बिबी का मकबराची अवस्था पाहता त्यात प्रेक्षणीय काय असा प्रश्न आणि त्यात ती औरंगजेबाची बीबी.. त्यात काय पहायचंय..
रंकाळा 'ऐतिहासिक' आहे हे माहीत नव्हतं..
बाकि काडया सरपण आहे पण जरा झाकलेलं --
औरंगाबाद मध्ये आलेल्या पाहुण्याना फिरवण्यासाठी बीबी का मकबरा , पाणचक्की यासारखी स्थळे दाखवता येतात. कोल्हापुरात रंकाळा , भवानी मंडप , जुना राजवाडा , शालीनी पॅलेस , कनेरी मठ अशी ठीकाणे दाखवता येतात.
-- यात औरंगाबादेत दोन आणि कोल्हापुरात पाच जागा आहेत.
पुण्यात भटकंतीला दोन तीन दिवस आलेल्या पाहुण्याना कोणती ठिकाणे दाखवावीत हा प्रश्न पडतो.
शनिवार वाडा , पर्वती ,जंगली महाराज मठ , ओशो पार्क या व्यतीरीक्त ठीकाणांची माहिती मिळाल्यास पुण्यात रहाणार्या न रहाणार्या मिपाकरांसाठी एक चांगली सोय होईल.
पहिल्या झटक्यात विजुभाऊंना चार चांगली सुस्थितीतली ठिकाणं सापडली आहेत तरी इतक्या प्रतिसादांनंतर सूर कसा --
बस्स्.इतकीच ठीकाणे. फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच?
ऐतिहासिक म्हटल्यावर लगेच मनात येणारी पहिला जागा - पाताळेश्वर ती वल्ली साहेबांनी डिटेलवार सांगितली आहे.
दुसरा अर्थात आमचा अभिमान (अर्थात जाज्वल्यच) - सिंहगड..
वरचे प्रतिसाद जरी पाहिले तरी -
१. पाताळेश्वर
२. सिंहगड
३. शनिवारवाडा
४. पर्वती
५. ओशो कम्युन
६. जंगली महाराज मंदिर
७. केळ्कर म्युझियम
८. महादजी शिंदे छत्री - वानवडी
९. आगाखान पॅलेस - गांधी स्मारक
१०. कसबा गणपती
११. लाल महाल
१२. विश्रामबाग वाडा - अपुणेकर आणि ऐतिहासिक स्थळांमध्येच रस असेल तर इथले पुनवडी ते पुणे प्रदर्शन पहाच..
इतकी ठिकाणे आहेत. पण तरी इतकीच? म्हणून स्वाहाकार चालू आहेच :)
इतर म्युझियम सुद्धा -(फुले, जोशी रेल्वे, इ.) सांगितली आहेत. एम्प्रेस गार्डन, पुल देशपांडे उद्यान अशीही सर्व ठिकाणं धरली तर अस्सल पुणेकर सुद्धा चार आठ दिवस जिवाचे पुणे करत फिरू शकेल.
लंडनमध्ये एक "वन स्क्वेअर माईल" नावाचा भाग आहे - जुन्या "सिटी ऑफ लंडन"चा. (हो - सिटी ऑफ लंडन आणि लंडन ही वेगवेगळी शहरं आहेत.)
तसा पुण्यातही "एक चौरस मैल" आहे. गावातला, ऐन गर्दीचा गजबजलेला भाग. इथे पहाण्यासारखं म्हणजे खास पुणेरी दुकानं आणि त्यांचे अव्वल मालक.
- दगडूशेठ गणपतीकडून लक्ष्मी रस्त्याकडे जाताना काळे यांचं पेनचं दुकान आहे. अतिशय भारी दर्जाची फाऊंटन पेनं यांच्याकडे मिळतात. (माझ्या संग्रहीच्या आवडत्या पेनांमध्ये एक जर्मन पेलिकन आहे आणि दुसरं काळे!) निबची ५ वर्षांची वॉरंटी देणारे माझ्या माहितीत हे एकच महाभाग. पेनची कमाल किंमत रु. २१. पेन घेतल्यावर (तुम्ही नेहेमीचं गिर्हाईक नसाल तर) "पेन कसं वापरावं" यावरचं प्रवचनसुद्धा मिळतं.
