Welcome to misalpav.com
लेखक: माम्लेदारचा पन्खा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

दोन्ही गीते छान आहेत.. पण अधिकृत राष्ट्र्गीत एकच असावे/ असु शकते त्यामुळे त्यातील जन गण मन निवडले गेले.. नेहेरुंनी निवडले.. त्याने देशाचे मातेरे कसे झाले .. आणि यात राजकारण काय आणि कसे?

नाटक करुन गांधीजींवर चिखलफेक करुन झाली. आता रास्।ट्रगीतावरुन नेहरुंवर चिखलफेक सुरु झाली. वाजवा रे वाजवा ! २०१४ आले.

जरा शब्द तरी नीट टन्काना,राष्ट्रगीत असा.
सध्या शब्दावर आहेत. थोड्यावेळाने शुध्दलेखनावर घसरतील. संघप्रेमींचा आता शिमगा चालू होइल. ताई माई आक्का पंजावर मारा शिक्का.

साहेब आता राष्ट्रगीत हा शब्द नीट नाही लिहिला/टन्कला त्यावरुन लोकान्च्या राष्ट्रगीताबद्दलच्या भावना कळुन येतात त्याचा ईथे सन्घ्रप्रेमी असण्याचा काय सम्बध? आणि मुळात मी स्वता कुठे शुद्धलेखन तपासतो तर दुसर्याच्या शुद्धलेखनावर लिहीणार (घसरणार)?

जावु द्या हो.. मुळात ज्याने धागा काढला त्याने फक्त "नेहरू आणि गांधी" हे शब्द वापरले.म्हणून त्यांनी "संघ" हा शब्द अ‍ॅड केला असावा.. चला आपण आपले स्मॉल पेग घेवू या...

पेग कसले? चाइ अथवा कषायपेय तेव्हडे चालेल्,कारण बाकी आम्ही गवत खाणार्यात मोडणारे असल्याने,अभक्षभक्षण तसेच अपेयपान हे वर्ज्य आहे.

बघा हा असा अर्थाचा अनर्थ होतो... "पेग" हे द्रव पदार्थ मोजायचे एकक आहे. आपण आपले दोघेही स्मॉल पेग अख्खा भरून कोक पियु या...उरला तर बांधुन घेवू... बोला कधी येताय डोंबिवलीला..

प्युअर गवतखौ असलेले कैक ओळखीचे लोक अट्टल दारुडे शोभतील इतकी दारू ढोसणारे पाहिले आहेत. आपण दोन्हीपैकी काही करत नसाल, कौतुकच आहे. पण ती कारणमीमांसा अंमळ गंडलेली आहे इतकेच सांगतो आणि अवांतरातून रजामंद होतो.

"मुझको रजामंद करलो . दरवाजा बंद करलो " हे रजामंद का रे ब्याट्या ? मला रजामंद म्हणजे `हापिसला रजा न घेणारा ` असे वाटायचे.

'रजामंद' म्हणजे ”तुला जे काही करायचंय, त्यासाठी मला तयार कर ” असा अर्थ गाण्यात अभिप्रेत असावा.. ('लोटन कबूतर' प्रेमी) चिगो

रजामंद चा अर्थ: मोरोपंतांची सुप्रसिद्ध आर्या: "शादीके लिये रजामंद कर ली, मैने इक लडकी पसंद कर ली" यातून स्पष्ट होत आहे. 'पटवणे, सहमत करणे इ. बघा: http://www.youtube.com/watch?v=ZFyJtRCFgcw http://www.youtube.com/watch?v=UE65HF_1Caw http://www.youtube.com/watch?v=BZOCi41J1Qk

अरे काय चाल्लंय काय? धागा काय, विषय काय, चर्चा काय? ह्या बघू इकडे कोपच्यात आपापले द्रवपदार्थ नि भक्षण करायचे पदार्थ घेऊन. 'बसून' बोलू. ;) -गवताळ प्या रे

गंभीर विषयावरील धाग्यावर अवांतर करून त्याचा खरडफळा करणार्‍या मुक्तविहारी, अनिरुद्ध प, बॅटम्यान, अभ्या, आणि प्यारे१ यांचा कडकडीत णिशेढ.

माझा का म्हणून? मी गरीब सगळ्या अवांतरकारांना किंवा सगळ्या गरीब अवांतरकारांना किंवा कसेही... कोपर्‍यात 'एकत्रीकरण' करुन 'मंडल' करुन 'उपविश' करुन बौद्धीक घेणार्‍यांची चिंतन बैठक घेणार होतो. जेणेकरुन चर्चा सुरळीत नि शिस्तीत चालावी.

या गंभीर धाग्याचा शेवटी ख"रड"(पट्टी)फळाच होणारे, त्यात चार क्षण सुखाचे अनुभवू म्हटले तर संमंला बघवेना बघा. घोर कलयुग...

