Welcome to misalpav.com
लेखक: सुधीर मुतालीक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अगदी मलासुध्दा हातपाय धडधाकटपणा असुन मी कधी चँपिअन बनलेलो नाही. पण People with Special Needs...! ही टॅग लाइन केवळ विनरवर कशीकाय फोकुस (केंद्रित) होउ शकते हाच खरा प्रश्न आहे... एकटा हंसराज म्हणजे People with Special Needs...! न्हवे. इट इस वेरी वास्ट एंड जिनेरिक टर्म येट फिल्म फोक्सेस ओनली ऑन हंसराज लोन. सिरीअस्ली गॉट कंफ्योसन बिटवीन द ट्रु सब्जेक्ट ऑफ शॉफि. वाज इट "Dreams Matter" ऑर "People with Special Needs...!" असो, ४च दिवसात आपण खडक काम केलय हे नक्कि.

"शिखरावर नजर असणाराच वरपर्यंत पोहोचु शकतो" आणि people with special needs स्वतःच एक प्रश्नचिन्ह म्हणुन उभे ठाकलेले असतात. त्या अवघड प्रवासात जर तुम्ही अशी शिखरे पाहुन काही स्फुर्ती घेत असाल तर अगदी घ्यावा लागणारा प्रत्येक अवघड श्वासही सुलभ होउन जातो. फक्त विनर दाखवणे हे बाकिच्या कष्टांना विसरुन काहीतरी आपणही घडवु, आपल्यालाही असे बनता येइल हा विचार मनात सुरु करण्याचा एक मार्ग आहे. तरीही....हंसराज ओपन कॅटॅगीरीतुन एमपीएस पास होउन तहसीलदार बनतो यात त्याच्या special need चा कोणताही हातभार नसावा. तेथे त्याची स्वतःची बुद्धीमत्ताच कामी आली. किती हसरा उमदा चेहरा! सुधीरजी तुम्ही शेवटी दाखवेपर्यंत त्याच स्पेशल असण लक्षातही नाही आलं. जियो हंसराज..जियो सुधीरजी!

हंसराजची जिद्द खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे.तुमचे चित्रिकरण व सादरीकरणही आवडले. स्वाती

नि:शब्द.... कशाला द्याद द्यावी तेच समजत नाही.... केवळ एक-दोन तासात योग्य तो विचार करून ठाम निर्णय घेण्याच्या तुमच्या क्षमतेबद्दल की ह्या हंसराज पाटील ह्यांच्या जिद्दी बद्दल... शेवटी सामान्य माणुस जे करतो तेच केले...वाचनखूण साठवली....

विषयाची निवड जरी तुमच्या हातात नसली तरी मिळालेल्या विषयाची काहि तासात इतकी प्रभावी मांडणी व ते करताना एक वेगळा विचार देणयाचा तुमचा प्रयत्न आवडला. हा व्हीडिओ पाहिल्या नंतर मी धडधाकट असुनही एक "People with Special Needs" आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. श्री हंसराज यांच्या जिद्दीचे त्यांच्या पराक्रमाचे मनापासुन कौतुक व तुम्हाला मनापासुन शुभेच्छा.

सुंदर, हंसराज पाटील यांची जिद्द आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. मुतालिक साहेब तुमचे हा छंद जोपासा. समाजोपयोगी आहे.

सुंदर, हंसराज पाटील यांची जिद्द आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. मुतालिक साहेब तुमचे हा छंद जोपासा. समाजोपयोगी आहे.
असेच म्हणतो.

असा विषय घेऊन, शिवाय इतक्या थोड्या वेळात आणि थोडक्यात सगळं आलं पाहिजे या नियमांना धरून इतकी चांगली फिल्म बनवलीत! तुम्हाला जास्त वेळ मिळाला तर तुम्ही आणखी खूप काही करू शकाल!

समस्त मिपाकरांचे महाप्रचंड आभार. आपणा सर्वांच्या प्रतिसादांनी हुरूप आलाय पुन्हा असा काही प्रयत्न करण्यासाठी !!

सुधीर मुतालीक तुमचा पहिलाच प्रयत्न म्हणून अभिनन्दन व एक चान्गला विषय सादर केल्याबद्दल धन्यवाद !
माणसाचा निश्चय, साध्य साधण्यासाठी अविरत परीश्रम घेण्याची तयारी, प्रचन्ड आत्मविश्वास व सकारात्मक द्रुष्टीकोन असेल तर काय होउ शकते ??? त्याचे हंसराज पाटील यांचा हा असा स्फुर्तीदायक प्रवास हे उत्तर.....!!!
आता सुरवात केलीच आहे तर येउद्या असेच उत्तम चित्रपट, शुभेच्छा. विनोद१८