Welcome to misalpav.com
लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

माझेपणा आला की प्रतिक्रिया येते नि ती तशी आली की बंधन आलंच....... जरा वाद घालायची खुमखुमी येतेय. पण नक्की शब्द सापडत नाही आहेत. म्हणजे अति मी पणा कधीही वाईटच, पण माझेपण नसेल तर अत्मियता कशी वाटेल? या एका भावनेपोटीच तर सारं जग वाढतय, जे काही चाम्गल वाईट घडतय ते ही याच भावनेपोटी. आता माझ घर जळल्यावर मला वाईट नाहे वाटायच तर कोणाला? ही आत्मियतापण सोडायची का? असो. शेवटी गदिमा म्हणतात तेच खर. - ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सवंगडी, हातकडी ही अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला.... लेख छान अन ओघवता आहे. फक्त एक आरती धरुन तिच्याद्वारे विश्लेषण सुरेख जमलय.

अतिशय सनयोचित आणि सुरेख लेखन , धागाकर्त्याचे अभिनंदन ! पण माझेपण नसेल तर अत्मियता कशी वाटेल? या एका भावनेपोटीच तर सारं जग वाढतय, जे काही चाम्गल वाईट घडतय ते ही याच भावनेपोटी अपर्णाताई , उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय , माझेच बरोबर आहे असा अजिबात दावा नाही ! माझेपण / आत्मीयता ही भावना विसर्जित करणे हेच खरे अध्यात्म आहे ! मी आणि "तो"कोणी वेगळा आहे ही भावना नष्ट करणे हीच शेवट्ची पायरी , तिथे द्वैत सरले ! मग कर्म कसे करायचे ? कार्य घड्णार कसे ? कर्ताच नसेल तर गोष्टी घडतीलच कशा ? ज्याच्याबद्दल आत्मियता नाही ते होणार कसे ? असाच काहीसा तुमचा प्रश्न आहे असे मला वाटते. एकदा द्वैत सरले की "मी माझे" आणि "ते त्याचे" सारे एकच होऊन जाते, मी मीच रहात नाही , तो ही नाही.. अवघा रंग एक झाला ! खेम देऊ गेली तरी पाऊलची ना दिसे , उभाचे स्वयंभू असे ! मग मी आणि तो असा भेद राहीला कोठे ? मग जे घडते ( ज्ञानोत्तर कर्म ) ते सारे त्याचीच इच्छा ! माझा श्वास , माझे जगणे , ही सारी त्याचीच इच्छा ! माझे कर्तृत्व हे देखील त्याचेच ! माझे असे शिल्लक आहे काय? कर्तृत्व त्याचे भोग ही त्याचेच ! त्याचे श्रेय ही माझे नाही आणि अपश्रेय हे माझे नाही ! राम कर्ता ऐसे म्हणशी त्याने पावसी यश कीर्ती प्रताप ! माझ घर जळल्यावर मला वाईट नाहे वाटायच तर कोणाला? घर तुझे होते कुठे ? पशु म्हणती आमुचें घर| दासी म्हणती आमुचें घर |घरीचीं म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४४|| पाहुणे म्हणती आमुचें घर| मित्र म्हणती आमुचें घर |ग्रामस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४५|| तश्कर म्हणती आमुचें घर| राजकी म्हणती आमुचें घर |अग्नि म्हणती आमुचें घर| भस्म करूं ||४६|| समस्त म्हणती घर माझें| हें मूर्खहि म्हणे माझें माझें |सेवट जड जालें वोझें| टाकिला देश ||४७|| आई- बाप , बंधू , पुत्र आपले नाहीत , बाकीच्या काय गोष्टी? तुवां भोगिल्या पुनरावृत्ती| ऐसीं मायबापें किती |स्त्री कन्या पुत्र होती| लक्षानलक्ष ||५१|| कर्मयोगें सकळ मिळालीं| येके स्थळीं जन्मास आलीं |तें तुवां आपुलीं मानिलीं| कैसीं रे पढतमूर्खा ||५२||

