Welcome to misalpav.com
लेखक: सस्नेह | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लेखन आवडले. तुम्हाला जो मेसेज द्यायचा होता तो वाचकांपर्यंत व्यवस्थित पोचलाय. अवांतरः सरकारी कर्मचारी म्हणजे दावणीला बांधलेली गुरे आहेत, असा केंद्र व राज्य सरकारांचा सदैव समज असतो.

हा हा. मजा आली. सरकारी कर्मचार्‍यांची शाळा सुटलीतरी जयंत्या आणि पुण्यतिथ्यांपासून सुटका नाही.

बिचारे गांधीजी! वर्षभर भिंतीला लटकावून ठेवलेले असतात. एक दिवस सर्कारी हुकुमाने आठवण करायची आणि तीही अशी? हे राम!!

पंधरा ऑगस्ट , २६ जानेवारी , २ ऑक्टोवर या तीनही सुट्ट्या रद्द करून त्यादिवशी सरकारी कर्मचार्‍यानी फक्त आठ तास इमानदारीत काम करावे. तीनही दिवसाना धन्य वाटेल ! ज्याना असे काम वर्षभर करावेच लागते उदा. डोंबिवली स्टेशनवरचा तिकीट क्लार्क .याना या दिवशी दुप्प्पट पगारी सुटी द्यावी.

सुंदर, हलके-फुलके, खुसखुशीत लेखन. आवडले. 'झाडूवाली दोन दिवस आलेली नसल्यामुळे ऑफिसची जवळपास कचराकुंडी झालेली.' 'वर फिरणाऱ्या एकुलत्या एक पंख्याच्या आडोशानं एक हवेची झुळूक मरगळून पिंगा घालत होती.' 'अंगाचा तिळपापड संयमाच्या पुरचुंडीत गोळा करून मी केबिनमध्ये शिरले.' 'पन्नास दुणे शंभर हातांनी निष्ठावंतपणे कडकडाट केला.' वगैरे वाक्ये विशेष उल्लेखनिय.

करुण विनोद आवडला. गांधीजींना याचीही सवय झालीच असेल आत्तापावेतो म्हणा. 'प्रभू, यांना क्षमा कर, ते काय करताहेत ते त्यांना समजत नाहीय' असे म्हणून सोडून देतील झाले.

आमच्या कार्यालयात आणि आजुबाजूच्या सरकारी कार्यालयांत आम्ही गांधीजीपुजा न करता, कार्यालय आणि परीसर स्वच्छ करणे, कार्यालय( नीटनेटके करणे इ. केले.. गांधीबाबा खुष झाले असावेत, असा अंदाज आहे.. :-)

कुंकवापुरतं सौभाग्य... :( पण हा अनुभव गांधीजयंती किंवा इतर सरकारी कार्यक्रमांपुरताच नाही. "मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव" अशा सर्वच ठिकाणी येतो.

रघुपती राघव राजा"राम" पतित पावन सिता"राम" हे कुछ कुछ होता हे या चित्रपटातल्या याच गाण्याच्या वेस्टर्न मोडवर म्हंटले गेले आहे असे समजुन घेणे. ;)

एखादा प्रसंग खुलवून सांगण्याच्या स्नेहाताईंच्या हातोटी बद्दल काय बोलावे, ते मस्तच जमले आहे नेहमी प्रमाणे सरकारी कर्मचार्‍यांशी नेहमी टेबला समोरुन आणि कधिकधि टेबलाखालुन संबंध येत असल्य मुळे त्यांच्या बद्दल सहानुभुती तर कधिच वाटत नाही. त्या मुळे प्रसंग वाचुन बरे वाटले. त्या दिवशी सुट्टी न मिळाल्याबद्दलची जळजळ थोडी कमी झाली. फक्त एखादे लांबलचक भाषण पण झोडले असते नारळ फोडल्यावर तर अजुन बरे वाटले असते. रच्याकने :- गांधीबाबा म्हणजे काय मारुती आहे का नारळ फोडायला?

नशिब! गांधीबाबांनी दुसरी मान पुढे केली नाही हार घाला म्हणुन! काय एकेक पंचेस आहेत. वाह! खुर्च्यांना अन साहेबपणाला शोभा काय, संयमाची पुरचुंडी काय, आग्गागागा, विचारु नको.

ल्ल भारी ! शॉटावर शॉट हन्लयिसा !!! गांधी जयंतीचा पार बेंदूरच. गुलाल काय अन खडीसाकर काय !!! बाबाला एकदिवस दारूचाबी निवद दावतील. एकदम बेश्ट लिवलयिसा !!

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार ! आय ई वापरल्यामुळे काही टायपो मिस्टेक्स राहिल्या त्याबद्दल क्षमस्व. स्वसंपादन लवकर सुरू होवो.

मस्त लिहिलेय स्नेहातै. अगदी परफेक्ट वातावरण उभे केलेस. तुझ्या समर्पक शबदरचनांचा वापर लैच आवडतो. बांधीव अन अनुभवसमृध्द लिखाण. खूप खूप शुभेच्छा. :)