Welcome to misalpav.com
लेखक: धन्या | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आमच्या रायगड जिल्ह्यात याला म्हशीला टोणगा लावणे असे म्हणतात. टोणगा शब्द तितकासा प्रचलित नसल्यामुळे मी लेखात रेडा शब्द वापरला आहे. :)

गाय/बैल/म्हैस/रेडा यांच्या झुंजीला झोंबी म्हणतात. जर या गुरांची शिंगे बाकदार असतील तर अशा झोंबीच्या वेळी ती दुसर्‍या गुराच्या शिंगात अडकतात आणि मग बाका प्रसंग ओढवतो. :)

सामन्य शेतकरी जर म्हशीला रेडकु झाले तर त्याला सांभाळायला तयार नसतात. रेडा लावायला देणारे लोक असतात त्यांनाच ते रेडकु विकले जाते नाहीतर कसायाकडे जाते असे ऐकले होते. हे खरे आहे का? रेड्याचा शेतकर्‍याला आणखी काही उपयोग होतो का?

प्रजनन सोडलं तर रेडयाचा शेतकर्‍याला काहीच उपयोग नसतो. कुणा शेतकर्‍याचा अगदीच नाईलाज झाला, नांगरणीच्या वेळी बैल मिळाला नाही तर रेडयाला नांगराला जुंपले जाते. परंतू म्हैस किंवा रेडा प्रचंड आळशी असतात. हा प्राणी एकदा चिखलात बसला की त्याला उठवणं हे एक मोठं दिव्य असतं.

आम्ही पण एक बैल आणि एक रेडा असे जोत वापरायचो... बैलाचा चपळपणा, समज, आणि रेड्याची ताकद.. छान जोडी.

रेडकू कसायाकडे दिले जाते हे खरे आहे. आणि थोडा अमानुष प्रकार म्हणजे कसाई त्या रेड्काच्या कातड्याची छोटी पिशवी शिवून मालकाला देतात. मालक दुध काढताना हि पिशवी म्हशीला हुंगायला देतो आणि मग म्हशीला पान्हा फूटतो. हा प्रकार मी हैद्राबाद ला बघितला आहे.

कातड्याची पिशवी अजुन वापरतात. पुर्वी पेंढा भरलेले रेडकू असायचे पान्ह्यासाठी. लहान रेड्याला मराठवाड्यात वाघार किंवा वाघरु म्हणतात. रेडा अगदीच बिन्कामाचा नसतो. काहीजण अगदी हौसेने हालगट पाळतात. टकरी आता बंद झाल्यात पण दारु पाजलेल्या हाल्याच्या टकरी मी पाहील्यात. किती अमानुष ताकद असते हाल्यात ते त्या आवाजातच जाणवते. अगदी परवा परवा घाटात अडकलेला ट्रेलर बाहर काढने ट्रक्टर वापरून जमना. बैल सुधा फेस काढत होते तेव्हा चार हालगट वापरून विंड मिल असणारा मोठा ट्रेलर रस्त्यावर आणलेला मी पाहिला आहे. फ़क्त हाल्या जू लवकर लावून घेत नाही. वेसण आन कासराच लावतात.

वाईट :( :( :( च्यायला, दिवसाच्या सुरुवातीलाच हे मी का वाचले. साला आता दूधही धडपणी पिववणार नाही.

गाई काय चितळ्याकडुन दूध आणून देतात काय? का पावडर विकत घेतात? तिथे पण अशाच कहाण्या असतात. :-( एकेक डेअरी पाह्यली तर दूध प्यायचे डेअर करनार नैस ;-) गोकुळ नंदाचे नाही आता. विनयरावाचे आहे.:)

मी हेच म्हणणार होतो .. इतना शेन्टीमेन्टली नई होनेका . गाय म्हैश बकरी बस्स फक्त उपयोगी पशु हय . ( नाही तर , रेडकु / खोंड मारलं जात नाही अशा प्राण्याचा दुध पिण्याशिवाय पर्याय राहणार नाही ... ;) )

