ख्रिस्ति धर्म जगाला शांती शिकवणारा धर्म आहे .अगदी आपल्या पंतप्रधानाने त्यांची भेट घेतली आणि कायद्याची माहीती दीली आणि पोपचे मार्गदर्शन घेतले तर कुठे बिघडले?
अगदी अगदी. क्रूसेड करणारे, इ.स. १५०० पासून आफ्रिका-अमेरिका-आशिया खंडांतील लोकांवर अनन्वित अत्याचार करून ख्रिस्ताच्या कैकांचा वंशविच्छेद, संस्कृतिउच्छेद करणारे लोक बहुतेक शांतीचाच संदेश देत होते. कॅथलिक-प्रोटेस्टंट झगडे, गोवा इन्क्विझिशन, जेरूसलेम क्रूसेड मध्ये मुसलमानांवरचे केलेले अत्याचार, अमेरिका खंडातील आदिवासींचे हत्याकांड, जगभरच्या वसाहतींमध्ये केलेले अत्याचार, इ.इ. सगळे शांतिप्रिय लोकांनीच केले, हो की नाही? इतका जर तो धर्म शांतिप्रिय होता तर त्या धर्माने नास्तिकांचा इतका छळ का बरे केला? जिओर्डानो ब्रूनोसारख्यांना पृथ्वी सूर्याभोवती फिरते इतकेच सांगितल्याने जिवंत का जाळले गेले? हायपॅटिया सारख्या महिला फिलॉसॉफरला दगडांनी चेचून का मारले? बहुतेक शांती प्रस्थापित करायलाच असेल.
अन पोपला राजकारणातलं काय कळतं म्हणून मनमोहन सिंगाने त्याच्याकडे जावं मार्गदर्शनासाठी?
एक तर तुम्ही अजिबात त्या बाजुचे नाही आहत जे तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय.. (पराने ब्राह्मणांविरुद्ध काइतरी इतिहासाचे पुनर्लेखन धागा लिहीला ना त्या टाईप..)
किंवा काहितरी सिरीयस लोचा आहे तुमच्या डोक्यात...
त्याशिवाय असं वाट्टेल ते कसं लिहील माणुस..??
काही जणांना त्यांच्याच भरवशावर सोडलेले बरे, हेच खरे.
झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्या नाही ;)
नाहीतर ग्रेट थिंकींग कशाला हवे... केवळ ऑर्डिनरी थिंकिंगवाल्या माणसालाही एका देशाच्या मंत्र्याच्या "पब्लिक / संवैधानिक" आणि "खाजगी" जीवनातला आणि जबाबदार्यांतला फरक कळला असता !
अर्थात जेव्हा एखादा देशाचा मंत्री अशी कृती करतो तेव्हा तो एकतर अज्ञानी असला पाहिजे (ज्याची शक्यता कमी आहे... कारण हेच लोक स्वतःच्या फायद्याचे कायदे फार चतुराईने बनवतात / बनवण्याचा प्रयत्न करतात *) किंवा सर्वसामान्य जनतेला फाट्यावर मारले तरी आपले "बांधलेले" लोक सारासार विवेकबुद्धी** न वापरता आपल्याला आंधळे समर्थनच देतील याची खात्री (हे आता सिद्ध होत आहेच)... कारण लोकशाही केवळ दिखाऊ तोंडीलावणे, मुख्य "खाणे" वेगळेच असते.
भारताचे दुदैव असे की आपल्यात राजकारणी गल्लीबोळात हू म्हणून आहेत... देशकारण करणार्यांची कमतरता आहे.
*: नुकतीच लोकसभेतील गुन्हेगार सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध कायदा बनविण्याची झालेली अयशस्वी तडफड.
**: हीला ग्रेट थिंकिंग करताना विचारपूर्वक बासनात बांधून ठेवली जाण्याची राजकारणी प्रथा पाहतो आहोतच.
दुसर्यावर टीका करायच्ञा आधी फ्याक्ट तपासणे महत्त्वाचे. विश्वबंधुत्वाचे डांगोरे पिटून आपल्याच देशबांधवांना शिव्या घालण्यात धन्यता मानणार्यांपैकी आम्ही नाही.