- अहिल्यादेवी शाळेजवळ अभ्यंकरांचं चपलांचं दुकान आहे. त्यांच्याकडे अभेद्य चपला मिळतात. माझा एक मित्र अकरावीपासून बीएएमएस होईपर्यंत अभ्यंकरांच्या एकच चपला वापरत होता. त्या तोडण्यासाठी त्याने हरतर्हेचे प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही! माझ्या चपला पाचवं वर्षं नॉटाऊट काढताहेत!
- लक्ष्मी रस्त्यावर जनता खादी भांडार. साधे, झकास सुती / खादीचे कपडे. (त्याचा मालक थोडा "सखाराम गटणे" आहे!)
- लक्ष्मी रस्त्यावरच उंबर्या गणपती चौकात "बालाजी बेल्ट हाऊस" आहे. त्यांचे बेल्ट घ्यायला लोक कुठून कुठून येतात. मालकांचं आता वय झालं आहे. त्यामुळे सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास दुकान उघडतात. सुट्टे नसले तर सरळ "घेऊ नका" सांगतात.
उपहारगृहं आणि त्यांचे मालक हा तर वेगळाच विषय! मिसळवाले बेडेकर, रामनाथचा खन्ना, श्री उपहारगृहाच्या फटकळ मालकीणबाई असे अनेक नमुने. पेरूगेटासमोरच्या न्यू पूना बोर्डिंगचे प्राध्यापक उडपीकर माझ्या काकाला शिकवायला होते!
असं बरंच काही काही :)
हो.
मी नेहेमी घेतो ती पेनं १६ रुपयांना मिळतात (प्लॅस्टिकची बॉडी). मी हे कौतुक एका मित्राला सांगितलं. तो अगाव मनुष्य काळ्यांच्या दुकानात गेला आणि "सर्वात जास्त किमतीचं पेन द्या" असं काहीतरी म्हणाला. काळ्यांनी स्टीलची कॅप वगैरे असलेलं पेन त्याच्यासमोर ठेवलं आणि रु. २१ अशी किंमत सांगितली.
"अहो हे गिफ्ट द्यायचंय" मित्र त्या पेनाचं एकंदर रुपडं पाहून म्हणाला.
"तसली पेनं आम्ही ठेवत नाही. फरासखाना चौकातून डावीकडे वळलात तर व्हीनस दिसेल. तिथे मिळतील तुम्हाला तसली पेनं!" काळे मख्खपणे म्हणाले.
'आम्ही लिहायची पेनं विकतो, दाखवायची नव्हे. तसली पेनं घेणारे ** असतात' असं त्यांनी ध्वनित करून टाकल्याने मित्र रु. २१ चं पेन घेऊन निमूटपणे परतला. :)
माझ्याकडे मी सातवीला असताना घेतलेले काळे-पेन आहे.
मला नविन पेन घ्यायचंय म्हंटल्यावर वडिलांनी "चांगल्यापैकीच घे" म्हणून फ्लेअर, बटर्फ्लाय्,हिरो वगैरेंच्या हिशोबाने पैसे दिले. मी आणि माझे मित्र शाळेमागच्या गल्लीतून लगेच काळेंकडे ! भारी पेन द्या, असं म्हणालो तर, "कितवीला आहेस, मग काय करायचाय एव्हढा भारी पेन?" वगैरे सुरू केलं. तरी हट्टाने म्हणालो की, मी फक्त शाईपेन च वापरत आलोय. त्यात वाढदिवस पण आहे, नवीन घ्यायचाच तर भारी घे, म्हणून बाबांनी पैसे दिलेत. "असंय होय" म्हणत, त्यांनी मला हिरो-सारखं दिसणारं नीब आत घुसवलेले ते राखाडी रंगाचं पेन तात्काळ तयार (असेंबल) करून दिलं. लगेच तिथेच लिहुन वगैरे बघून, नीब सेटींग करुन दिलं मस्तपैकी! सोबत, एक काळ्या शाईचा पाऊच पण दिला वाढदिवसाची भेट म्हणून !! भारी होते ते काळेकाका.
उपाहार गृह आणि त्यांचे मालक यात सर्वात वरच्या क्रमांकावर येतील ते बादशाही चे तवकर आजोबा.
त्या नंतर वैद्य मिसळवाले रवीवार पेठेतले , एस पी समोरचे भेळेचे दुकानवाले आणि शिक्केवाले छत्रे ( अप्पा बळवंत चौक जुने रतन टॉकीज)
फक्त पंचावन्न??? विजुभाऊ काय म्हणतील मिपाबद्द्ल. त्यांना शंभर प्रतिसाद हवेत म्हणून ना त्यांनी पुण्यावर धागा टाकला. धिस इज अगदी अगेन्स्ट मिपाची क्रेडिबिलिटी बाबा. 'पुणे' असा नुसता शब्द उच्चारताच शंभरी भरली पाहिजे.
