Welcome to misalpav.com
लेखक: साऊ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

प्राप्त परिस्थितीशी झगडून आऊने शक्य तो मार्ग शोधला. त्यातल्या त्यात कमी मानहानीचा. नीतिनियमांच्या चौकटीत तिला कोणी अन का बसवावं? तशी तर मला तिच्या सवतीचीही काही चूक वाटत नाही. तीही फसवणुकीची बळीच.

कारण लैगिकतेच्या नजरेतुन बघितले तर त्यात अयोग्य ते काय आहे बोआ ? अन तसही लैंगीकताच सोडली/दुर्लक्षिली तर स्त्रि अन पुरुषांत तुम्ही अजुन नक्कि कोणते भेद माणता बोआ ?

ऑ? मग आई वडिल लग्न कशाला लावुन देतात ब्वा? सासूला टाईमपास म्हणुन छळ करायला अन सासरघरची धुणी भांडी करायला? लिहीलेला संदर्भ काय ओळखीतून प्रेमविवाहाचा आहे? मी तुला जसा आहेस तसा स्विकारते म्हणायला?

@अग्निकोल्हा, अपर्णा, माझं म्हणणं, निव्वळ वय झालं म्हणून लग्न केलेल्या, कुठलीही जबाबदारीची जाणीव नसलेल्या, घरच्या घरी एक सुख मिळवण्याचं साधन म्हणून बायकोकडे बघणार्‍या कोणत्याही व्यक्तीला 'पुरुष' म्हणणारांना, मानणारांना नि मुळात त्या व्यक्तीला 'सलाम' असं आहे. टीपः सलाम हा शब्द आत्यंतिक चिडेनं वापरला आहे. कारण अशा व्यक्तिंमुळे आयुष्याचं मातेरं झालेल्या बायका घरासभोवती बघितल्या आहेत. त्यातही मानानं जगणार्‍या आहेत मात्र त्यांची परवड संपता संपत नाही. बघवत नाही.