तुम्ही सांगितलेल्यापैकी कुठल्या मुद्द्याला पोपमुळे कशी मदत होणारे ते सांगा, मग आमच्या तुम्हीच आरोपिलेल्या जपजाप्याबद्दल खल करू. कसे?
बिल गेटने किंवा अजून कोणी कोणत्याही (यात सामाजिक, वैद्यकीय, इ सर्व प्रकारचे प्रकल्प अंतर्भूत आहेत) अगदी बिलियन्समध्ये डॉलर ओतले तरी त्याला भारतीय सार्वभौमत्वाला धक्का लागेल असे कोणतेही अधिकार मिळणार नाहीत... मिळू नयेत. कारण तो १२० कोटी भारतीयांचा (त्यात तुम्ही आम्ही सगळे भारतीय आलो) अपमान असेल. देशाच्या सार्वभौमत्वाला मूठमाती देऊन/देणारा कोणताही प्रकल्प स्विकारायचा हक्क भारतिय सरकारला नाही.
शिवाय, भारत सरकारच्या कोण्या एका बिलाची माहिती करून घेण्याएवढी पोपसाहेबांना उसंत / गरज आहे असे वाटत नाही. गरिबांच्या दोन वेळच्या अन्नाची सोय होणारी बातमी कोणी दिली तर त्याची कोणीही सज्जन माणूस वाखाणणी करण्याचा उपचार करून भेटीला आलेल्या पाहुण्याचा मान राखणारच. इतकाच केवळ पोप महाशयांच्या कृतीचा अर्थ.
मंत्रिमहोदयांच्या कृतीचा अर्थ मात्र संशयास्पद आहे. या सगळ्या प्रकरणात पोप महाशयांचा मतपेटीच्या राजकारणासाठी "उपयोग" केला जात आहे हे काही फार लपलेले गुपित नाही ! लोकपाल बिलही पोपसाहेबांच्या सल्ल्याने पुढे गेले असते तर मात्र इतर विचारास वाव होता (अर्थात, तसे करण्याचाही हक्क भारतिय सरकारला नाही, ही गोष्ट वेगळी.).
मी ग्रेट थिन्कर, उद्दाम आणि 'तमाम' सेक्युलरिस्ट काँग्रेसी, तसेच वामकुक्षी आपलं लेफ्टिस्ट कम्युनिस्ट सदस्यांचा 'फॅन' झालेलो आहे असं अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो.
त्यांच्याशिवाय तरणोपाय नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे.
धन्यवाद!
-माणूस बनण्याच्या प्रयत्नात
राईचा पर्वत करणे म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा धागा!
खरे तर अन्नसुरक्षा विधेयक भारतीय संसदेने पारीत केले असून त्यावर राष्ट्रपतींची मोहोरदेखिल उठली आहे. आता ते संपूर्ण विधेयक जगजाहीर आहे (जालावर फुकट उपलब्धदेखिल आहे). अशा परिस्थितीत, त्या बिलाचा गोषवारा (संपूर्ण विधेयक नव्हे आणि अख्खी घटनातर नव्हेच नव्हे) भेटीला गेल्यानंतर पोपना दिली (पुस्तिका पोपच्या पायावर घालून आले, हा धागाकर्त्याचा समज (इंटरप्रिटेशन), तर त्यात कुठल्या गोपनियतेचा भंग होतो वा कुठे आपली सार्वभौमिकता धोक्यात येते, ते समजले नाही.
थॉमस हे अन्नसुरक्षेच्या परिषदेला रोम येथे गेले होते. तेव्हा हे समयोचितदेखिल म्हणता येईल. (कुठला मंत्री अफ्रिकेत अणूउर्जा परिषदेला गेला आणि मुद्दम वाट वाकडी करून रोमला जाऊन पोपना अन्नसुरक्षा विधेयकाचा गोषवारा दिला असता, तर आक्षेप समजण्यासारखा होता).
