Welcome to misalpav.com
लेखक: जॅक डनियल्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आता माझी फाटली बेक्कार फाटली Afraid तुम्हाला मिपा कट्याला बोलावतांना पब्लिक दहा वेळ इचार करेल , कुठल्याश्या कॉल करून येत असला व पिशवीत मण्यार घेऊन उपहार गृहात आला तर लपडा होईल Scared Smiley

त्याची चिंता नसावी, मागच्या ४ वर्षात एक पण कॉल केला नाही मी. आणि आधी पण जेंव्हा करायचो तेंव्हा विषारी साप असेल तर तडक सर्पोद्यान (रात्री पाहते, कधी पण) हा नियम होता.

किती जणांच्या अंगावर काटा आला हा लेख वाचताना? हा लेख वाचून, मला आत्ताच्या आत्ता डझनभर मुंगूस व हनी बॅजर पाळावेसे वाटू लागले आहे.

ट्रेक ला जायला काहीच हरकत नाही... पण आपण जेंव्हा दुसऱ्या माणसाच्या घरी जातो तेंव्हा जसे सभ्य पणे वागतो तसे वागले पाहिजे, म्हणजे आपण काही न विचारता त्यांच्या बाथरूम मध्ये घुसत नाही. ट्रेक करताना.. या लेखात मिपाकर 'मोदकांनी' ट्रेक कसा करावा याची मस्त माहिती दिली आहे.

सरळ आणि सोप्प्या शब्दात . "फाटली" . फक्त एक प्रश्न . हि मण्यार . बेळगाव (उत्तर कर्नाटक) च्या आसपास पण सापडते का? असाच काहीसा साप पहिल्या सारखा (मारल्या सारखा :( ) आठवतो . कि या सापासारखी दुसरी हि एक बिनविषारी प्रजाती आहे? कुठे तरी वाचल्या सारखं वाटतंय . काळा साप होता . साधारण ४ साडेचार फुट . पट्टे होते कि नाही हे नाही लक्षात

एक विचारू का म्हणून "दोन" प्रश्न विचारले आहेत...;) हो, मण्यार ही अख्या भारतात सापडते,(फक्त हिमालयात नाही.)त्यामुळे बेळगाव मध्ये तुम्हाला दिसली असायची शक्याता आहे. मण्यार जाती सारखा " कवड्या" (वूल्फ स्नेक ) दिसतो, पण त्याची लांबी ४.५ फुट नसते. या बद्दल एक सविस्तर मी पुढे एक लेख लिहीन.

आयला . माण्यारच मेली म्हणजे . . :( एकाच्या शेतात मळणी ला गेलो होतो . रात्री शेतातच असलेल्या झोपडीत झोपायची तयारी करताना दिसली होती . काही कळायच्या आत मित्राच्या हातात असलेली कुदळ तिच्या डोक्यात मारली होती त्याने . . तेव्हा त्याला जबरदस्त शिव्या घातल्या होत्या . पण नंतर . . "अबे रात्री झोपेत चावली असती तर काय करणार होतास ? " या प्रश्नाला उत्तर नवतं . .

त्या गुहेतील प्रसंग ऐकून तर अंगावर काटा आला...! तंतरली आहे पुरती ! आता सुद्धा टेबलाखालून काही येईल से वाटते .. पाय वर उचलून घ्यावे म्हणतोय !

ते किती किती बरे आहे !!! तुमचे लेख म्हणजे नारायण धारपांच्या पुस्तका सारखे आहेत . धड वाचवत नहीत आणि वाचल्याशिवाय रहावत नाही !

सगळ्या मिपाकरांना माझे धन्यवाद् ! हा लेखाचा उद्देश तुमच्या मध्ये सापां विषयी भीती पसरवायचा नसून त्याबद्दल माहिती देणे आहे. ही माहिती वाचून कोणी सापाशी खेळ करायला जाणार नाही. अख्ख्या आयुष्यात तुम्हाला हा साप कधी दिसणार पण नाही, त्यामुळे घाबरू नका.

अख्ख्या आयुष्यात तुम्हाला हा साप कधी दिसणार पण नाही ऑ..?? जेडी - या वाक्याशी थोडासा असहमत. मण्यारीने आतापर्यंत शहरातच तीन चारदा दर्शन दिले आहे. वरती सूडने उल्लेखलेला प्रसंग बालगंधर्व जवळच झाला होता. (मी आणि अत्रुप्त आत्मा त्या सापाचे फटू काढायला येड्यासारखे त्याच्या मागे पळत होतो - मोबाईलचा कॅमेरा ऑन करून. त्यावेळी हा लेख आणि मण्यारीच्या विषाची दाहकता माहिती नव्हती!!) मण्यार वारंवार दिसण्यावरून पण काही अंधश्रद्धा / समज आहेत का..? ;-)

तुमचे भाग्य चांगले आहे की तुम्हाला दिसला. पण माझ्या अनुभवावरून साधरण पणे लोकांना साप दिसायचे प्रमाण कमी असते. शहरात त्याचा संबध येऊ शकतो कारण आपण त्यांच्या जागे वरच राज्य करतो. पण जसे शहाराबाहेर जाऊ तश्या सापांच्या लपायच्या जागा पण वाढतात, आणि मग ते आपल्या आजुबजुला असून पण आपल्याला दिसत नाही.

