Welcome to misalpav.com
लेखक: माम्लेदारचा पन्खा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

@ ग्रे.थि. आपण ज्या काही ४ ओळी खरडल्या त्या बद्दल आभार.. पण ते मुझफ्फर नगरचे राहिलेच बघा... असे एक एक करून कसे चालेल? तुम्ही जरी विसरलात तरी मी नाही ना विसरु शकत... तो पर्यंत अजून एक होम वर्क "अफगणिस्तान मधील बौद्ध मुर्तींचे काय झाले?" बाकी तुमची पदरा आड लपण्याची व्रुत्ती माहित असल्याने हा होम वर्क फक्त तुम्हालाच आहे...

बामियानात काय झाले! मला कशाला विचारताय? तूमा हिंदुत्ववाद्यांच्या धर्मानुसार बुद्ध हा विष्णुचा नववा अवतार आहे ,मग तूमी जायचे कि तिकडे.... कि तुमच्या उड्या अयोध्येपलिकडे जात नाहीत. :-P

काय हो तुम्ही आजचा ग्रुह पाठ तर लगेच पुर्ण केलात. पण त्या मागच्या ग्रुह पाठाचे काय? बाकी काही ही म्हणा पण तुमचे अवतार कार्य फार जोरदार सुरु आहे..नाही म्हटले आमच्या शंकांची उत्तरे द्यायला वेळ मिळायला लागला म्हणून विचारले.... का तिथे पण कूणाच्या पदरा आड लपत होतात? तुमच्या स्मायली पण जाम भारी असतात हो.

खरंय... 'जन-गण-मन अधिनायक जय हे भारतभाग्यविधाता' हे तेव्हा पंचम जॉर्जच्या सन्मानार्थ म्हटलं गेलं, आता आपण ते नेमकं कोणाला उद्देशून म्हणतो हे अजुनपर्यंत उमगलेलं नाही. वैयक्तिक पातळीवर मी ते तिरंग्याला उद्देशून म्हणतो आणि स्वतःचं समाधान करून घेतो. बाकी वंदे मातरम कधीही उजवेच वाटत आले आहे. बाकी स्वतःच्या देशाचं जागतिक पातळीवर अधिकृत नाव ठरवताना आधीपासूनच भारत, आर्यवर्त, हिंदुस्तान(-ज्यांनी हे नाव ठेवलं त्यातले बहुतांशी नंतर भारतीय संस्कृतीचा भाग झाले असा ग्रह आहे. चुकलो असल्यास खुलासा करावा.) असे पर्याय असतानासुद्धा परकीयांनी सुचवलेला इंडीया हा पर्याय वापरण्याची लाचारी ज्यांच्यावर यावी त्यांनी राष्ट्रगीत निवडतानाही पुरुषार्थ दाखवला नाही यात काय नवल??

तुमचे हिंदुत्ववाद्यांचे एकदा १३ दिवसांचे व नंतर चार वर्षे सरकार असताना तुम्हाला आर्यावर्त असे नामांतर करण्यासाठी गागाभट्टाकडून मुहुर्त काढून हवा होता :-Pकाय ? करुन टाकायचं कि नामांतर तेव्हाच.. १४ ला मोदीबाबा पीएम झाले तर मिपातर्फे एक नामांतराचे निवेदन पाठवून द्या ,कसे ? 'आर्यावर्त गव्हर्नमेँटचा सुर्वंट !

हे पाहा ग्रेथि, मी इथे हिंदुत्ववाद्यांच्या बाजुने, किंवा नमोंच्या बाजुने बोलत नाहीये. आपल्या पहिल्या वहिल्या राज्यकर्त्यांनी मुळात देशाचं नाव ठेवतानाच स्वाभिमान बाळगण्याचा सूज्ञपणा दाखवायला हवा होता एवढंच म्हणतोय. आणि तुम्हांला आर्यवर्तच दिसलं का हो?? मी इतर नावंही सुचवलीयत की... इंग्रजीत BHAARAT लिहिणं कसंसच वाटेल का हो तुम्हांला? आणि काय हो, माणूस हिंदूंच्या बाजुने बोलतोय म्हणजे तो संघाचा, भाजपचा.. मराठीच्या बाजुने बोलतोय म्हणजे मनसेचा, असं गृहित धरून बोंबलत सुटता ते!! मी हिंदूंच्या बाजुने बोलत असेन तर संघ, भाजप किंवा हिंदुमहासभेची वकिली करण्याचा मक्ता घेतल्यागत त्यांच्या बाबतीतल्या तक्रारी काय ऐकवत सुटताय!! धर्माचा, भाषेचा, जातीचा कैवारी असल्याचा दावा करणा-या संघटनांपेक्षा त्या धर्माची, भाषेची आणि जातीची व्याप्ती आणि समाजजीवनातलं महत्त्व मोठं नाही का? आणि त्याबाबतीतलं व्यक्तिगत मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कसंतरी करून ते मत खोडून काढण्यासाठी लगेच वर नमूद केलेल्या आणि तशासारख्या कोणत्याही संघटनांशी त्याचा संबंध जोडण्याची काय गरज? त्याच्यामुळे मांडलेल्या वैयक्तिक मतामध्ये जे तथ्य आहे, ते कसं खोटं ठरवणार तुम्ही??