माझेपणा सोडायचा म्हणजे त्याची मालकी नाही सोडायची. त्याबद्दल वाटणारं अनाठायी प्रेम सोडायचं. घर जळाल्या'नंतर' (जर आपण घरापासून लांब असू तर काहीच्च करता येत नसल्यानं) दु:ख वाटणं स्वाभाविक आहे. मात्र वाटणार्‍या दु:खाला उगाळत बसून काहीच साध्य होत नाही. त्यानं खचून जाऊन , निराश होऊन जाण्यापेक्षा नंतर असा प्रसंग येऊ नये, आला तर काय करावं, ह्या ऐवजी दुसरा काही प्रसंग आल्यास काय करावं असा सर्वांगीण विचार करावा. घर हे फक्त एक उदाहरण आहे. असेच इतर प्रसंग देखील असतात. बाके आत्मीयता दाखवण्यासाठी असावी की 'असण्यासाठी' असावी? दाखवण्यापुरता जो 'कार्यक्रम' असतो त्यामध्ये बर्‍याचदा मी अमुकसाठी तमुक केलं चा बडेजाव असतो. ते न करता 'माझ्या वाटेला आलेली कर्तव्यकर्मं मी व्यवस्थित पार पाडली' तर तो देखील एक भगवदप्राप्तीचाच एक मार्ग म्हणजे कर्मयोग आहे. हा भाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मुलाची जबाबदारी अत्यंत प्रेमानं पार पाडताना तो शाळेत गेला तरी त्याचाच विचार करत बसणे ही आत्मीयता ठरते का? की शाळेत गेल्याक्षणी स्वीच ऑफ करुन आत मध्ये आपला वेगळा विचार सुरु असावा? योग्य पद्धतीनं केलेला एक विचार पुन्हा पुन्हा संकल्प विकल्प करण्यापासून 'उगाळत' बसण्यापासून मोकळं करतो. काम तेच मात्र आता अ‍ॅप्रोच वेगळा असतो. इथं थोडंस्सं 'स्मार्ट'पणा दाखवावा की आपल्या माणसाला हा बदल न समजता हे आतल्या आत घडावं. त्यानं योग्य बदल घडतो. शेवटी ही स्वतःची लढाई असते. फक्त स्वतःची.

हाहा. पहिले खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातले, दुसरे वेरूळच्या रामेश्वर लेणीतले आणि तिसरे सासवडमधल्या चांगावटेश्वर मंदिरातल्या स्तंभावरचे.

वल्ला ..वल्ला .. ( अप्रतिम तरी कितीवेळा म्हणायचे ) तुमच्या पोतडीत अजून पुष्कळ काही असेल , काढा ना जरा ..केवळ देवी या विषयाला धरुन !

अप्रतिमच. इतिहासकार, लेखात म्हटल्याप्रमाणं देवीची उपासना नि तिची वेगवेगळी रुपं ह्याबद्दल येऊ दे की माहिती.

मला मित्राने असे सांगितले होते की देवीची जी शक्तीपिठे आहेत तिथे देवीच्या मुद्रा वेगवेगळ्या आहेत. देवीने एके ठीकाणी महीषासुराचा वध केला तिथे देवीची उग्र मुद्रा आहे. नंतर देवी दुसर्‍या शक्तीपिठाच्या ठीकाणी गेली तिथे शांत / सात्विक मुद्रा आहे. याबद्दल कोणाला माहीती असेल तर जरुर सांगा. साडे तीन (?) शक्तीपिठे कोणती आणि कोणत्या क्रमाने येतात?

