Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अजीर्ण होण्यासारखं दवणीय लेखन. उरलीसुरली कसर,
अपशकुन मी मानत नाही मात्र शुभशकुनांवर विश्वास ठेवतो. जय माता दी म्हणत नकळत मजसारख्या नास्तिकाचेही हात जोडले गेले. चमत्कारांवर माझा विश्वास नाही मात्र नशीबावर आहे
वा ओळींनी भरून काढली.

चान चान! अवांतरः कधीतरी मोराच्या समोर उभं राहून पिसारा बघावा माणसानं. सदानकदा कसं मागं जाऊन उघडं ढुंगण बघायची इच्छा? बरं बघितलं तर बघितलं, गप बसावं की... सगळ्यांना सांगत बसायचं!

अवांतर आवडले.. छिद्रान्वेषीपणा निव्वळ ! उगा मताची पिंक टाकून शुभ्र पांढर्यावर डाग पाडायचे.

:D आपल्या मताचा आदर आहे. ते मत कितीही वेळा सगळ्यांना सांगण्याच्या स्वातंत्र्याबद्दलदेखिल आदर आहे.

प्यारे काका संपादक पदासाठी हार्दिक शुभेच्छा ;) . . आणि अवांतर विटेकरबुवा, पांढरेशुभ्र वातावरण पण सुतकी वाटू लागते हो नंतर. किंवा प्रियदर्शनचा चित्रपट पाह्ल्याचे फील येते. शुभ्रावर आहे रंगीबेरंगी प्रतिसादाची सोय तर असु द्या की थोडे पिंक, थोडे मरून. काय बिघडले? . (फ्यान ऑफ दि मिपा आयडी दादा कोंडके)

खिक्क्क. अरे ते प्यासा मधलं गुरुदत्तचं गाणं टाका रे कुणीतरी... ये दुनिया गर मिल भी जाये तो क्या हय ;) 'संपादक पदे दु:खाची शिराणी' रे अभ्या...

मला मुळात दवणीय या शब्दाचा अर्थच माहीत नसल्याने आपल्या मताशी सहमती किंवा असहमती तुर्तास दाखवू शकत नाही. तसेच आपण याचा अर्थ उलगडण्यास मला मदत व्हावी या हेतूने ज्या पोस्ट कोट केल्यात त्यातूनही काही अर्थ लागत नाहीये. याला माझे अज्ञान समजू शकता मात्र एकंदरीत आपल्याला हि लिखाणाची शैली भावली नाही असा सूर लागतोय, म्हणूना खास आपल्या सोयीसाठी माझे इतर काही विविध शैलीतले लिखाण खाली देतोय. कृपया त्यावर मत द्यावे जेणेकरून आपली आवड समजेल. .............. १) पाच आदमी एक उस्सल और पाव नही ??? -- http://misalpav.com/node/23912 - यात हृदयस्पर्शी लिहिण्याचा प्रयत्न केलाय, अन बहुतेक तो जमलायसा वाटतो, माझ्या आवडत्या कथांपैकी एक. २) च्याईला परत तिचा फोन आला -- http://misalpav.com/node/23959 - यात जराशी खुसखुशीत सुरुवात करून शेवट थोडासा सेंटी कसा करता येईल हे बघितलेय. ३) माझी पहिली ऑर्कुट डेट - http://misalpav.com/node/24008 - हा माझ्या डेटींगचा एक किस्सा पुष्पक फेम कमल हसन छाप विनोदी अंगाने लिहायचा प्रयत्न केलाय. ४) एक रात्र सरपटलेली - http://misalpav.com/node/24103 - भयप्रद अन अंगावर काटा आणणारी किळसवाणी कथा. ५) माझी गडचिरोली सफर - एक थरारक अनुभव -- http://misalpav.com/node/24225 -- नावाप्रमाणेच थरारक, आणखी काय वर्णावे ! ६) माय ईंग्लिश वॉल्कींग - http://misalpav.com/node/24483 -- एक प्रयत्न आचरट विनोदी लेख लिहिण्याचा. ७) एक सिगारेट पिणारी मुलगी -- http://misalpav.com/node/24641 -- या कथेला कोणत्या कॅटेगरीत टाकावे हे समजत नाही, आपणच वाचून एखादा शब्द सुचवावा. ८) हो मीच ती एक सिगारेट पिणारी मुलगी -- http://misalpav.com/node/24715 -- वरच्या कथेचाच पार्ट टू.. पण मुलीच्या दृष्टीकोनातून विचार करून.. ९) बालक पालक आणि मी -- http://misalpav.com/node/24832 -- हा एक लेख लिहायचा प्रयत्न.. कितपत जमला सांगालच.. १०) एक हरवलेली मैत्री -- http://misalpav.com/node/24872 --- कथा क्रमांक १) उस्सलपावसारखीच हि देखील एक हृदयस्पर्शी कथा, अन हि देखील माझ्या आवडत्यापैकी एक.. ११. अ) सावल्या -- http://misalpav.com/node/25331 ब) वॅलेंटाईन डे -- http://misalpav.com/node/25337 क) धाडस -- http://misalpav.com/node/25382 या तीनही अनुक्रमे शतशब्दकथा आहेत... प्रत्येकात शेवटी एक ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केलाय.. १२) फिर मिलेंगे भाईजान - http://misalpav.com/node/25594 -- दादा कोंडके प्रोफाईल नावाला जागायचे म्हटले तर हि सुद्धा आवडू शकते.. ;) .................... थोडेफार लिखाण इतर आयडीने केले असल्याने ते तुर्तास सांगू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व ! तरी यातले आपल्याला कुठल्या प्रकारचे वाचायला आवडेल हे समजल्यास आणि पुढच्या वेळी तसे काही लिखाण करायचा योग आल्यास आपल्या खरडवहीत येऊन लिंक देऊन जाईन. मात्र कृपया "आवरा" असे म्हणू नका, प्रत्येक लिखाण प्रत्येकालाच आवडेल असे नसते, काही लिखाण मला स्वतासाठीही करूद्या की. ज्या दिवशी माझे नाव बघूनच इथले लोक त्यावर क्लिकायचे बंद होतील, वाचनांची संख्या आटेल त्या दिवशी मी स्वता आवरते घेईन, अर्थात लिखाण नाही तर इथे प्रकाशित करायचे थांबवेन. तळटीप - वर मी माझ्या कथांच्या लिंका दिल्यात याला कृपया जाहिरात करतोय असे समजू नका.. हवे तर स्वस्तुती समजू शकता, कारण ती मी करतो.. मला ते आवडते.. ज्या गोष्टीने दुसर्‍याला त्रास होत नाही पण मला स्वताला आनंद मिळतो ते सारे मी करतो.. (एक शंका - हा डायलॉग सुद्धा दवणीय मध्ये मोडतो का?) अवांतर - माझे नामबंधू अभ्या यांच्याशी सहमत, थोडे प्रतिसादांचे वेगवेगळे रंग धाग्यावर उधळू देण्यात काहीच हरकत नाही, त्या निमित्ताने मिपाकरांना तुमचा अभिषेक नामक इंद्रधनुष्यातील आठवा रंग बघायला मिळेल. :)