इतना शेन्टीमेन्टली नई होनेका
वईच तो बता रिया मै. :) दूध हेच त्यांचे यूएस्पी. कुठल्याहि पशुखाद्याच्या (दुधाळ) जाहिराती बघ. मुख्य मुद्दा दुधाचे प्रमाण वाढविणे हाच. जास्तीत जास्त दुधाचा दर्जा वाढविणे, परत गायींना इंजेक्शने दूध वाढविण्यासाठी, संकरीत जाती कुठल्या तर जास्त दूध देणार्‍या, मग त्या रिप्रॉड्क्शन न करणार्‍या (टर्मिनेटर बियाणे आठवले का?) असतील तरी चालेल. साधा कडबा, मका, आस्ट्रेलिअन ब्ल्यु ग्रास नायतर मुरघास कशासाठी तर जास्त दुधासाठी. एकूण काय तर आपण खाऊ न शकणार्‍या खाद्याचे रुपांतर खाद्यात करणारे मशीन ते. कशाला उगीच शेण्टीमेण्टल व्हायचे? त्यो कुठला टिंग्या का काय तो पिक्चर मल्टीप्लेक्समध्ये डेरीमिल्क खात बघायचा. बस्स. :) (बाकी नैसर्गिक शेतीचे अन दुग्ध व्यवसायाचे अजून कुतूहल असणार्‍यानी अंकोली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील अरुण देशपांड्याच्या प्रकल्पाला भेट द्यावी. खूप सारी माहिती मिळेल ही ग्यारंटी. :) )

खालील लेख वाचा. आता अमेरिकेत मान्साहारी दुध मिळते. कारण गायी शाकाहारी राहील्या नाहीत.. अजबच http://epaper.loksatta.com/166067/indian-express/29-09-2013#page/26/2

उगा कायबी काहान्या ऐकू नगा... सगलं दूद बाटलितुन नायतं पिशवितुन नायतं डब्यातुनच येतंय बगा. हाकानाका ;) --- (नीडोच्या डब्यातलं दूध आवडनारा) इस्पिकचा यक्का

असं कसं ? असं कंसं ? कोणत्याही गोष्टीला (अगदी त्यांच्या भल्याची असली तरीसुद्धा) प्रतिवाद करणे या टिंकर... आपलं... थिंकर लोकांच्या हक्काला बाधा पोच्विल्ल्य्याबद्दल तुम्चा टीव्र णीशेढ ;)

अतिशय रोचक लेखन! हे प्रत्यक्ष पाहिले नव्हते कधीच. पार्ट ऑफ लाईफ, दुसरे काय. बाकी माजावर आलेली असो किंवा नसो, गाय अथवा म्हैस सांभाळणे म्हंजे तसा औघडच प्रकार, तो लीलया केलेल्या धनाजीरावांना एक कडक सलाम!

हा प्रकार माहिती होता, टोणगा लावणे असे बहुतेक याला म्हंटले जाते.तसेच भरवश्याच्या म्हशीला टोणगा ही म्हण देखील आहे.कोणाला जास्तीची उत्कंठा असेल तर मदतील तू-नळी आहेच म्हणा... ;) जाता जाता :- रेडकु/टोणगा याचे बिचार्‍याचे हाल होतात... आधीच काही मिळत नाही,बाजारात किंमत नाही शिवाय एकदा काम होउन देखील वरुन जबरदस्ती ! ;)

हा प्रकार माहिती होता, टोणगा लावणे असे बहुतेक याला म्हंटले जाते.तसेच भरवश्याच्या म्हशीला टोणगा ही म्हण देखील आहे.
बाणा, तुझं बरोबर आहे. टोणगा लावणे हेच जास्त प्रचलित आहे.

"माज आलाय काय?" या वाकप्रचाराचा अर्थ आता कळला. एक प्रश्न. रेड्याबरोबरच्या एका दिवसातल्याच प्रयत्नात म्हैस गाभण राहते का? अर्थात मला यातले काहीच माहिती नाही. इतर प्राण्यांत माजाच्या दिवसात अनेक वेळा केलेल्या प्रयत्नांनंतर (एकाच दिवशी नाही) गर्भधारणा होते. तसे म्हशींमध्ये नसते का? शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणार्‍या बैलांच्या जननेंद्रियांची काहीतरी शस्त्रक्रिया करावी लागते असे ऐकले आहे. त्याबाबत काही माहिती आहे का?