तुम्ही मध्ये येव्वुन लिहील्याबद्दल तुमचा पण णिषेध.. (ज्योती ताई रागावू नका हो...मी ना थोडा सिरियश मूड मध्ये होतो)

धन्यवाद, आपण पहिलेच आहात कि जे माझ्या सारख्याचे कौतुक करत आहात्,कारण बर्याच ठीकाणी मागासलेला orthodox,वगैरेत सम्भावना केली जात होती,त्यामुळे पुनस्च धन्यवाद्,अवान्तर रजामन्द होणे म्हणजे माझ्या मते स्विक्रुती देणे असा होतो,तर आपल्याला रजा घेतो असे म्हणावयाचे आहे असे समजतो.

मागासलेला orthodox
स्वानुभावाने सांगतो , हेच लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. काही दिवस जाउ द्यात. पण हेच क्षण संभाळायचे असतात.. आजिबात पीअर प्रेशर ( मराठी शब्द? ) येऊ देऊ नका !

नेहरूंचे मुस्लिम प्रेम जग जाहीर आहे आणि त्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी मुस्लिमधार्जिण्या केल्या यात नवल नाही. मातृभूमीला देवता स्वरुप मानणे, सगुणपूजा ही हिंदू संकल्पना आहे त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या मुस्लिम बांधवांचा त्याला विरोध होता. अनुनय करण्यासाठी काँग्रेस शरण जाणरच ! " वंदे मातरम" हे अत्यंत स्फुर्तीदायक गीत आहे. संपूर्ण वंदेमातरम तर अफलातून आहे. समजा या गीतापासून स्फुर्ती घेऊन निद्रिस्त आणि सुस्त हिंदू समाज जागृत झाला तर काँग्रेस पुन्हा निवडून कशी येणार ? या सार्या गोष्टी अत्यंत चीड आणणार्या आहेत पण त्याच्या मुळाशी आपला निलंड्पणाच आहे हे ही तितकेच खरे !

समजा या गीतापासून स्फुर्ती घेऊन निद्रिस्त आणि सुस्त हिंदू समाज जागृत झाला तर काँग्रेस पुन्हा निवडून कशी येणार ? आँ !!!! म्हणजे काँग्रेसने वंदे मातरम राष्ट्रगीत म्हणून मान्य नाही केले तर तुम्हा हिंदुंची ते गीत म्हणायला कुणी तोंडं धरुन ठेवली आहेत का? तसेच म्हणायचे की ! मूळ वंदे मातरम जेंव्हा स्वातंत्र्यापूर्वी गाजत होते तेंव्हा कुठे त्याला न्हेरुंचे सर्टिफिकेट मिळाले होते? मग आता तुम्हाला त्या सर्टिफिकेटची गरज का पडावी? तसेच म्हणा की राव! उद्या म्हणाल, आम्हाला नेहरुनी रात्री दुधाचा पेला दिला नाही, म्हणून आम्हाला पोरं झाली नाहीत .. हिंदुंना गाणं म्हणायचंच आहे तर तसेच म्हणावे. कुणीही अडवलेले नाही.

वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयजशीतलाम् शस्यशामलां मातरम् । शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुर भाषिणीं सुखदां वरदां मातरम् ।। १ ।। वन्दे मातरम् । कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले, अबला केन मा एत बले । बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरम् ।। २ ।। वन्दे मातरम् । तुमि विद्या, तुमि धर्म तुमि हृदि, तुमि मर्म त्वं हि प्राणा: शरीरे बाहुते तुमि मा शक्ति, हृदये तुमि मा भक्ति, तोमारई प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम् नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरम् ।। ४ ।। वन्दे मातरम् । श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरम् ।। ५ ।। वन्दे मातरम् ।।

हे गाणे लिहीले तेव्हा भारताची लोकसंख्या फक्त सात कोटी होती? की ती फक्त बंगाल्यांची संख्या आहे? आमची आपली एक शंका बरं का! गाण्याला आमचा विरोध नाही आणि हे राष्ट्रगीत झाले तरी काही हरकत नाही.

पूर्व + पश्चिम बंगाल मिळून ७ कोटी असणार. कारण १७७० मधे बंगालच्या मोठ्या दुष्काळात ३ कोटीपैकी १ कोटी लोक मृत्युमुखी पडले होते. वंदे मातरम बद्दल बरीच चर्चा विकिवर सापडली. http://en.wikipedia.org/wiki/Vande_Mataram सुरुवातीपासून या गाण्याला धार्मिक रंग असल्याची चर्चा झाली तरी राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेली आहे. १८८२ नंतरच्या सगळ्या राष्ट्रीय चळवळी "वंदे मातरम" च्या आधारे लढल्या गेल्या. आमच्या लहानपणी शाळा भरताना जन गण मन तर शाळा सुटताना वंदे मातरम म्हणायची पद्धत होती. बहुतेक पब्लिक कार्यक्रम संपताना वंदे मातरम म्हटले जात असे. २००६ पर्यंत फार मोठे वाद झाले नव्हते. त्या वर्षी मात्र मोठेच प्रकरण घडवून आणण्यात आले. कोणी बंदी घातली तरी वैयक्तिक पातळीवर वंदे मातरम चे महत्त्व कित्येक मुस्लिम सुद्धा मान्य करतात. ए आर रहमानने तर वंदे मातरम वर अख्खा आल्बम काढला आणि त्यातलं "माँ तुझे सलाम" ऐकताना काहीही गैर वाटत नाही. वंदे मातरम मधली तीच भावना!

