Welcome to misalpav.com
लेखक: प्रमोद देर्देकर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ह्म्म... हे बर्‍याच वेळा पाहिले आहे. या लोकांची ती ढकल गाडी मात्र सर्वांनकडे सारखीच आहे असे का कोणास ठावुक पण वाटते.लहान आंधळी मुले हातात टिपर्‍या घेउन गाणं म्हणत पैसे मागतत्,काही आंधळे मात्र एखीदी चीजवस्तु विकताना आढळुन येतात... कधी कधी वाटते यांना कोणी जबरदस्तीने पैसे मागायला तर लावत नसेल ना ? {याची शक्यता वाटते खरी !)तसेच खांद्यावर एखाद तान्ह झोपलेल मुल आणि हातात छोट्या ताटलीत कुंकवान माखलेल्या देवीची तसबीर घेउन पैसे मागणार्‍या स्त्रीया देखील पाहिल्या आहेत. जाता जाता :- जो पर्यंत शरिरात प्राण आहे आणि पोटात भूक तो पर्यंत जगण्याची धडपड ही करावीच लागते !

आई ग! एकदा नखरा म्हणुन नेसलेली साडी माझ्या आधी आत गेल्याने मला ट्रेनमध्ये ओढलेली आठ्वते आहे लेडीज डब्यात. हे रडु फुटल होतं.

पोटासाठी वेगवेगळी कामे माणसाला करावी लागतात ! मध्यंतरी तू-नळीवर असाच एक व्हिडीयो माझ्या पाहण्यात आला होता. मोठ्या स्कायस्क्रेपरवर जे उंच टॉवर बांधलेले असतात त्यात लाल दिवा बसवलेला असतो ते बदलण्याचे काम जे कामगार करतात ते फारच भितीदायक वाटते. त्यांच्या डोक्यावरच्या टोपीत बसवलेल्या कॅमेराने हा व्हिडीयो रेकॉर्ड करण्यात आला आहे.

आपल्या रोजच्या रोजीरोटीसाठी सगळेच जण मेहनत करत असतात. याच जगण्यासाठी त्याची चाललेली धडपड, जिद्द आणि उमेद याला माझा सलाम!
असहमत. तो स्वाभिमानाने कष्ट करून खात असेल तर सलाम-बिलाम. जास्त *भीक मिळते म्हणून या स्टेशना वरून त्या स्टेशनावर स्टंट करत विनातिकिट प्रवास करत असेल तर कसलं कौतुक? मग भलेही तो फिजिकली चॅलेंज्ड असला म्हणून काय झालं? याच न्यायानं उद्या भर गर्दीत वेगात जाणार्‍या वाहनाची पर्वा न करता लहानग्यांना कडेवर घेउन (हाय पोटेंशिअल असलेल्या गिर्र्‍हाइका समोर ती रडावीत म्हणून प्रसंगी त्यांना चिंमटा घेउन) सिग्नलला भीक मागणार्‍या बायकांनाही सलाम कराल. *
आपल्याला मिळालेली चिल्लर रक्कम हातात खुळखुळवत बाहेरील पळणारी दृश बघत होता.
यावरून तो भिकारी असावा असं वाटतं. तसं नसल्यास वरचा प्रतिसाद बिनशर्त मागं घेतो.