Welcome to misalpav.com
लेखक: इष्टुर फाकडा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

शाकाहारी पदार्थ व वस्तु असतील तर ते शंकराचार्यांच्या पायावर मांसाहारी पदार्थ व वस्तु असतील तर ते इमाम बुखारींच्या पायावर या व्यतिरिक्त मैदा आणी किण्वयुक्त पदार्थ व वस्तु असतील तर पाद्र्यांच्या पायावर घालावेत. (चुभुदेघे.)

आपला निधर्मीवाद/सर्वधर्मसमभाव सापेक्ष असतो का किंवा का असतो ?
निधर्मीवादाचा मक्ता घेतलेल्यांचा निधर्मीवाद सापेक्ष अन तर्कदुष्ट असतो. पण तसे नाही बोलले तर यांना भाव कोणी देणार नाही त्यामुळे त्यांना ते करणे भागच आहे. बाकी किण्व हा शब्द इयत्ता दहावीनंतर आज पहिल्यांदा वाचला, त्या फर्मेंटेड स्मृतींनी अंमळ हळवा झालो.

अरेरेरे...धर्मगुरूच्या आशीर्वादाने कुणाचं काही भलं होतं यासारख्या हास्यास्पद फ्यांटसीला तुम्हीही बळी पडलात तर...तुमच्यासारखे ट्रोलभैरवच असे वागू लागले तर कसं होणार म्हराठी विचारजंतांचं?

पोप धर्मगुरू आहेत आणी ते वंदनीय आहेत या बद्दल कोणताही आक्षेप नाही किंबहुना थोमस साहेब त्यांच्या पाया पडले तरी त्यात काहीही गैर नाही. मी स्वतः सुद्धा कोणत्याही धर्माच्या गुरूच्या पाया पडेन(आणी पडतो) . पण जर कोणी भारतीय घटनेचे पुस्तक किंवा आपला तिरंगा कोणत्याही धर्मगुरूच्या पायावर ठेवेल तर तो घटनेचा(आणी राष्ट्राचा) अवमान आहे असे मला वाटते कारण भारतीय घटना हि पूर्णपणे निधर्मीवादाचा पुरस्कार करते आणी असे पुस्तक कोणत्याही धर्मगुरूच्या पायावर लोटांगण घालते (मग त्यात पोपच काय शंकराचार्य व शाही इमाम सुद्धा येतात) हे मान्य होणारे नाही. यात राजकारण(किंवा धर्मकारण) नसावे असे मला वाटते.

नक्कीच. जगातल्या कोणत्याही पुण्यप्रद व्यक्तिचे आशिर्वाद इतर कोणाही व्यक्तिस, याला काही शास्त्रीय वा भावनिक आधार असेल तर, मिळाले तर हरकत नसावी. एक महान विचार म्हणून सोनिया -थॉमस द्वयींनी, कोणी कोणत्या का देशाचे असेना, ख्रिश्चन आहेत म्हणून , आणि एक चांगले वर्तन म्हणून, भारताच्या संघराज्याचा कोणता नियम वा शिष्टाचार मोडून वा न मोडून, बिलाचा प्रत पोपांना दिली हे ही उत्तम मानू. पण, केवळ 'कल्याणकारी कामातून पुण्य मिळते' अशा ख्रिश्चन धारणेतून, भारताच्या अन्य आर्थिक वा राजकीय परिस्थितीचा विचार करून वा न करून, या बिलाला बल प्राप्त तर झाले नसावे ना आणि अशा यशाचा दृश्य समारोह म्हणून ही घटना का पाहिली जाऊ नये असा एक आशयघन प्रश्न लेखकास अभिप्रेत असावा. लेखकाचा प्रतिवाद करताना या प्रश्नाचे उत्तर देणे आणि शक्य तितके प्रांजळ होणे आवश्यक आहे कारण सोनिया आणि थॉमस नक्की किती धार्मिक असावेत, आणि त्यांच्या धार्मिकतेचा भारतीय राजकारणावर किती परिणाम होत असावा हे ते स्वतःही सांगू शकतील कि नाही ठाऊक नाही. असे या करिता म्हणायचे कि चिदंबरम् यांना कितीही संतुलित नेता मी म्हणायला जातो तेव्हा ते मला 'दिल्लीत' मोठ्या मोठ्या काँफरन्सात लूंगी घालून आलेले दिसतात. लूंगी विना पाहिल्याचे आठवतच नाही. कोणती अस्मिता, भावना किती दृश्य असते, किती खोल असते हे निर्णायकरित्या आपण सांगू शकतो का?