रेड्याबरोबरच्या एका दिवसातल्याच प्रयत्नात म्हैस गाभण राहते का?
एकाच प्रयत्नात म्हैस गाभण राहण्याचं प्रमाण खुपच जास्त असतं. अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणावे इतपत. एखादी म्हैस एकदा रेडा लावल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा माजावर आली तर त्याला "म्हैस पलटली" असे म्हणतात. भरवशाच्या म्हशीला टोणगा या म्हणीचं मुळ या म्हैस पलटण्याच्या प्रकारात आहे.
शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणार्‍या बैलांच्या जननेंद्रियांची काहीतरी शस्त्रक्रिया करावी लागते असे ऐकले आहे.
या प्रकाराला "बैल बडवणे" असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया नसून खरं तर एक वाईट प्रकार असतो. नुकतंच वासरुपण संपलेल्या वयात आलेल्या खोंडाला खोडयात अडकवून आडवे पाडले जाते. त्याचे पाय जाड दोर्‍यांनी करकचून बांधले जातात आणि लाकडी हातोडयाने त्या खोंडाचे वृषण चेचले जातात. नंतर त्यावर हळद चोळली जाते. या सार्‍या प्रकारामागे त्या खोंडाचे लैंगिक खच्चीकरण होऊन तो गायीच्या मागे जाऊ नये हा उद्देश असतो.

//भरवशाच्या म्हशीला टोणगा या म्हणीचं मुळ या म्हैस पलटण्याच्या प्रकारात आह//// तसे नसावे. म्हशीला म्हैसच व्हावी अशी इच्छा असते. काही म्हशीलापण लागोपाठ म्हैसच होते. अशा या भरवशाच्या म्हशीला जर टोणगा झाला तर ..... त्या म्हणीचा उगम असा आहे... (आपण म्हटलेलेच आहे की टोणग्याचा काही उपयोग नसतो).....

भरवशाच्या म्हशीला टोणगा ही म्हण माझ्या माहितीप्रमाणे "ज्याच्याकडून फार अपेक्षा आहेत त्याच्याकडूनच अपेक्षाभंग होणे" अशा अर्थाने वापरली जाते. ज्या म्हशीला एकदा टोणगा लावल्यावर ती गाभण राहनारच अशी खात्री असताना ती म्हैस पलटल्यामुळे त्या "भरवशाच्या म्हशीला टोणगा" लावावा लागला असं काहीसं.

जयंतरावांचं बरोबर आहे. घरी म्हैस असणारांची म्हशीकडून असणारी अपेक्षा म्हणजे दुसरी म्हैस कारण ती देत असलेलं दूध नि त्यापासून मिळणारं उत्पन्न. एक म्हैस हमखास म्हैसच जन्माला घालत असेल तर साहजिकच ती भरवशाची वाटू लागते नि अशा वेळी तिच्या पोटी टोणगा आला तर आत्यंतिक अपेक्षाभंग होतो. (टोणगा दूध देत नाही, बैलाप्रमाणेच. काही मिसळपाव सदस्यांचा शेरभर देत असला तरी) त्यामुळे उत्पन्नाचे मार्ग खुंटतातच वर त्या प्राण्याचा फारच कमी उपयोग होतो. म्हणून भरवशाचा म्हशीला टोणगा! (महिष--- महिषासुर--- महिषासुरमर्दिनी ) आली आठवण देवीची! :)

म्हशीचे मुख्य उत्पन्न आहे दूध. एखादी तान्ही म्हैस आपण दूधासाठी घरात थेवावी, आणि तिलाच टोणगा लागावा, आणि ति गाभण राहावी.. असे काहीतरी ध्वनित होते.