साडे तीन (?) शक्तीपिठे कोणती आणि कोणत्या क्रमाने येतात?
साडे तीन शक्तीपिठे कोणती हा प्रश्न समजण्यासारखा आहे. परंतू ती कोणत्या क्रमाने येतात असा विचार मात्र अनाकलनिय आहे. एकाच देवीच्या वेगवेगळ्या रुपांमध्ये भक्त क्रमवारी लावतात हे पचनी पडत नाही.

अहो क्रम म्हणजे मान किंवा महत्व असे नाही. मी वरती जी अख्यायिका सांगितली आहे (अर्धवट) त्यासंदर्भात विचारलाय. मी ऐकलेली अख्यायिका देवीने राक्षसाचा वध केला (१ शक्तीपीठ उग्रावतार) ते एक ठीकाण नंतर देवी एके ठीकाणी आली.. उग्रावतार शांत झाला(दुसरे शक्तीपीठ) त्यानंतर अजुन एका ठीकाणी सात्विक भाव (तिसरे शक्तीपीठ) आहेत अशी काहीशी आहे. तो क्रम कोणता? ती ठिकाणे कोणती? पुर्ण शक्तीपीठे कोणती आणि अर्ध शक्तीपीठ कोणते (तुळजापुर आणि कोल्हापुर यात आहेत इतकेच माहीत आहे) बादवे काही लोक अष्ट्विनायक पण शास्त्रोक्त करतात (मोरगाव ते मोरगाव) ठराविक क्रमानेच याचाही अर्थ माहीत नाही आणि हे का हे माझ्याही पचनी पडत नाही.

नासिक जवळचं वणी हे अर्धं आहे. आणखी देवीचं ठिकाण कुठलं याचा शोध घेतला तर मिळालं. लिंक जोडता आली नाही. https://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=21&did=0&dsid=0&pmid=0&id=500

देवीची उपासनापद्धती नेमकी कधी चालू ते माहिती नाही. वेदांत देवीची सूक्ते नाहीत पण देवीपूजा (स्त्रीरूपी शक्तीची) पूजा वैदिक काळाच्याही आधीची आहे असे मला वाटते. लज्जागौरीमध्ये याचे स्पष्टीकरण रा. चिं. ढेरे यांनी दिलेले आहे बहुधा (ते पुस्तक मी वाचलेले नाही) देवीची सगुण रूपात उपासना मात्र गुप्तकाळापासून चालू झालेली असावी. बाकी देवींची जुनी शिल्पे देऊन लेख लिहिण्याचा विचार होता पण टंकाळा.

प्यारे सुरेख विवेचन लिहलेयंस. बाकी देवीची हि आरती सुखकर्ता दूखहर्ता आणि लवलवथी विक्राळाबरोबरच त्यातल्या शब्दसाधर्म्यामूळे संत नरहरी सोनारांपेक्षा समर्थांचीच अधिक वाटते.

ती नरहरींचीच आहे. पण समर्थांनी एक ग्रेट आरती रचलीय. आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनि हो ।

माझ्या माहितीप्रमाणे ही आरती श्री समर्थांनीच केली आहे. नरहरी हा समर्थशिष्य त्यावेळी उपस्थित होता , त्याची भावविभोर अवस्था झाली .. पुन्हा एकदा खात्री करुन घेईन. आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनि हो । ही नऊ कडव्याण्ची आरती ही सुरेख आहे. याची चाल कोणाला माहीती आहे का ?

मग हे संत नरहरी सोनार नव्हेत का? माझ्या माहितीप्रमाणे नरहरी सोनार संत नामदेवांच्या समकालीन होते आणि त्यांचे अभंग पाहिल्यावर ही रचना त्यांची नसावी असे वाटते. बाकी, अवघे करणे जगदिशाचे आणि कवित्व काय मनुष्याचे असे समर्थांनीच म्हणून ठेवले आहे .