दवणीय म्हणजे मराठीत 'मशी'. :) मी प्रत्येक प्रतिसाद देताना लेखकाबद्दल कोणताही पुर्वग्रह न ठेवता मत देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही वरती लि़ंक दिलेले बरेच सगळेच लेख मी वाचलेत. आवडल्याबद्द्ल प्रतिक्रियाही दिल्यात. पण "ती आणि मी - सुख.." ही मालिका जरा जास्तच ताणत आहे असं वाटलं. माझी वैयक्तीक आवड म्हणा (बाकी वपु पहिल्यापासूनच आवडत नाहीत) किंवा वाढत्या वयाचा परिणाम म्हणून हे असलं शब्दबंबाळ, गोग्गोड, गुलाबी लेखन वाचवत नाही. त्यात रात्री-अपरात्री निघालेल्या देवीच्या मिरवणुका, गुलाल उधळणारी गर्दी, रस्त्यावरची भटकी कुत्री, बस स्टॉपवर बसलेलं टोळकं यांना यु टर्न घेउन रोमँटीक संवाद वाचणं म्हणजे पिटातल्या प्रेक्षकांना खुष करण्यासाठी हिंदी चित्रपटातला वन रूम किचेन मध्ये राहणारा हिरो "सेहत के लिये मै स्विझ्झर्लंड जाउ?" संवाद ऐकण्यासारखं वाटलं.
तरी यातले आपल्याला कुठल्या प्रकारचे वाचायला आवडेल हे समजल्यास आणि पुढच्या वेळी तसे काही लिखाण करायचा योग आल्यास आपल्या खरडवहीत येऊन लिंक देऊन जाईन.
हा हा. :)
मात्र कृपया "आवरा" असे म्हणू नका, प्रत्येक लिखाण प्रत्येकालाच आवडेल असे नसते, काही लिखाण मला स्वतासाठीही करूद्या की.
ते "आवरा" म्हणजे एक वाचक म्हणून या लेखाला दिलेली स्पाँटॅनिअस प्रतिक्रिया होती. त्याच्याशी तुम्ही लिखाण थांबवण्याचा संबंध नाही.
ज्या दिवशी माझे नाव बघूनच इथले लोक त्यावर क्लिकायचे बंद होतील, वाचनांची संख्या आटेल त्या दिवशी मी स्वता आवरते घेईन, अर्थात लिखाण नाही तर इथे प्रकाशित करायचे थांबवेन.
ऐसा कैसे मिया? तुम लिकते जाओ. हमकु भाया तो तारीफ करेंगे नै तो गाली देंगे. पर बुरा मान्नेका और रुकने का नै. :D

काही हरकत नाही दादा, मी पण तेवढीच संधी घेतली लिंका देऊन जाहीरात करायची, तुमच्या प्रतिक्रियेत वापरलेल्या शब्दांबद्दल राग नव्हताच, कारण मला या सुखाच्या मालिकेवर दोन्ही प्रकारचे प्रतिसाद मिळताहेत, आणि ते मी स्विकारोनही लिखाण चालू ठेवतोय कारण काही जणांना हे आवडत नाही म्हणून ज्यांना आवडते त्यांच्यासाठी तरी लिहायला हवेच ना... ज्यात एक मी स्वताही आहे आणि माझी बायकोही आहे.. बाकी शंका असलीच तर ती हेतूवर होती, तुम्हाला माझ्यापेक्षा मराटी आंतरजाल जास्त माहीत असेल, काही जण चांगल्याला चांगले म्हणणार नाहीत पण जिथे खुसपट काढायची संधी मिळते ती सोडणार नाही, अर्थात अश्यांना मी इग्नोरच करतो, पण वर म्हटल्याप्रमाणे जाहीरात बाजी करायचा चान्स घेतला... असो, पण आपण यातील नक्कीच नाहीत याची खात्री पटली, क्षणभरासाठी गैरसमज झाला त्याबद्दल क्षमस्व ! :)