मी ही असच ऐकलं होतं आजवर आजी आजोबांकडुन. बाकी अगदी धन्यासारखी गायीगुरं चरायला नेली नसली तरी त्याने वर्णन केलेल्या बर्‍याच गोष्टी पहाण्यात आल्या आहेत बालपणी. वेगळ्या विषयावरचं लेखन आवडलं धनाजीराव. :) तुला ते करण्यास उद्युक्त केल्याबद्दल वल्लीशेटचेही आभार. :) टोणगा हा शब्दही फारा दिवसांनी ऐकला. लहानपणी येता जाता 'उद्धार' व्हायचा आमचा. ;)

बैल बडवणे पाहायला मला आजही जमणार नाही. एकदा कुतुहलाने पाहिले होते तेव्हा धीर धरुन शेवटपर्यंत थांबून र्‍हायलो. मग असा हळहळायला लागलो कि विचारता सोय नाही.

>>> या प्रकाराला "बैल बडवणे" असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया नसून खरं तर एक वाईट प्रकार असतो. नुकतंच वासरुपण संपलेल्या वयात आलेल्या खोंडाला खोडयात अडकवून आडवे पाडले जाते. त्याचे पाय जाड दोर्‍यांनी करकचून बांधले जातात आणि लाकडी हातोडयाने त्या खोंडाचे वृषण चेचले जातात. नंतर त्यावर हळद चोळली जाते. या सार्‍या प्रकारामागे त्या खोंडाचे लैंगिक खच्चीकरण होऊन तो गायीच्या मागे जाऊ नये हा उद्देश असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस इतका क्रूर आणि निर्दयी का होतो याचे मला कायम दु:ख वाटत आले आहे. बैल इतर प्राण्यांप्रमाणेच फक्त ठराविक दिवसातच माजावर येत असणार. तो काही वर्षाचे ३६५ दिवस गायीच्या मागे जाणार नाही. निसर्गनियमाप्रमाणे फक्त त्या ठराविक दिवसातच तो गायीच्या मागे जाणार असेल तर माणसाने त्याला इतक्या वेदना देऊन अत्याचार का करावा?

स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस इतका क्रूर आणि निर्दयी का होतो याचे मला कायम दु:ख वाटत आले आहे.
असाच वाईट प्रकार गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर होतो. गायीचं किंवा म्हशीचं पिल्लू जन्माला आल्यानंतर तासभरात ठणठणीत होऊन उडया मारु लागतं. गाय/म्हैस व्यायल्यानंतर पहिल्यांदा जे दुध काढलं जातं ते खुपच घट्ट आणि चिकट असते. या पहिल्या दुधाला कोकणात चिक म्हणतात. या चिकापासूनच खरवस बनवला जातो. मादी व्यायल्यानंतर तिच्या दुधावर तिच्या पिल्लाचा हक्क असतो. दुर्दैवाने हा नियम माणूस आपण पाळळेल्या प्राण्यांच्या बाबतीत पाळत नाही. गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर तिचे दुध काढले जाते. तिला पान्हा फुटावा म्हणून अगदी थोडा वेळ वासरु किंवा रेडकूच्या तोंडात त्याच्या आईचे आचळ दिले जाते. आनि नि जेमतेम अर्धा कप दुध ते पिल्लू प्यायले नसेल तर त्याला "आखडले" जाते म्हणजे आचळापासून दूर केले जाते. ते वासरु आपल्या आईच्या आचळापर्यंत जाण्यासाठी केविलवाणी धडपड करत राहते. पण माणसाच्या अमानुषतेपुढे त्याचे काही चालत नाही. यावर दुधाचा व्यवसाय करणारे शेतकरी त्यातल्या त्यात एक व्यवहारीक तोडगा काढतात. गाय किंवा म्हशीच्या चार आचळांपैकी एका आचळाचे दुध तिच्या पिल्लाला पिऊ दिले जाते. उरलेले तीन आचळांचे दुध चरवीत काढले जाते.

आणि चरवीत दुधाची धार पडायला लागल्यावर चरवी सूर पकडते.जस जसे दूध साठत जाते मग चरवीचे गायन कमी होत जाते.

छान बारकावा टीपलात. वरच्या पट्टीतील "चर्र चर्र" असा काहीसा आवाज असतो तो.