थोडी आटोमोबाईल मध्ये आवड असेल तर Autocluster, चिंचवड च्या अगदी पुढे तेथे "Science पार्क" सुरु झाला आहे. आटोमोबाईल कसे काम करते यापासुन सर्व भागांचे सेक्शन सुद्धा दिले आहेत. मुलांसाठी तर आवर्जुन जावे असे.
अवान्तर :- पुणे विषय असतांना पिंपरी चिंचवड ची माहिती चालते का हो :)
विजुभौ, मी तुमचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो. निषेध यासाठी की ''पुणे हे एक ऐतिहासीक शहर आहे.औरंगाबाद देखील तसेच आहे'' औरंगाबाद या ऐतिहासिक शहराची तुलना करायला एखादं तुल्यबळ शहर निवडायला पाहिजे होतं, असं माझं प्राथमिक मत आहे.
आमच्या औरंगाबाद शहराचा इतिहास काय सांगायचा. सातवाहन सम्राट आमच्या पैठणचे. पैठण तसं हाकेच्या अंतरावर. वेरुळ, अजिंठा बघायचं तर टाचा उंच करुन पाहिलं की लेण्या दिसतात. औरंगजेब विसावला तो इथेच. पैठणची पैठणी. हिमरु शाली, ही आमची ओळख. इ.स.पू. पासून आमच्या शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहे. आमच्या मराठवाड्यावर बहामनी,निझामशाही, आदिलशाही,बरीद शाही, कुतुब शाही, मोगल आणि हैदराबादचा निजाम यांनी राज्य केलंय. आहे का तसा कोणा शहराचा इतिहास ? स्वातंत्र्यही आम्हाला दीडवर्ष उशिरा मिळालं.
आमच्या मराठवाडा यातलं 'वाडा' शब्दांचा संबध 'पाटक' या शब्दाशी आहे. पाटकाचा विकास होऊन वाडा शब्द बनला. ऋग्वेदात 'पत' हा शब्द आहे त्याच्या अर्थ प्रवाहित होणे असा आहे. 'प्रपात' म्हणजे धबधबा प्रपातापासून पाटक शब्दाची जडणघडण झाली. पाटक म्हणजे पसरुन भिजणारी सपाट भूमी. आता ऋग्वेदात उल्लेख म्हणजे आमचा वारसा किती प्राचीन आहे, हे काय सांगायचं. पुराणे,महाकाव्ये, बौद्धवा:मय,जैन वाडःमय आणि इतर अनेक ग्रंथ इथलेच. त्याच्या खाणाखुणा शोधणा-याला दिसतात.
रेडे वेद वदले ते इथेच. नाथ,महानुभव, आणि वारकरी हे सर्व संप्रदाय फुलले इथेच. प्राचीन मानवी संस्कृतीचे अवशेष औरंगाबाद जिल्ह्यातच आढळले. अश्मयुगीन संस्कृतीच्या विविध अवस्थांचा विकास इथलाच. पुराणात असलेलं भोगवर्धन आमचं जालना जिल्ह्यातलं भोगवर्धन. असो.
खायचं म्हणाल तर मराठा हॉटेल गुलमंडीत आहे. लोक ताटकळतात तिथला चिकनचा रस्सा ओरपायला. बिर्याणी, तर क्या कहने. (हैदराबादी लोकांनी काहीही बनवलं तर अशी चवदार तर्री आणि टेष्ट असते त्यांच्या भाज्यांना की मत पुछो) माझ्याच तालुक्यात हंडी नावाचा प्रकार आहे. एका कापडाच्या गठुड्यात एक चिकनच्या भाजीचं भगुनं. सोबत वीस पंचवीस पोळ्या, कांदा,लिंबु, मीठ असा लवाजमा पाचशे रुपयात मिळतो. कुठेही पोहचती करतात ही मंड्ळी. नै तर त्यांच्या घरी जेवायला जायचं. शेनाने सारवलेल्या घरी बसावं लागतं. हाय का असं कुठं. असो.
