पण एवढा विचार करायला आम्हाला वेळ नसतो आणि वेळ असेलच तरी ते अनेक आघाड्यांवर परवडणारं नसतं. तरीही एखादा समाज असा का वागतो याला तात्कालिक कारणांपेक्षा समाजाच्या स्मृतीमधे असलेली अनेक शतकांची कारणे आणि एकत्रित अनुभव्/शहाणपणा/वेडेपणा असतो.
लेख खूप आवडला.
साधेपणाने आणि सुसुत्रपणे "मना"तील कोलाहल मांडला आहे.
आपण असे कां वागतो ह्याचे उत्तर मात्र मिळणे कठीण आहे.
तसेच एक उत्तर देखील नसणारेयं.
समाजमानसशास्त्रवाले, राजकारणी,विचारजंत.... प्रत्येकाचे विष्लेषण वाचायला आवडेल.
पण तशी उत्तरे वाचून देखील हे विचित्र वागणे नाही संपणारेयं.
तेव्हा मनातली वादळे नेहमीप्रमाणे मनातच विरून जाणारेयं.
पण ते अलहिदा. एक प्रामाणिक चिंतन वाचायला रंजक वाटले.
मनोबा .
लेख तर छानच आहे .
हे असं चहा घेताना बहुतेकदा मीही विचार केलाच आहे .
पण मग .
हे सगळे विचार करताना . एखादा मेल येतो . फोन येतो .
कि लागले सगळे रोजच्या रगाड्यात .
या सगळ्यासाठी काही करायचं जाउद्या .
शांत बसून विचार करायला तरी कोणाला फुरसत असते का इथे
Note: If using color names, different browsers may render different colors, and Firefox have problems if the attribute value is in RGB code (will not display correct color).
Tip: To produce equal results in all browsers, always use hex code to specify colors.
However, the color attribute was deprecated in HTML 4, and is not supported in HTML 4.01 Strict DTD or in XHTML 1.0 Strict DTD. Use CSS instead.
मूळ धाग्याचच एक्स्टेंशन असलेला हा प्रतिसाद देत आहे.
.
पब्लिकच्या कृत्रिम वागण्याबद्दल :-
मी नुकताच एक आंतरराष्ट्रिय ब्यंकेची सॉफ्ट्वेअर पाहणार्या उपकंपनीत भरती झालोय.(software arm of MNC, international bank असं म्हणता यावं.)
इथे ऑफिस भारतात असले तरी कित्येक युरोपीय वंशीय काम करतात. त्यांच्याशी कसे वागावे ह्यावरही एक भाग होता.(बहुदा त्यांच्या फीडबॅक वरून त्यातील सिलॅबस तयार केला असावा.)
तिथे सुरुवातीच्या वागणूक मार्गदर्शन शिबिरात(behaviour training) काही पथ्ये सांगितली.
वागणूक प्रोफेशनल असावी ही कुठलीही कॉर्पोरेट वर्तुळातील अपेक्षा तिथे होतीच. पण वातावरण फ्रेंडली असावं हाही मुद्दा ठसवण्यात येत होता.
अर्थात फ्रेंडली ह्याचा अर्थ नको तितके वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणे नव्हे ; हे ही आवर्जून सांगितले. त्याचा सारांश:-
भारतीयांच्या प्रतिक्रिया ह्या एकट्या राहणार्या प्रौढ व्यक्तीबद्दल विचित्र असतात. स्त्रिया , अधिक वयाच्या असतील तर अजूनच विचित्र. आणि स्त्री घटस्फोटित किंवा विधवा ; त्यातही तिला अपत्ये असतील तर अजूनच विचित्र.
युरोपीय वंशीय लोकांच्यात हे सिंगल लोकांचे प्रमाण भारतापेक्षा अधिक आहे.( मनोबा, विदा द्या. जा फुट. देत नै.) भारतीय "स्त्री एकटी आहे ह्याचा अर्थ ती available आहे" असा घेताना दिसतात.
त्यातही तिने चुकून कॉफी किंवा लंच वगैरे बोलावले, ट्रीटला बोलावले तर त्यांची खात्रीच होउन जाते.
घटस्फोटित असली तर आडून आडून कुठे सहानुभूतीचा उगीचच खांदा द्यायला जातात किंवा "नक्की कुणात प्रॉब्लेम असावा" ह्याची डिटेक्टिवगिरी सुरु करतात.
पण सगळं कसं आडून आडून. घटस्फोटिता ही चिडकी, निराश, हताश किंवा अतिआक्रमकच किंवा माजोरडी असली पाहिजे किंवा गरिब बिचारी, victim म्हणून जगणारी असली पाहिजे असे पब्लिक ठरवूनच टाकते.
सगळं कसं type casting.आम्ही इतर काही म्हणून पाहूच शकत नाही. दरवेळी उगीचच स्वतःच्या कृत्रिमतेने दुसर्यास अवघडायला लावतो.
.
गे लोकांबद्दलही हेच आणि असेच्.विचित्र नजरेने पाहणे.
.
ह्या ट्रेनिंगच्या उपदेशानंतर आठवला तो अगदि असाच मुद्दे असलेला वर्षभरापूर्वीचा TOI मधील एक लेख (हो. अजूनही TOI वाचतो.(गटणे "पूर्वी पीत होतो" असा कबुली जबाब देतो ना, तसेच.)).
त्यातही हेच मुद्दे मांडण्यात आले होते.
.
स्वतःपुरते:-
माझे स्वतःचे सांगायचे तर पूर्वी गे लोक आसपास असले तरी अंगावर घाण पडल्यासारखे वाटे.(अमुक एक व्यक्ती गे आहे हे तुला कसे कळे रे मनोबा? काही नाही, ते ऐकण्यात येइ;
क्वचित व्यक्तीने स्वतःच कधी तसे घोषित केलेले असे.) हल्ली त्यांची वैयक्तिक प्राथमिकता मान्य किंवा तो पूर्ण मुद्दा दुर्लक्षित करण्याइतकी तरी समज आहे. पण स्त्रैण वागणारे पुरुष पाहिले की अजूनही शिसारी येते. डोक्यात जातात ही मंडळी. गंमत म्हणजे आकर्षक बांधा असलेल्या मुलीची पुरुषी हालचाल (कमी लवचिकता, अधिक मोकळेधाकळेपणा, शारिइर्क सलगी अधिक) अजिबात डोक्यात जात नाही. उलट अधिकच आकर्षक वाटते. गंमत आहे.
प्रतिक्रिया
तुम्ही जाज्वल्य पुणेकर आहात
का??
हेच म्हणतो. बहुतेक विजुभौंचा
प्रकट चिंतन आवडलं
:)
Eternal truth
(No subject)
जबराट!!!!
आवडेश!
+१
मनातली वादळे म्हटलेले खरे.
+1
सुरेख रे मना सुरेख!
+१
+ १
मनोबा .
*****
परेशान आत्मा
misalpav!
misalpav!
Note: If using color names, different browsers may render different colors, and Firefox have problems if the attribute value is in RGB code (will not display correct color).
Tip: To produce equal results in all browsers, always use hex code to specify colors.
However, the color attribute was deprecated in HTML 4, and is not supported in HTML 4.01 Strict DTD or in XHTML 1.0 Strict DTD. Use CSS instead.
आभार...
उर्वरित
सही.