पशुपालन करणारे तो व्यवसाय म्हणुन करतात. चीकाला किंमत मिळते, ते पौष्टीक असते म्हणुन रेडकुच्या तोंडातला घास माणसाच्या तोंडी घातला जातो. असं प्रत्येक व्यवसायात होतं... प्रमाणाचा काय तो फरक. त्यात अमानुषपणा अजीबात नाहि. तो सच्चा माणुषपणाच आहे.

बैल इतर प्राण्यांप्रमाणेच फक्त ठराविक दिवसातच माजावर येत असणार. तो काही वर्षाचे ३६५ दिवस गायीच्या मागे जाणार नाही. निसर्गनियमाप्रमाणे फक्त त्या ठराविक दिवसातच तो गायीच्या मागे जाणार असेल तर माणसाने त्याला इतक्या वेदना देऊन अत्याचार का करावा?
निसर्गनियमाप्रमाणे बैल वर्षाचे ३६५ दिवस "माजलेला"च असतो. पण बॉटलनेक गायींमुळे येते. गायी ठराविक वेळी माजावर येतात तेव्हाच बैलांना संधी साधता येते. (बहुतांश प्राणीजगतात हेच होतं.) बाकीच्या वेळेस बैलाने काही करायचा प्रयत्न केल्यास गायी स्वत:च्या "शीलरक्षणा"साठी पुरेशा ताकदवान असतात. भाव न देणाऱ्या गायींच्या मागेमागे जाण्याची बैलांची नैसर्गिक वृत्ती नसते. बैल बडवतात तो शेतीच्या कामांना उपयोगी पडावा म्हणून. --- ही वर्णनं वाचून ज्यांना दूध नकोसं होत असेल त्यांनी सोयाचं दूध प्यावं. चहा, कॉफीत घालून पिण्याची माझी अजून हिंमत झालेली नाही; पण ब्रेकफास्ट सिरीयलमधे किंवा पेय म्हणून काही वाईट लागत नाही. पाव किंवा पोळीच्या कणकेतही सॉयचं दूध घातल्यामुळे चवीत फार फरक पडत नाही. त्याशिवाय पोल्ट्रीत काय चालतं, कोंबड्या, नवजात कोंबडे यांचं काय होतं याची चौकशीही करू नये. व्हेगन आहाराच्या प्रसारासाठी जे माहितीपट बनवले जातात ते ही टाळलेले उत्तम. शिवाय शेतीच्या यांत्रिकीकरणाचा पर्याय आता उपलब्ध आहे. --- धनाजीशेठ, तुमच्या या वेगळ्या अनुभवांबद्दल जरूर लिहा.

निसर्गनियमाप्रमाणे बैल वर्षाचे ३६५ दिवस "माजलेला"च असतो. पण बॉटलनेक गायींमुळे येते. गायी ठराविक वेळी माजावर येतात तेव्हाच बैलांना संधी साधता येते. (बहुतांश प्राणीजगतात हेच होतं.) बाकीच्या वेळेस बैलाने काही करायचा प्रयत्न केल्यास गायी स्वत:च्या "शीलरक्षणा"साठी पुरेशा ताकदवान असतात. भाव न देणाऱ्या गायींच्या मागेमागे जाण्याची बैलांची नैसर्गिक वृत्ती नसते.
विशिष्ट हंगाम सोडला तर बैल स्वतःहून गायीच्या मागे जातात याचा पुरावा असेल तरच बैल माजलेला असेल असे म्हणता येईल. तसा पुरावा आहे का?

त्यासाठी बैलाच्या मागे दावाकर्ता/कर्ती ला ३६५ दिवस तरी जावे लागेल असे दिसते. ;) तुम्चं संख्या शास्त्र काहीच कसं सांगत नाही ब्यामॅशेट?