विजुभौचा धागा म्हणुन भर घालणं आलं. :)
-दिलीप बिरुटे
पण पुण्याचा विषय असताना कोणी रत्नाङ्ग्रीस बरेवाईट काहीही का म्हणून म्हणेल? पुणे विरुद्ध मुंबै नामक रिक्काम** वादापासून रत्नाङ्ग्री अलिप्त आहे हे चाङ्गलेच आहे, नैका ;)
काय 'समजलेंनीत'? वशाडी येवो. :))
काय समजलें, समजलांत किंवा अगदी बाणकोटीत वैगरे असेल तर काय 'समाजलीव' (अर्थात हे आदरार्थी).
दिलेनीत, केलेनीत हे नेहमी तृतीयपुरुषी असते. तिथे नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलत असतो तेव्हां!! जसं की, 'किती घेतलंनीत/ घेतलंन् रे या उदबत्तीच्या पुड्याचे?'
जाणकार भर घालतीलच!! ;)
आम्चा जनम रत्नायरीचा. तिला बोल्ल्लेलं खपणार नाही. मी त्याना सैत्लय (सांगितलं आहे) तसेच थिबा राजाला कोणी बैत्लय (म्हणजे बगितलं आहे) असं उच्चारण लहानपणी ऐकलेलं आठवतंय !
पुणे आणि मुंबै या दोन्ही शहरांचे बहुचर्चित गुणविशेष रत्नांग्रीतूनच तिकडे गेलेले. त्यामुळे आम्हाला रत्नांग्रीची परंपरा पुढे चालल्याचा अभिमानच आहे. त्यातून तुम्ही जोपर्यंत वईवरून तात्त्विक वाद घालायला येत नाही, तोपर्यंत कोणीपण कायपण बोला. कोणाच्या तीर्थरूपांचे काय जाणारे?
'आडस!' म्हणजे पुणेरी भाषेतील 'लय भारी' या एक्स्प्रेशनद्वारे निर्देशिलेल्या गोष्टीपेक्षा जरा कांकणभर अजून भारी गोष्ट असेल तेव्हा वापरायचं रत्नांग्रीच्या नवीन पिढीचं एक्स्प्रेशन आहे..
ओह ओके, धन्यवाद!
(बादवे ते लय भारी हे मूळचे पुणेरी - कोङ्कणो-पुणेरी ऑर मावळी पुणेरी नसून दक्षिण महाराष्ट्रीय इंपोर्ट असण्याची जास्त शक्यता आहे.)
(खवळून झोपणार्या रंगहीन विचारांचा फ्यान) बॅटमॅन.
प्रतिक्रिया
हरकत नाही
महत्वाचे म्हणजे पुणेकरांमुळे
अर्थाचे काय हो काढेल तसा
चितळे हे मूळचे पुणेकर नव्हे.
विजुभाउ
फक्तं?
टीआरपी साठी माझाही प्रतिसाद
खॅ खॅ खॅ... जाज्वल्य पुणेकर..
ऐतिहासिकच का ते?
आणि अशा प्रकारे मैत्र ह्यांनी
लंडनमध्ये एक "वन स्क्वेअर
माहीती बद्दल धन्यवाद... पण एक शंका...
हो.
भन्नाट
मी पण काळे यांची पेन्स वापरली
खरंय!
(No subject)
उपाहार गृह आणि त्यांचे मालक
बादशाहीचे आजोबा आता वारले. लै
मागल्या शन्वारीच फोटो पायला
हे काय?
ररा,
गैरसमज
अजून एक,
पुणे विषय असतांना पिंपरी
नदीच्या अलीकडे
पुण्यात एके ठीकाणचे प्राणी
विजुभौचा निषेध. :)
बघा, बघा,
याला म्हणतात अभिमानाने लिहिणं
"इथे पुण्याची माहिती बर्
म्हणजे काय!
पुण्याचा विषय असताना
हो का?
पण पुण्याचा विषय असताना कोणी
'रत्नांग्री'
पण उच्चारी दोन्हीही शेम टु
काय 'समजलेंनीत'? वशाडी येवो.
अर्रर्र हो की, चुकलो. आयमाय
आमची भर
बोला तुम्ही!
आडस!
म्हञ्जे?
'आडस!' म्हणजे पुणेरी भाषेतील
ओह ओके, धन्यवाद!
असेलही... झी मराठीने खास
सहीsssss औरंगाबाद ची ही
दिलीपजी औरंगाबाद ला
अरे हो विसरलो...
१८ दरवाज्यांतून शहराबाहेर
Pagination