:) काय करणार.तो किल्ला गेले काही महिने इतर अनेकांनी लढविला पण त्यातले बरेचसे खंदे वीर आता कंटाळलेले दिसत आहेत. निराकार गाढव यांचा सन्माननीय अपवाद वगळता.तेव्हा मधल्या काळात मी त्यांना साथ देतो आहे. काय करणार एकेकाची बुध्दीमत्ता.दुसरे काय.

वर्णन आवडले. वेगळं काहीतरी करणार्‍यांना सतत नावे ठेवली पाहिजेत असे काही नाही. ज्यांना अशा प्रदक्षिणा करायची नाही त्यांच्यावर कोणी सक्ती केलेली नाही. सवय नसताना निव्वळ इच्छाशक्तीच्या जोरावर ३० किमि चालणे याचेही कौतुक करता येते. गणपतीपुळ्याला जायला पूल झाले नव्हते तेव्हा आम्हीही दर वर्षी आरे वारे नेवरे असे ३ डोंगर पार करत जवळपास २० किमि चे अंतर चालत जाऊन परत येत असू म्हणजे (४० किमि एका दिवसात) त्याची आठवण झाली.

निश्चयाने एकादी कठीण कामगिरी - तसा त्यात काही भौतिक फायदा नसताही- ती पार पाडणे ही फार समाधानाची आणि आनंदाची बाब. अशी एक कामगिरी पार पाडून लेखाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवणे, हे आणखी विशेष.
दुसरी म्हणजे ब्रम्हगिरी आणि हरिहर पर्वत अशी मोठी साठ किलोमीटरची प्रदक्षिणा
ही मोठी प्रदक्षिणाही तुम्ही करावीत यासाठी शुभेच्छा. जीएंच्या ज्या 'प्रवासी' कथा आहेत, त्या तर अश्या परिक्रमाप्रेमींचा कळसच.

फारच छान लेख. ज्यांनी ही प्रदक्षिणा केली त्यांना या प्रदक्षिणेचे महत्व अन आनंद समजेल. उगाच टिका करण्यात काही हशील नाही. एक निरिक्षण नोंदवतो: आताच्या काळातील प्रदक्षिणा (फेरी) ही मिडीयाने केलेल्या हाईपमुळे वाढली आहे. हौशे गवशे नवशे या फेरीत मोडतात. भक्तिभाव कमी झाला आहे. गुटखा, नशिले पदार्थ खाऊन धांगडधींगा करत जाणार्‍यांचे कंबरडे मोडले पाहीजे. परिसरातील शेतांमधून सरळ लोकं चालत जावून पिकांचे नुकसान करतात. गर्दीच्या लोढ्यांत अपघात संभवतो. नाउमेद होवू नका. खरोखर आयुष्यात त्रंबकेश्वराच्या ब्रम्हगीरीची फेरी एकदातरी केलीच पाहीजे. नितांतसुंदर अनुभव असतो निसर्गसौंदर्याचा. शेवटी निसर्ग हाच खरा देव. एका फेरीत मला आलेला अनुभवः रस्त्यावर आदिवासी विक्रेता काठ्या विकत होता. एका टोळक्यातील एका मवाल्याने त्याला त्या काठ्यांची किंमत विचारत गुंतवून ठेवले. त्यानंतर त्या टोळक्यांतील इतर जणांनी मागून पळत येवून त्या आदिवासीच्या सगळ्या काठ्या पळवल्या. तो आदिवासी काय त्या टोळक्याला पकडू शकला? त्याने तक्रार केली? तक्रार तरी कुणाकडे करणार? पहाटेचे तीन साडेतीन वाजत होते, वरतून धुंवाधार पाऊस पडत होता.

आवडेश. बाकी स्वतः काही न करता कसही करून मिपा प्रसिद्ध होण्याकडे लक्ष देणार्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करा. असो, बाकी आम्हाला फोटू कै दिसले नैत बॉ !

