Welcome to misalpav.com
लेखक: कलंत्री | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

विनम्र श्रध्दांजली. आपल्या संस्थळावर काही विपश्यनेची साधना करणारे काही सदस्य आहेत त्यांनी जरूर या धाग्यात भर घालावी.

त्यांच्या कार्याबद्दल आणि व्यक्तित्त्वाबद्दल अधिक माहिती मिळाल्यास आनंद होइल. आम्हाला इगतपुरीचा आश्रम फक्त माहीत आहे.

सत्यनारायण'जींना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धान्जली!... *~*~*~* ___________ आशु जोग- इगतपुरीव्यतिरिक्त पुण्यामध्ये स्वारगेटला आनन्द मंगल कार्यालयाच्या मागच्या लेनमध्ये विपश्यपना केन्द्र आहे. तसेच देवाची आळन्दी'च्या पुढे मरकळ येथे भव्य विपश्यना केन्द्र आहे........ :)

अनेको लोकांपर्यंत आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे हे तंत्र पोचवल्याबद्दल आपले कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. _/\_

विनम्र श्रध्दांजली. आज सकाळीच त्यांच्या निवासस्थानी अंतीम दर्शन घेउन आलो. अग्निकोल्हा यांनी वरती लिहीलय त्याच्याशी सहमत, अनेको लोकांपर्यंत आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे हे तंत्र पोचवल्याबद्दल आपले कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. हा माझा वैयक्तीक अनुभवही आहे. _/\_

विनम्र श्रद्धांजली. विपश्यनेबद्दल ऐकून माहिती आहे. किरण बेदी यांनी गुन्हेगारांना सुधारण्यासाठी प्रभावीपणे वापर केल्याचे वाचले आहे. लीमाउजेटने एक छान लेखमालिका लिहिली होती असे आठवते.

लीमाउजेटच्या लेखमालिकेचे दुवे http://www.misalpav.com/node/15515 http://www.misalpav.com/node/15525 http://www.misalpav.com/node/15538 http://www.misalpav.com/node/15558

मी जे पहिलं विपश्यना शिबिर केलं, त्याला (माझ्या सुदैवाने) श्री. गोयंका गुरुजी जातीने मार्गदर्शन करत होते. 'हा माणूस जे बोलतोय ते जगतोय' असं माझं (माझी वृत्ती अतिचिकित्सक असूनही) त्यांच्याबद्दल मत झालं आणि त्याला कधीही धक्का बसला नाही. त्यांनी मला जे शिकवलं त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे, नेहमीच राहीन. हे ऋण फेडता येण्याजोगं नाही!

एक योगायोग सांगतो. मी सोमवारी मुंबईत होतो, पण गुरुजींच्या निधनाची माहिती नव्हती. माहित असते तर निदान त्यांचे शेवटचे दर्शन नक्कीच घेऊ शकलो असतो. पण गुरुजींना प्रत्यक्षात पहाणे नशिबी नव्हते म्हणायचे.... :( -सूर्यपुत्र.

हे ऋण फेडता येण्याजोगं नाही, हे अगदी खरं आहे. मरकळ (पुणे ) येथील एक अनुभव , विपश्यना शिबिराला गेलो असता १० हि दिवस विपश्यना केंद्राच्या बाजूला एका मंदिरात कर्ण कर्कश्य आवाजात भजने लावली होती, मौन संपल्यावर , ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी कुंपणाला वडाची झाडे लावा अशी सूचना दिल्याचे आठवते. इगतपुरी चे केंद्र साधने साठी उत्तम ठिकाण आहे.