खेरीज, पोप हे जसे कॅथलिक पंथियांचे प्रमुख धर्मगुरू आहेत तसेच वॅटिकन ह्या सार्वभौम देशाचे देशप्रमुखदेखिल आहेत.
असो.
अन्न सुरक्षा परिषदेत जे बुकलेट वाटले, त्याचीच एक कॉपी पोपलाही दिली, तर पोपला कायद्याचा मसुदाच दिला म्हणून लोक गळा काढत बसले आहेत.
आणि राईचा पर्वत झाला तरी आनंदच आहे.
अन्नसुरक्षेत जे अन्न मिळेल, त्याला फोडणी घालायला राई लागेलच की! :)
संपूर्ण परिषदेत पोप हे कुठल्याही 'देशाचे' प्रतिनिधी म्हणून उपस्थित न्हवते. त्यामुळे थॉमस यांनी धार्मिक भावनेतूनच पुस्तिका पोपना अर्पण केली (म्हणून पायावर घालून आणली- जसे आपण अपत्याला देवीच्या पायावर घालून आणतो तसेच).
जसे मी लेखात म्हटले आहे कि, पुण्याच्या भावनेतून त्यांनी ते केले ज्याला वरवर हरकत असू नये. मी फक्त दुसर्या एका परिस्थितीमध्ये हीच घटना माणसे आणि धर्म बदलून कल्पना करत होतो. त्या परिस्थितीमध्ये आपल्या माध्यमांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले असते का?
शिवाय जिथे पोप राहतात तिथे शिवाय बहुतेक सर्व युरोप मध्ये सरकारी धर्म ख्रिस्ती आहे. त्यांच्या सरकारी माणसाने हे केले तर त्याची वाहवा होईल. आपल्या देशाचे सरकार 'निधर्मी' आहे. ज्या पक्षाचे सरकार आहे ते त्या मुद्द्यावरून टिर्या बडवून घेत असतात. या सर्व पार्श्वभूमीवर या घटनेची साधी दखल सुद्धा घ्यायची नाही असे तुमचे म्हणणे आहे काय ?
नॉनइश्युवरुन लोकांमध्ये भांडणं लावून द्यायची ,म्हणजे लोक मुख्य मुद्द्याकडे येतच नाहीत...
लोकांना अन्न मिळेल याचा आनंद नाही, पोपच्या नावाने चुना लावत बसायचे..
हा मुद्दा "मुख्य मुद्दा -लोकांना अन्न मिळणे" तुमच्या लक्षांत आला तर......
हे मात्र लक्षात नाही आले
"प्रतिक्रिया देतोय कारण खरा इश्यु वाचकांच्या लक्षात आणुन देणे."
कारण तुमचा खरा इश्यु माझ्या तरी लक्षांत आला आहे...
तरी पण आपले ते मूळ प्रश्र्न आहेतच ,,,,
बाकी नेहमीप्रमाणे......
लोकांना अन्न मिळेल याचा आनंद नाहीहे फक्त गृहित आहे. याच्यासाही खरी राजकीय इछाशक्ती आहे की नाही याकरिता "शिधापत्रिकांच्या घोळांची पाश्वभूमी + गेले शतक दोन शतके होणार्या गलथान साठवणूकीने होणार्या हजारो टन अन्नाच्या नासाडीची पार्श्वभूमी" चांगले उत्तर देत नाही. किंबहुना "अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी योग्य गोदामे तयार करा आणि शिधापत्रिकेवरून नीट अन्न्वाटप होईल अशी व्यवस्था करा... इतर काहीही करण्याची गरज नाही" हा सल्ला तज्ञांकडून सरकारला अनेकदा दिला जातो आणि त्याकडे सतत डोळेझाक केली जाते. यात या योजनेतून काय साधायचे आहे ते दिसतच आहे... डोळे उघडे असल्यास. सद्याचे पुरावे हे फक्त गृहितच राहील किंवा भ्रष्टाचारासाठी अजून एक कुरण होईल असेच पुर्वानुभव आहे.