चांगला प्रतिसाद. चारपाच मुस्लिम संघटना वंदे मातरमला विरोध करतातेत म्हणून सगळे मुसलमान त्याचा विरोध करतात. असा इथल्या अनेकांचा गैरसमज आहे किंवा टीनपाट लोक तसा तो करुन देतात. आपण तिथे टंकायचे श्रम घेतल्याचं दिसत नाही

तुम्ही पण ना अगदीच हे आहात बघा... उघाच ते वेड पांघरून पेडगावला जायचे सोंग आणू नका.. तुमच्या खरडवहीत लिहीले आणि संदेश पण पाठवला. पण तुम्ही माझ्या शंकांची उत्तरे न देता भलतेच कुठे जाता? असे कसे चालते हो तुमच्याकडे गड्या?

जनगनमन तेंव्हा वंदे जॉर्जला उद्देशून होते का आणि आज कुणाला उद्देशून आहे, याची चर्चा 'वैदिक' मंडळीनी करायची म्हणजे अजबच आहे! ऋग्वेदातील एके काळचे ब्रह्मणस्पतीचे सूक्त गणपतीसाठी आजचे वैदिक दुकानदार वापरतात. ऋग्वेदातील इंद्राच्या डाव्या आणि उजव्या हाताचे सूक्त हेदेखील आज गणपतीच्याच सोंडेचे वर्णन आहे, असेही हेच दुकानदार सांगतात आणि ते देखील बिनदिक्कतपणे आज गणपतीसाठी वापरतात. ऋग्वेदातील रुद्र सूक्त आज शंकराचे म्हणून हीच मंडळी वापरतात. आणि , समजा, ते जनगनमन पंचम जॉर्जलाच उद्देशून असले , तर न्हेरु मात्र ते भारताला/ विधात्याला का वापरतात ? असा प्रश्न विचारुन हीच वैदिक मंडळी इंटरनेटावर गळाही काढतात !!!! :)

त्या सुर्वंटाला आधी बाजुला करा बघु उगीच खाजखुजली पसरायची,(आमचा गावठी ईनोद हो आपला)

असल्या टीनपाट लोकांची फालतू व्याख्याने ऐकून रक्त-बीक्त खवळून घेणारे लोक आहेत, हे बघून आश्चर्य वाटलं, जरा शाळेची पुस्तकं वाचली असती, तर अन्वयार्थ लावणं सोपं गेलं असतं !

गांधीजी ,पंच्चावन्न कोटी ,गोहत्या ,राममंदीर /सेतू यांचा वापर करुन संघ आणि त्यांचे भाट जातीधर्मात आग लावायचे काम करत असतात ,इथे संघा संबंध येतो. फिस्स्कन हसायची स्मायली !

तूमि स्मॉल थिँकरच राहणार, तूमची डोकी चालत असती तर विकासाच्या मुद्दावर राजकारण केले असते, पण तसे नाही ,त्याऐवजी विद्वेष पसरवणार्या संघटना काढायच्या ,संघाची कल्पना हेडगेवारांनी हिटलरच्याच धर्तीवरुन उचलली होती .त्यांचे गेस्टेपो तसे तुमचे 'खाकी चड्डीवाले' ... एवढाच काय तो फरक.बाकि शुद्ध आर्य रक्त वगैरे मसाला कॉमन ठेवला आहे.

