Welcome to misalpav.com
लेखक: तिमा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मी चित्रपट पाहिलेला नाही पण माझ्या सामान्य ज्ञानानुसार राता हेच असावेत. यांनी चित्रपटात बहुदा यम साकारला आहे. माहिती चुकीची असल्यास तिमाकाका/मिपाकर यावर जास्त प्रकाश टाकतीलच.

जसे बीजे म्हणजे एकेकाळचे बाबूभाई जगजीवनदास तसे रा. ता. म्हणहे राजन ताम्हाणे!

जेमतेम ५/६ मिनिटे म्हणजे आता नक्की सांगायचे म्हणजे साईनाथच्या एंट्री पर्यंत तग धरली. त्याला बघीतले आणि गब्बरला पण बिंधास्त बघणारा मी... जो झोपलो तो "सिनेमा संपला" असे ओळखीचे वाक्य कानी पडले आणि उठलो.पॉप कॉर्न पण न खाता बघीतलेले सिनेमे फार कमी.त्यात हा पहिला...

टोलेबा़जी आवडली. रिकामे प्रेक्षागृह पाहून तर, हा नक्कीच अ‍ॅवॉर्ड जिंकणारा असावा असे वाटू लागले होते. पण या दोघांमुळे, (दिग्दर्शकाच्या) प्रतिष्ठेचे बुरुज सांभाळले जातात. शेवटी रापुंना स्वर्गात न्यायला आलेला यांत्रिक देवदूत, आमीरखानसारखा का दिसत होता, हे कोडे शेवटपर्यंत उलगडले नाही. ही तीन वाक्यं विशेष आवडली आहेत :-)

थोडक्यात आणि छान लिहिलंत. टीव्हीवर फुकटात लागेल तेव्हा बघण्याचा प्रयत्न करीन. (त्यातल्या २ नावांमुळे) लिखाण एकदम खुसखुशीत!