विचारजंतांना विरोध करतो म्हणून मी अंधश्रद्धाळू आहे हा निष्कर्ष तुम्ही काढणारच. अन हो, विचारवंतांची काळजी मला नाही, तर विचारजंतांची आहे. डोळे अन मेंदू उघडा ठेवा अन स्वतःची पाठ थोपटू नका उगीच =))

डोळे अन मेंदू उघडा ठेवा ग्रेट थिंकींग ला या दोन्हीची (किंवा इतर काहीची) अजिबात गरज नाही असा काहींचा समज असल्याचा माझा समज होत चाललाय ;)

हा हा हा, अगदी खरेय. हे थिंकरमहाशय अ‍ॅरिस्टॉटल परंपरेतले दिसतात. कुठलीही गोष्ट निव्वळ (वाटेल तशा) विचाराने समजून घेता येते, प्रयोगांती प्रमाणाची गरज नै असा त्यांचा (पानिपतावर न गेलेला) विश्वास असतो =))

ओ ग्रेटथिंकर (?) उगा डोक्यावर पडल्यासारखे सगळ्या धाग्यांवर उथळ थैमान घालत जावू नका. पोपही धर्मगुरुच आहेत, त्यांचे आशिर्वाद भारतीयांना मिळाले तर बिघडले कुठे? --- कोण म्हटलंय बिघडलंय म्हणून ? प्रसाद खाल्ला नाही म्हणून साधूवाण्याचं जहाज बुडालं, यावर इश्वास असणार्याने इचारवंतांची काळजी करु नये --- तुम्हाला माझ्या (वाक्य माझ्यासाठी असेल तर) किंवा इतर लोकांबद्दल ट माहिती असायचं कारण नाही, गोष्टी गृहीत धरू नका.

बाकी सगळं र्‍हाऊ द्या. कायद्याचा मसुदा, कायदा होण्यापूर्वी असा बाहेरच्या देशाच्या नागरिकाला दाखवला तर चालतो का?

ह्यावेळी चान्स होता म्हणे पोप भारतीय बनण्याचा. हुकला. आता किती वर्षं वाट बघायची कुणास ठाऊक पांढर्‍या धुराची ;) बाकी कायदा बनताना पोपना भारतीय नागरिक असले तर काही आक्षेप नसेल ना तुमचा? रेशनकार्डच पायजे ना? तुमच्या शेजारचा गोव्यातलाच पत्ता द्यायला सांगू. हाय काय नि नाय काय? ;)

आक्षेप घेणारे आम्ही कोण? म्या फक्त एक शंका विचारली! तसं काय रेशन कार्ड अन आधार भारताचे नागरिक नसलेल्यांना आमच्या आधी मिळतंय!

इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ ! काय्य्तरीच्च क्कॉय ?

लिंकमध्ये जे वाचलं त्याप्रमाणे अन्न सुरक्षा कायद्यावरील पुस्तिका पोपना भेट देण्यात आली. ह्या बातमीनुसार बिलला राष्ट्रपतींची सहमती मिळून तो आता कायदा झालाय, त्यामुळे ह्यात कायदेशीररित्या काही गैर नाही.. बाकी, सोनिया गांधी किंवा थाॅमस ह्यांच्या धार्मिक भावना किंवा पुण्यप्राप्तीसाठी हा कायदा बनवला नसावा,अशि अपेक्षा आहे.. कायदा किंवा योजना ह्यांचे प्रयोजन 'जनकल्याण' हे असावे, पुण्यप्राप्ती नव्हे..

छान . कुणाच्या ना कुणाच्या आशिर्वादानं का होईना, लोकाना अन्न मिळावे. न्हायतर एकेक परमेश्वरी अवतार असतात, छाताडावर हात मारुन सांगतात - योगक्षेमं वहाम्यहम ! सगळ्यांचं योगक्षेम मी बघतो. आणि यांच्याआसपास पिठात पाणी कालवून पिणारा कुणी अश्वत्थामाही नांदत असतो , त्याची यान्ना कल्पनाही नसते.