आमच्या वरील शंकांची उत्तरे तर द्या... बाकी जमेल तशी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो... "विकासाच्या मुद्दावर राजकारण केले असते" हिंदूस्थानाचा विकास न होण्यामागे प्रमूख कारण आहे आणि ते म्हणजे लोकसंख्या.आता ती कशी आटोक्यात आणायची ते बघा. दुसरे कारण म्हणजे समान नागरी कायदा.. आता तो पण कसा आणायचा ते बघा. "त्याऐवजी विद्वेष पसरवणार्या संघटना काढायच्या" हे एकदम पटले बघा.अजून संघावर बंदी नाही पण नक्की किती संघटनांवर बंदी आणली आणि ती का हे पण सांगा की... "संघाची कल्पना हेडगेवारांनी हिटलरच्याच धर्तीवरुन उचलली होती .त्यांचे गेस्टेपो तसे तुमचे 'खाकी चड्डीवाले'" हे पण पटले बघा.फक्त थोडा फरक आहे.आज देशावर कुठेलीही नैसर्गिक आपत्ती कोसळली की हेच ते चड्डीवाले इतरांना कपडे आणि इतर वस्तू देतात... "बाकि शुद्ध आर्य रक्त वगैरे मसाला कॉमन ठेवला आहे." हे काही पटले नाही गड्या. आता बघ ना अमिर खानची,शाहरूख खानची बायको हिंदूच आहे ना? आणि आपले सलमान भाउ पण एका हिंदू मुलीच्याच प्रेमात पडले होते.. असो... वेळ मिळाला तर माझ्या शंकांची पण उत्तरे द्या...

चड्डीवाले आपत्तीकालात मदत करतात ?? :-P मी तरी कधी बघितले, ऐकलेले नाही. आपत्तीकाळात चमकोगिरी करणारे काहीजण असतात त्यातला हा प्रकार दिसतोय. ;-) एवढाच देशसेवेचा पुळका आहे तर सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करायचा विषय निघाल्यावर या तथाकथित राष्ट्रसेवकांना पोटशुळ का उठतो ???? स्वतःच्या भावाच्या मनीऑर्डरमधले दहा रुपये कापून घेणारे ज्यांचे आदर्श आहेत ते चड्डीवाले आपत्तीकाळात मदत करायला जातात... वा रे मदत :-P :-P

"चड्डीवाले आपत्तीकालात मदत करतात ?? Blum 3 मी तरी कधी बघितले, ऐकलेले नाही." संघवाले मदत करतात ही बातमी आपल्या पर्यंत आली नाही का? मग एक काम करा.आत्ता उत्तर भारतात पुर आला तेंव्हा कोण कोण गेले होते त्याची जरा माहीती घ्या.माझ्या माहीतीप्रमाणे संघ वाले गेले होते. "एवढाच देशसेवेचा पुळका आहे तर सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करायचा विषय निघाल्यावर या तथाकथित राष्ट्रसेवकांना पोटशुळ का उठतो ????" मुळात मी सच्चर आयोग वाचलेला नाही त्यामुळे मला माहीत नाही.आणि मी काही संघाची धोरणे वगैरे ठरवत नाही.त्यामुळे आपणच ह्या बद्दल जास्त सांगू शकाल. "स्वतःच्या भावाच्या मनीऑर्डरमधले दहा रुपये कापून घेणारे ज्यांचे आदर्श आहेत ते चड्डीवाले आपत्तीकाळात मदत करायला जातात... वा रे मदत" ही पण कहाणी मला माहीत नाही.त्यामुळे आपण म्हणता तसे पण असेल.मान्य करतो.पण काय हो? औरंगजेब आणि शहाजहान स्वतःच्या भावांचे खून करून गादीवर आले होते ही गोष्ट खरी आहे का हो?

संघवाले उत्तर भारतात पुरग्रस्तांच्या मदती साठी गेले होते ही चांगली गोष्ट आहे ...तसेच औदार्य त्यांनी इतर धर्मीयांच्या बाबतीतही दाखवावे तरच ते राष्ट्रीय होतिल. एक शंका... हे संघाचे प्रचारक इतरांच्या घरी वार लावू जेवतात असे बघितले आहे ,हिंदूनी हे असले हजारो प्रचारक अनेक वर्षं फुकट खायला घातलेत/ घालत आहेत, त्यांनी पूरग्रस्तांना मदत दिली तर लगेच त्याचा बोभाट कशाला करायचा?