जर सरकारला खरंच गरिबांच्या पोटाची काऴजी असेल तर ती (१) थोड्या काळासाठी भ्रष्टाचारमुक्त शिधापत्रीकेवरील अन्नचे वितरण आणि (आ) कायम स्वरूपी देशव्यापी रोजगार योजनेचे नियोजन यानेच होऊ शकेल. हे करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि त्यासाठी भ्रष्ट सबळांना काबूत ठेवून दंड करण्याची कुवत असल्याचे पुरावे अजूनपर्यंत उपलब्ध नाहीत. त्यामुळे केवळा पुस्तिका वाटुअन किंवा अगदी कायदा करूनही (शिधापत्रिका कायदा आहेच की अनेक वर्षे) लोकाना ना अन्न मिळेल असा आनंद व्यक्त करायचा असेल तर स्वतःच्या बँकेच्या खात्यात एकाएकी करोडो रुपये जमा झालेत असाही आनंद व्यक्त करायला हरकत नाही... शेवटी सगळा खयालोंमे हंगामा.
पोपच्या नावाने चुना लावत बसायचे...
प्रतिसाद नीट वाचले तर असे दिसून येईल (किंवा खरे हे आहे की तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे) की बहुतेक जण असेच म्हणत आहेत की हा पोपबद्दलचा मुद्दा नाही तर "परदेशी माणूस किंवा कोणीही धर्ममार्तंड*" यांना आपल्या देशातल्या कायदाव्यवस्थेत दखल देण्याची अथवा सामील करून घेण्याची परवानगी सरकारला आहे काय? याचं उत्तर नाही असे आहे (हे माहित नाही असे दिसत आहे म्हणून मुद्दा भरकटवण्याच्या प्रयनाअगोदरच ते देऊन ठेवतो.)
* :यात सगळे-- हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, बौद्ध, इ. --- धर्म येतात.
प्रतिसाद आवडला. फक्त रेशन कार्डांबद्दल बोलायचे तर २०११ ची ही बातमी बघा.
२०११ च्या जनगणनेत गोव्याची लोकसंख्या १४.५९ लाख असताना तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कारकीर्दीत गोव्यातल्या रेशन कार्डधारकांची संख्या १६ लाखावर पोचली होती!!!
अजूनही पर्रीकर सरकार नेपाळी आणि बांगलादेशी घुसखोरांना कसे शोधून काढायचे या विवंचनेत आहे!
संपूर्ण अवांतरः सरकारी गोदामांमधे लाखों करोडों टन अन्नधान्य कुजून वाया गेल्याच्या बातम्या रोज उठून येत असतातच. त्याशिवाय या सगळ्या उपक्रमाला प्रत्यक्षात किती खर्च येणार आहे ते एक देवच जाणे! शिवाय करामती करून दारिद्र्य रेषा वर नेण्यात आली आहे. मग आता गरीब कुटुंबे कुठून उत्पन्न झाली? एकीकडे सबसिडी काढून टाकायच्या गोष्टी बोलायच्या, आणि एकीकडे सबसिडी या ना त्या प्रकारे वाढवत रहायची यामागचे अर्थकारण कोणीतरी समजून सांगा प्लीज!
....कसे शोधून काढायचे या विवंचनेत आहे!"
कठीण आहे...
आसामचे उदाहरण पटकन डोळ्यासमोर आले....
अति अवांतर....
तुमच्या गोव्यात पण मुंबई सारखे आझाद मैदान आहे का?
प्रतिक्रिया
दीली आणि पोपचे मार्गदर्शन घेतले तर कुठे बिघडले?
ख्रिस्ति धर्म जगाला शांती
एक तर तुम्ही अजिबात त्या
अहो
काहितरी सिरीयस लोचा आहे
काहितरी सिरीयस लोचा आहे तुमच्या डोक्यात...तुम्हाला या सगळ्या भानगडीतली मेख कळली आहे असे आम्ही जाहीर करत आहोत +Dकाही जणांना त्यांच्याच
दुसर्यावर टीका करायच्ञा आधी
बिल गेटने किंवा अजून कोणी
बरोब्बर.