आपल्याला अश्वत्थामाच आठवला ? अहो त्यच्याकडे निदान पीठ आणि पाणि तरि होते,योगक्षेम चालवायला तेही नसे थोडके?

आण्णा, ते थोडकेच असते. त्याने पोट भरत नाही. कुपोषण म्ह्णजे काय हे तुम्ही शिकवायला येऊ नका. --- सुदृढ उद्दाम

अश्वत्थामा जर कुपोषित असता,तर एव्हड्या पान्डवान्च्या मुलांचा ध्रुष्ट्दुम्ना सहीत वध करु शकला असता काय?

आण्णा, त्याच्या डॅडीना कौरवांची मास्तरकी मिळण्याआधीची ती गोष्ट आहे.

देशाबाहेरच्या नागरिकाला असे दाखवणे यात गैर काही नाही असेच शिकवले असेल तुमच्या डाव्या शाखेत, नैका? गुलाग सपोर्टर्सचे उफराटे लॉजिक पाहिले की मजा येते, कारण लॉजिकच नसते.

लोकाना अन्न पुरवणे, कुपोषण टाळणे, एखादी रोग प्रतिबंधात्मक स्कीम जसी पल्स पोलिओ, टी बी योजना, मलिएरिया योजना वगैरे आंतरराष्ट्रीय सहकार्याने पार पाडायच्या असतात. या प्रकरणात जागतिक एन जी ओ , वर्ल्ड ब्यान्क, इतर डॉनर यांची मदत होत असते. शिवाय, एका देशाच्या डेटाचा अभ्यास करुन दुसर्‍या देशातील स्कीम आणखी मजबूत करता येते. अर्थात, हे समजायला विश्वबंधुत्व म्हणजे काय याचे ज्ञान असावे लागते. आसिंधुसिंधुच्या आतले लोक आमचे, त्याच्या आतलेच देव आमचे, पुण्यभू आणि पितृभु वगैरे जप करणार्‍या लोकाना ही समज असण्याची शक्यता कमीच. --- जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाने आणि पाचपन्नास देशांच्या अनुभवाने तयार झालेला, भारतात सुरु असणार्‍या एच आय व्ही केंद्रात काम करणारा आणि त्याबद्दल बिल गेटच्या डोनेशनच्या पैशातून पगार घेणारा डॉ. उद्दाम.

लोकाना अन्न पुरवणे, कुपोषण टाळणे, एखादी रोग प्रतिबंधात्मक स्कीम जसी पल्स पोलिओ, टी बी योजना, मलिएरिया योजना वगैरे आंतरराष्ट्रीय सहकार्याने पार पाडायच्या असतात. या प्रकरणात जागतिक एन जी ओ , वर्ल्ड ब्यान्क, इतर डॉनर यांची मदत होत असते. शिवाय, एका देशाच्या डेटाचा अभ्यास करुन दुसर्‍या देशातील स्कीम आणखी मजबूत करता येते.
एव्हढ्या सगळ्या गोष्टी पोप महाराजांच्या मुठीत आहेत हे पाहून डोळे पाणावले. काय हो, जागतिक बँक पण त्यांच्या योजना पोप साहेबांच्या पायावर वाहूनच काम सुरू करते वाटते?

कमीत कमी इटलीचे संविधान / सरकार त्यांच्या देशाचे कायदे / योजना पोपसाहेबांना सांगून मग मंजूर करत असले तर त्याची नक्की माहिती वाचायला आवडेल. सार्वभौम सरकारच्या वागणूकीचे काही मानदंड असतात यात हे असले काम बसत नाही... अगदी परक्या सरकारने अथवा गैरसरकारी संस्थेने अगदी भरघोस मदत केली असली तरी "योजनेचा मसुदा बनवण्यात काही प्रमाणात मतप्रदर्शन" यापलिकडे देशाच्या सार्वभौम अधिकारांना कोणत्याही प्रकारे बाधा येईल असे कोणतेही प्रावधान योजनेत असू शकत नाही. अशी मागणी करणार्‍या कोणत्याही प्रकारच्या मदतगाराची मदत अस्विकार्य करण्याचा सार्वभौम सरकारचा हक्क असतो. यासंदर्भात राष्ट्रसन्मान अबाधित राखण्यासाठी अनेक गरजू देशांनी (म्यानमार, श्री लंका, इ.) अनेकदा परकीय मदत नाकारलेल्याची उदाहरणे आहेत. राष्ट्राच्या सार्वभौम अधिकाराची अवहेलना करणार्‍या सरकारवर नीट राज्य करता येत नाही (failure of governance) असा शिक्का बसतो. येत्या निवडणूकीच्या धसक्याने सद्या असा शिक्का मारून घेण्यासाठी केल्या जाणार्‍या धडपडींची मालिका सुरू आहे हे काही गुपित नाही. अवांतरः चर्चेत एखादा मुद्दा आंधळेपणाने (किंवा आपल्या एखाद्या गोष्टिचा सोईस्कर पाठपुरावा करायला) पकडला की मग फार पंचाईत होते ! म्हणतात ना की, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं ! मग एक इल्लॉजीकल वचन लपवायला दुसरे... त्यातून सावरायला तिसरे... इ. इ.