ते मनसोक्त ट्रोलींग करताहेत आणि तुम्ही रक्त तापवून घेताय आणि टंकन श्रम वाया घालवताय. तरी आमच्या संघप्रेमी विक्षिप्त भगिनी अजून आल्या नाहीत. त्या आल्या तर तुमचे अजून १०-२० प्रतिसाद नक्की.

संघवाले मदत करतात ही बातमी आपल्या पर्यंत आली नाही का? मग एक काम करा.आत्ता उत्तर भारतात पुर आला तेंव्हा कोण कोण गेले होते त्याची जरा माहीती घ्या.माझ्या माहीतीप्रमाणे संघ वाले गेले होते.
बातमी कानावर आलेली नाही,आणि केदारनाथला मदतीला गेले नाहीत तर लोक त्यांच्या तोंडात गोमय घालतील हे ठाऊक आहे त्यांना.संघटना' राष्ट्रीय' आहे तर मदत फक्त हिंदूंचीच का??? मुस्लिम शीख ख्रिस्ती हे भारतीय नाहीत असा संघवाल्यांचा समज आहे काय?? असल्यास तो का करुण दिला असावा
मुळात मी सच्चर आयोग वाचलेला नाही त्यामुळे मला माहीत नाही.आणि मी काही संघाची धोरणे वगैरे ठरवत नाही.त्यामुळे आपणच ह्या बद्दल जास्त सांगू शकाल.
वाचा मुस्लिमांच्या सबलीकरणासाठी तो अहवाल लागू करायला हवा असे आयोग ख्रिस्ती शीख बौद्ध यांच्यासाठी नेमल्सास आपण ते वाचावे व त्याचे 'राष्ट्रीय' या नात्याने स्वागत करावे :-P
काय हो? औरंगजेब आणि शहाजहान स्वतःच्या भावांचे खून करून गादीवर आले होते ही गोष्ट खरी आहे का हो?
खरंय परंतु हेच फक्त का सांगायचे ?हिंदूराजे महाराजे गुण्यागोविंदाने एकत्र कुटुंबात रहायचे ,असा आपला इतिहास आहे काय?? :-P

पण अद्द्याप आपब आधीच्या शंकांबाबत काही मत व्यक्त नाही केले,,, ते पण एकदा लिहून टाका... तुम्ही असे नेहमी नका करू ना गड्या...

'तूमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आमचे अवतारकार्य नाहे." मग तुम्हाला पण शंका विचारायचा अधिकार नाही रहात ना गड्या.... कारण त्याचे काय आहे गड्या... आपण जर इतरांना शंका विचारत असू तर .. इतरांनी विचारलेल्या शंकांची उत्त्रे पण आपण द्यायला हवी ना......गड्या.....

पण काय हो? औरंगजेब आणि शहाजहान स्वतःच्या भावांचे खून करून गादीवर आले होते ही गोष्ट खरी आहे का हो? अगदी खरे.... त्या औरंग्याने आणि शहाझानने स्वतःच्या भावाचे खून कर, तुरुंगात टाक असले धंदे केले. किती ते क्रूर नै का? आणि ही असली कामं करुन त्यान्नी इतिहासाची मझाच घालवली राव! भावाने दुसर्‍या भावाशी इस्टेटीसाठी भांडायचं तर कसं सिस्टिम्याटिकली भांडायचं .. म्हणजे आधी दोघानी द्युत खेळायचं . जिंकेल त्यानं हरणार्‍याची बायको नागडी करायची. मग त्यात मिटवामिटवी झाली की पुन्हा त्याच द्युताची खाज भागवायला पुन्हा खेळायचं .. मग हरलं की १४ वर्षे वनवास, मग अज्ञातवास .. मधल्या काळात एका भावानं दुसर्‍या भावाचं घर जाळायचं .. दुसर्‍यानं भुयार खणून पळून जायचं आणि त्याआधी कुठल्या तरी निष्पाप लोकाना मारुन त्यांची मढी फसवायला ठेवायची. मग शेवटी त्या दीडदमडीच्या राज्यासाठी अर्धा भारत हिकडे आणि अर्धा तिकडे असं युद्ध करायचं . मग त्या युद्धात औरंगजेब अचानक धनुष्य टाकून खाली बसणार. त्याचा रथ हाकणारा मौलवी सांगणार : औरंग्या, उचल ते धनुष्य आणि लढ. मग मुडदे, मढी, हातमोडके लोक, विधवा बाया, मग कुणीतरी कुणाची तरी छाती फोडून रक्त पिणार .. कुणीतरी कुणाचं तरी रक्त बायकोच्या केसात घालणार , अन काय , अन काय! :) तो औरंग्या अन त्याचा भाऊ बिनडोक, त्यानी असले काही नाही केले ना!