खुपच सुंदर लिहिले आहे ! ( टीकात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करावे ... सगलेच लोक समान अध्यात्मिक / भावनिक पातळीवर नसतात ... || अंतर्स्थितीचिया खुणा | अंतर्निष्ठचि जाणती || )

मनोनिग्रह होणं ही कुठल्याही ध्येयप्रवासाची एक महत्त्वाची पायरी आहे. ते एक साधन आहे साध्य मिळवण्यासाठी. मात्र प्रत्येक साधनाच्या मूल्य नि मर्यादा असतात त्यानुसार यात्रा, तीर्थाटनं ह्यांचं एक मूल्य नि एक मर्यादा असं दोन्ही आहे. एखादं व्रत करणं, उपासतापास करणं हे एका ठराविक मर्यादेपर्यंत आवश्यक आहे. सकाळी पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही हा नियम मनाला वळण लावायला उपयुक्त आहे मात्र कालच रात्री चक्कर येऊन पडलाय नि अन्नाचा कण पोटात नाही मग आधी जेवायला हरकत नसावी. अन्यथा कर्मठपणा शिवाय हातात काहीही येत नाही. व्रताचा अभिमान, अहंकार वाढीला लागतो नि त्या त्या कर्माचा उपयोग ज्या दिशेला जाण्यासाठी करायचा ते राहूनच जाऊन गाडी भलतीकडे वळते. शाळेत जायला लागल्यावर दप्तराचं स्वरुप खराब करेल म्हणून चड्डी, नाक पुसायचा रुमाल, पाण्याची बाटली, खाऊच्या डब्यापासून सुरु होऊन कुठंतरी एक पेन नि एक वही असं होऊन पुढं काहीच नाही हातात मात्र सगळं डोक्यात तयार असं व्हायला हवं. अन्यथा दप्तराच्या रंगात, नि मुख्य म्हणजे आपण शाळेतच असं होऊन बसतं... मात्र पुन्हा एकदा सांगावं लागेल की शंभरातल्या ९६ ना तरी (हल्ली कदाचित संख्या कमी झाली आहे) शाळेत सुरुवात अशीच करावी लागते. सो शाळेत जावंच.

संजयजी, मला तुमच्या प्रतिसादाचे कहीही वाटले नाही कारण माझे जे विचार बनले आहेत ते अगदी लहान पणापासुन वाचलेले जे ग्रंथ आहेत त्याचेच सार आहेत कोणी काहिही म्हटले तरी मला जे योग्य वाटते ते मि करतोच, आणि आपण जि क्रूती करतो त्या पासुन जर आत्मिक समाधान क्रुती करणाराला मिळ्त असेल तर काय हरकत आहे. आणि प्रत्येक चांगल्या क्रुतीमधुन चांगले शिकायला मिळ्त असेल तर मला वाटते जे जे चांगले आहे ते ते नेहमिच करावे

तेच तर सांगतोयं इतके दिवस. ज्यांचे विचार पक्के आहेत त्यांना काही फरक पडत नाहीत. तुमचे विचार पक्के आहेत त्यामुळे तुम्ही प्रदक्षिणा करत राहणार. आणि शोध स्थिरत्वाचा आहे याची मलाही खात्री आहे त्यामुळे मी देखिल लिहीत राहणार. ज्याला पटेल त्यानी ते घ्यावं. तुम्हाला जे समजलंय ते इतरांच्या लक्षात आलं की सगळे वाद संपतील.

तुम्हाला जे समजलंय ते इतरांच्या लक्षात आलं की सगळे वाद संपतील.
हे तुम्हाला समजुन वाद संपले ? नाही ना ? मग ते इतरांच्या लक्षात येउन वाद संपतिल कशाच्या जोरावर म्हणताय ?

स्वतःला योग्य वाटेल ते अवश्य करावे. चार खवट अन रिकामी टाळकी काहीबाही बोलतील म्हणून उगा दाबून ठेवू नये. प्रदक्षिणेने समाधान मिळते किंवा नाही हा कुणालेखी वादाचा मुद्दा असेलही, तुम्हाला समाधान मिळाले हे सर्वांत महत्त्वाचे.

खुप जणांनी या लेखाविषयी आपली मते मांडली काहींना प्रदक्षीणा चांगली वाटली तर काहींना रिकामटेकडा उद्योग वाटला कुणी कशिही प्रतिक्रिया दिली तरी मला तरी मला त्याचे काहिही वाट्ले नाही कारण प्रतेकाचे विचार वेगळे असतात. सर्वांनी विचार व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद