मी पहिला मी पहिला. ;)
मस्तच!
बाकी >>> आज ३१ नंबर ची पी.एम.टी खूप उशिरा आली एवढे कॉमन आहे.
प्द्मावती - स्टेशन (व्हाया सारंग, सहकारनगर मार्गे ;) वाली) ही बस म्हणजे खरंच दिव्य आहे. :)
तुम्ही मंनोरंजन आणी प्रबोधन एकसाथ करता राव . बाकी लहानपणी शेताकड निघाल की मामा याची भिती घालायचा ,हा साप अंगावर त्याचा श्वास सोडतो ज्यामुळे अंगावर मोठी फोड येत ,म्हणुन फुर्रसे म्हणत असा समज होता
विषारी सापांचा स्वभाव धर्म म्हणजे "तो साप विषारी आहे " एवढाच धरून चालवा. उगाच कोणी सांगेल एखादा विषारी साप शांत आहे आणि मग अपघात झाला की "ती शांतता खड्यात जाईल."
कालच एक साप दिसला. पक्षी निरीक्षणासाठी डोळ्यांवर दुर्बिण होती म्हणून दिसला. औषधाच्या बाटल्यांचा ढीग होता - त्यात तोंड घालून काय करत होता देव जाणे! एक बाटली झाली की दुसरी - असा त्याचा खेळ चालू होता. साधारण दहा फूट लांबी असावी त्याची. मधूनच डोके वर काढून जीभ बाहेर काढत होता. मागे थोडं जंगल आहे - माणसांचा वावर नसणारं.
नुसते जेडीचे लेख वाचून प्रत्यक्षात साप 'ओळखू' येत नाहीत हे लक्षात आलं :-)
दुर्बिणीचा अँगल बदलायला गेले तर तेवढ्यात कुठे गायब झाला कुणास ठाऊक! काही पत्ता लागला नाही :-(
दिवड म्हणजे विरोळा. हा हरणटोळ किंवा नानेटी या जातीतील एक बिनविषारी साप असून तो पाण्यात सहज पोहतो आणि अतिशय चपळ असतो.
पहा
http://www.indianetzone.com/4/keel_back.htm
फुरसे हे त्यामानाने( नाग मण्यार किंवा घोणस यांपेक्षा) फारच लहान असते परंतु मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे सर्वात जास्त सर्पदंशाचे रुग्ण फुरसे चावल्याचे असतात. एकतर हे भारतात झाडून सर्वत्र दिसतात. आणि फारच लहान असल्याने पटकन नजरेस पडत नाहीत आणि आकार लहान असल्याने लोक पण जर जास्तच चावटपणा करतात.
मी २ ० ० ४ साली गोव्यात(वास्को च्या जीवन्ति या नौदलाच्या रुग्णालयात) काम करीत असतानाचे दोन किस्से.
पहिला एक किस्सा म्हणजे एक नौसैनिक एक जेमतेम पाच ते साडेपाच इंचाचा "किडा" घेऊन आला होता आणि हा किडा मला चावला आणि आता हाताची आग होते म्हणत होता. तो किडा चावल्याने त्याने त्याचे डोके ठेचले होते. तो हंस या नौदलाच्या विमानतळ येथे सफाई करत होता आणि पाने उचलताना हा "किडा" त्याला चावला होता. हा "किडा" पाहिल्यावर मला लक्षात आले कि हे फुरसे (किंवा पिल्लू) असणार. मी त्याला ताबडतोब भरती करून घेतले. त्यावर त्याची कुरकुर चालली होती, साहेब साधा किडाच आहे उगाच भरती कशाला करता. साहेब मला ओरडतील कि वार्षिक तपासणी आहे काम करायला नको म्हणून नाटके चालली आहेत इ. अर्थात मी आवाज चढवून त्याला गप्प केले आणि सांगितले याची जर एलर्जी आली तर तुला श्वास घ्याला त्रास होऊ शकतो. त्याच्या रक्ताचा नमुना घेऊन तपासणी साठी पाठवून दिला. थोड्या वेळाने त्याचा हात सुजायला लागला मग त्याला पटले कि हि काहीतरी गडबड आहे. तोवर त्याच्या रक्ताचा निकाल आला होता मी आमच्या फिजिशियन ला पाचारण केले त्याने येउन त्याला सर्प विष प्रतीबंधकाचा टेस्ट डोस दिला आणि त्या नौसैनिकाला ताबडतोब त्याची एलर्जी(anaphylaxis) आली. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याचा रक्तदाब एकदम कमी झाला आणि त्याला चक्कर येऊ लागली. त्याला ताबडतोब अदरेनालीन(adrenaline), स्टेरोईड(हायड्रो कोरटीसोन)ची इंजेक्शने दिली आणि त्याला अतिदक्षता विभागात हलवले. तसेच त्याला पुढे सर्पविष प्रतीबंधकाचे पुढचे डोसे दिले. या सगळ्या प्रकरणात फिजिशियन चे पाच सहा तास गेले म्हणून तो त्या नौसैनिकाला झाडत होता कि नको तिथे हात कशाला घालत होतास. आणि तो नौसैनिक मला धन्यवाद देत होता कि साहेब तुम्ही मला वाचवले. मी घरी गेलो असतो आणि घरी एलर्जी आली असती तर मेलोच असतो. आता हि एलर्जी खर तर सर्प विष प्रतीबंधकाची होती आणि सापाच्या विषाची नव्हती पण काकतालीय न्यायाने मला फुकटचे क्रेडीट मिळाले होते.