इथे फक्त गाण्याचा सम्बन्ध नसून त्यामागे किती द्ळिद्री विचार आहेत हे पण पाहिले पाहिजे..... मलाही असेच वाट्ले होते की ह्यात काय असणार पण हा गहन मुद्दा आहे...बाकी वन्दे मातरम झकासच आहे.......

देश फक्त हिंदूंच्या मालकिचा आहे काय? देश सर्वधर्मियांचा आहे .राष्ट्रगित सर्वांच्या पसंतीला उतरले आहे. जन गन मन उर्दु किंवा अरबी भाषेत आहे काय? मुस्लिमांनी ख्रिच्चनांनी ते स्विकारले हा त्यांचा मोठेपणा आहे. पोँक्षे हे कट्टर गांधीद्वेष्टे आहेत. कोणता तरी मुद्दा उकरुन काढायचा आणि हिंदू मुस्लिमांत लावून द्यायची हा या संघिष्ट लोकांचा आवडता उद्योग असतो.

देश फक्त हिंदूंच्या मालकिचा आहे काय? देश सर्वधर्मियांचा आहे हायला , हे माहीतीच नव्हतं , बरे झाले सांगितले ते ! जन गन मन उर्दु किंवा अरबी भाषेत आहे काय? नाही , पण तसे करुन घ्यावे , तुमचं काय म्हणण आहे ? मुस्लिमांनी ख्रिच्चनांनी ते स्विकारले हा त्यांचा मोठेपणा आहे. डोळे पाणावले ! केव्ढा हा मोठेपणा ! कोणता तरी मुद्दा उकरुन काढायचा आणि हिंदू मुस्लिमांत लावून द्यायची हा या संघिष्ट लोकांचा आवडता उद्योग असतो. अरे वा! हे काय संघाने तुम्हाला कानात येऊन सांगितले काय ? रच्याकने तुमचा आवडता उद्योग काय आहे ?

हिन्दू-मुस्लीम तेढ वाढवायची आणि नंतर दोन्हिवर राज्य करायचे हा कावा लोकांनी कधीच ओळखला आहे.

"जन गण मन" हे पंचम जॉर्ज वर रचलेले आहे.. असे वाचलेले आहे.. तर ते राष्ट्र गीत व्हावे का? आता ह्यात संघाचा किंवा हिंदूंचा काय संबंध?

गांधीजी ,पंच्चावन्न कोटी ,गोहत्या ,राममंदीर /सेतू यांचा वापर करुन संघ आणि त्यांचे भाट जातीधर्मात आग लावायचे काम करत असतात ,इथे संघा संबंध येतो.

कारण गेल्या १०-१२ वर्षांत भाजप प्रणीत गुजरात राज्यात दंगली अजिबात झाल्या नाहीत पण कोंग्रेस प्रणीत राज्यांत मात्र झाल्या. हे पण संघाचेच राजकारण असावे. मुझफ्फर (उ.प्र) ला काय झाले? का ते पण संघाचेच राजकारण हो? आझाद मैदानात नक्की काय झाले? का ते पण संघाचेच राजकारण? बरे ते जावू दे पण भारतावर जे अतिरेकी हल्ले झाले त्यात जास्तीत जास्त कोण होते? का ते पण संघाचेच राजकारण?

ह्या! मुवि आसल काय इचारु नका. आवो आगदी क्रिकेट खेळ्ताना सुद्धा आम्ही भारताच्या भाकरी मोडत पाकिस्तानला आगे बढो म्हणणार. तुमी आगदीच ह्ये बगा!

गुजरातेत दहा वर्षात दंगली झाल्या नाहीत याचे कारण हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांना आपण वापरले गेलो आहोत याची पुरती जाणिव झाली आहे, फेकू मोदीचा या शांतिवादाशी काडीचाही संबंध नाही/नसावा. आणि उपरोक्त इतर गोष्टींची आणि हल्ल्यांची सुरवात(आझाद मैदान वगैरे) बाबरी मशिद पाडल्यानंतर झाली , बाबरी कुणी पाडली हो!!! .... आता असे म्हणू नका कि संघाचा त्याच्याशी कशाला संबंध जोडता म्हणून :-P लोक भूलथापांना जास्त दिवस बळी पडत नाहीत. ;-)