त्यांनी चांगले उत्तर दिलेय मुक्तबिहारी! तेच मी दिलेय ... हिंदूराजे हम साथ साथ है शिणुमा सारखे राहयचे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला अमी तरी काय कर्नार..

त्यांनी चांगले उत्तर दिलेय मुक्तबिहारी! तेच मी दिलेय ... हिंदूराजे हम साथ साथ है शिणुमा सारखे राहयचे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला अमी तरी काय कर्नार..

पण त्या पहिल्या प्रश्नांचे काय? का ती पण उत्तरे दुसर्‍या कुणीतरी द्यायची वाट बघत आहात? का आपल्याला अजून पण पदर लागतो?

मुक्तविहारी आण्णा, हा मुक्त फोरम आहे. इथे कुणालाही कुणीही प्रश्न विचारु शकतो आणि उत्तरही देऊ शकतो. प्रायव्हेट प्रश्नोत्तरे करायची असतील तर एकमेकांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत द्यावेत.

मुक्त विहार करायला यापेक्षा उत्तम जागा आहेत , कुठे त्यांच्या स्वप्नात जाता? उद्या ते म्हणतील . मुक्तविहारी माझ्या स्वप्नात आले, त्यात संघाचा हात आहे! त्यातून त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे, तेव्हा स्वप्न इल्ला !

हा मुक्त फोरम असून कुणीही प्रश्न विचारत किंवा उत्तर देत मुक्तपणे विहार करु शकतो. खाजगी सवाल जबाब खेळायचे असतील तर एकमेकांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत देत बसावे. ----- मुक्तविहारी उद्दाम.

संघवाले आपत्तीकाळात टीव्ही चॅनेलची वाट बघत थांबत नाहीत हो ग्रेथीं . ते बिना पब्लीसीटी काम करतात. बिनडोकच लेकाचे. टीव्ही आल्याशिवाय काम सुरु करायच नाही असा विचारच नाही त्यांना. ह्या! बा द वे ते पुर्वभारत..जे चिनच्या अगदी जवळा आहे ते...तिथली माणस सुद्धा जेनेटीकली चिनी लोकांसारखी दिसतात ते...ते पुर्वांचल कोणामुळे भारताला जोडुन आहे जरा विचारुन या. मग गावा गाणी हाताची.

प्रचंड सहमत. राहुल, सोनिया गांधीनी पत्रकार, विविध वाहिन्यांचे छायाचित्रकार वगैरे बोलवुन हिरवा झेंडा वगैरे दाखवुन ट्रक रवाना केले ते बघुन तर प्रचंड संताप आला.

बा द वे ते पुर्वभारत..जे चिनच्या अगदी जवळा आहे ते...तिथली माणस सुद्धा जेनेटीकली चिनी लोकांसारखी दिसतात ते...ते पुर्वांचल कोणामुळे भारताला जोडुन आहे जरा विचारुन या. 
आमच्या माहिती आणि अकलेप्रमाणे, भारत सरकार जो भरपुर पैसा ओतते (जो की खर्च करणे पण जमत नाही आम्हाला :-( ) त्यामुळे.. संघाचे लोक इथे एवढ्या कठीण परीस्थितीत काम करत असतात, ह्याचं कौतुक आहे.. पण त्यांच्यामुळे हा भाग देशाशी जोडलेला आहे, हे जरा जास्तच होतंय.. भाजपाचा ह्या भागातला परफाॅर्मन्स पाहीलात, तरी कळेल हे..

पण संघाचा ' सोशल इफेक्ट' ह्या भागात फारसा नाहीये, हे सांगतोय.. आपल्याकडे वेगळी माहिती असल्यास द्यावी..

तुम्ही फारच विनोदी लिहिता बुवा ! शक्यता आहे, त्यालाच ग्रेटथिंकिंक म्हणत असतील ! गडागडा लोळण्याची स्मायली !