असाच एक दिवस एक नौसैनिक वरुणा पुरी(नौसैनिकांची कौटुंबिक वसाहत) येथून एक लहान मुलाला किडा चावला म्हणून घेऊन आला. हा सात आठ वर्षाचा मुलगा तेथे खेळत होता आणि बॉल घ्यायला कोरड्या गटारात गेला तर पानांच्या आडून त्याला एक "किडा" चावला मुलाने डास किंवा मुंगी असेल म्हणून दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने त्याचा पायाचा अंगठा सुजला आणि आग होऊ लागली म्हणून त्याने बापाला दाखवले तर तेथे एक छोटेसे छिद्र दिसले आणि बाजूचा अंगठा सुजला होता. तो घेऊन आला तेंव्हा मला ते एक छिद्र अंगठ्याच्या नखाच्या थोडेसे बाजूला दिसले आणि अंगठा सुजून आतमध्ये रक्तस्त्राव झाल्यासारखे दिसत होते. मला ते साप चावल्यासारखेच वाटत होते(अगोदरचे फुरसे चावलेले रुग्ण आठवले तर ती जखम तशीच वाटत होती ( माझा तर्क होता कि फुरसे चावले असणार पण एक दात नखावर गेल्याने एकच छिद्र पडले आणि त्यातून विषबाधा झाली असावी) मी त्या मुलाला भरती करून घेतले त्याच्या रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठवला आणि आमच्या बाल रोग तज्ञाला फोन केला कि संध्याकाळी राउंडला येशील तेंव्हा या मुलाला बघून जा. पंधरा मिनिटात त्या मुलाला उलटी झाली. आता माझ्या लक्षात आले कि माझा तर्क बहुधा खरा होता. त्या मुलावर विषाचा अंमल होऊ लागला होता(systemic envenomation) आणि थोड्या वेळाने रक्ताचा अहवाल आला आणि त्यात त्याला सर्पविष बाधा झाली असल्याचे सिद्ध झाले. बाल रोग तज्ञाने येउन त्याला सर्प विष प्रतीबंधकाचे डोस दिले आणि तो मुलगा यथावकाश ठीक झाला.
तिसरी कथा- माझ्या वर्गातील एक डॉक्टर मुलगी रेणुका वायुसेनेत फ्लाईट लेफ्टनंट होती. ती राजस्थानात बाडमेर जवळ उत्तरलाई या ठिकाणी मिग २१ च्या स्क्वाड्रन ची मेडिकल ऑफिसर म्हणून तैनात होती. साडेचार वर्षे झाली तरी तिचे पोस्टिंग झालेले नव्हते.(आमचे मित्र म्हणत होते कि वायुसेना रेणुकाला विसरली आहे.) तेंव्हा एका संध्याकाळी ती खोलीच्या बाहेर आली तेंव्हा एका फुरश्यावर तिचा पाय पडला आणि तिला ते चावले. ती ताबडतोब आपली जीप घेऊन बाडमेरच्या लष्करी रुग्णालयात गेली. प्रथम तेथील फिजिशियन तिच्यावर विश्वास ठेवायला तयारच नव्हता. उगाच किडा चावला असेल असे तो म्हणत होता. अर्थात रेणुका आपल्या म्हणण्यावर ठाम होती त्यामुळे त्याने तिला तेथे अधिकारी वार्ड मध्ये भरती करून घेतले. थोड्यावेळाने तिचा पाय सुजू लागला तेंव्हा त्याचा विश्वास बसला आणि तो टरकला. कारण थोड्या वेळापूर्वी तो तिची टर उडवत होता. आता त्याने तिची रक्त तपासणी इ सुरु केले. तिला सर्प विष प्रतीबंधकाचा टेस्ट डोस दिला आणि तिला त्याची जोरदार एलर्जी आली आणि तिचा रक्तदाब एकदम खाली आला. त्याची अजूनच तंतरली. त्याने तातडीचे उपाय केले पण तिला सर्पविष प्रतिबंधक देणे आवश्यक होते. तेवढ्यात रेणुकाचा कमांडिंग ऑफिसर त्याला म्हणाला डॉक्टर आत्ता आमचे वायुसेनेचे एक विमान (ए एन १ २) पुण्याला जात आहे तुम्हाला तिला पुण्याला हलवायचे आहे काय? त्यावर तो तयार झाला. पुढच्या एक तासात तो स्वतः तिला घेऊन पुण्याच्या कमांड रुग्णालयात गेला तिथे तिचा इलाज झाला आणि तिथून तिला सुट्टीवर पाठवले गेले.तिचे आई वडील पुण्यातच स्थायिक आहेत. शेवटी तिचे तिथून पुण्यालाच(लोहगाव) पोस्टिंग आले. आम्ही तिला थट्टेने बोललो कि पोस्टिंग करण्यासाठी तु सापाला "सुपारी" दिली असशील.