मण्यार सारखा साप चावल्या नंतर जखम साधारण पणे कशी दिसते ? हे महत्वाच आहे ? कारण झोपेत साप चावला हेच कळत नसेल तर प्रकर्ण फारच गंभीर आहे , परवाच वर्तमान पत्रात वाचल आदिवासी भागात अनेक लहान मुलांचे मृत्यू होत आहेत (लेखकानी असही सुचवले होते की लहान मुलांच्या हात किवा पाय आपल भक्ष्य समजून हे हल्ला करतात), त्यामुळे त्यानी शक्यतो मच्छरदाणीत झोपावणे किवा उंचावर अगदी खाट नसेल तर पाटावर असे काही उपाय सांगितले होते

मण्यार सारखा साप चावल्या नंतर जखम साधारण पणे कशी दिसते ? हे महत्वाच आहे ?
हे सांगणे खूप अवघड आहे, कारण जरी पुस्तकामध्ये जरी विषारी साप "असे दात लावतो !" असे दिले असेल तरी, तो प्रत्येक वेळी पूर्ण चावेलच असेल नाही, मृत्यू व्हायला घासून गेलेला दात पण पुरतो. उंचावर झोपणे, घराच्या बाजूला स्नेक त्रेन्चेस (एक खड्डा की ज्यातून साप आत येऊ शकणार नाही) आणि घराच्या आसपासचा परिसर खूप स्वच्छ ठेवणे हे काही उपाय आहेत.

(लेखकानी असही सुचवले होते की लहान मुलांच्या हात किवा पाय आपल भक्ष्य समजून हे हल्ला करतात) साप इतके निर्बुद्ध असतील असे लेखक महाशयांना वाटले कसे याचे आश्चर्य वाटते. सापाला चांगले दिसत नसले तरी त्यांची दृष्टी इतकी कमी नसते. शिवाय त्यांच्या वासाची शक्ती नक्कीच तीव्र असते कि उंदीर कोणता आणि बालकाचा हात कोणता यात फरक सहज करता येतो. त्यामुळे हे पटले नाही. आदिवासी भागात कुपोषणाने सर्पदंशापेक्षा कितीतरी जास्त मृत्यू होतात. आणि सर्पदंशाने होणारे मृत्यू हे जास्त करून मांत्रिकाच्या कृपेने होतात( एकतर सरकारी रुग्णालय जवळ नसतेच शिवाय मांत्रिक लोक छातीठोकपणे सांगतात कि मी याला बरा करतो या दोहोंमुळे तेथे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे) मुळात आदिवासी लोक जंगलात राहत असल्याने सापाशी भेट रोजच होते.

हो मी पहिला काल हा फोटो. तो जो बेडूक आहे, तो बुल फ्रॉग आहे. त्याच्या समोर जे येते तो ते खातो, पक्षी, सरडे, साप, विंचू...असे काही पण.. तुनळी वर खूप विडीयो आहेत त्याचे. आत्ता हिवाळ्याच्या आधी त्यांना खाऊन घ्यावे लागते नंतर ते बेडूक, जमिनीखाली जातात (Hibernation). यावेळी फक्त हा बेडूक क्यामेरा मध्ये पकडला गेला.

मागच्याच महिन्यात केंजळगडावर साधी मण्यार आडवी गेली…छोटा साप दिसतोय म्हणून २-३ मित्र धतींग करायला गेलेले त्यांना वेळीच हटकलं…ती 'मण्यार' आहे म्हणून सागितलं, मग काय त्यांचा उत्साहाचा पार मनमोहनसिंग झाला !

तुमचे लेख कौलारु खोलीत खाली बसून वाचणार नाही अशी शपथ घेत आहे. =O त्या भयानक मण्यारला किती गोड शब्दांत आणि उपमांमधे घोळवता हो...

साधी मण्यार (४-५ फुट ) ही साधारण करून पुण्यात सापडते हे वाक्य "पुण्यात साधारण करून साधी मण्यार (४-५ फुट )सापडते "अस असायला हवं होतं का? बाकी लेख उत्तमचं ...

आमच्याकडे हाच मण्यार एका लहान मुलाला चावला. त्याला कळलेच नाही कि त्याला साप चावलाय. 1 घंट्याने तो चक्कर येवून पडला. त्याला दवाखान्यात नेल्यावर कळले कि त्याला साप चावलाय. त्याची प्राणज्योत अगोदरच मालावली होती. नंतर आंम्ही घरात शोधल्यावर हा साप सापडला.

नाही - पाऊण मुसळ केरात. जेडीच्या लेखमालेचा संदेश आहे की साप सापडला की तज्ज्ञ सर्पमित्राला ताबडतोब बोलवा - तोपर्यंत मारू नका.