अहो विदा आणि निरीक्षणे असल्याखेरीज संख्याशास्त्र काहीच बोलत नै. त्याच्या नावाखाली कुणी तसे बोलत असेल तर नाइलाज आहे. "संख्याशास्त्र अ‍ॅब्यूजणे | जळो जिणे लाजिरवाणे ||" असे लोक म्हणून गेलेतच ;)

जिवंत प्राणी, पक्षी, झाडांची एकमेव मूलभूत प्रेरणा असते, पुनरूत्पादन. आपली गुणसूत्र तगवणे, पुढच्या पिढीत पाठवणे. त्यासाठी जे काही "कष्ट, त्याग, बलिदान" करावे लागतात ते सगळे केले जातात. (ही नैसर्गिक प्रेरणा. मानवी मूल्यं निराळी.) बहुतांश प्राणी जगत आणि सस्तन प्राण्यांमधे नर समागमासाठी नेहेमीच* तयार असतो. नरांना जास्तीत जास्त माद्यांशी संभोग करून आपली गुणसूत्र पसरवता येतात; माद्या कमी प्रजा तयार करतात पण उत्पन्न झालेल्या प्रजेची देखभाल करतात आणि आपली गुणसूत्र पुढच्या पिढीत पाठवतात. (या नर-मादी वर्गीकरणालाही अपवाद आहेत, पण कमी आहेत. आणि प्रस्तुत उदाहरण हा अपवाद नाही.) बैल समागमासाठी, वीर्यासकट तयारच असतात. (चार गावांमधे एक रेडा पुरतो, हे त्यामुळेच.) पण गायी तयार नसतात. वासरू जन्माला आलं की गायी त्याची काळजी घेतात. हा काळ सर्वसाधारण प्राण्यांमधे वासरू स्वत: पुनरूत्पादनासाठी तयार होणं इतका असतो. (शेतकरी कुटुंबांमधले लोक या तपशीलाबाबत अधिक माहिती देऊ शकतील.) त्यानंतर गायी/माद्या पुन्हा माजावर येतात. बैलांच्या बाबतीत अशी डॉर्मंट स्थिती नसल्यामुळे त्याला माजवर येणं असं म्हणणं कितपत योग्य आहे याची मला कल्पना नाही. पण एकदा नर वयात आला की तो लैंगिकदृष्ट्या अॅक्टीव्हच असतो; कालवडींचं असं होत नाही. (लहानपणीच्या आठवणीनुसार) गायींचा असा विशिष्ट हंगामही नसतो. गायी कोणत्याही महिन्यात माजावर येऊ शकतात. एका वेळेला सगळ्या गायी माजावर आणि पुढे गाभण, असं दिसत नाही. लेख वाचून म्हशींच्या बाबतीत असं निश्चितच म्हणता येईल; एका म्हशीला माजावर यायला दहा (बारा नाही) महिने लागतात. बैल बडवला की बहुदा (माणसाविरोधात, आज्ञा देणाऱ्याविरोधात) बंडखोरीची भावना उत्पन्न करणारी संप्रेरकं वृषणांमधे तयार होत नाहीत पण शारीरिक ताकद तशीच रहाते. त्यामुळे फार कष्ट न घेता माणसाला ही ताकद स्वत:च्या उपयोगासाठी वापरून घेता येते. *एक समागम झाल्यावर वीर्य पुन्हा तयार होण्यासाठी जो काळ मधे जावा लागतो, तो वगळता. पण यालाही अपवाद आहेत. त्याचं वर्णनही सदर लेखात आलेलं आहेच. हा काळ माद्यांना माजावर यायला म्हणजेच पुढचं बीजांडं तयार (मच्युअर) होण्यासाठी लागणाऱ्या काळपेक्षा फारच कमी असतो. मनुष्यांमधे साधारण स्त्रियांना एक महिना लागतो, पुरुषांना फारतर एक दिवस. --- हे फार त्रोटक लिहीलेलं आहे. पण gender evolution किंवा evolutionary psychology विषयावरच्या कोणत्याही मूलभूत पाठ्यपुस्तकांमधे याबद्दल फार तपशीलात माहिती मिळेल. मी सध्या हे पुस्तक वाचते आहे आणि त्यात या गोष्टी प्रयोगांसकट रंजकरित्या लिहीलेल्या आहेत.