Welcome to misalpav.com
लेखक: संपादक मंडळ | प्रसिद्ध:
नमस्कार मिपाकर हो, कळविण्यास आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २३/१०/२०१३ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने मिपा एडिटरमधे (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित चोप्य पस्ते करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल. १. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे. कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी इ. प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील, तरी दिवाळीच्या निमित्ताने स्वतंत्रपणे प्रकाशित करायला हरकत नाही. २. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने -विषय, आकार इत्यादिबाबतची) नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे. ३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : २३/१०/२०१३ ४. इतर अटी: साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच! ५. साहित्य पाठवण्याचा ऑप्शन. वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा. तुमचे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण १९ दिवस आहेत. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती! धन्यवाद!


Comments

मिपाच्या दुस-या वर्षी निघणा-या दिवाळीअंकासाठी शुभेच्छा. संपादक, दिवाळी अंकासाठी कै मदत बिदत लागली तर हाक मारा. -दिलीप बिरुटे

मिपाच्या ह्या दुस-या दिवाळी अंकासाठी खूप शुभेच्छा. दर्जेदार दिअं वाचायला मिळेल ह्याबद्दल शंका नाही :)

दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा साठी फोटो / चित्रे यासाठी एखादी स्पर्धा ठेवावी. तसेच त्या स्पर्धच्या निमित्ताने आलेले फोटो अंकात सहभागी करावेत् ही विनन्ती.

दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा साठी फोटो / चित्रे यासाठी एखादी स्पर्धा ठेवावी.
सहमत. . पण आधी निकष सांगून. किंवा नंतर रसग्रहण तरी, नुसते एकतर्फी नको.

सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.
भयकथा बाद का ?? *DONT_KNOW*

खरतर हे सांगायचे गरज नव्हती कारण पुर्वप्रकाशित साहित्य दिवाळी अंकात पुन्हा प्रकाशित करण्यात काहीच अर्थ नाही. तरीही मुद्दा वर धाग्यात उल्लेखला नाही म्हणुन

दिवाळी अंकासाठी पाठवलेले साहित्य पुर्वप्रकाशित असु नये. निदान मिपावर या आधी प्रकाशित झालेले साहित्य पुन्हा प्रकाशित करता येणार नाही, कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

तो त्या कथेचा परिणाम असेल चाफाभाऊ! कथा उत्कंठा वाढवत नेत असेल, मनात भय उत्पन्न करुन वाचायला उद्युक्त करत असेल, तर तो प्रकार किळसवाणा ठरत नाही. ही एक फार पातळ अन नाजुक रेषा ठरु शकते ठरवण्यासाठी, पण बिभस्त नसेल, मन गुंगवुन ठेवणारी असेल तर चालु शकेल. मागच्यावेळी मीच लिहीलेली सवाष्ण शेवटी थोडी ट्रॅजीक होत गेली, पण कथेच्या अनुषंगाने जाणारा मृत्यु वेगळा. एकूण या वेळी सणासमारंभात मन उल्हसित असावा असा काहीसा सूर आहे, तरीही अपवाद असतातच. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या लेखनाला कोणीही नाही म्हणु शकणार नाही.

कॅन्सरची कथा आणि अखेर मरण. शी शू वातनिस्सारण उलटी आदिंची वास्तवपूर्ण वर्णने किंवा त्यावर बेतलेले विनोद. इत्यादि शक्यतो टाळावे. मरणाचा उल्लेखही नको असे नव्हे.

त्यातल्या "स्स" मुळे विसिष्ट फील येतो
महानिर्वाण जाहले आहे! - (हसून हसून वातनिस्सारण झालेला) सोकाजी

आणि लाइफबॉयच्या मराठी जाहिरातीत देखिल, "लाइफबॉय हे जहां, तंदुरुस्ती है वहां" याचं भाषांतर, 'लाइफबॉय जेथे, आरोग्य वास करते तेथे' असं केलेलं असायचं. :)

दिवाळी अंकासाठी सुभेच्छा . अंध-श्रद्धा ,कर्म कांड , कला ,प्रवास वर्णन ,इत्यादी चालेल का?

तुम्हाला जे काही पाठवावंसं वाटेल ते पाठवा. प्रकाशित करण्याबद्दल अंतिम निर्णय दिवाळी अंक संपादकांचा असेल.

चोप्य पस्ते >>> लेखन आवाहन लिहून झाल्यावर पुन्हा एकदा वाचून पाहिले नाही काय?

पण ते मिपाच्या सं मं चे लिखाण आहे ना! चोप्य पस्ते हा मिपाकरांचा ट्रेडमार्क आहे!

पाकॄ नको
त्यांना बहुदा 'जिलबी' नको असे म्ह्णायचे असावे. :) - (जिलबीसारखा गोलगोल) सोकाजी

तुमच्याकडे काहि खास दिवाळी कॉकटेल वगैरे असेलच ना... नक्की पाठवा. शिवाय अभ्यंगस्नान आटोपल्यानंतर चावडीवर गप्पा मारायला घारुअण्णा गँग देखील आली पाहिजे यंदा.

लै दिवस झाले ग्यांग सुट्टीवर गेलीये. आणा आता लौकर. अन हो, चहासोबत अजून काहीतरी मागवले तरी चालेल. वाचकांनाही तेवढाच रुचिपालट.

माझ्या जिवाचे मधल्यामधे हाल झाले, मी मारे खून बिन करून मोकळा झालेलो, नियमावली वाचायचे कष्ट घेतले नाहीत हे काही वेगळे सांगायला नको ;) , आता परत हाणामारी करतोय, एखादा खून माफ कराल ना हो संपादक ;)

अहो,अहो तुम्ही लेखक मंडळी, आसा जीवाबीवाच हाल नका करुन घेऊ. निवांत हाना मारा चाफाभाऊ. काय लय लागल बिगल कुनाला तर देउ चिरीमीरी. तुमी सुरु ठेवा.

चला चाफासाहेब आता तुम्हाला सगळे खून माफ... खुद्द मिपासंमंकडून पाठिंबा म्हणजे काय ! लागा तलवारीना धार करायला आणि बंदूका साफ करायला... ठरवल्यापेक्षा दोनचार जास्त आत्मे मुक्त झाले तरी आता नो वरीज आणि नाचणीज ;)

मिपाच्या दिवाळी अंकांचे विशेष म्हणजे सर्व सामन्यांच्या लेखणीतून उतरलेले असामान्य लेखन त्यात उगाच उच्चभ्रू पणाचा लवलेश नाही.

सर्व मिपाकर आगाऊ लेखकांना शुभेच्छा. दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पहात आहे.

कृपया वरील वाक्य "सर्व मिपाकर लेखकांना आगाऊ शुभेच्छा" असे वाचावे. लिहिताना कळफलक गंडला आणि प्रकाशित करायच्या आधी वाक्य वाचलेच नाही. मालक/संमं, कृपया स्वसंपादनाची सोय ऊपलब्ध करून द्यावी ही विनंती.