च्यायला नशीब ह्या मण्यार चा भाडोत्री मारेकरू अजून वापर करत नाही एखाद्याला टेकडीवर भरपूर पाजायची व मण्यार असलेल्या पिशिवीत त्याचा हात किंवा पाय न्यायाचा , काहीतरी टोचल्याचा भास व मग चिरनिद्रा आणि सरकार दप्तरी नोंद साप चावल्याने मृत्यू

एक विचारायचे राहिले ह्या विषारी सापांचा असा असा खून करण्यासाठी वापर फक्त शेरलोक होम्स च्या कथेत झाला आहे का वास्तविक जीवनात सुद्धा असे प्रकार घडले आहेत

२०११ मध्ये एका लखनौ च्या गारुड्याने TAX ऑफिस मध्ये त्याला लाच मागितली आणि जमिनीचे काम अडकवून ठेवले म्हणून नाग सोडून दिले होते. तिकडच्या लोकांची फार वाट लागली होती...ऑफिस मध्ये नाग सोडताना गारुडी . आता हे किती बरोबर का चूक ते मला माहित नाही, पण बिकट परिस्थितीचा परिणाम असावा.

उत्तम. बँडेड क्रेट असा जिचा उल्लेख आहे तिला आगीमण्यार म्हणतात असं मला वाटतं. पिवळ्या रंगाचे सुस्पष्ट पट्टे असतात. A http://thebutterflydiaries.wordpress.com/ येथून साभार संदर्भ. कॉमन क्रेट, नेहमीची मण्यार मात्र कोंकणात असंख्य वेळा घरात आणि आवारात निघालेली आणि दोनदा घरच्यांना चावलेलीही आहे. मांजराविषयी पैसाताईप्रमाणेच म्हणतो. मांजरांना सापाशी खेळण्याची आणि मारण्याची भयंकर हौस असावी. सापाला मारण्याच्या प्रकारात रक्त लागलेले मांजराचे तोंड पाहून काही दिवस तरी तिला मांडीवर घेऊन कुरवाळण्याची इच्छा मरत असे. साप हा निसर्गोपयोगी प्राणी, अन्नसाखळीतला एक घटक, समतोल राहण्यासाठी आवश्यक, उंदरांचा शत्रू आणि शेतकर्‍यांना उपयोगी अशा सर्व कारणांनी त्याला न मारणे आणि शक्यतो वाचवणे याला माझा पाठिंबा आहे. पण अगदी अनेक साप हातात पकडून, कॉलेजात स्नेक अवेअरनेस शो करुनही, माझ्या मनात सापाविषयी इतर प्राण्यांप्रमाणे कोणताही आवडणारा, मैत्रीपूर्ण इ इ भाग तयार होऊ शकलेला नाही. याला आपल्या मनातल्या पूर्वापार धारणाच कारण आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. कदाचित एक नैसर्गिक डिफेन्सिव्ह भागही असावा. पण तरीही, एकवेळ उंदरालाही मी गोंडस किंवा मजेशीर किंवा तत्सम काही मानायला तयार आहे, पण सापाचा स्पर्श थंडगार गिळगिळीत, त्याचा एकूण लुक आणि हालचाल हे सर्व केवळ किळसवाणं, भीतीदायक आणि शहारा आणणारंच असतं हा भाव मनातून काही केल्या घालवता आलेला नाही.. यात साप विषारी आहे की बिनविषारी याचाही संबंध नाही. काही लोकांना आवडीने साप पाळताना पाहिलं आहे. सापाचा विचार एक पाळीव किंवा मित्रवत प्राणी म्हणून निदान मलातरी करता येत नाही. शक्यतो सापाला मरु न देण्याकडे माझाही कल आहे, पण घरात साप निघाला आणि सर्पमित्राची सहज / जलद उपलब्धता नसेल तर कोणतीही जोखीम न घेता सापाला जिवे मारायला आजही मी मागेपुढे पाहणार नाही. अर्थात.. लेखमालेच्या उत्तमतेशी या मतप्रदर्शनाचा काही संबंध नाही.

हो, तिला आग्या मण्यार पण म्हणतात. मी फक्त कॉमन नाव सांगितले, सापांची भाग बदलला की नावे बदलतात. तुम्ही जे मत व्यक्त केले आहे ते अगदी बरोबर आहे.

मी तर असे ऐकलय कि मण्यार चावल्यावर माणूस बेशूद्ध पडतो. समोरच्या व्यक्तीला तो मृत दिसतो. कधी कधी डाँक्टरपण पेशंटला मृत घोषित करतात. पण ती व्यक्ती म्हणे जिवंत असते. आणि त्याचा अंत्यविधीपण उरकण्याच्या घटना घडतात. हे खरे आहे का?

मण्यारीचे विष मज्जासंस्थेवर हल्ला करत असल्याने माणूस कोमात जातो हे नक्की...पण पुढच्या गोष्टीबद्दल माहिती नाही.