समर्थ रामदासांनी लिहिलेली ही आरती म्हणताना शब्दांची खूप ऒढाताण करावी लागते. पहिल्या दोन कडव्यांची तशी ओढाताण करून खाली दाखविली आहे.:- आश्विन शुद्ध, पक्षींऽ अंबा, बैसलि सिंहाऽसनींऽ हो । प्रतीऽपदे-पासुनी घऽटस्-थापऽना ती करुनीऽ हो । मूलमंत्रजप करुनि भोंवते, रक्षऽक ठेऽवुनीऽ हो । ब्रह्माविष्णु रुद्रआइचें, पूऽजन करिती हो ।। १ ।। उदोऽ बोला उदोऽ अंबा, बाईऽ माऊऽलिचा हो । उदोकारें गर्जति काऽय, महिमा वर्णूऽ तिचाऽ हो । उदोऽ बोला उदऽो अंबा, बाईऽ माऊऽलिचा हो ।। ध्रु .।। द्वितीऽयेचे दिवशींऽ, मिळतीऽ चौसष्ट योऽगिनीऽ हो । सकळांमध्यें श्रेष्ठऽ परशूऽ, रामाचीऽ जननी हो । कस्तुरि मळवट, भांगीं शेंदुर, भरुनीऽ हो । उदोकारें गर्जती सकळऽ, चामुंडाऽ मिळुनीऽ हो ।। २ ।। उदोऽ बोला उदोऽ अंबा, बाईऽ माऊऽलिचा हो । उदोकारें गर्जति काऽय, महिमा वर्णूऽ तिचाऽ हो । उदोऽ बोला उदऽो अंबा, बाईऽ माऊऽलिचा हो ।। ध्रु .।। यू-ट्यूबवर ही आरती अनुराधा पौड्वाल यांच्या सुरात https://www.youtube.com/watch?v=_Xdprjt80Iw येथे आहे.

काय मस्त आणि नेमकं लिहिलय ! अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये काहीच नाही म्हणताना देखील त्या नाहीमध्ये असणारं अस्तित्व (काहीच नाही म्हणजे निर्वात पोकळी तरी 'आहे' ना?) म्हणजे ब्रह्म तत्त्व नि त्या खालोखाल वर म्हटलेली हालचाल ती मूळमाया. तिच्यातून उत्पन्न गुणमाया मग जडमाया नंतर त्रिविधा प्रकृती, पंचमहाभूते असा क्रम आहे. खरंच थोडा विचार केला तर विज्ञानाला समांतर असा हा विचार आहे पार्टिकल थियरी इथेच येऊन थांबणार आहे !पण आधिक महत्वाचे.
ह्या 'एकोऽहम बहुस्याम' च्या प्रक्रियेमागं नक्की काय दडलंय हे रुक्षपणे जाणून घेण्यातून साध्य काय होणार आहे? त्यापेक्षा त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली तर आपला अहंकार तरी कमी होईल.
सहमत ! काय मजा आहे त्यात..देवा तुझा मी सोनार !

आधीचा आणि हा दोन्ही लेख आवडले. छानच लिहिले आहे. शाळेत संदर्भासहीत स्पष्टीकरण लिहायचो (८,९, १० वीला) त्याची आठवण झाली. संदर्भासहीत स्पष्टीकरण मला जमायचे नाही खास पण तुमचे स्पष्टीकरण / विवेचन सुरेखच.

आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं.
म्हणजे यात महिषासुरमर्दिनीचा काहीएक हात नाही! आणि त्या आधी म्हटलंय :
इतकं सगळं कार्य दोन हातातून करता येणं शक्य थोडीच आहे असा विचार करुन तिला अष्टभुजा बनवली नि तिच्या प्रत्येक हातात एक एक वस्तू दिली.
याला म्हणतात गोलमाल लॉजिक. ते स्वचा उलगडाही होऊ देत नाही आणि भोंगळ विनम्रतेला निरहंकारिता म्हणून मिरवायला मदत करतं. अर्थात, अशांचाच भरणा भारंभार असल्यानं पब्लिक भावभोळ्या आरत्या करून भवसागर पार होईल अशी आशा करतं. आरतीला घंटा वाजवतात आणि काहीही अर्थ नसला की `घंटा अर्थ नाही म्हणतात ' त्याचा उत्तम नमुना! ...चालू द्या आरती!