लेखाच्या खालची सही आवडली
:D गुड वन
कोण पोप ?
हे भगवान.....
अहो
मी ग्रेट थिन्कर, उद्दाम आणि
धन्यवाद
आयला ... इतक्या लवकर धन्यवाद...
राईचा पर्वत
सहमत.
तेच तर मी म्हटले.
+ १
थोडेसे अजुन स्पष्टीकरण
इत्यलम
आपल्या दोघांनाही चकवा लागलेला
नॉनइश्युवरुन लोकांमध्ये
मुद्द्याकडे येताना,
@ इ.फा.
मुख्य मुद्दा -लोकांना अन्न
अरे व्वा!!!!!
लोकांना अन्न मिळेल याचा आनंद
लोकांना अन्न मिळेल याचा आनंद नाहीहे फक्त गृहित आहे. याच्यासाही खरी राजकीय इछाशक्ती आहे की नाही याकरिता "शिधापत्रिकांच्या घोळांची पाश्वभूमी + गेले शतक दोन शतके होणार्या गलथान साठवणूकीने होणार्या हजारो टन अन्नाच्या नासाडीची पार्श्वभूमी" चांगले उत्तर देत नाही. किंबहुना "अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी योग्य गोदामे तयार करा आणि शिधापत्रिकेवरून नीट अन्न्वाटप होईल अशी व्यवस्था करा... इतर काहीही करण्याची गरज नाही" हा सल्ला तज्ञांकडून सरकारला अनेकदा दिला जातो आणि त्याकडे सतत डोळेझाक केली जाते. यात या योजनेतून काय साधायचे आहे ते दिसतच आहे... डोळे उघडे असल्यास. सद्याचे पुरावे हे फक्त गृहितच राहील किंवा भ्रष्टाचारासाठी अजून एक कुरण होईल असेच पुर्वानुभव आहे. जर सरकारला खरंच गरिबांच्या पोटाची काऴजी असेल तर ती (१) थोड्या काळासाठी भ्रष्टाचारमुक्त शिधापत्रीकेवरील अन्नचे वितरण आणि (आ) कायम स्वरूपी देशव्यापी रोजगार योजनेचे नियोजन यानेच होऊ शकेल. हे करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि त्यासाठी भ्रष्ट सबळांना काबूत ठेवून दंड करण्याची कुवत असल्याचे पुरावे अजूनपर्यंत उपलब्ध नाहीत. त्यामुळे केवळा पुस्तिका वाटुअन किंवा अगदी कायदा करूनही (शिधापत्रिका कायदा आहेच की अनेक वर्षे) लोकाना ना अन्न मिळेल असा आनंद व्यक्त करायचा असेल तर स्वतःच्या बँकेच्या खात्यात एकाएकी करोडो रुपये जमा झालेत असाही आनंद व्यक्त करायला हरकत नाही... शेवटी सगळा खयालोंमे हंगामा.पोपच्या नावाने चुना लावत बसायचे...प्रतिसाद नीट वाचले तर असे दिसून येईल (किंवा खरे हे आहे की तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे) की बहुतेक जण असेच म्हणत आहेत की हा पोपबद्दलचा मुद्दा नाही तर "परदेशी माणूस किंवा कोणीही धर्ममार्तंड*" यांना आपल्या देशातल्या कायदाव्यवस्थेत दखल देण्याची अथवा सामील करून घेण्याची परवानगी सरकारला आहे काय? याचं उत्तर नाही असे आहे (हे माहित नाही असे दिसत आहे म्हणून मुद्दा भरकटवण्याच्या प्रयनाअगोदरच ते देऊन ठेवतो.) * :यात सगळे-- हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, बौद्ध, इ. --- धर्म येतात.उत्तम प्रतिसाद
"अजूनही पर्रीकर सरकार नेपाळी आणि बांगलादेशी घुसखोरांना
त्याहून वाईट!
असो...
Pagination