खूप माहितीपूर्ण आणि विलक्षण प्रतिसाद आहे.
तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या लेखांना वैदकीय पाठींबा मिळतो.मी स्वतः वैदकीय क्षेत्रातला नसल्यामुळे मला उपचाराची जास्त माहिती नाही, ती तुमच्या प्रतिसादामधून लोकांपर्यंत पोहचते. (खरा निसर्गातील ) किडा चावल्याला आता मिपाकर तरी थोडे गंभीर पणे घेतील, असे वाटते. ;)
धन्यवाद् !
पुलंच्या एका लेखात ' आमच्या कोकणात चुलीवर फुरसे बसलं हे वाक्यदेखील...' वाचलं होतं, तेव्हापासून ह्या सापाबद्दल कूतुहल होतं.. नेहमीप्रमाणेच भारी लेख.. ह्या लेखातले फोटोपण एकदम खतरनाक आहेत..
ह्या हातभर सापात माणसाची हातभर टरकवण्याची ताकद, चपळाई असते.
लहानपणी आमच्या शेतात उसाच्या मुळाशी हे साहेब त्यांच्या तंद्रीत बसलेले असतील. हातात एका चिपाडावर गरमागरम गुळाचा पाक आणि शेंगदाणे असा "इंस्टंट" चिक्की घेऊन आम्ही भावंडं शेतातल्या गुर्हाळाजवळ बागडत होतो. पहाटे सहा-साडेसहाच्या सुमाराला घडलं होतं हे..अगदी सहज..अनावधानाने माझं पाऊल ह्या वेटोळ्या साहेबांच्या शेपटीवर पडला. अनवाणी होतो. अर्धवट ओल्या मातीत पण जाणवलं खरं.. पण तोवर हे साहेब जागचे उसळून हल्लाबोल करुन पुन्हा जणु काही घडलेच नाही, अशा थाटात गप आपल्या जागेवर वेटोळ्यात! निमिषार्धात जे पहायला मिळालं, ते त्या बी.बी.सी.च्या कॅमेर्याने बरोबर पकडलंय. केवळ नशीब थोर किंवा ह्या साहेबांचा अंदाज चुकला म्हणा..वाचलो. थिजलो होतो जागीच. बत्ती गूल झालेली आमची तर! त्यानंतर बर्याचवेळा भेट झाली, पण आम्ही आपले गपगुमान वाट वाकडी करुन "सरजी तुस्सी ग्रेट हो!" म्हणत कल्टी मारत गेलो. ह्यांना तंद्रीत राहू देणंच सुखाचं.
या आधिही ट्रेक वगैरे करताना साप निवांत भ्रमण करताना पाहिले होते वा सळसळत वेगाने जाणार्या जनावराशी संबंध फक्त तेंव्हाच आला जेंव्हा ते माझ्यापासुन दुर जाण्याच्या प्रयत्नात असे. त्यामुळे निसर्गात आढळणार्या सापांबद्दल मत न्युट्रल होते.. यापुढे मात्र जास्त चौकसता अन सावधता बाळगली जाइल. धन्यवाद.