असा समजूतदारपणा माझ्या लेखांवर प्रतिसाद देतांना दाखवा
आयला! परस्परं प्रशंसन्ति ची अपेक्षा चक्क तुमच्याकडून??? डोळे पाणावले. पैसा, वेळ यांप्रमाणेच प्रसिद्धीही एक भ्रमच आहे नैका? ३१ जुलैच्या भ्रामक कामांतून सवड मिळालेली दिसतेय =))

किंवा असंही म्हणता येईल, तू आपुनके येरीयामे नय आनेका. और आपुन तेरे येरीयामे नय आयेगा. मांडवली करण्याची पद्धत आवडली. :)

स्वतःच्या भावनांचा प्रश्न काढला तेंव्हा मी सोडून दिलं. पक्षीनामवाचक सदस्यानी मला व्य.नि. करुन प्रश्न विचारले आहेत. आणि प्राणीनामवाचक सदस्याला काही समजण्याची शक्यता नाही तस्मात त्यांना उत्तरं देत नाही. देवीबिवीला घाबरणं किंवा तिच्या करुणेच्या विस्तारीची अपेक्षा करणं म्हणजे स्वत:च्या कल्पनेचे खेळ आहेत. लेखकानं योग्य तो समजूतदारपणा दाखवला आहे त्यामुळे इथे थांबतो.

देवीबिवीला घाबरणं किंवा तिच्या करुणेच्या विस्तारीची अपेक्षा करणं म्हणजे स्वत:च्या कल्पनेचे खेळ आहेत.
हे विधान असत्य आहे व मी ही गोष्ट तुम्हि लावाल त्या कसोटीवर फक्त तुम्हापुढे (प्रत्यक्ष अनुभवातुन निव्वळ चर्चेने न्हवे) सिध्द करण्यास तयार आहे. बोला तुमच्यात आहे तयारी हे आव्हान देण्याची ?

प्राणीनामवाचक सदस्याला काही समजण्याची शक्यता नाही तस्मात त्यांना उत्तरं देत नाही.
जे आपला उदोउदो करत नाहीत त्यांना असे फाट्यावर मारायचा केविलवाणा प्रयत्न आवडला.

न तुमच्याकडे त्याविषयी काही समज. फक्त व्यक्तिगत प्रतिसाद देणं इतकाच काय तो हातखंडा. (पाहा तुमचा इथला पहिला प्रतिसाद) तस्मात या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करतो.

मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने घातलेली माळ बरी इतके तुमचे शब्दबुडबुडे जबरी असतात, त्यामुळे तुमच्या मनोरंजन क्षमतेला एक कडक सॅल्यूट!

मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने घातलेली माळ बरी इतके तुमचे शब्दबुडबुडे हा वि स खांडेकर प्रभाव का ? त्यातला फक्त जबरी शब्द बदला ...

तुझा आयडी ना प्राणीनामवाचक आहे ना पक्षीनामवाचक. हे कोण आयडी आहेत बरे?

माझा लेख भोंगळ होताच. परंतू माझी तेव्हाची आकलन शक्ती तेव्हढीच होती. मी रोज वाचन करतो. अर्थात माझे वाचन स्वतःला सुधारण्यासाठी असते, जगाला सुधारण्यासाठी नाही. त्यामुळे वाचनाने मला माझ्या धारणा चुकीच्या वाटल्या तर त्या बदलण्याचा प्रयत्न करतो. माझं म्हणणं अंतिम सत्य मानत नाही. :)
पक्षीनामवाचक सदस्यानी मला व्य.नि. करुन प्रश्न विचारले आहेत. आणि प्राणीनामवाचक सदस्याला काही समजण्याची शक्यता नाही तस्मात त्यांना उत्तरं देत नाही.
किती घाबरता राव. सत्याची कास धरलेल्याला असा भित्रेपणा शोभत नाही.

