Welcome to misalpav.com
लेखक: मारवा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

श्री ब्याट्मन आपण हा ब्लॉग वाचता हे वाचुन आनंद झाला. असे सर्व ब्लॉग प्रकाशात यायला हवेत असे मनापासुन वाटते,

आपण उल्लेखलेल्या ब्लॉगवर विपुल, दर्जेदार आणि अप्रतिम नोंदी आहेत. लेखकाची शैली खिळवून ठेवणारी आहे आणि त्याच्याकडे माहितीही भरपूर आहे. पण या ब्लॉगवरील मराठी नोंदी इतक्या कमी आहेत की त्याला मराठी ब्लॉग म्हणता येईल का? - असा प्रश्न पडतो. लेखकही त्याला 'द्वैभाषिक ब्लॉग' म्हणतो आहे. अर्थात इंग्रजीतून मराठी साहित्याविषयी बरेच काही लिहिले आहे आणि ते अत्यंत वाचनीय आहे; याबाबत दुमत नाही. याच्याइतका दुसरा अप्रतिम ब्लॉग - हे किंचित मनोरंजक वाटलं! एका जगात एकच चांगली गोष्ट असू शकते; दुसरी नाही - हे मत, हा दृष्टिकोन मला तरी समजत नाही. शिवाय 'अप्रतिम' साहित्य (किंवा खरं तर कोणतीही गोष्ट) ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असते. पण ते असो. आपल्याला हा ब्लॉग माहिती आहे तर 'रेघ'ही माहिती असेलच.

एका जगात अनेक चांगल्या गोष्टी निश्चित च असु शकतात ( including blog) असे च माझे ही मत आहे. याच्याइतका दुसरा अप्रतिम ब्लॉग असे म्हणतांना फक्त या सारखा दुसरा असे म्हणायचे होते. या हुन ही सुंदर असतील आणि त्यांचाच तर शोध घेत आहे. बाकी एक अशा प्रकारची आणखि एक शोध मोहीम लता मंगेशकर वर येउन थांबली आहे पुढे जात च नाही काही केल्या,

I have already thanked Marva for his/her kind words for my blog. I just wish to comment what I felt reading Aaativas's comments above. I have always wondered what "Marathi blog" is...Does it have to be written in Marathi? What if its ethos is Marathi but is written in Tamil? (btw- Is Thanjavur Marathi acceptable Marathi? Believe me, I have sat though a few conversations where T.M was spoken and I did not understand a word!) I don't know how many of Misalpav.com's writers/readers have read Vidyadhar Date's excellent reporting on "Marathi culture" in The Times of India of yesteryears? For me, it is as much 'Marathi' as any Marathi I have come across. Arun Kolatkar's 'Jejuri' is written in English. Is it any less Marathi than poetry of Tukaram? (I am probably being arrogant invoking Kolatkar in my defence.). A lot of us now use Marathi interspersed with English rather freely at home/ office/ social media etc. Misalpav.com is a pathbreaking website dedicated to Marathi culture/ way of life and I am grateful that one day in October 2013 my tiny blog rode it to reach a lot of people it would never have otherwise. best, Aniruddha G. Kulkarni

एका चांगल्या आणि सातत्याने लिहिल्या गेलेल्या ब्लॉगची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! मात्र ब्लॉग लेखकांनी इथे आपले उत्तर मराठीत लिहिले असते तर जास्त आवडले असते. आणि त्यांचा लेखनाचा अनुभव लक्षात घेता ते नक्कीच मराठीतून लिहू शकले असते!

बाकी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ब्लॉग इंग्लिशमधे लिहिलात तर तो अमराठी भाषिक लोकांपर्यंत सुद्धा पोचेल याची कल्पना आहे, पण हे संस्थळ विशेषत्वाने मराठीत लिहिण्यासाठी आहे, त्यामुळे इथे तुम्ही बिनधास्त मराठी लिहू शकता, कारण मराठी न समजणारे इथे कोणीही नाही! मिपावर स्वागत! यापुढे तुमचे मराठी लिखाण इथेही प्रसिद्ध करत चला. शुभेच्छा!