अतिशय उत्तम माहीती रंजकपणे सांगण्याची तुझी हातोटी खासच! आता काय होतं की, तूझा एक भाग आल्यावर तो वाचून मी लगेच पुढच्या भागाची प्रतिक्षा माझ्याही नकळत करतो. आणि त्याचबरोबर अॅनिमल प्लॅनेटवर स्टिव्ह आॅस्टीन एडवेन्चर्स हा सापांच्या माहीतीचा कार्यक्रमही न चूकता पाहतो. :-)
जेडीचा लेख आणि डॉक्टरसाहेबांची भर म्हणजे एक पर्वणी असते. माहितीचा एक नवा खजिना प्रत्येक लेखातून खुला होतो.
प्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकरांना फुरसे चावले होते असे ऐकून आहे.
जेडीचा लेख आणि डॉक्टरसाहेबांची भर म्हणजे एक पर्वणी
अगदी खरंय. जेडी आम्रिकेत आणि डॉ खरे मुंबईत, पण दोघं मिळून जगभरातल्या मिपाकरांना पर्वणी देतात. आंतरजालाच्या सामर्थ्याची ही प्रचीतीच आहे.
जेडी आणि डॉक्टरसाहेबांनी मिपा दिवाळी अंकासाठी एक लेख एकत्र लिहावा असं सुचवतो. (या प्रस्तावाला ज्यांचं अनुमोदन असेल त्यांनी या दोघांना खरडी, व्यनि आणि (शक्य असल्यास) प्रत्यक्ष संपर्क करून त्यांच्यावर मनोवैद्न्यानिक दबाव आणावा)
मस्त... नेहमीप्रमाणेच खुसखुशित आणि माहितीपूर्ण !
सुचना: जमल्यास चित्रे टाकताना फ्लिकर ऐवजी गुगलफोटोचा उपयोग करावा. फ्लिकरवरची चित्रे बर्याच जणांना दिसत नाहीत असे प्रतिसादांतून जाणवते आहे (मीही त्यातला एक :) ). गुगलबाबा सगळीकडे दर्शन देतो ;)
कांडार, कांडर किंवा कान्डोर( हा शब्दप्रयोग श्री ना पेंडसेंच्या "तुंबाडचे खोत"या कादंबरीत आहे) म्हणजे मण्यार. हिचे सूर्य कांडार(माणूस सूर्योदयापूर्वी मरतो) किंवा चंद्र कांडार((माणूस चन्द्रोदयापूर्वी मरतो)अशी नवे रायगड जिल्ह्यात ऐकावयास मिळतात हिचे विष इतके घातक असते म्हणून या आख्यायिका आल्या असाव्यात. जे डी चा माण्यारीबद्दल लेख वाचावा म्हणजे त्याबद्दल अधिक माहिती मिळेल.
प्रतिक्रिया
मी पहिला मी पहिला.
जबरा फोटो आहेत. निसर्गाच्या
ये बात, जेडी!
उत्तम लेख. सुरेख प्रकाशचित्रे
*****
हो, फोड येणारा साप म्हणजे
@तुम्ही मंनोरंजन आणी प्रबोधन
जबरा लेख....
विषारी सापांचा स्वभाव धर्म
मस्तच जेडी !
जबरदस्त.
जबरदस्तच!
एक साथ... नमस्ते!
बाबौ!!! ह्ये बी ड्यान्जरच...
नेहमीप्रमाणे ...
कालच एक साप दिसला. पक्षी
जबरदस्त
कांडर
आणि दिवड पण
दिवड
दिवड म्हणजे विरोळा. हा
कांडर
पुढच्या भागात बिनविषारी साप..
फुरसे हे त्यामानाने( नाग
तुमचे अनुभव नेहमी माहितीपुर्ण
+ १
खूप माहितीपूर्ण आणि विलक्षण
नेहमी प्रमाणाचे झकास्स्स्स...
जबरदस्त..
+१
भारी माहिती आणि फोटो
धन्यवाद...
खुप धन्यवाद.
अतिशय उत्तम माहीती रंजकपणे
मस्त
माहितीचा खजिना
जेडीचा लेख आणि
ह्यो साप कोनचा म्हनायचा हो
आई
हां! अता आला बघा!
फोटो वरून ओळखणे अवघड जाते आहे
आता
लेख आवडला हो जेडीभौ! फोटू
मस्त... नेहमीप्रमाणेच
धन्यवाद् !
आमच्याकडे
कांडार, कांडर किंवा कान्डोर(
डॉ. बरोबर आहेत.मण्यार म्हणजेच
सहीच.... :)
नेहमी प्रमाणेच रंजक आणि
Pagination