आणि समजा, असा बिलाचा मसूदा तिसर्‍या कोणाला दाखवायला हरकत नसेल तर बजेटबद्दल एवढी गुप्तता कशासाठी असते? मग ते बिलसुद्धा हामेरिका, युरोपियन युनियन आणि चीनला दाखवायला हरकत नसावी. आणि संरक्षण बजेट तर पाकिस्तान आणि चीनला दाखवून मगच तयार करावे.

अवांतरः चर्चेत एखादा मुद्दा आंधळेपणाने (किंवा आपल्या एखाद्या गोष्टिचा सोईस्कर पाठपुरावा करायला) पकडला की मग फार पंचाईत होते ! म्हणतात ना की, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं ! मग एक इल्लॉजीकल वचन लपवायला दुसरे... त्यातून सावरायला तिसरे... इ. इ.
अगदी खरंय!!!!!!!! अशी इल्लॉजिकल मुक्ताफळे पाहून अलीकडे मणोरञ्जण व्हायचेही बंद झालेय :P

हा सगळा धागाच इलॉजिकल लोकान्नी भरलेला आहे. मूळ लेखात 'कायद्याचा गोषवारा' सादर केला असे वाक्य आहे. गोषवारा याचा अर्थ एक प्रकारची जाहिरात / षिनेमाचा ट्रेलर . यात आपण काय करणार, किती लोकाना फायदा मिळेल, किती आन लागेल, याने कोणते चांगले परिणाम होतील, यातील अडचणी काय यांचे सारांशरुपाने विवेचन असते. जसे ट्रेलरमध्ये सस्पेन्स सिनेमा, अमूक अमुक हिरो, हिरॉइन, एखादी गाण्याची ओळ आणि रिलिजिंग डेट .. इतकेच असते. तसा गोषवारा सादर केला गेलेला आहे. पण इथे प्रत्येकजण जणू अख्खा कायदा/ विधेयकच जणू पोपच्या सही शिक्क्यासाठी पाठवले की काय! आणि त्याना हे अधिकार आहेत का आणि काय नि काय चर्चा करत बसले आहेत. म्हाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने इठोबाला साकडं घातलेलं चालतं, ख्रिश्चन पक्षनेत्यानं पोपला नमन केलं तर कुणाच्या पोटात का दुखावे? १. पोपला नमायला जाणं हेही चुकीचं नाही. २. योजनेचा ' गोषवारा' सांगणं यातही काही चुकीचं नाही.

"हा सगळा धागाच इलॉजिकल लोकान्नी भरलेला आहे." हे मात्र एकदम पटले भाऊ. पटले म्हणजे काय? एकदम मनापासुन पटले बघ... मला पण काही काही धागे आवडत नाहीत, मग अशावेळी मी काय करतो माहेती आहे? मी आपला मला आवडतील असे धागे शोधतो आणि वाचत बसतो. सध्या जॅक डॅनियलचे सापावरचे लेख वाचत आहे.

म्हाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने इठोबाला साकडं घातलेलं चालतं, ख्रिश्चन पक्षनेत्यानं पोपला नमन केलं तर कुणाच्या पोटात का दुखावे?
ट्रोलिंगचा क्षीण केविलवाणा प्रयत्न. तुमच्याकडून अजून बर्‍याची अपेक्षा होती =))

"तुमच्याकडून अजून बर्‍याची अपेक्षा होती." "कुणाकडूनही कसलीही अपेक्षा बाळगू नका" असे परवाच जे.डी. नावाचा माझा मित्र म्हणत होता.