मी तुम्हाला किंवा उल्लेखित सदस्यांना घाबरतो? कोणत्या भ्रमात आहात? फक्त त्यांना प्रतिसाद देण्यात वेळ घालवत नाही इतकंच. आता तुम्ही कसं स्पष्ट कबूल केलत पाहा :
माझा लेख भोंगळ होताच. परंतू माझी तेव्हाची आकलन शक्ती तेव्हढीच होती.
आणि आता सुद्धा तितकीच आहे. नाही तर तुम्ही असं म्हणणार नाही:
माझं म्हणणं अंतिम सत्य मानत नाही
सत्य अंतिम आहे ते कुणी सांगितलंय याला महत्त्व नाही हे तुमच्या अजूनही लक्षात आलेलं नाही!

मी तुम्हाला किंवा उल्लेखित सदस्यांना घाबरतो? कोणत्या भ्रमात आहात? फक्त त्यांना प्रतिसाद देण्यात वेळ घालवत नाही इतकंच.
घाबरत नसतात तर "पक्षीनामवाचक" आणि "प्राणीनामवाचक" असे शब्द वापरले नसते तुम्ही. उघडपणे त्या आयडींचा उल्लेख केला असता.
आणि आता सुद्धा तितकीच आहे.
हे दुसर्‍या कुणी म्हटलं असतं तर नक्की विचार केला असता. :)
सत्य अंतिम आहे ते कुणी सांगितलंय याला महत्त्व नाही हे तुमच्या अजूनही लक्षात आलेलं नाही!
सत्य अंतिम आहे ते कुणी सांगितलंय याला महत्त्व नाही हे मलाही मान्य आहे. परंतू कुणी मी म्हणतोय तेच "अंतिम सत्य" आहे याच भ्रमात असेल तर काय करणार ना.

लेखातला अंतर्विरोध पहिल्या प्रतिसादात स्पष्ट केलायं त्यावर लेखक (किंवा तुम्ही) काहीही वक्तव्य करु शकला नाहीत. काही सदस्यांची नांवं इतकी चमत्कारिक आहेत की ती उधृत कराविशी वाटत नाहीत. आता मुद्दाच उरला नाही म्हटल्यावर तुम्ही `मी म्हणतोय तेच "अंतिम सत्य" आहे. हा नेहेमीचा रडीचा डाव सुरु केलायं, त्यावर काय लिहीणार? जमत असेल तर मुद्याला धरुन (माझा पहिला प्रतिसाद पाहा) तुम्ही काही सार्थ आणि तर्कशुद्ध प्रतिवाद करा, माझ्याकडे उत्तर आहे.

आम्ही लाख मुद्याला धरुन काही सार्थ आणि तर्कशुद्ध लिहू हो, पण तुम्ही त्यानंतर शब्दांचा कीस पाडून आम्ही लिहिलेलं चुकीचं कसं आहे आणि तुम्हीच कसे बरोबर आहात ते पुन्हा एकदा खरडाल. त्यापेक्षा नकोच ते.

खरं तर तुमच्याकडे मुद्दा नाही! प्रथम तुम्ही म्हणालात -
संक्षींनी माझ्या या उत्तर देण्यासाठी गैरसोयीचे ठरणार्‍या प्रतिसादाला फाटयावर मारलेले आहे.
आणि आता म्हणताय -
शब्दांचा कीस पाडून आम्ही लिहिलेलं चुकीचं कसं आहे आणि तुम्हीच कसे बरोबर आहात ते पुन्हा एकदा खरडाल.
न तुम्हाला प्रश्नात रस ना उत्तरात. मग कशाला विषय वाढवतायं?