हो कारण विठोबा हा देव (ईश्वर) आहे,(निदान आमच्यासाठीतरी),आणि पोप हे माझ्यामते धर्मगुरु (ईश्वराचे सेवक) आहेत.

विठोबा आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बडवे नावाचा कमिशन एजंट असतो हे माहीत आहे काय! ज्याला दक्षिणा चारल्याशिवाय तो काही एजंटगिरी करत नाही. (पोप निदान फुकट तरी निवेदन स्विकारतात ते ही हिंदूबहुल देशाचे आणि इथे हिंदुंच्याच देशात कमिशन एजंट लै बोकाळलेत.)

रहाता आपण? माझ्या माहिती प्रमाणे सद्ध्या पंढरपूर देवस्थानाचा कारभार हा सरकारी आहे,आणि एकादशीच्या वेळी तिथला सुद्धा घोटाळा बाहेर आला होता.आणि पोप यान्ची व्यवस्थासुद्धा तिथले सरकारच बघते म्हनजेच त्यान्चा योगक्षेम चालवते,राहिली गोष्ट ती मुख्यमन्त्र्याची त्यनी साकडे बडव्याना नाही तर विठोबाला (देवाला) घातले.

साकडे घालायला भारतातील गीरजाघरे (चर्च) ओस पडली होती का?का पोप हे येशुच्या अधीक जवळचे एजन्ट आहेत म्हणुन त्यन्च्याकडुन येशुला साकडे घातले?

एक इल्लॉजीकल वचन लपवायला दुसरे... त्यातून सावरायला तिसरे... इ. इ हायला, ही तीनशेव्या वचनाकडे चाललेली यशस्वी चाल म्हणावी काय  .... शुभेच्छा :)

Prof. K.V.Thomas, Minister for Consumer Affairs, Food & Public Distribution who is leading the Indian delegation to the 40th FAO Conference on World Food Security at Rome today called on the Pope Francis at Vatican City and submitted a booklet on Food Security Act. ती अनेक देशांची जागतिक अन्न सुरक्षा यावरील बैठक होती. म्हणजे तुमचाच देश नव्हे, अनेक देश यात सहभागी होते.

आंतर्रष्ट्रीय परिषद होती. ओके. तिथे हजेरी लावली. ओके. त्यात पोपचा काय संबंध? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विठोबाची सर्कारी पूजा करतात. एखाद्या कायद्याची प्रत बडव्यांच्या पायावर ठेवत नाहीत. पोपचा दर्जा शंकराचार्यांसारखा असावा. विठोबासारखा नव्हे. सोन्या बाई आणि थॉमस व्यक्तिगत जीवनात धार्मिक ख्रिश्चन असतील तर ठीक. त्यांनी खाजगीरीत्या पोपला देणग्या द्याव्यात. आपल्या मुलांना त्यांच्या मठात संन्याशी होण्यासाठी पाठवावे. आमचं काही म्हणणं नाही, भारताचा कायदा/कायद्याचा मसूदा ही सोन्या बाई किंवा थॉमस यांची खाजगी मालमत्ता नाही. भारताचे संविधान निधर्मी आहे. अशा प्रकारे कोणत्याही धर्माच्या गुरूला कायद्याच्या/मसुद्याच्या प्रती देणे यामागचा उद्देशच कळला नाही. निवडणुकीत विजय मिळावा म्हणून पोपचा आशीर्वाद घेणे, किंवा स्वतःच्या मुलांना पोपकडून बाप्तिस्मा देणे आणि एखाद्या कायद्याच्या प्रती अशा सादर करणे यातला फरक सर्वांना चांगलाच कळत असावा.

उद्या सांगाल कि मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान आहेत, फक्त शिखांचे नव्हेत ,त्यामुळे त्यांनी डोक्यावरची पगडी,राखलेली दाढी काढून टाकावी. काय लॉजिक लावतात लोक ,नै. ख्रिस्ति धर्म जगाला शांती शिकवणारा धर्म आहे .अगदी आपल्या पंतप्रधानाने त्यांची भेट घेतली आणि कायद्याची माहीती दीली आणि पोपचे मार्गदर्शन घेतले तर कुठे बिघडले? (ख्रिस्ती धर्माचा आदर करणारा आणि ख्रिस्ती नसल्याबद्दल हळहळ व्यक्त करणारा- ग्रेटथिन्कर)